Maharashtra Breaking News Live : राज ठाकरे यांनी सांगितलेला तो मागून बोलणारा माणूस म्हणजे उध्दव ठाकरे, नितेश राणे यांचा दावा

| Updated on: Mar 24, 2023 | 5:59 AM

Maharashtra Breaking News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : राज ठाकरे यांनी सांगितलेला तो मागून बोलणारा माणूस म्हणजे उध्दव ठाकरे, नितेश राणे यांचा दावा
Maharashtra Breaking NewsImage Credit source: tv9 marathi

मुंबई : देशातील टॉप टेन खासदारांची यादी जाहीर झाली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या नंबर वनवर आहेत. तर श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे अनुक्रमे 8 आणि 9 व्या क्रमांकावर आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दाखवलेला माहीम येथील दर्गा 600 वर्ष जुना. महिला महाराष्ट्र केसरीचा थरार आजपासून. सांगली क्रीडा संकुलात रंगणार कुस्ती स्पर्धा. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Mar 2023 07:50 PM (IST)

    गुगलवर सर्च करताना रहा सावध

    हा नंबर चुकूनही शोधू नका

    नाहीतर बँकेतील रक्कम छुमंतर झालीच म्हणून समजा

    कशी होते फसवणूक, काय वापरतात ट्रिक्स

    सायबर भामट्यांनी किती जणांना घातला गंडा, वाचा बातमी 

  • 23 Mar 2023 07:20 PM (IST)

    कोरोनातील दोन वर्षांच ईडब्लूएस प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांनाही मिळणार एमपीएससीची मुलाखतीची संधी

    पुणे : 

    एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

    कोरोनातील दोन वर्षांच ईडब्लूएस प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांनाही मिळणार मुलाखतीची संधी

    कोरोना काळात ईडब्लूएस प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना काढता आलं नव्हतं

    मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्र बंधनकारक होतं

    मात्र राज्य शासनाने परिपत्रक काढून कोरोना काळातील प्रमाणपत्र न मागता 2022-23 प्रमाणपत्र ग्राह्य धरावं एमपीएससी आयोगाला दिल्या सूचना

  • 23 Mar 2023 07:09 PM (IST)

    एप्रिलपासून बदलणार बँकेचा टाईमटेबल

    एप्रिलमध्ये सुट्यांचा सुकाळ, इतक्या दिवस सुट्या

    उरकून घ्या पटकन कामे, नाहीतर वाट पहावी लागणार

    यादी पाहूनच बँकेचा धरा रस्ता, नाहीतर नाहक होईल चक्कर, वाचा बातमी 

  • 23 Mar 2023 06:28 PM (IST)

    काँग्रेस नेते राहुल गांधी नवी दिल्ली विमानतळावर दाखल

    नवी दिल्ली :

    काँग्रेस नेते राहुल गांधी नवी दिल्ली विमानतळावर दाखल

    सुरतमधील न्यायालयात शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी राजधानीत दाखल

    काँग्रेस नेत्यांनी केलं विमानतळावर स्वागत

  • 23 Mar 2023 06:11 PM (IST)

    या पेन्नी शेअरने केली कमाल

    रॉकेटच्या वेगाने एकदम सूसाट

    गुंतवणूकदार एकदम मालामाल

    1.55 रुपयाचा शेअर 72 रुपयांवर

    एकाच वर्षात जोरदार फायदा, वाचा बातमी 

  • 23 Mar 2023 05:31 PM (IST)

    'नव्या इन्फ्लुएन्झाबाबत नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं', भारती पवार यांची प्रतिक्रिया

    नवी दिल्ली :

    नव्या इन्फ्लुएन्झाबाबत नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं

    अजूनही मास्कचा वापर करायला हवा - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घेतली कोरोना बाबत महत्त्वपूर्ण बैठक

    देशभरात सध्या 7000 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण

    केंद्र सरकार अलर्ट मोडवर, राज्य सरकारनाही सूचना दिल्या आहेत - डॉक्टर पवार

  • 23 Mar 2023 05:25 PM (IST)

    भारतात नव श्रीमंतांची नांदी

    मोठ्या शहरातून नाही आले श्रीमंत

    भारतात इतके वाढले अब्जाधीश

    गेल्या पाच वर्षांत वाढली अब्जाधीशांची संख्या

    या यादीत रेखा झुनझुनवाला टॉपवर, वाचा बातमी

  • 23 Mar 2023 05:03 PM (IST)

    मनसेच्या इशाऱ्यानंतर पुणे पोलीस अलर्टवर

    पुणे : पुण्येश्वर मंदिर आणि मस्जिद परिसरात पोलिसांचा बंदोबस्त केला तैनात,

    सकाळपासूनचं पोलीस मंदिर परिसरात पहारा ठेऊन,

    या आधी पुण्येश्वर मंदिराच्या परिसरात असणाऱ्या मस्जिदवर मनसेनं आक्षेप घेतला होता,

    मात्र कालच्या राज ठाकरेंच्या सभेनंतर पुण्यातील मस्जिद परिसरात बंदोबस्त वाढवण्यात येतोय.

  • 23 Mar 2023 04:28 PM (IST)

    प्राप्तिकर रिटर्न भरण्यासाठी अंतिम संधी

    करा घाई, आता पुन्हा संधी नाही

    या करदात्यांसाठी आता केवळ काही दिवसच उरलेत

    दंडात्मक कारवाई अथवा इतर प्रक्रिया होऊ शकते

    केंद्र सरकारने सुधारीत आयकर रिर्टन भरण्यासाठी दिली सुविधा, वाचा बातमी 

  • 23 Mar 2023 03:24 PM (IST)

    नितेश राणे यांनी घेतले उद्धव यांचे नाव

    उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांच्यावर दबाव टाकला

    राणेंना भेट दिल तर मुलबाळ सोबत मातोश्री सोडेल

    उद्धव ठाकरे ज्या पध्दतीने सहानुभूती घेत आहेत ते खोटारडे आहेत

    महाराष्ट्र ला कळू द्या की का माणूस कसा आहे

  • 23 Mar 2023 03:10 PM (IST)

    नक्षलवाद्यांनी लावलेले एक क्लोमाईन बॉम्ब आणि दोन कुकर बॉम्ब डाव उधळला

    गडचिरोली :  टीसीओसी नक्षलाच्या सप्ताहा दरम्यान नक्षलवाद्यांनी मोठे प्राणघाता हल्ला करण्याच्या उद्देशाने दोन ठिकाणी बॉम्ब लावले होते

    भामरागड तालुक्यातील दोडराज जंगल परिसरात आज सकाळपासून नक्षलविरोधी पोलीस सी 60 पथकाच्या कोंबिंग ऑपरेशन सुरू होते

    या आपरेशन दरम्यान नक्षलवाद्यांनी लावलेल्या बॉम्बचा हल्ला होण्याआधीच पोलीस विभागाला कळले

    कोणतीही जीवितहानी न होता सतर्कतेने हा बॉम्ब निष्क्रिय करण्यात आला.

  • 23 Mar 2023 02:29 PM (IST)

    ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

    अंबरनाथच्या नेवाळी परिसरात घडली दुर्दैवी घटना

    ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची स्थानिकांची मागणी

  • 23 Mar 2023 01:57 PM (IST)

    पुणे शहरात काँग्रेसचं आंदोलन

    पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेविरोधात काँग्रेस आक्रमक,

    मोदी सरकारच्या आदेशानुसार सुरत कोर्टाने राहुल गांधींना शिक्षा सुनावली काँग्रेसचा आरोप,

    पुण्यातील बालगंधर्व चौकात काँग्रेस नेत्यांचे आंदोलन,

    मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधींना सुरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आणि नंतर जामीन देखील देण्यात आला.

  • 23 Mar 2023 01:43 PM (IST)

    पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेविरोधात काँग्रेस आक्रमक

    मोदी सरकारच्या आदेशानुसार सुरत कोर्टाने राहुल गांधींना शिक्षा सुनावल्याचा काँग्रेसचा आरोप

    पुण्यातील बालगंधर्व चौकात काँग्रेस नेत्यांचे आंदोलन

    राहुल गांधींना सुरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली

    त्यानंतर जामीनदेखील देण्यात आला

  • 23 Mar 2023 12:59 PM (IST)

    नवी दिल्ली : संजय राऊत यांची मुख्य नेते पदावरून हकालपट्टी करा

    शिवसेना संसदीय पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांचे पत्र

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र

  • 23 Mar 2023 12:57 PM (IST)

    राहुल गांधी सावरकरांबद्दल बोलले, तर त्यात गैर काय - पृथ्वीराज चव्हाणांकडून समर्थन

    राहुल गांधी सावरकरांबद्दल बोलले, तर त्यात गैर काय - पृथ्वीराज चव्हाणांकडून समर्थन

    सावरकरांबद्दल जी भूमिका घेतली ती पुरावानीशी घेतलेली आहे.

    सावरकरांनी जर त्या ठिकाणी इंग्रजांची माफी मागितली असेल तर त्याचा देखील उल्लेख इतिहासाच्या पानांमध्ये आहे. ते जर राहुल गांधी बोलत असतील तर त्यामध्ये गैर काय ?

    सावरकरांनी जे चांगलं काम केलं त्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे.

    पण जे वाईट केलंय त्याबद्दलही आम्ही बोलतच आहोत. त्याच्या इतका आटापिटा काय करायची गरज आहे? भाजपला इतक्या मिरच्या झोंबायची गरज काय? असा सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.

  • 23 Mar 2023 12:27 PM (IST)

    सुरत कोर्टाने दिलेल्या राहुल गांधी यांच्या निर्णयानंतर मुंबईत काँग्रेस आक्रमक

    मुंबई : मुंबई काँग्रेस ऑफिसच्या सर्व वरिष्ठ नेते काही वेळा करणार भाजपविरोधात निदर्शने करणार आहेत,

    नाना पटोले, बाळासाहेब थोरात ,अशोक चव्हाण , विजय वडेट्टीवार ,भाई जगताप आणि इतर मोठे नेते आंदोलनात सहभागी होणार.

  • 23 Mar 2023 12:20 PM (IST)

    नवी दिल्ली : शिवसेना पक्षाची महत्वपूर्ण बैठक

    संसदेच्या कार्यालयात होणार बैठक

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय भूमिका घ्यायची याबाबत होणार चर्चा

    मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबतही खासदार करणार चर्चा

    शिवसेना पक्षातील सर्व खासदार बैठकीला उपस्थित राहणार

  • 23 Mar 2023 12:15 PM (IST)

    शिवसेना पक्षाची महत्वपूर्ण बैठक

    शिवसेना पक्षाची महत्वपूर्ण बैठक

    संसदेच्या कार्यालयात होणार बैठक

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय भूमिका घ्यायची याबाबत होणार चर्चा

    मुख्यमंत्र्यांच्या आयोध्या दौऱ्याबाबतही खासदार करणार चर्चा

    शिवसेना पक्षातील सर्व खासदार बैठकीला उपस्थित राहणार

  • 23 Mar 2023 12:09 PM (IST)

    राहुल गांधी यांच्या सावरकरांविरोधातील वक्तव्याचे विधानसभेत पडसाद, सत्ताधारी आक्रमक

    सावरकरांवरील विधानावरून राहुल गांधी यांनी माफी मागावी, सत्ताधाऱ्यांची विधानसभेत मागणी

    सावरकरांच्या मुद्द्यावर विरोधक विधानसभेत आक्रमक

    विधानसभेत प्रचंड गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज 10 मिनिटासाठी तहकूब

  • 23 Mar 2023 11:52 AM (IST)

    अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा प्रकटदिन सोहळा

    प्रकटदिन सोहळ्यासाठी हजारो स्वामी भक्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून अक्कलकोट येथे दाखल

    वटवृक्ष देवस्थानतर्फे भाविकांची सोय करण्यात आलीय

    पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी

    मंदिर समितीतर्फे भजन तसेच कथ्थक नृत्य आयोजित करण्यात आले

  • 23 Mar 2023 11:26 AM (IST)

    Ed कार्यालयात बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त

    राज्य राखीव दलासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त

    राष्ट्रवादी काँग्रेसकडून ED कार्यालयावर आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्याने दिले छावणीचे स्वरूप

    कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होत ED कार्यालयावरती धडकणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली

  • 23 Mar 2023 11:14 AM (IST)

    पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या चंदन ऊटी पूजेस आज पासून होणार प्रारंभ

    ग्रीष्म ऋतु ते मृग नक्षत्रापर्यंत होत असते श्री विठ्ठलाची चंदन ऊटीपूजा

    उन्हाळ्याच्या वाढत्या काहिली पासून संरक्षण व्हावे यासाठी विठ्ठलाच्या सर्वांगास लावला जातो चंदनाचा लेप

    आज पासून पुढील 67 दिवस होणार विठ्ठलाची चंदन ऊटीपूजा

    चंदन ऊटीपूजेस आकारले जात आहेत तीस हजार रुपये देणगी शुल्क

    दररोज दोन भाविकांना मिळणार चंदन ऊटीपूजेचा लाभ

    विठ्ठलाच्या चंदन ऊटीपूजेसाठी खास म्हैसूर आणि बेंगळुरूतून मागवलं जातं चंदन

  • 23 Mar 2023 11:04 AM (IST)

    छत्रपती संभाजी नगरच्या नामांतरावरून 69 हजारांच्या जवळपास आक्षेप

    छत्रपती संभाजी नगरच्या नामांतरावरून 69 हजारांच्या जवळपास आक्षेप.

    छत्रपती संभाजीनगर नामांतरवरून 69 हजार पेक्षा अधिक हरकती दाखल.

    धाराशिव नामांतरावरून 19 हजार अर्ज दाखल.

    आक्षेप नोंदवण्याची 27 मार्च पर्यंत शेवटची मुदत.

    छत्रपती संभाजी नगरच्या नामांतरावरून तब्बल 69 हजारांच्या जवळपास आक्षेप.

    छत्रपती संभाजी नगरच्या समर्थनार्थ शिवसेनेकडून शहरातून पाठवले जाणार 30 हजार पोस्ट कार्ड.

    सूचना हरकतींचा विभागीय आयुक्त कार्यालयात अक्षरशः पडला खच.

    हरकती दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात गर्दी.

  • 23 Mar 2023 10:52 AM (IST)

    विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बोलावली मराठी भाषा भवनासंदर्भात बैठक

    मंत्री दीपक केसरकर आणि अन्य विधिमंडळ सदस्य बैठकीला उपस्थित राहणार

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा बैठकीला उपस्थित राहणार

    गेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर यांच्यात झाला होता वाद

    उपसभापतींच्या दालनात झाला होता वाद

    बंडखोरीबद्दल दीपक केसरकर यांना उद्धव ठाकरे यांनी सुनावले होते

    या प्रसंगानंतर दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला दिलं होतं प्रत्युत्तर

    या वादानंतर उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर मराठी भाषा भवनासंदर्भातील आयोजित बैठकीत एकमेकांसमोर

  • 23 Mar 2023 10:52 AM (IST)

    आयकर खात्याने टाकले एक पाऊल पुढे

    करदात्यांसाठी आणले नवीन ॲप

    करदात्यांसाठी मोबाईल ॲप, प्ले स्टोअरवरुन होईल डाऊनलोड

    इतक्या सेवा मिळतील सहज, राहता येईल अपडेट

    करदात्यांना त्यांची मते ही येणार मांडता, वाचा बातमी 

  • 23 Mar 2023 10:44 AM (IST)

    अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री करणार पाहणी

    अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री करणार पाहणी

    मुख्यमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी करणार चर्चा

    शनिवार-रविवारी मुख्यमंत्री हिंगोली आणि धुळे जिल्ह्याचा दौरा करणार

  • 23 Mar 2023 10:41 AM (IST)

    मुख्यमंत्री जाणार बांधावर

    अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री करणार पाहणी

    मुख्यमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी करणार चर्चा

    शनिवारी व रविवारी मुख्यमंत्री हिंगोली व धुळ्याचा करणार दौरा

  • 23 Mar 2023 10:31 AM (IST)

    नवी दिल्ली : भाजपकडून खासदारांना व्हीप

    लोकसभा आणि राज्यसभेत व्हीप जारी

    अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या दुसऱ्या टप्प्यात सलग सात दिवस दोन्ही सभागृहांचे कामकाज नाही

    महत्त्वपूर्ण विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी भाजपकडून खासदारांसाठी व्हीप जारी

  • 23 Mar 2023 10:30 AM (IST)

    कोल्हापूरात पुन्हा आढळले कोरोना रुग्ण

    काल दिवसभरात पाच नवीन रुग्ण तर मंगळवारी आढळले होते सहा नवीन रुग्ण

    वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

    सीपीआर सह तालुकास्तरावरील कोरोना केअर सेंटर मध्ये आवश्यक यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना

    अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 41 वर

  • 23 Mar 2023 10:20 AM (IST)

    राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत आज महत्त्वपूर्ण निकाल

    राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत आज महत्त्वपूर्ण निकाल

    सुरत सेशन कोर्ट देणार निकाल

    2019 साली निवडणुकी वेळी राहुल गांधी यांनी केलं होतं वादग्रस्त विधान

    सगळ्या चोरांचं नाव हे मोदीच का असतं

    राहुल गांधी यांच्या या वक्तव्य विरोधात भाजप नेते पूर्णश मोदी यांनी दाखल केली होती याचिका

    राहुल गांधी थोड्याच वेळात सुरत कोर्टात हजर राहणार

    चार वर्षांनंतर सुरत सेशन कोर्ट आज निकाल देणार , निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष

  • 23 Mar 2023 10:18 AM (IST)

    थोड्याच वेळात लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज

    कामकाजापूर्वी विरोधी पक्ष नेत्यांची आज पुन्हा बैठक

    विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात

  • 23 Mar 2023 10:11 AM (IST)

    Rohit sharma : IPL 2023 दरम्यान खेळाडूंना ब्रेक देण्याबद्दल रोहित शर्माच स्पष्ट मत

    Rohit sharma : रोहित शर्माने या विषयात काय सत्य आहे? त्या बद्दल सांगितलं. वाचा सविस्तर....

  • 23 Mar 2023 10:11 AM (IST)

    बिसलेरीत पुन्हा नवीन ट्विस्ट

    कंपनीचा कारभार सांभाळणार तरी कोण

    7000 कोटींचा कारभारी कोण

    TATA शी बिनसले, झाली नाही डील

    आता घरातील वाद चव्हाट्यावर

    नेमका नवा वाद आहे तरी काय, वाचा बातमी 

  • 23 Mar 2023 10:11 AM (IST)

    IND vs AUS : Suryakumar Yadav च्या बॅटचा चेंडूला का स्पर्श होत नाहीय? 3 चुकांमुळे 3 वेळा 0,0,0 वर OUT

    सूर्यकुमार यादव क्रिकेटमधील असा पहिला बॅट्समन आहे, जो तिन्ही वनडे सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद झाला. वाचा सविस्तर....

  • 23 Mar 2023 10:10 AM (IST)

    IND vs AUS : चेन्नईमध्ये टीम इंडियाला विराट कोहलीने हरवलं, जाणून घ्या कसं

    IND vs AUS 3rd ODI : चेन्नई वनडेमध्ये भारताकडून विराट कोहलीने सर्वात जास्त धावा केल्या. त्याने हाफ सेंच्युरी झळकवली. त्याने सर्वाधिक 54 धावा केल्या. मग टीम इंडियाच्या पराभवाला विराट कोहली कसा जबाबदार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.वाचा सविस्तर....

  • 23 Mar 2023 10:07 AM (IST)

    नागपुरातल्या सतरंजीपुरा भागात एनआयची छापेमारी, काय आहे प्रकरण?

    पाकिस्तानताील व्यक्तीशी वॉट्सअपवरून संशयास्पद चॅट केल्याप्रकरणी चौकशी

    अख्तर रजा वल्द मोहम्मद मुक्तार आणि अहमद रजा वल्द मोहम्मद मुक्तार यांची चौकशी केल्याची माहिती

    पहाटे 4 वाजता NIA ची टीम पोहचली सतरंजीपुरा भागात, NIA च्या छाप्याने नागपुरात खळबळ

    NIA टीम चौकशी करून परतली, अद्याप कुणाला ताब्यात घेतलं नाही

    NIA टीमकडून काही सीम कार्ड ताब्यात

  • 23 Mar 2023 10:07 AM (IST)

    थोड्याच वेळात लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज

    नवी दिल्ली : कामकाजापूर्वी विरोधी पक्ष नेत्यांची आज पुन्हा बैठक,

    विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात.

  • 23 Mar 2023 10:05 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेत पिकांचे मोठे नुकसान

    आरमोरी- वडसासह अहेरी तालुक्यातील पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत

    भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसह मका आणि उन्हाळी धान पिकांचे मोठे नुकसान

    आठवडा उलटूनही या नुकसानीचे सर्वेक्षण न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त

    रब्बी पिकांना बसलेल्या हा फटका कसा भरून काढावा या चिंतेत आहेत शेतकरी

  • 23 Mar 2023 09:44 AM (IST)

    अयोध्येच्या राम मंदिरासाठी चंद्रपुरातून जाणार सागवान

    1800 क्युबिक मिटर सागाचे लाकूड 29 मार्चला कास्ट पुजन करून रवाना होणार

    वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली माहिती

    आलापल्ली येथील सागवानाचे लाकूड आहे जगप्रसिद्ध

  • 23 Mar 2023 09:20 AM (IST)

    सोन्याचा निघाला दम, चांदीची गती मंद

    आज भावात झाली जोरदार घसरण

    दुपारनंतर काय होईल, भाव वधारले की होईल कमी

    भावाचा पॅटर्न, गेल्या गुरुवारी पण झाली होती घसरण

    गेल्या आठवड्यात घेतली होती सोन्या-चांदीने मोठी उसळी, वाचा बातमी 

  • 23 Mar 2023 09:06 AM (IST)

    'राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीचा देखील मुद्दा उपस्थित करावा'

    आनंद दवे यांनी राज ठाकरेंना काही सवाल केले आहेत.

    राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीचा देखील मुद्दा उपस्थित करावा.

    औरंगजेब महाराष्ट्राचा शत्रू त्याची कबर संभाजीनगर मध्ये कशाला हवी?

    राज ठाकरे यांनी पुण्यश्लोक आणि शनिवार वाड्यातील दर्ग्याचा मुद्दा का नाही उचलला?

    शनिवार वाड्यातील दर्गा देखील अनधिकृत, हिंदू महासंघ आंदोलन करणार.

    भोंगे कमी आणि बंद झाल्याची आकडेवारी राज ठाकरे यांनी दिली होती. पण काल राज ठाकरे यांनी स्वतःच मान्य केले की राज्यात भुंगे अजून देखील चालू आहेत

    आजही दर शुक्रवारी नमाज होतात हनुमान चालीसा किती प्रमाणात चालू झाल्या? आनंद दवे यांचा राज ठाकरेंना सवाल

  • 23 Mar 2023 08:55 AM (IST)

    चंद्रपूर : शहरातील 2 तरुणांची चंदीगड इथं आत्महत्या

    आत्महत्या करणाऱ्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या सख्ख्या पुतण्याचा समावेश

    महेश अहिर असं हंसराज अहिर यांच्या पुतण्याचं नाव

    हरीश धोटे असं आत्महत्या करणाऱ्या दुसऱ्या तरुणाचं नाव

    आत्महत्या करणारे दोन्ही तरुण होते जिवलग मित्र

    15 मार्चपासून दोघं चंद्रपुरातून बेपत्ता

  • 23 Mar 2023 08:38 AM (IST)

    चंद्रपूर : मंदिरात झोपलेल्या २ ग्रामस्थांची हत्या

    भद्रावती तालुक्यातील मांगली गावातील घटना

    मांगली गावाशेजारी जगन्नाथ बाबांचं छोटं मंदिर

    याच मंदिरात झोपलेल्या मधुकर खुजे (५५) आणि बापूराव खारकर (६५) यांची हत्या

    मंदिरातील दानपेटी गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक संशय

    भद्रावती पोलिस करताहेत घटनेचा तपास

  • 23 Mar 2023 08:36 AM (IST)

    सोनू निगमच्या वडिलांच्या घरी 72 लाखांची चोरी

    गायक सोनू निगमचे वडील आगमकुमार निगम यांच्या घरी चोरी

    डिजिटल लॉकरमधून 72 लाख रुपये चोरीला

    सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद, बहिणीने दाखल केली तक्रार, वाचा सविस्तर..

  • 23 Mar 2023 08:36 AM (IST)

    आज पेट्रोल-डिझेलचा भाव काय

    इंधनाच्या आघाडीवर दिलासा

    भावात कोणतीही दरवाढ नाही

    कच्चा तेलाच्या किंमतीत आज वाढ

    रशियाने उत्पादन घटवले, काय होईल परिणाम, वाचा बातमी 

  • 23 Mar 2023 08:23 AM (IST)

    हर्षवर्धन जाधव बीआरएस पक्षात सामील

    कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव बीआरएस पक्षात सामील

    तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

    हैदराबाद येथे जाऊन भारत राष्ट्र समिती पक्षात केला प्रवेश

    लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजी नगर शहरात सभा घेणार असल्याचं केलं स्पष्ट

  • 23 Mar 2023 08:09 AM (IST)

    Entertainment News Live | अंकिता लोखंडेची गुढी पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

    अंकिता लोखंडेनं सोशल मीडियावर पोस्ट केला गुढी उभारतानाचा व्हिडीओ

    व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

    अंकिताने उभारलेल्या गुढीवर कलश नसल्याने नेटकऱ्यांनी व्यक्त केला राग, वाचा सविस्तर..

  • 23 Mar 2023 08:06 AM (IST)

    कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव बीआरएस पक्षात सामील

    तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

    हैदराबाद येथे जाऊन भारत राष्ट्र समिती पक्षात केला प्रवेश

    लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजी नगर शहरात सभा घेणार असल्याचं केलं स्पष्ट

  • 23 Mar 2023 08:03 AM (IST)

    औरंगाबाद नावाच्या बोर्डाची तोडफोड

    भाजपच्या पदाधिकारी अनुराधा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

    औरंगाबाद नावाच्या बोर्डाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    अनुराधा चव्हाण यांनी आय लव्ह औरंगाबाद या बोर्डाची केली होती तोडफोड.

  • 23 Mar 2023 07:56 AM (IST)

    कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना आणखी एक मोठा झटका

    छत्रपती संभाजीनगर : अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघातील शेतकरी दाम्पत्याने केली आत्महत्या,

    नापिकी कर्जबाजारी आणि गरपीठीला कंटाळून पती पत्नीने केली आत्महत्या,

    पतीने गळफास लावून तर पत्नीने विष घेऊन केली आत्महत्या,

    संदीप आळेकर आणि लताबाई आळेकर असं शेतकरी दाम्पत्याचे नाव,

    कृषी मंत्र्यांच्या मतदार संघात शेतकरी आत्महत्येचे दुष्टचक्र सुरूच.

  • 23 Mar 2023 07:55 AM (IST)

    आसामच्या मुख्यमंत्र्यांचे एकनाथ शिंदेंना पत्र

    नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र,

    आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य बाबत पत्र,

    बच्चू कडू यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि दिलगिरी व्यक्त करावी आसामचा मुख्यमंत्र्यांची शिंदे यांच्याकडे मागणी,

    आसामचे नागरिक आणि मांसाहार याबाबत बच्चू कडू यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य.

  • 23 Mar 2023 07:53 AM (IST)

    भाजपच्या पदाधिकारी अनुराधा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

    भाजपच्या पदाधिकारी अनुराधा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

    औरंगाबाद नावाच्या बोर्डाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    अनुराधा चव्हाण यांनी आय लव्ह औरंगाबाद या बोर्डाची केली होती तोडफोड

  • 23 Mar 2023 07:50 AM (IST)

    मालवाहू ट्रकने छोटा टेम्पो आणि कंटेनरला दिली धडक

    भरधाव वेगाने पुण्याहून नगरकडे येणाऱ्या मालवाहू ट्रकने छोटा टेम्पो आणि कंटेनरला दिली धडक

    ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार 11 जण गंभीर जखमी

    नगर पुणे रोडवरील कामरगाव शिवारातील घटना

    देवगड आणि शनिशिंगणापूरचे दर्शन घेऊन पुण्याकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात

    या भीषण अपघातात तीन भाविकांचा जागीच मृत्यू यामध्ये एका 14 वर्षीय बालकाचा समावेश

    11 जण गंभीर जखमी जखमींवर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

  • 23 Mar 2023 07:32 AM (IST)

    संजय राऊत आजपासून नाशिकमध्ये

    संजय राऊत आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

    येत्या रविवारी उद्धव ठाकरे यांची मालेगाव मध्ये सभा

    सभेच्या नियोजनासाठी संजय राऊत नाशिक आणि मालेगावचा दौरा करणार

    मालेगावच्या सभेपूर्वी संजय राऊत यांच्याकडून घेतला जाणार एकूणच तयारीचा आढावा

    दादा भुसे आणि संजय राऊत यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मालेगावच्या सभेकडे लक्ष

  • 23 Mar 2023 07:26 AM (IST)

    पुणे महानगरपालिकेचा भोंगळा कारभार

    शिक्षण विभागासाठी पुणे महानगरपालिका निरूत्साही

    गेल्या वर्षभरात शिक्षण समितीची एकही बैठक नाही

    शिक्षण विभागातील अनेक निर्णय प्रलंबित

    मात्र शिक्षण विभागातील निर्णय रखडले नसल्याचा प्रशासनाचा दावा

    पुणे महापालिकेत प्रशासक आल्यापासून शिक्षण समितीची एकही बैठक झाली नसून शिक्षण विभागाच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती समोर

    शिक्षण समितीचा एकही विषय कुठल्याही बैठकीत मांडला गेला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड

  • 23 Mar 2023 07:18 AM (IST)

    माता अमृतानंदमयी यांची संघाच्या स्मृतीभवन परिसरात भेट

    माता अमृतानंदमयी यांनी नागपुरात घेतली सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट

    मोहन भागवत आणि माता अमृतानंदमयी यांच्यात काही काळ चर्चा

    माता अमृतानंदमयी यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं

  • 23 Mar 2023 07:08 AM (IST)

    मुंबई : माहीममधील बांधकाम तोडलं जाणार

    माहीम समुद्रानजीक बांधकाम तोडलं जाणार जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

    मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्याकडून सहा जणाच पथक नेमलं

    सदर टीम सकाळी आठ वाजता अनधिकृत बांधकाम ठिकाणी पोचणार

    पालिका आणि पोलिसांच्या मदतीने बांधकाम तोडण्यात यावे

  • 23 Mar 2023 06:26 AM (IST)

    कल्याण आधारवाडी गणेश चौक परिसरामध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर

    नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत करावा लागला प्रवास

    स्थानिक नगरसेवक आणि पालिका अधिकारी घटनास्थळी धाव घेत जेसीपीच्या सहाय्याने मार्ग करत केला पाण्याचा निचरा

    ठाणे महापालिकेच्या स्टेम प्राधिकरणाची 1800 एम.एम व्यासाची जलवाहिनी असून व्हॉल लिकेज झाल्याची माहिती

  • 23 Mar 2023 06:19 AM (IST)

    महिला महाराष्ट्र केसरीचा थरार आजपासून

    सांगली क्रीडा संकुलात रंगणार कुस्ती स्पर्धा

    पहिली महिला महाराष्ट्र केसरी व 24 वी राज्य अजिंक्यपद महिला कुस्ती स्पर्धेसाठी सांगलीचा आखाडा सज्ज झाला आहे.

    महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सांगली क्रीडा संकुलात आजपासून महिलांच्या कुस्त्यांचा थरार रंगणार आहे.

    विजेतेपदासाठी कोल्हापूर, पुणे, नगर संघात चुरस दिसणार आहे.

    24 मार्चला कोण पहिली मानाची गदा जिंकणार याचा फैसला होईल.

  • 23 Mar 2023 06:15 AM (IST)

    देशातील टॉप टेन खासदारांमध्ये सुप्रिया सुळे नंबर वनवर

    खासदार श्रीरंग बारणे दुसऱ्या स्थानावर

    खासदार श्रीकांत शिंदे 8 तर राहुल शेवाळे 9 नंबरवर

    टॉप टेन खासदारांच्या यादीत महाराष्ट्राचा बोलबाला, चार खासदारांचा समावेश

    सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांमध्ये सुप्रिया सुळे दुसऱ्या क्रमांकावर

    तर सर्वाधिक खासगी विधेयक मांडणाऱ्या खासदारांमध्ये गोपाल शेट्टी नंबरवनवर

Published On - Mar 23,2023 6:10 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.