LIVE | मोठी बातमी: सातारा-पंढरपूर एसटीवर दरोडा, एसटी बसचा ताबा दरोडेखोरांच्या ताब्यात

| Updated on: Jan 19, 2021 | 11:38 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE | मोठी बातमी: सातारा-पंढरपूर एसटीवर दरोडा, एसटी बसचा ताबा दरोडेखोरांच्या ताब्यात
Breaking News

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Jan 2021 11:15 PM (IST)

    सातारा-पंढरपूर एसटीवर दरोडा, एसटी बसचा ताबा दरोडेखोरांच्या ताब्यात

    पंढरपूर सातारा रस्त्यावर पिलिव घाटात दगडफेक, येणाऱ्या प्रत्येक गाडीवर दहा ते पंधरा लोक करत आहेत दगडफेक, पंढरपूरमधून साताराकडे जाणऱ्या एसटीचा ड्रायव्हर जखमी, दरोडेखोर असल्याची शक्यता, पंढरपूर सातारा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद

  • 19 Jan 2021 10:55 PM (IST)

    प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची ‘संत परंपरा‘ राजपथावर दिसणार

    महाराष्ट्राची ‘संत परंपरा‘ राजपथावर दिसणार – प्रजासत्ताक दिनी राजपथावर ‘संत परंपरा‘ – शिवाजी महाराज आणि संत तुकाराम भेटीचा फिरता देखावा असेल – तुकारामांची गाथा राजपथावर दिसेल – संत साहित्याची महती पाहायला मिळणार – वारकरी चित्ररथावर पाहायला मिळणार – यात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत गोरोबा, संत जनाबाई यांचा देखावा अंतिम टप्प्यात

  • 19 Jan 2021 10:34 PM (IST)

    मीरा-भाईंदरमध्येही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची भीती

    मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील पक्षांना बर्ड फ्ल्यूची लागणं झाल्याचे समोर येत आहे. मागील काही दिवसात मीरा भाईंदर शहरातील 15 कावळे आणि 5 कबुतरांचा मृत्यू झाला आहे. त्यांची पालिका प्रशासनाकडून विल्हेवाट लावण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात दाखल झालेल्या ‘बर्ड फ्ल्यू’मुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर शहरातदेखील पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर येत आहे. मागील काही दिवसात शहरातील विविध परिसरातील 15 कावळे आणि पाच कबुतरांचा ‘बर्ड फ्ल्यू’मुळे मृत्यू झाला आहे, अशी आशंका व्यक्त करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाकडून ‘बर्ड फ्ल्यू’ बाबत काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, शहरात कुठेही मृत कोंबड्या, कावळे, पक्षी आढळून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ महापालिकेच्या पशु विभागातील डॉ. विक्रम नाराटले यांच्याशी ९८१९५४४६४२ या नंबर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 19 Jan 2021 10:08 PM (IST)

    मराठा आरक्षणावर उद्यापासून नियमित सुनावणी सुरू होणार

    मराठा आरक्षणावर उद्यापासून नियमित सुनावणी सुरू होणार असून, या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मराठा आरक्षणावरील उद्याची सुनावणी घटनापीठासमोर होणार आहे, 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे.

  • 19 Jan 2021 09:32 PM (IST)

    कल्याणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, दोन कोंबड्यांचा मृत्यू

    ठाणे : कल्याण डोंबिवली महापलिका हद्दीत असलेल्या आटाळी काकडी पाडा येथे 13 जानेवारी रोजी दहा कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे नमुने तपासणीसाठी पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रयोग शाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून या दहा कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कल्याणमध्ये बर्ड फ्लू दाखल झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. एमसीकरून परिसरात सर्वेक्षण करण्यात आले आहे. अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही तसेच कोंबड्या मारण्यासाठी कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पाटील यांनी दिली आहे

  • 19 Jan 2021 07:28 PM (IST)

    मुंबईतील शेतकरी आंदोलनात शरद पवार उपस्थित राहणार : नवाब मलिक

    मुंबई : दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे २५ जानेवारी रोजी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी कायद्याला विरोध केला आहे. आता या आंदोलनात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते व मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत असेही मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

  • 19 Jan 2021 07:08 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यातील 622 पैकी 320 ग्रामपंचायतींमध्ये महिला राज

    उस्मानाबाद जिल्ह्यातील 622 पैकी 320 ग्रामपंचायतींमध्ये महिला राज, अनुसूचितातीच 53 तर अनुसूचित जमातीच्या नऊ महिलांना संधी, ओबीसी महिलांसाठी 86 तर खुल्या प्रवर्गातील 172 महिलांना सरपंच पदाची संधी, एका ग्रामपंचायतीचा बहिष्कार, 22 जानेवारीला होणार आरक्षण सोडत, उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांची माहिती, 428 ग्रामपंचायतीसाठी झाली होती निवडणूक मात्र 2021 ते 2015 या काळात होणाऱ्या इतर ग्रामपंचायतसाठी सरपंच पदाला हे आरक्षण लागू राहणार

  • 19 Jan 2021 07:05 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 2294 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 50 जणांचा मृत्यू

    राज्यात आज दिवसभरात 2294 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर दिवसभरात 50 रुग्णांच्या मृत्यूची नोंद, दिवसभरात 4516 रुग्णांना डिस्चार्ज, आतापर्यंत 18 लाख 94 हजार 839 रुग्म बरे, राज्यात सध्या 48 हजार 406 बाधित रुग्ण

  • 19 Jan 2021 07:00 PM (IST)

    चिपी विमानतळ केव्हा सुरू होणार याबाबत अजूनही संभ्रम, मनसेचे चिपीत कागदी विमाने उडवत आंदोलन

    सिंधुदुर्ग : चिपी विमानतळ केव्हा सुरू होणार याबाबत अजूनही संभ्रम. मनसेचे अनोखे आंदोलन. चिपी विमानतळावरून वारंवार उद्घाटनाच्या तारख्या देणाऱ्या सत्ताधारी आणि शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी कागदी विमाने उडवली. माजी आमदार आणि मनसेचे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी चिपीत जाऊन कागदी विमाने हाताने उडवून शासनाचा निषेध

  • 19 Jan 2021 06:21 PM (IST)

     पुण्यात दिवसभरात 182 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 11 रुग्णांचा मृत्यू, 335 रुग्णांना डिस्चार्ज

    पुणे :  - दिवसभरात १८२ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ, दिवसभरात ३३५ रुग्णांना डिस्चार्ज, दिवसभरात पुण्यात करोनाबाधित ११ रुग्णांचा मृत्यू, यापैकी ६ रूग्ण पुण्याबाहेरील. - २०३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १८३४७७. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३०४. - एकूण मृत्यू -४७१४. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १७६४५९. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २३४०.

  • 19 Jan 2021 06:18 PM (IST)

    कोबी 2 तर फ्लॉवर 3 रुपये किलो, नवी मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर घसरले

    नवी मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. बाजार आवारात ग्राहक नसल्याने मालाची उठाव नसल्याचे दिसून आले. भाजीपाला मार्केटमध्ये आज  630 गाड्यांची विक्रमी आवक झाली असून भाज्यांचे दरकमी झाले आहेत. कोबी 2 रुपये किलो, फ्लावर 3 रुपये किलो, वांगी 8 रुपये, कारले 15 रुपये, वटाने 10 ते 14 रुपये किलो विकले जात आहे. बाजारात ग्राहक नसल्याने शेतकऱ्यांना मोठं नुकसान होत आहे.

    भाजीपाला मार्केटमध्ये तब्बल 630 वाहनांची आवक झाली. पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा आणि इतर राज्यातूनही भाजीपाला विक्रीसाठी आला. आवक जास्त असल्यामुळे ग्राहक नसल्याने मालाची उठाव नाही. वटाने,  फरशवी , शेंगाच्या बरोबर इतर भाज्यांची दरात घसरण झाली आहे.

  • 19 Jan 2021 04:50 PM (IST)

    मंत्री शंकरराव गडाख यांच्या कारखान्याची बिनविरोध निवडणूक, 17 सदस्यांची बिनविरोध निवड

    शिर्डी : मंत्री शंकरराव गडाख यांच्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. यात  नेवासा तालुक्यातील मुळा सहकारी साखर कारखान्यात सतरा सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील नामांकित कारखाना म्हणून याची ओळख आहे. ज्यात सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा कारभार चालणार आहे. मुळा सहकारी साखर कारखान्यात ऐतिहासिक निर्णय झाला आहे.

  • 19 Jan 2021 02:10 PM (IST)

    भाजप आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात

    भाजप आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात, आयपीसी कलम 68 अंतर्गत घेतलं ताब्यात, वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र आगरकर यांची टिव्ही 9 ला माहिती,

  • 19 Jan 2021 01:39 PM (IST)

    भाजप आमदार राम कदम यांचा घाटकोपर चिरागनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

    भाजप आमदार राम कदम यांचा घाटकोपर चिराग नगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, सरकारविरोधात नारेबाजी, पालघर प्रकरण सीबीआयला सोपवा अशी मागणी, तांडव निर्मात्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस तयार पण महाराष्ट्र सरकार रोखत असल्याचा राम कदम यांचा आरोप, सरकारचे कान उघडण्यासाठी राम कदम यांचा शंखनाद सुरु

  • 19 Jan 2021 01:03 PM (IST)

    कोल्हापुरात शिवसैनिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पायाचा पुतळा जाळला

    कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसैनिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पायाचा पुतळा जाळला, येडियुरप्पा यांनी सीमाप्रश्न आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद, काल कन्नड रक्षक वेदिकेने जाळला होता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा, शिवसैनिकांकडून कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा

  • 19 Jan 2021 12:16 PM (IST)

    रत्नागिरीत कोरोना लसीकरणाला पुन्हा सुरुवात

    रत्नागिरी : कोरोनाची लस देण्यास पुन्हा एकदा सुरुवात, आठवड्यातून चार दिवस दिली जाणार लस, मंगळवार-बुधवार आणि शुक्रवार-शनिवारी दिली जाणार लस, रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी लसीकरणाला सुरुवात, जिल्ह्यातील 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना आज दिली जाणार लस

  • 19 Jan 2021 12:14 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, खंडाळा तालुक्यातील मृत कोंबड्यांचा अहवाल पाॅझिटीव्ह

    सातारा जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, खंडाळा तालुक्यातील मृत कोंबड्यांचा अहवाल पाॅझिटीव्ह, 5 दिवसांपूर्वी, मरिआईचीवाडी येथील 92 कोबंड्यांचा अचानक झाला होता मृत्यू, पुणे येथील रोग अन्वेशन संस्थेला 8 मृत कोबड्यांचे नमुने दिले होते तपासणीला, बाधित क्षेत्रातील 3 हजारहुन अधिक कोंबड्या आणि अंड्याची विल्हेवाट लावण्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आदेश

  • 19 Jan 2021 11:48 AM (IST)

    TRP घोटाळ्याचा तपास योग्य दिशेने, अर्णव गोस्वामींचे चॅट गंभीर : गृहमंत्री अनिल देशमुख

    TRP Scam Arnab Goswami |  टीआरपी घोटाळ्याचा‌ तपास चांगल्या पद्धतीनं सुरु आहे. त्यात काही टीआरपी वाढल्याचा प्रकार घडल्याचं उघड‌ झालंय, ही चौकशी वरिष्ठ अधिकारी करत आहेत. पुलवामा, बालाकोट हल्ला झाल्यानंतर ते ‌चॅट वायरल झालेत ते गंभीर आहे. २६ फ्रेबुवारीला हल्ला झाला, २३ तारखेला त्याला माहिती कशी मिळाली. हा राष्ट्रीय सुरक्षितेचा प्रश्न आहे. केंद्र सरकारनं याची दखल घ्यायला हवी. डीटूएच दूरदर्शनचा वापर रिपब्लिक चॅनेलने फुकट केला. केंद्र सरकार आणि अर्णव गोस्वामींचे‌ कसे संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे - गृहमंत्री अनिल देशमुख

  • 19 Jan 2021 11:36 AM (IST)

    महौपार किशोरी पेडणेकर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

    मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली, 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवस, दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालय समोर बाळासाहेबांचा पुतळा बसवण्यात आला आहे याचं अनावरण सोहळा असणार आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण सर्वपक्षीय नेत्यांना दिलं जात आहे , शरद पवार , देवेंद्र फडणवीस , राज ठाकरे अशा मोठ्या नेत्यांना स्वतः महापौर निमंत्रण देत आहेत

  • 19 Jan 2021 11:27 AM (IST)

    भाजपच नंबर वन, काँग्रेस चौथ्या नंबरवर, केशव उपाध्येंचा दावा

    भाजपची पत्रकार परिषद, केशव उपाध्ये लाईव्ह

    प्रत्येकाने आम्हीच किती मोठे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मी प्रत्येक पंचायतीची आकडेवारी आणली आहे. आम्ही सहा हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकू असा विश्वास मी व्यक्त केला होता. ही गावागावाची निवडणूक होती. ,सामान्य लोकांनी भाजपवर विश्वास दाखवला. भाजपने सहा हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या. माझ्याकडे चार्ट आहे. आम्ही बोलतो ते ठोस आकडेवारीवर बोलतो, उगाचच दावे करत नाही.

    5800 पेक्षा अधिक ग्रामपंचायती आम्ही अधिक जिंकल्या आहेत. गडचिरोली आणि काही ठिकाणची आकडेवारी यायची बाकी आहे. भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. काँग्रेसने दावा केलाय पण सत्ताधीर पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी तरी काँग्रेसचा दावा मान्य करेल का काँग्रेसची अवस्था दयनीय आहे, पण त्यांना त्यांचे मित्र पक्ष तरी विचारतात का हा प्रश्न आहे.

    काँग्रेस हा चौथा नंबरवर आहे. त्यांनी मांडलेल्या जागांचा हा दावा त्यांच्या दोन्ही मित्र पक्षांना तरी मान्य आहे का?

  • 19 Jan 2021 11:04 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील शाळा 27 जानेवारीला सुरु होण्यावर प्रश्नचिन्ह

    पुणे : जिल्ह्यातील शाळा 27 जानेवारीला सुरु होणार का यावर प्रश्नचिन्ह, पालकांनी मुलांच हमीपत्र शाळेकडे दिलं तरच 5 ते 8 वीच्या शाळा उघडल्या जाणार, पालकांच प्रबोधन करण्याचं काम सुरू, शिक्षकांची कोरोना चाचणी आणि कोरोनाचे सगळे नियम पाळूनचं शाळा सुरू केल्या जाणार, मात्र पालकांचं हमीपत्र शाळा सुरु करण्यातील मोठा अडसर, पालकच शाळेकडे मागतायेत हमीपत्र, शाळेनं हमीपत्र दिलं तरच पाल्यांना शाळेत पाठवणार, मात्र पालकांनी हमीपत्र दिलं तरचं शाळा उघडणार, राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची माहिती

  • 19 Jan 2021 09:46 AM (IST)

    दुहेरी हत्याकांडात आरोपी जामखेडच्या नाहोली ग्रामपंचायतीतून विजयी

    अहमदनगर : जेलमध्ये असतांनाही उमेदवार आला निवडून, जामखेड तालुक्यातील नाहोली ग्रामपंचायतीतील उमेदवार, उमेदवार काकासाहेब बबन गर्जे हा तुरुंगात असतानाही आला निवडून, गर्जे हा 2018 मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडात आरोपी असून, सध्या जामखेड तुरुंगात आहे, त्याने निवडणूक अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची सुटी घेतली होती, अर्ज भरल्यानंतर पुन्हा त्याची रवानगी तुरुंगात झाली, मात्र सोमवारी लागलेल्या निकालात तो विजयी ठरला,

  • 19 Jan 2021 08:52 AM (IST)

    बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास 28 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

    पुणे : बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ, आता विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 28 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार, नियमित शुल्कासह 19 ते 28 जानेवारीपर्यंत, तर विलंब शुल्कासह 29 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार, राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांची माहिती

  • 19 Jan 2021 08:44 AM (IST)

    कंगनाविरोधात कोर्टाचा अवमान केल्या बाबत अर्ज दाखल

    अभिनेत्री कंगना रनौतविरोधात कोर्टाचा अवमान केल्या बाबत अर्ज दाखल, कास्टिंग डायरेक्ट मनवर अली सय्यद यांनी केला अर्ज दाखल

  • 19 Jan 2021 08:41 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यातील 3,695 शिक्षकांची कोरोना चाचणी होणार

    रत्नागिरी- जिल्ह्यातील 3 हजार 695 शिक्षकांची कोरोना चाचणी होणार, 5 ते 8 वीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरु होणार असल्याने प्रशासनाचा निर्णय, जिल्ह्यात सर्व माध्यमाच्या अध्यापन करणाऱ्या 3202 शाळा, शिक्षकांची तालुक्याच्या ठिकाणीच होणार कोरोनाची चाचणी

  • 19 Jan 2021 08:33 AM (IST)

    औरंगाबादेत कोरोना लसीचं 90 जणांना रिअ‍ॅक्शन, लसीबाबत भीतीचं वातावरण

    औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना लसीची 90 जणांना रिअ‍ॅक्शन, 352 स्वयंसेवकांपैकी तब्बल 90 जणांना रिअ‍ॅक्शन, ताप मळमळ आणि अंगदुखी सारखी आढळली लक्षणे, लसीकरणानंतर रिअ‍ॅक्शन होत असल्यामुळे लसीबाबत भीतीचं वातावरण

  • 19 Jan 2021 07:52 AM (IST)

    पुण्यातील सीओईपी मैदानावर उभारलेले जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद

    पुणे : सीओईपी मैदानावर उभारलेले जम्बो कोविड सेंटर अखेर बंद करण्यात आलं, येथे गेल्या सहा महिन्यांत तब्बल 1,911 जणांवर उपचार, उपचार घेणारे शेवटचे काही बाधित बरे होऊन गेल्यानंतर जम्बो कोविड सेंटर बंद, दरम्यान, सहा महिन्यांत या रुग्णालयावर तब्बल 105 कोटींचा खर्च

  • 19 Jan 2021 07:49 AM (IST)

    ‘काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील नेत्यांना मिळावं’, बाळू धानोरकरांची मागणी

    ‘काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील नेत्यांना मिळावं’, ग्रामपंचायतीमध्ये विदर्भातील यशानंतर नेत्यांची दोवेदारी, ‘काँग्रेसला आक्रमक आणि सर्वांना घेऊन चालणारा अध्यक्ष हवा’, विदर्भात पक्षाला मोठा स्कोप, पक्षाने विदर्भातला प्रदेशाध्यक्ष द्यावा, राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी घेतली हायकमांडची भेट, प्रदेशाध्यक्ष होणाऱ्या व्यक्तीकडे मंत्रीपद असावं, खासदार बाळू धानोरकर यांची मागणी

  • 19 Jan 2021 07:48 AM (IST)

    जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन, आंबेगावात विजयी उमेदवाराची मिरवणूक काढणाऱ्या 15 ते 20 जणांवर गुन्हा

    पुणे : आंबेगाव तालुक्यातील खडकवाडीमधील ग्रामपंचायत निकालानंतर विजयी मिरवणूक काढणाऱ्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि दोन महिला सदस्याच्या पती आणि अन्य 15 ते 20 जणांविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अनिल सखाराम डोके,संतोष चंदर डोके,गुलाब वाळुंज,सुभाष लहू सुक्रे यांच्या सह 15 ते 20 जणांवर 188 ,135 कलामांअंतर्गत गुन्हा दाखल, गावामध्ये जेसीबीच्या रोडर मध्ये गुलाल भंडारा भरुन विजयी उमेदवाराची मिरवणूक काढून पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी केला गुन्हा दाखल, या मिरवणुकीत वापरलेला जेसीबी मंचर पोलिसांनी केला जप्त

  • 19 Jan 2021 07:45 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 125 ग्रामपंचायतीमध्ये झालं सत्तांतर

    कोल्हापूर : जिल्ह्यात तब्बल 125 ग्रामपंचायतीमध्ये झालं सत्तांतर, 232 ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी दिलं स्पष्ट बहुमत, तर 155 ठिकाणी स्थानिक आघाडीपेक्षा पक्षांनाच पसंती, जिल्ह्यात सहा ठिकाणी आणि सत्तेच त्रांगडं, शिरोळ तालुक्यातील तीन, करवीर मध्ये दोन तालुक्यात एका ठिकाणी अपक्ष ठरवणार कारभारी

  • 19 Jan 2021 07:28 AM (IST)

    बोदवड तालुक्यातील मनुर बुद्रुक येथे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पॅनलचा धुव्वा

    जळगाव : बोदवड तालुक्यात प्रस्थापितांना हादरे, बोदवड तालुक्यातील मनुर बुद्रुक येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पॅनलचा धुव्वा तर पुतण्याचाही पराभव, ईश्वर चिठ्ठीने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे भाचे आणि सुनेचा या ठिकाणी पराभव, तालुक्यातील नाडगाव ग्रामपंचायत साठी झाली होती निवडणूक

  • 19 Jan 2021 07:28 AM (IST)

    अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन संचालक मंडळाला धर्मादाय आयुक्तांचा दणका

    कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन संचालक मंडळाला धर्मादाय आयुक्तांचा दणका, मानाचा मुजरा कार्यक्रम गैरव्यवहारातील 10 लाख 78 हजार रुपये पंधरा दिवसात भरण्याचे आदेश, अभिनेत्री अलका कुबल, अभिनेता विजय पाटकर, दिग्दर्शक विजय कोंडके सह 11 जणांना लागू करण्यात आला आदेश, टंक लेखनातील चुकीचा गैरफायदा घेत पैसे लाटल्याचा तत्कालीन संचालक मंडळावर आरोप

  • 19 Jan 2021 07:28 AM (IST)

    नागपुरातील कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी जारी केले आदेश

    नागपुरातील कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी जारी केले आदेशक्रीडा स्पर्धा आणि उपक्रमांनाही परवानगी, कोव्हिड-29 ची नियमावली पाळून मिळाली सशर्थ परवानगी, क्लासेसमधील शिक्षकांना कोव्हिड चाचणी अनिवार्य, नऊ महिन्यानंतर नागपूरात कोचिंग क्लासेस होणार सुरु

  • 19 Jan 2021 07:27 AM (IST)

    विदर्भात ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेला यश

    विदर्भात ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेला यश, यवतमाळ वणी, वर्धा समुद्रपूर, नागपूरमध्ये मनसेला यश, वणीमध्ये 15 ग्रामपंचायत जिंकल्याचे मनसे नेते राजू उंबरकरचा दावा, समुद्रपूरमध्ये गिरड, कोरा, एकोडीसह इतर ठिकाणी यश मिळाल्याचा दावा, मनसे नेते अतुल वांदिलेंचा दावा, चंद्रपुर, गोंदिया जिल्ह्यातंही मनसेचे सदस्य आले निवडून, विदर्भातील गावांमध्ये मनसेचं यश

  • 19 Jan 2021 07:27 AM (IST)

    वडोदा येथे डॉक्टर राजेंद्र फडकेंच्या गावात राष्ट्रवादी आणि भाजपला समसमान जागा

    मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथे डॉक्टर राजेंद्र फडके यांच्या गावात राष्ट्रवादी भाजप समसमान जागा, निर्विवाद बहुमत राखण्यात भाजपाला या ठिकाणी आले अपयश, फडके बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक आहेत यांच्या पुरस्कृत भाजपाच्या समर्थक उमेदवारांना 7 व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघडीला 7 अशा एकूण 14 जागा मिळाल्याने दोन्ही समसमान तिथे आलेली आहे

  • 19 Jan 2021 07:06 AM (IST)

    मुक्ताईनगरात कोणाची बाजी? 51 ग्रामपंचायतींसाठी 90 प्रतिदावे

    मुक्ताईनगर : मुक्ताईनगरच्या 40 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा दावा, तर 35 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा दावा, भाजपाने 12 ग्रामपंचायतीवर विजय मिळवण्याचा दावा केला, मात्र ग्रामपंचायत निवडणूक 51 ग्रामपंचायतची झाली, दावे-प्रतिदाव्यांमुळे एकूण गणणा 90 पर्यंत पोहोचली असून सरपंचपदाची निवड नंतरच खरे चित्र स्पष्ट होईल

  • 19 Jan 2021 06:58 AM (IST)

    भुसावळमध्ये ग्रामपंचायत पॅनलविना अनेक गावांमध्ये निवडणूक, काही मातब्बरांना दिला हादरा

    भुसावळ : तालुक्यात ग्रामपंचायत पॅनलविना अनेक गावांमध्ये निवडणूक, काही मातब्बरांना दिला हादरा, भुसावळ तालुक्यात अनेक गावांमध्ये पॅनलविनाच निवडणूक झाली असली तरी, विजयाचे दावे प्रतिदावे सर्वच पक्षांनी केली आहे, तालुक्यातील साकरी व बोहर्डी, येथे समान मते पडल्यामुळे ईश्वर चिठ्ठीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोपान भारंबे यांचा पराभव झाला आहे

  • 19 Jan 2021 06:44 AM (IST)

    कोथळी ग्रामपंचायतचे 'ते' विजयी उमेदवार ना भाजपाचे ना राष्ट्रवादीचे

    मुक्ताईनगर : कोथळी ग्रामपंचायतचे ते विजयी उमेदवार ना भाजपाचे ना राष्ट्रवादीचे केवळ खडसे परिवाराचे, त्यामुळे संभ्रमाचे वातावरण, ग्रामपंचायतच्या एकूण 11 जागांपैकी दोन- बिनविरोध झाल्या, 9 पैकी 5 याठिकाणी शिवसेने मिळवल्या, सहा उमेदवारांनी आम्ही ना राष्ट्रवादी चे ना भाजपचे, खडसे परिवाराचे असल्याचे म्हटल्याने याठिकाणी संभ्रमाचे वातावरण

  • 19 Jan 2021 06:42 AM (IST)

    21 व्या वर्षी मारलं ग्रामपंचायतीचं मैदान, सोलापुरातला ऋतुराज सर्वात तरुण सदस्य

    सोलापूर : मोहोळ तालुक्यातल्या घाटणे येथील 21 वर्षाचा तरुण ऋतुराज देशमुखने विजय मिळवत सर्वांत तरुण उमेदवार होण्याचा मान पटकवला आहे, ऋतुराज सध्या 21 वर्षाचा असून नुकतेच त्याचे बीएससीचे शिक्षण पूर्ण झाले आहे, त्यानंतर आता तो LLB ला प्रवेश घेणार आहे, यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ऋतुराजने आपल्या घाटणे गावात निवडणुकीसाठी स्वत:चं पॅनेल उभं केलं, निवडणुकीच्या काळात ऋतुराजने तयार केलेला वचननामा चर्चेचा विषय ठरला, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतःचा वचननामा तयार करुन गावच्या विकासाचा रोडमॅप सांगणारा ऋतुराज पहिलाच असावा

  • 19 Jan 2021 06:39 AM (IST)

    नाशिक जेलमध्ये असलेला उमेदवार रावेर तालुक्यातील बक्षिपुर ग्रामपंचायतमध्ये विजयी

    जळगाव : नाशिक जेलमध्ये असलेला उमेदवार रावेर तालुक्यातील बक्षिपुर ग्रामपंचायतमध्ये विजयी,स्वप्नील मनोहर महाजन ह्या उमेदवाराने जेल मधुन  निवडणूक रिंगणात उभा होता, रावेर शहरात जनता कर्फ्यूवेळी दोन गटात झालेल्या दंगलीमध्ये बक्षिपुर येथील माजी सरपंच स्वप्नील महाजन यांना अटक झाली होती, तेव्हा पासून ते जेलमध्येच आहेत, ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 2 मध्ये जेलमध्ये असलेल्याच्या भावाने उमेदवार दाखल केला होता अर्ज

Published On - Jan 19,2021 11:15 PM

Follow us
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.