AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News: मोठी बातमी, विधान परिषद निवडणूक जाहीर

| Edited By: | Updated on: Mar 04, 2025 | 2:54 PM
Share

देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News: मोठी बातमी, विधान परिषद निवडणूक जाहीर
Maharashtra Live News Updates

शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे 19 वर्षांत तरुणीवर दोन जणांकडून बलात्कार प्रकरणी रांजणगाव पोलिसांनीदोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना 7 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी पीडित तरुणीच्या अंगावरील सोन जबरदस्ती काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीतून देखील मोठी बातमी समोर येत आहे. 65 बेकायदा इमारती उभारणारे भूमाफिया मोकाट फिरत आहेत. 260 हून अधिक भूमाफिया गायब, नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेच्या मोबाइल संचाची तांत्रिक तपासणी करण्यात येत असून, पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक तपासणीत उघडकीस आले आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Mar 2025 06:40 PM (IST)

    आयआयटी बाबांविरुद्ध एफआयआर दाखल

    जयपूर पोलिसांनी जयपूरमधील आयआयटी बाबांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. बाबाची तपासणी करताना, गांजा (अंमली पदार्थ) आढळून आला. तथापि, प्रमाण कमी असल्याने, बाबांना अटक करण्यात आली नाही.

  • 03 Mar 2025 06:21 PM (IST)

    अबू आझमी यांनी माफी मागावी: एकनाथ शिंदे

    महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांच्या मुंबईत झालेल्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांचे विधान अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ४० दिवस छळले आणि अशा व्यक्तीला चांगले म्हणणे हे मोठे पाप आहे, म्हणून अबू आझमी यांनी माफी मागावी. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा.

  • 03 Mar 2025 06:21 PM (IST)

    गुजरातहून महाराष्ट्राकडे जाणाऱ्या बसला लातूरमध्ये अपघात, २० जण जखमी

    अहमदपूर लातूरहून येणाऱ्या बसला आज दुपारी अडीच वाजता महाराष्ट्रातील लातूर शहराजवळील नांदगाव पार्टी येथे अपघात झाला. ही बस अहमदपूरहून लातूरला येत होती. बस नांदगाव पार्टी येथे पोहोचताच, वेगाने येणाऱ्या मोटारसायकलला टाळण्यासाठी चालकाने बस दुभाजकावर आदळवली. यादरम्यान एक भीषण अपघात झाला आणि बस उलटली. या अपघातात २० ते २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लातूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 03 Mar 2025 05:55 PM (IST)

    वाळू माफियांवर छापे

    कल्याण रेतीबंदर खाडी परिसरात रेतीबंदर ते उंबर्डे दरम्यान बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी रेती बंदर ते उंबर्डे दरम्यान खाडीलगत छापे टाकले.

  • 03 Mar 2025 05:40 PM (IST)

    संघर्ष समितीच्या वतीने रायगड भवनवर आंदोलन

    घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने रायगड भवनवर 2011 पूर्वीच्या झोपड्याचा सर्वे करण्यात यावा, 2011 पूर्वीच्या झोपडीवर तोडक कारवाई थांबवावी, यासाठी आंदोलन करण्यात आले.

  • 03 Mar 2025 05:20 PM (IST)

    अकोल्यामध्ये काँग्रेसचे आंदोलन

    भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा या पिकांची शासनाने खरेदी करावी, या मागणीसाठी अकोल्यामध्ये आज काँग्रेसकडून धरणे आंदोलन करण्यात आली.

  • 03 Mar 2025 05:04 PM (IST)

    अमरावतीमध्ये धरणे आंदोलन

    बिहार बुद्धगया येथील महाबोधी महाविहार येथील 1949 चा महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट कायदा दुरुस्त करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, अशी मागणी बौद्ध समाजाचे वतीने करण्यात आली. अमरावतीच्या जिल्हाधीकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन त्यासाठी करण्यात आले.

  • 03 Mar 2025 03:32 PM (IST)

    मोठी बातमी, विधान परिषद निवडणूक जाहीर

    राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा निकालानंतर परिषदेच्या 5 जागा रिक्त होत्या. विधान परिषदेतील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

  • 03 Mar 2025 03:26 PM (IST)

    विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    लोकांनी आम्हाला प्रचंड बहुमत दिलंय. विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ नाही. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील,असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच शिंदेंनी मविआवर टीका केली केली. मविआ म्हणजे महाराष्ट्र विरोधी आघाडी, असं शिंदे म्हणाले.

  • 03 Mar 2025 11:59 AM (IST)

    बीड महादेव मुंडे हत्या प्रकरण: महादेव यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचे आमरण उपोषण;आरोपींना पकडण्याची मागणी

    महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आमरण उपोषण केलं आहे. आज (3 मार्च2025 )पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी उपोषणाला करणार सुरुवात केली आहे.उपोषणस्थळी ज्ञानेश्वरी मुंडे यांचे कुटुंबीय देखील दाखल झाला आहेत. 16 महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांची परळी तहसील समोरील मैदानात हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार असून जोपर्यंत आमच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण असंच सुरू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

  • 03 Mar 2025 11:42 AM (IST)

    Pune Crime: दत्ता गाडे आणि पीडित तरुणीचा कोणताही संपर्क नाही; पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर

    पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकावर गेल्या आठवड्यात एका तरुणीवर अत्याचार झाला होता. याच गुन्ह्यातील गुन्हेगार दत्ता गाडे आणि पीडित तरुणीचा कोणताही संपर्क नाही पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर. गाडे याने वकिलांमार्फत आपण पीडित तरुणीला महिनाभरापासून ओळखत होतो. असा दावा केला होता. त्यामुळे या दोघांच्या फोन कॉलची चौकशी व्हावी, अशी मागणी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी केली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केल्यानंतर त्याच्या आणि पीडितेच्या मोबाईलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासले आहेत. यामध्ये कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आलेले नाही.

  • 03 Mar 2025 11:25 AM (IST)

    कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्तानं भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने

    नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान सभापती विरोधात अविश्वास ठराव झाल्याने 18 पैकी 15 सदस्य विद्यमान सभापतींच्या विरोधात आहेत. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्वास सादर करणारे 15 सदस्य पोलीस बंदोबस्तात दाखल झाले आहेत. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्ताने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झालं आहे. ज्यांचा विरोधात अविश्वास ठराव आणला आहे ते अजित पवारांचा राष्ट्रवादीचे नेते आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 03 Mar 2025 10:58 AM (IST)

    पुणे – दत्ता गाडे आणि पीडित तरुणीचा कोणताही संपर्क नाही….

    पुणे  बलात्कार प्रकरण – आरोपी दत्ता गाडे आणि पीडित तरुणीचा कोणताही संपर्क नाही अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

    दत्तात्रय गाडे याने वकिलांमार्फत आपण पीडित तरुणीला महिनाभरापासून ओळखत होतो असा दावा केला होता. मात्र संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले नाही.

  • 03 Mar 2025 10:39 AM (IST)

    हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधानभवनात

    हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. मुलभूत अधिकार शाबित राहिले पाहिजेत – आव्हाडांची मागणी

  • 03 Mar 2025 10:29 AM (IST)

    चंद्रपूर :- प्रेमीयुगुलाची वीज टॉवरला गळफास लावून आत्महत्या

    प्रेमीयुगुलाने वीज टॉवरला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील उचली शिवारात उघडकीस आली. रोहित रमेश लिंगायत (25) आणि 14 वर्षीय मुलीने आपली जीवनयात्रा संपविली.

  • 03 Mar 2025 10:15 AM (IST)

    राज्यात केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नाही – संजय राऊत

    राज्यात रोज लाडक्या बहिणींचा विनयभंग होत आहे, राज्यात केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नाही – संजय राऊतांचे टीकास्त्र

  • 03 Mar 2025 10:08 AM (IST)

    दिनकर पाटील हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंज येथे आले

    दिनकर पाटील हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंज येथे आले आहेत. भेटीचे कारण दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले नसले तरी मोठ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी तातडीने बोलवल्याची माहिती समोर आली आहे.

  • 03 Mar 2025 09:57 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यात 2024 या एका वर्षात तब्बल 56 बलात्काराच्या घटना

    जळगाव जिल्ह्यात 2024 या एका वर्षात तब्बल 56 बलात्काराच्या तर 231 विनयभंग घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे वर्षभरात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या तब्बल 95 घटना तर अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या 87 घटना घडल्या आहेत. छेडखानी, विनयभंग, अत्याचार अशा घटना पाहता पोलिसांचा धाक संपला की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.

  • 03 Mar 2025 09:56 AM (IST)

    पूर्व द्रुत गती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

    ठाणे ते मुलुंड-ऐरोली मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा. गेल्या एक तासापासून वाहतूक कोंडी रस्त्यावर दिसून येत आहे. सिग्नल यंत्रणा आणि वाहन बंद पडल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहन अडकून पडली आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे आणि मुंबई वाहतूक विभागाची नाचक्की.

  • 03 Mar 2025 09:54 AM (IST)

    रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेड प्रकरणात चौघांना अटक

    केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेड प्रकरणात सात आरोपींपैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पॉस्को अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे. या आरोपींना न्यायालयात आज दुपारी हजर केलं जाणार आहे.

  • 03 Mar 2025 09:14 AM (IST)

    आधारकार्ड, पॅन कार्ड नाल्यात सापडल्याने खळबळ

    टपालाने येणारे आधारकार्ड, पॅन कार्ड, नियुक्ती पत्र चक्क विरार पश्चिम पुरापाडा येथील एका नाल्यात सापडल्याने खळबळ माजली आहे. अर्नाळा भागातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कावळी, जागरूक नागरिक संतोष शिर्के, गणेश तांडेल यांनी हा सर्वप्रकार उघड केला आहे. सापडलेल्या कागदपत्रात आधारकार्ड, पॅन कार्ड, एल आय सी पत्र, नियुक्ती पत्र अशा कागदपत्राचा समावेश असून हे सर्व अर्नाळा गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील पत्यावरील असल्याचे समोर आले आहे. जागरूक नागरिकांनी नाल्यात सापडलेली सर्व कागदपत्र जमा करून ती अर्नाळा पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत.

  • 03 Mar 2025 08:58 AM (IST)

    Maharashtra News: नाशिकच्या भाभानगर दर्ग्यासंदर्भात आज वक्फ बोर्डात सुनावणी

    सात पीर दर्गा विरुद्ध नाशिक महानगर पालिका यांच्यात सुनावणी… छत्रपती संभाजीनगर येथे ही सुनावणी होणार… सकल हिंदू समाजाच्या वतीनेही हस्तक्षेप याचिका दाखल होण्याची शक्यता… नाशिकच्या जिल्हा न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतांना वक्फ बोर्डात सुनावणी… फेब्रुवारी महिन्यात नाशिक महानगरपालिकेने दर्ग्याच्या परिसरातील काढले होते अतिक्रमण… वक्फ बोर्डाच्या सुनावणीत आज काय घडतं याकडं लक्ष

  • 03 Mar 2025 08:35 AM (IST)

    Maharashtra News: मार्चच्या पहिल्या दिवसापासून शहरातील किमान व कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात

    नाशिक | मार्चच्या पहिल्या दिवसापासून शहरातील किमान व कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात… किमान तापमान १७.९ अंश सेल्सियस, तर कमाल तापमानाने ३५.४ अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडला.. पुढील काही दिवसांत तापमान ३६ ते ३८ अंशांपर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली… उत्तरेकडील गार वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता उष्णतेच्या लाटांची शक्यता… सलग आठ दिवसांपासून नाशिक शहरात कोरडे हवामान… कमाल तापमानाच्या वाढीमुळे उकाडा, सकाळपासून उन्हाच्या झळा

  • 03 Mar 2025 08:19 AM (IST)

    Maharashtra News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान करणाऱ्या विरोधात आज अमरावतीत शिवसन्मान महामोर्चाचे आयोजन…

    काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर तसेच आता प्रशांत कोरटकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन… मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी,शिवप्रेमी सहभागी होणार… खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, बच्चू कडू, यशोमती ठाकूर देखील मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती… अमरावतीच्या डॉ पंजाबराव देशमुख स्मारक पंचवटी चौक येथून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा इर्विन चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा..

Published On - Mar 03,2025 8:03 AM

Follow us
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.