Maharashtra News LIVE Update | पावसाळी अधिवेशनासाठी 3, 4 जुलैला RT-PCR टेस्ट, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसह सर्वांना अनिवार्य
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi June 29 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi June 29 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening
LIVE NEWS & UPDATES
-
महावितरण भांडूप परिमंडलातील 34 हजार 247 वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
कोरोनाच्या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला आहे. मात्र, अनेक ग्राहकांनी लॉकडाऊनच्या काळातील वीजबिलाचा भरणा अजून ही केला नाही. भांडूप परिमंडलातील ग्राहकांच्या वीजबिलाची थकबाकी एकूण 583 कोटींवर पोहोचली असून मुख्य कार्यालयाच्या आदेशानूसार थकीत वीजबिल असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरु झाली आहे. भांडूप परिमंडलात 18 जून 2021 पासून आतापर्यंत 34 हजार 247 ग्राहकांचा वीजपुरवठा थकीत बिलापोटी खंडित करण्यात आला आहे. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर वीजबिल वसुलीचा दैनंदिन आढावा घेऊन कारवाई करत आहे.
-
इगतपुरी रेव्ह पार्टी | अभिनेत्री हिना पांचाळसह 25 जणांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ
इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण : अभिनेत्री हिना पांचाळसह 25 जणांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ. सोमवारी 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनवल्यानंतर आज कोर्टात हजर केलं होतं. त्यानंतर त्यांच्या कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
-
-
पावसाळी अधिवेशनासाठी 3, 4 जुलैला RT-PCR टेस्ट, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसह सर्वांना अनिवार्य
महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै, 2021 रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून त्यासाठी विधान भवन प्रवेशाकरिता कोव्हिड-19 संदर्भात RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितींच्या दिनांक 22 जून, 2021 रोजी झालेल्या बैठकीत याबाबत झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आज विधान भवन, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत RT-PCR चाचणी संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
3 किंवा 4 जुलै, 2021 या निर्धारित वैध कालावधीसाठीची RT-PCR चाचणी करून त्याचा अहवाल विधान भवन प्रवेशासाठी सोबत ठेवणे आवश्यक असेल. लसीकरणातील पहिला वा दुसरा डोस घेतलेल्यांना तसेच कोविड-19 संदर्भातील प्रतिपिंड (Antibodies) चाचणीचा सकारात्मक अहवाल असणाऱ्यांनासुध्दा RT-PCR चाचणी करणे अनिवार्य राहिल.
-
ठाणे मनपा अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांची पनवेल मनपा आयुक्तपदी नियुक्ती
ठाणे मनपा अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांची पनवेल मनपा आयुक्तपदी नियुक्ती
पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांची भिवंडी निजामपूर मनपा आयुक्त पदी नियुक्ती
-
भिवंडी पालिका आयुक्तांची बदली, सुधाकर देशमुख भिवंडीचे नवे आयुक्त
-भिवंडी महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांची बदली. -पनवेल पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची भिवंडी पालिका आयुक्त पदी नियुक्ती. -भिवंडी पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया हे दहा दिवसांच्या रजेवर असतानाच बदलीचा निर्णय.
-
-
चंद्रपूरमध्ये रेल्वेच्या ओव्हर हेड वायर चा धक्का लागून 14 वर्षीय मुलीचा मृत्यू
चंद्रपूर : रेल्वेच्या ओव्हर हेड वायर चा धक्का लागून 14 वर्षीय मुलीचा मृत्यू… चंद्रपूर शहरातील बाबुपेठ रेल्वे स्टेशनवर वरील घटना, आचल गणेश आत्राम असे मृत युवतीचे नाव, प्राथमिक माहितीनुसार मृतक आचल आत्राम हि युवती रेल्वे वॅगन मधून कोळसा काढण्यासाठी रेल्वे वॅगनवर चढली आणि त्यातच ओव्हर हेड वायरचा शॉक लागल्याने तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि सिटी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आला, या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.
-
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार
1) महामंडळ वाटप विषय तात्काळ मार्गी लागावा.
2) कोव्हीड निर्बंधाबाबत अन्य राज्यांना आपण फॉलो केलं पाहिजे. सततच्या निर्बंधामुळे सर्वसामान्य जनतेत आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. राज्याची आर्थिक घडीही विस्कटते आहे.
3) विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आता फार चालढकल करू नये. आपण ही निवडणूक जिंकू, चिंता नको..
-
शरद पवार मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा येथे उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. त्यापूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड वर्षावर पोहोचले आहेत.
-
शिर्डी जवळील को-हाळे येथील पती -पत्नीच्या खुनाचा उलगडा,दरोड्याच्या उद्देशाने अट्टल गुन्हेगारांकडून हत्या
शिर्डी जवळील को-हाळे येथील पती -पत्नीच्या खुनाचा उलगडा…. दरोड्याच्या उद्देशाने अट्टल गुन्हेगारांनी केली हत्या… डोक्यात फावडे घालून केली होती हत्या… 25 जूनच्या रात्री घडले होते दुहेरी हत्याकांड….
-
पुण्यातील म्हाडाच्या मोडकळीस आलेल्या 40 हजार सदनिकांचं नवीन नियमावली करुन पुनर्वसन
म्हाडा च्या मोडकळीस आलेल्या 40 हजार सदनिका…
नवीन नियमावली करत पुनर्वसन केले जाईल…
3 एफ एस आय लागू करण्यात आले आहेत…
पुणे म्हाडा प्रस्तावित बदल नगरविकास कडे पाठवणार आहे…
-
बीडमध्ये श्वानाच्या अंगावर गाडी गेल्याने दोन गट आमनेसामने, दगडफेक आणि तुंबळ हाणामारी
बीड: श्वानाच्या अंगावर गाडी गेल्याने दोन गट आमनेसामने
दोन गटात दगडफेक आणि तुंबळ हाणामारी
हानामारीचा व्हिडीओ व्हायरल
केज तालुक्यातील विडा येथील घटना
दोन्ही गटातील चार जण जखमी
महिला, मुले आणि पुरुषांचा एकमेकांवर दगडाचा पाऊस
केज पोलिसात परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल
-
विजय वडेट्टीवार यांना झेड प्लस सुरक्षा द्या, ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
नांदेड: मंत्री विजय वडेट्टीवार यांना झेड प्लस सुरक्षा द्या, ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी, वडेट्टीवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार सुरेश धस यांच्यावर कारवाई करा, ओबीसी नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन.
-
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गृहमंत्री वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड पोहोचले
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे वर्षा येथे दाखल झाले आहेत. या बैठकीत ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई, विधिमंडळ अधिवेशन याबद्दल चर्चा होऊ शकते अशी माहिती आहे.
-
पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार, जलकेंद्रांच्या दुरुस्तीची कामांसाठी निर्णय
शहरातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर या जलकेंद्रांमध्ये काही दुरुस्ती कामांमुळे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी दिनांक 1 जुलै रोजी बंद राहणार आहे. तसेच, शुक्रवारी दिनांक 2 जुुलै रोजी उशिरा आणि कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार आहे.
-
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची आज मराठा संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक
कोल्हापूर :
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची आज मराठा संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक
आरक्षणाच्या मुद्यावरून संघटनांचे प्रतिनिधी भाजपची भूमिका जाणून घेणार
थोड्याच वेळात कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात बैठक
बैठकीत चंद्रकांत पाटील काय भूमिका मांडणार याकडे लक्ष
-
नवेलमध्ये अखिल भारतीय समता परिषदेचा रास्तारोको आंदोलन
पनवेलमध्ये अखिल भारतीय समता परिषदेचा रास्तारोको आंदोलन
सायन-पनवेल महामार्गावर कळंबोली मॅकडॉनल जवळ करण्यात आला रास्तारोको
समता परिषदेचे पन्नास ते शंभर कार्यकर्त रस्त्यावर
कळंबोली पोलिसांनी आंदोलकाना घेतले ताब्यात
-
चाळीसगावात पाण्यात बुडून काका-पुतण्याचा मृत्यू
चाळीसगाव –
– पाण्यात बुडून काका पुतण्याचा मृत्यू
– पोहण्यासाठी गेले होते गिरणा नदीवर
– वरखेडे धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यु
– वरखेडे गावावर शोककळा
– मृतांची नवे हिरतसिंग जगतसिंग पवार,(40) मृणाल इंद्रजित पवार (17)
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या श्वानाचा मृत्यू
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुत्र्याचा मृत्यू
जेम्स नावाच्या श्वानाचा रात्री 12 वाजता निधन झालं आहे
राज ठाकरे हे श्वान प्रेमी आहेत , जेम्स हा सुद्धा अनेक वर्षे त्याच्या सोबत होता
-
गडचिरोली जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत अंतर्गत कचरा साफ सफाई न केल्यामुळे कचऱ्याचे घाणीचे साम्राज्य
गडचिरोली जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत अंतर्गत कचरा साफ सफाई न केल्यामुळे कचऱ्याचे घाणीचे साम्राज्य आहे
या कचऱ्यामुळे पावसाळ्यात डेंगू मलेरिया असे आजार होण्याचा धोका सर्वात जास्त आहे मागील वर्षीही डेंगू मलेरिया मुळे अनेक रुग्णांना आपले जीव गमवावे लागले
आरोग्य विभाग ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपरिषद हे लक्ष देऊन गडचिरोली जिल्ह्यातील कचरा साफसफाईचे काम लवकर करावे अन्यथा आजारग्रस्त गडचिरोली जिल्हा दिसेल
-
कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
कराड
कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
सातारा सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 148 मतदान केंद्रावर मतदान सुरु झाले
47160 सभासद मतदानाचा हक्क बजावणार
ही निवडणूक तिरंगी होत असुन 21जागासाठी 66 उमेदवार रिंगणात
1 जुलैला मतमोजणी होणार आहे
-
पीएमपीनं सुरू केलेल्या पीएम आरडीए आणि महापालिका हद्दीबाहेर प्रवासी सेवेला एसटीचा आक्षेप
पीएमपीनं सुरू केलेल्या पीएम आरडीए आणि महापालिका हद्दीबाहेर प्रवासी सेवेला एसटीचा आक्षेप,
महापालिकेच्या हद्दीबाहेर 20 कि.मी पर्यंतच परवानगी मात्र 40 कि.मी पर्यंत जाऊन पीएमपीची प्रवासी सेवा सुरू,
महापालिका हद्दीबाहेरील सेवा बंद करण्याचं एसटीचं पीएमपीला पत्र,
सेवा सुरू करताना एसटीचं ना हरकत प्रमाणपत्र घेतलं नसल्याचं एसटीचा दावा,
त्यामुळे ही सेवा बंद करण्याची मागणी एसटीनं केलीये,
त्यामुळे आता प्रवासी सेवेवरून एसटी आणि पीएमपी प्रशासनात वाद पेटण्याची शक्यता आहे….
-
सहकार शिरोमणी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे साखर आयुक्तांचे आदेश
सोलापूर –
सहकार शिरोमणी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे साखर आयुक्तांचे आदेश
2020-21 च्या गळीत हंगामातील उसापोटी शेतकऱ्यांचे 19 कोटी 69 लाख रुपये लाख रुपये एफआरपी थकीत
कारखान्याची जमीन महसूल थकबाकी समजून वसूल करण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे आदेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाना
कारखान्यात उत्पादित साखर, मळी, बगॅस यांची विक्री करावी
गरज भासल्यास कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या दस्तऐवजावर शासनाच्या नावाची नोंद करण्याचे आदेश
कारखान्याची जप्ती करून विहित पद्धतीने विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे आदेश
-
नाशकात घोरपडीच्या अवयवांची विक्री करणाऱ्या इसमास अटक
नाशिक –
घोरपडीच्या अवयवांची विक्री करणाऱ्या इसमास अटक
संशयित आरोपी करत होता घोरपडीच्या अवयवांच्या विक्रीचा प्रयत्न
घोरपडीचे लिंग अथवा हात जोडी जवळ बालगल्यास धनलाभ होतो अशी अंधश्रद्धा
या अंधश्रद्धे पोटीच ही विक्री केली जात होती असा संशय
द्वारका परिसरातून आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
काही मुद्देमाल आणि घोरपडीचे हात जोडे हस्तगत
-
शाळेची फी भरली नाही म्हणून ॲानलाईन वर्गातून विद्यार्थी बाहेर
– शाळेची फी भरली नाही म्हणून ॲानलाईन वर्गातून विद्यार्थी बाहेर
– फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेनी ॲानलाईन क्लासची लिंक पाठवली नाही
– शैक्षणिक सत्र सुरु झाले, फी न भरलेले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
– ॲानलाईनची लिंक न पाठवणाऱ्या शाळांची पालक करणार तक्रार
– कोरोनामुळे रोजगार गेल्याने काही पालकांनी भरली नाही फीज
-
नाशिक महापालिकेची आजची महासभा वादळी ठरण्याची शक्यता
नाशिक –
महापालिकेची आजची महासभा वादळी ठरण्याची शक्यता
स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज विशेष महासभा
शहरात अर्धवट झालेल्या स्मार्ट सिटीच्या कामांबाबत नगरसेवक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता
गॅस पाईपलाईन,नोकरभरती,बस सेवा हे विषय गाजण्याची शक्यता
-
नागपूर जिल्ह्यातंच नाना पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेला बगल
– नागपूर जिल्ह्यातंच नाना पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेला बगल
– नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस – राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार
– दोन्ही पक्ष एकत्र पोटणीवडणूक लढण्यावर झालं शिक्कामोर्तब
– दोन्ही पक्षात जागावाटपासाठी सार्वत्रिक निवडणूकीचा फॅार्म्युला
– काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली होती स्वबळाची घोषणा
– प्रदेशाध्यक्षांच्या स्वबळाच्या घोषणेनंतरंही काँग्रेस – राष्ट्रवादीचा हातात हात
-
उद्योगपती संजय घोडावत यांच्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी एकाला केली अटक
इचलकरंजी –
उद्योगपती संजय घोडावत यांच्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी एकाला केली अटक
संजय घोडावत यांचा कडे पाच कोटींची मागणी व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी या दोघांनी दिली होत
हातकणंगले पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला मुंबईतून केली अटक तर दिल्लीत आरोपी फरार
रमेश कुमार टक्कर पोलिसांनी घेतले ताब्यात बी पी सिंग हा झाला आहे
खंडणी मागितल्याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी केला गुन्हा दाखल व करत आहे तपास
उद्योगपती संजय घोडावत यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी राज्यामध्ये व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माजली खळबळ
-
नागपूर 16 जिल्हा परिषद जागांसाठी पोटनिवडणूक
नागपूर 16 जिल्हा परिषद जागांसाठी पोटनिवडणूक
– नागपूर 61 पंचायत समितीसाठी पोटनिवडणूक
– आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल केले जाणार
– सकाळी 11 ते दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करता येणार
– पोटनिवडणूक महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची
– भाजपनेही लावली ताकद, देणार ओबीसी उमेदवार
-
पुण्याच्या विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक
पुणे –
– पुण्याच्या विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक,
– वडगाव शेरी परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्याबाबत आजच्या बैठकीत निर्णय होणार,
– गेल्या काही वर्षांपासून अग्रसेन शाळा ते बालग्रामपर्यंतच्या सुमारे ३०० मीटरच्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे त्यावर आज चर्चा,
– वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे आणि माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार बैठक आयोजित करण्यात आली आहे.
-
कोल्हापुरात प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांच्याकडून पाच कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न
कोल्हापूर
प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांच्याकडून पाच कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न
खंडणी मागणाऱ्या रमेशकुमार ठक्कर आरोपीला हातकणंगले पोलिसांनी केली अटक
ठक्कर च्या साथीदाराचा शोध सुरू
काही दिवसांपूर्वी ठक्कर सह साथीदाराने घोडावत यांना फोन करून मागितली होती पाच कोटींची खंडणी
खंडणी न दिल्यास त्यांच्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याची दिली होती धमकी
घोडावत यांच्याकडून वसुलीचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ
-
नाशिक महामार्गावर शहापूर जवळील चेरपोली पोलीस चौकी जवळ माल वाहतूक गाडीला रात्रीच्या वेळेस लागली भीषण आग
मुंबई – नाशिक महामार्गावर शहापूर जवळील चेरपोली पोलीस चौकी जवळ माल वाहतूक गाडीला रात्रीच्या वेळेस लागली भीषण आग
चालत्या गाडीने घेतला अचानक पेट
आगीत पूर्ण गाडी जळून खाक, प्रसंग वधनाने ड्रायव्हर आणि क्लिनर सुदैवाने वचले कोणती ही जिवीत हानी नाही, मात्र आगीत पूर्ण गाडी जळून खाक
आग विझवण्यासाठी भिवंडी येथील अग्निशामक दलाला केले प्राचारण
चेरपोली पोलीस चॉकी समोर माळ वाहतूक गाडीने पेट घेतला आहे टँकर हवी आहे
Published On - Jun 29,2021 6:31 AM
