Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

भीमराव गवळी, Tv9 मराठी

भीमराव गवळी, Tv9 मराठी | Edited By: महेश घोलप, Tv9 मराठी

Updated on: Nov 30, 2022 | 11:17 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Latest Breaking
Image Credit source: tv9 marathi

मुंबई : आज दिनांक 31 ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. गुजरातमध्ये पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 141 वर पोहोचली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला आजचा दौरा रद्द केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील शिंदे गटाचे सर्वच्या सर्व 50 आमदार पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाणार असल्याची घो,णा केली आहे. आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद सोडवण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी या दोन्ही आमदारांना बोलावून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 31 Oct 2022 05:38 PM (IST)

  Video : आदित्य ठाकरे लाईव्ह

  मुख्यमंत्र्यांना माझं चॅलेंज आहे, त्यांनी माझ्याशी वन टू वन बोलावं- आदित्य ठाकरे

  हे खोके सरकार तर होतं, आता तर हे खोटं सरकारही झालंय- आदित्य ठाकरे

  देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच अपयश झाकायला केंद्राकडे बोट दाखवलं

  आदित्य ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप

  प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याववरुन जोरदार हल्लाबोल

  मुंबईतील पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

  आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेंबडी पोरं म्हणणं अयोग्य- आदित्य ठाकरे

  पाहा पत्रकार परिषद

 • 31 Oct 2022 04:05 PM (IST)

  नाशिक – सुरगाणा तालुक्यात दोन सख्ख्या बहिणी गेली वाहून

  नाशिक – सुरगाणा तालुक्यात दोन सख्ख्या बहिणी गेली वाहून

  कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या असता घडली दुर्घटना

  बहिणीला वाचवण्यासाठी गेलेली दुसरी बहीण देखील बुडाली

  सुरगाणा च्या उंबरठाण मधली घटना

  भूमिका राऊत (८ वर्ष ) आणि उज्ज्वल राऊत (11 वर्ष ) अस दोघींचं नाव

 • 31 Oct 2022 12:30 PM (IST)

  28 तारखेपासून राज ठाकरे यांचा कोकण दौरा

  28 तारखेपासून राज ठाकरे यांचा कोकण दौरा

  27 नोव्हेंबरला गट अध्यक्षांचा मेळावा घेणार- राज ठाकरे

  माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांची माहिती

  प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय याचं वाईट वाटतं- राज ठाकरे

  पंतप्रधानांसाठी प्रत्येक राज्य सारखंच हवं- राज ठाकरे

 • 31 Oct 2022 11:57 AM (IST)

  राजू शेट्टी पुण्यात मोर्चा काढणार

  सोलापूरला 15 ऑक्टोबररला ऊस परिषद झाली त्यात ठरल्याप्रमाणे 7 नोव्हेंबरला पुण्यात मोर्चा

  साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार

  शेतकऱ्यांची लूटमार थांबवा यासाठी मोर्चा

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा इशारा

 • 31 Oct 2022 11:45 AM (IST)

  बुलढाणा : कार पुलावरुन कोसळून भीषण अपघात

  बुलढाणा : कार पुलावरुन कोसळून भीषण अपघात

  जालना खामगाव महामार्गावरील जांभोरा पुलावर दुर्घटना

  भीषण अपघाता काल पुलावरून थेट नदीत कोसळली

  अपघातात पाच जण जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

 • 31 Oct 2022 11:04 AM (IST)

  धुळे : टोमॅटो वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात

  धुळे : टोमॅटो वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात

  अपघातग्रस्त वाहनातून टोमॅटो घेऊन जाण्यासाठी गर्दी

  मिळेल त्या साहित्याने लोकांनी लुटले टोमॅटो

  नाशिकहून इंदूरकडे जात असताना पहाटेच्या सुमारास झाला

  अपघातग्रस्त ट्रकमधील जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरु

  अपघातामुळे काही काळ नाशिककडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद

 • 31 Oct 2022 10:42 AM (IST)

  लासलगांव बाजार समितीत कांद्यांला 'भाव'

  लासलगांव बाजार समितीत कांद्यांला 'भाव'

  कांद्याच्या बाजार भावात साडेसातशे रुपयांची वाढ

  कांद्याचा कमाल बाजार भाव तीन हजार रुपयांवर

  कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान

  कांद्याला कमाल 3100 रुपये , किमान 1000 रुपये

  तर सर्वसाधारण 2500 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव

 • 31 Oct 2022 10:39 AM (IST)

  कामोठे गावात धक्का लागला म्हणून 17 वर्षांच्या तरुणाची हत्या

  नवी मुंबई : कामोठे गावात धक्का लागला म्हणून 17 वर्षांच्या तरुणाची हत्या

  हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक, पोलीस तपास सुरु

  नवी मुंबईच्या कामोठेमध्ये हत्येच्या घटनेनं खळबळ

  दारु पिऊन पान खायला गेले असता तरुणाचा धक्का लागल्यानं पाठीत चाकू भोसकून हत्या

 • 31 Oct 2022 10:10 AM (IST)

  पोलिसांना दिवाळी बोनस मिळावा यासाठी परभणीत शोले स्टाईलने आंदोलन

  जनशक्ती शेतकरी संघटनेकडून परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कोक येथे आंदोलन

  जनशक्ती शेतकरी संघटनेच्या जिल्हाप्रमुख शीतल कदम ह्या टाकीवर चढत करतायेत आंदोलन

  पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा

 • 31 Oct 2022 10:05 AM (IST)

  ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख विशाल कपले यांच्यावर चाकू हल्ला

  अकोला : ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख विशाल कपले यांच्यावर चाकू हल्ला

  चाकू हल्ल्यानंतर उपचारादरम्यान विशाल कपलेंचा मृत्यू

  अकोला शहरातील जठारपेठ चौकात कपलेंवर चाकू हल्ला

 • 31 Oct 2022 10:01 AM (IST)

  यंदा नागपुरी संत्री आंबट! अतिवृष्टीमुळे फटका

  नागपूर- यंदा नागपुरी संत्री आंबट! अतिवृष्टीमुळे फटका

  संत्र्याला गोडवा कमी असल्याने दरही पडले

  गेल्यावर्षीपेक्षा ५ ते ६ हजार रुपये टन दर पडले

  नागपूर जिल्ह्यातील संत्री उत्पादकांचं मोठं नुकसान

 • 31 Oct 2022 09:45 AM (IST)

  हम साथ साथ है: रवी राणा

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चार तास चर्चा केल्यानंतर आमदार रवी राणा बॅकफूटवर

  ऑल इज वेल आहे. हम साथ साथ है, रवी राणांची मीडियाला प्रतिक्रिया

  वाद मिटल्याचंही रवी राणा यांनी केलं कबूल

  रवी राणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

 • 31 Oct 2022 09:06 AM (IST)

  औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू

  अधिसभेच्या पदवीधर प्रवर्गातील 10 जागांसाठी 26 नोव्हेंबर ला होणार निवडणूक

  28 नोव्हेंबरला लागणार निकाल

  अर्ज घेण्यासाठी विद्यापीठ परिसरातील नेत्यांची लगबग

  अधिसभेच्या पदवीधर प्रवर्गातील 10 जागांसाठी ही महत्वाची निवडणूक

 • 31 Oct 2022 09:03 AM (IST)

  अमरावती इमारत दुर्घटना प्रकरणाची चौकशी होणार

  अमरावती विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे करणार घटनेची चौकशी

  अमरावती शहरात काल दुपारी इमारती कोसळून पाच जणांचा झाला होता मृत्यू

  इमारत मालका विरुद्ध कलम 304 (निष्काळजीपणा मृत्यूस जबाबदार ठरणे) गुन्हे दाखल

  सुशीला शहा आणि हर्षल शहा अशी गुन्हे दाखल झालेल्या इमारत मालकांची नावे

  इमारत धोकादायक असल्याने पालिकेने सहा नोटीस बजावल्या होत्या

 • 31 Oct 2022 09:01 AM (IST)

  राणा-कडू वाद गोड झाला? रवी राणांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

  आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर पडदा पडल्याची शक्यता आहे

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही आमदारांशी केली चर्चा

  दोघांनाचीही मुख्यमंत्र्यांनी समजूक काढल्याचं सूत्रांनी सांगितलं

  रवी राणा थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार

 • 31 Oct 2022 09:01 AM (IST)

  गुजरात- मोरबी पूल दर्घटनेत मृतांचा आकडा 141 च्या पुढे

  मोरबी शहरातील माच्छू नदीवरील ब्रिज रविवारी संध्याकाळी कोसळला

  दुर्घटनेत आतापर्यंत 141 जण मृत्यूमुखी पडले तर 200 जण जखमी झाल्याची माहिती

  घटनास्थळी बचावकार्य अजूनही सुरुच, 200 जण अद्याप बेपत्ता असल्याची भीती

  मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर

 • 31 Oct 2022 08:59 AM (IST)

  पिंपरी चिंचवडमध्ये ड्रोनने लग्नाचं शूट करण्यासाठी परवानगी बंधनकारक

  पिंपरी चिंचवड शहरात लग्न सोहळ्यात ड्रोनने शूट हमखास केलं जातं, पण त्यासाठी परवानगी घेतली का?

  लग्न सोहळ्यात आणि इतर वेळी शूट करायचा असल्यास पोलीस आयुक्तालयात करावा लागणार अर्ज

  शासकीय यंत्रणेला देखील परवानगी घ्यावी लागतेय

  पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालये, न्यायालय, आयटी पार्क, एमआयडीसी, मेट्रो स्थानक,

  तहसील कार्यालय, एसटी डेपो, विद्युत सबस्टेशन, उच्चदाब वाहिणीचा टॉवर, आदी ठिकाणी ड्रोन उडवण्यास बंदी आहे

 • 31 Oct 2022 08:57 AM (IST)

  पुणे महापालिकेतील रस्त्यांची निकृष्ट कामे करणारे 25 ठेकेदार काळ्या यादीत

  17 रस्त्यांचे निकृष्ट काम करणार्‍या 13 ठेकेदारांना गेल्या महिन्यात काळ्या यादीत टाकण्यात आले

  महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आलेल्या 255 रस्त्यांची कामे निकृष्ट झाली असल्याचं तपासणीत समोर

  जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी

Published On - Oct 31,2022 8:52 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI