AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : धुळ्यात पोलीस कुटुंबीयच असुरक्षित, नक्की काय झालं?

| Edited By: | Updated on: Sep 14, 2025 | 3:14 PM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra News LIVE : धुळ्यात पोलीस कुटुंबीयच असुरक्षित, नक्की काय झालं?

मुंबईत जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. पुढील दोन दिवस कोकणासह घाटपरिसर आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इतर भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईत सध्या ढगाळ वातावरणासहीत जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवस वातावरण असंच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर कल्याण शीळ रोडवर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, यातच मध्यरात्री मोठा दिशा दर्शक फलक अचानक रस्त्यावर कोसळला आणि काही काळ दोन्ही साईडची वाहतुक ठप्प झाली होती. दरम्यान स्थानिक नागरिकांनी पोलीस, फायब्रिगेड यांना माहिती दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पडलेला फलक बाजूला काढत वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला. पण या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही… यासह देश-विदेश, महाराष्ट्र, राजकारण, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Aug 2025 07:56 PM (IST)

    स्मृती इराणी प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय

    1991आणि 1993 मध्ये स्मृती इराणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या की नाही, याची माहिती आरटीआय अंतर्गत देण्याचे सीबीएसईला निर्देश देणारा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

  • 25 Aug 2025 07:41 PM (IST)

    ग्रेटर नोएडामध्ये दुचाकी आणि कारच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू

    उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील कुलेसारा पुष्ता रोडवर कार आणि बाईकची टक्कर झाली. या अपघातात बाईकवरील चार मुलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी कार जप्त केली आहे आणि चालकाला ताब्यात घेतले आहे.

  • 25 Aug 2025 07:24 PM (IST)

    मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना नागालँडचीही जबाबदारी

    मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी सोमवारी नागालँडचे 22 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. राज्यपाल ला गणेशन यांच्या निधनानंतर त्यांना हा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. कोहिमा येथील राजभवन येथे शपथविधी समारंभ पार पडला, जिथे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आशुतोष कुमार यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

  • 25 Aug 2025 07:15 PM (IST)

    फिजीचे पंतप्रधान राबुका यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली

    फिजीचे पंतप्रधान सितेनी लिगामामादा राबुका यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपती म्हणाले की, भारत पॅसिफिक आयलंड कंट्रीज (पीआयसी) सोबत आपले संबंध आणि विकास भागीदारी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यापैकी फिजी हा एक विशेष भागीदार आहे.

  • 25 Aug 2025 07:12 PM (IST)

    धुळ्यात पोलीस कुटुंबीयच असुरक्षित, नक्की काय झालं?

    धुळे शहरातील दक्षता पोलीस कॉलनीतील 2 भावंडांनी गाडी फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस कुटुंबियांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे. या तोडफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. धुळ्यातल्या सुरत बायपास रोडवरील पोलीस दक्षता कॉलनीत हा प्रकार घडला. आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस कॉलनीतील महिला एकवटल्या आहे. तसेच या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलीस पत्नींकडून करण्यात आली.

  • 25 Aug 2025 06:41 PM (IST)

    आपले सरकार पोर्टलद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवा लवकरच व्हॉट्सॲपवर, मुख्यमंत्र्यांकडून सूचना काय?

    राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना ‘आपले सरकार’ या पोर्टलद्वारे सेवा पुरवण्यात येतात. याच सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवण्यात याव्यात. या सर्व सेवा योग्यप्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्या दृष्टीने सर्व तालुक्यांमध्ये एक रिंग तयार करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिक सेवांसंदर्भातील बैठकीत दिल्या.

  • 25 Aug 2025 06:08 PM (IST)

    यवतमाळमध्ये पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांकडूंन मंत्र्यांना चुकीची आकडेवारी

    यवतमाळमध्ये पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांकडूंन मंत्र्यांना चुकीची आकडेवारी देण्यात आलीय. त्यामुळे पालकमंत्री संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पालकमंत्र्यांनी उमरखेड येथे पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर ही आढावा बैठक घेतली.

  • 25 Aug 2025 04:52 PM (IST)

    नाशिकच्या वडनेर परिसरातील दुसरा बिबट्याही जेरबंद

    नाशिकच्या वडनेर परिसरात दहशत माजविणारा दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला  यश आले आहे. याआधी एका बिबट्याला पकडले होते.

  • 25 Aug 2025 04:38 PM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, गणपती आधी पगार मिळणार

    एसटी कर्मचाऱ्यांचा पगार गणपती आधी होणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवासाठी या महिन्यात लवकर केला जाणार होता. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील एसटी कर्मचारी पगाराची फाईल मागच्या आठवड्यात वित्त विभागाकडे पाठवली होती आणि लवकर निधी देण्याचे मागणी केली होती. त्यास मागणीला यश आले आहे.

  • 25 Aug 2025 04:28 PM (IST)

    चेंबूर येथे वराह जयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय

    मुंबईतील चेंबूर या ठिकाणी सकल हिंदू समाजाने वराह जयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्सवामध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाआरतीही केली जाणार आहे. चेंबूरनंतर नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणीही होणाऱ्या महाआरतीमध्ये मंत्री राणे सामील होतील.

  • 25 Aug 2025 04:16 PM (IST)

    नाशिक : सार्वजनिक गणेश मंडळांना दिलासा

    नाशिक – सार्वजनिक गणेश मंडळांचे शुल्क अखेर माफ करण्यात आले आहे. गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर महापालिकेने निर्णय घेतला आहे.

  • 25 Aug 2025 03:50 PM (IST)

    बीडमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांचे चलो मुंबईचे बॅनर

    बीडच्या गेवराई परिसरात आमदार विजयसिंह पंडित यांचे चलो मुंबई आशयाचे बॅनर पाहायला मिळत आहेत. याच बॅनरमधून लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता.

  • 25 Aug 2025 03:40 PM (IST)

    प्रेम संबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्याने मुलीची आत्महत्या

    नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बळजबरीने प्रेम संबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्याने अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. एकच महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन मुलांनी अल्पवयीन मुलीला प्रेम संबंध ठेवण्यास केली जबरदस्ती होती.

  • 25 Aug 2025 03:20 PM (IST)

    अंगणवाडी सेविकांचे मोर्चा काढत ठिय्या आंदोलन

    जळगावात विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या कामाचा प्रोत्साहन भत्ता, तसेच मोबाईल रिचार्जचा मोबदला मिळावा यासह विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालत मागण्यासंदर्भात निवेदन दिले आहे.

  • 25 Aug 2025 03:11 PM (IST)

    गणेश उत्सवामुळे धुळे बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी

    एसटी महामंडळाच्या वतीने कोकणासाठी धुळे विभागातून 325 बसेस पाठवण्यात आले आहेत. महामंडळाच्या वतीने विभागातून कोकणातील गणेश उत्सवासाठी 325 बसेस गेल्यामुळे धुळ्यातील बस स्थानकातून प्रवाशांना बसेस नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

  • 25 Aug 2025 02:59 PM (IST)

    जळगाव बोगस शालार्थ आयडी तयार 50 शिक्षकांच्या बोगस भरती?

    जळगाव जिल्ह्यात बोगस शालार्थ आयडी तयार करून जवळपास 50 शिक्षकांच्या बोगस भरतीसंदर्भात नाशिक येथे आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करम्यात आले आहेत. या गुन्ह्याच्या तपासात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पथक आज जळगावात चौकशीसाठी दाखल झाले आहे. पाच अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची पथकाकडून जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण अधिकारी दालनात बंदद्वार चौकशी केली जात आहे.

  • 25 Aug 2025 02:50 PM (IST)

    पालघरमधील नावझे गावात शेतकऱ्याने मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळीत दहा फुटी अजगर अडकल्याने खळबळ

    पालघरमधील नावझे गावात शेतकऱ्याने मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळी टाकली होती. त्या जाळीत चक्क दहा फुटी अजगर अडकल्याने खळबळ उडाली. नावझे गावातील शेतकरी रमेश पाटील यांनी शेतावर लावलेल्या जाळीमध्ये हा अजगर अडकला होता. अजगर अडकल्याची माहिती मिळताच त्याला बघण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिकांनी या अजगराबाबत सर्पमित्राला माहिती दिल्यानंतर सर्पमित्राने अजगराला जाळ्यातून सुरक्षितपणे बाहेर काढून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडले.

  • 25 Aug 2025 02:32 PM (IST)

    आमदार विजयसिंह पंडित यांचा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा

    ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू करत आहेत. दरम्यान गेवराई विधानसभेचे आमदार विजयसिंह पंडित यांनी चलो मुंबई अशा आशयाचे बॅनर एक्सवर (ट्वीटर) पोस्ट केले आहे. यामधून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याचं स्पष्ट होत आहे.

  • 25 Aug 2025 02:10 PM (IST)

    फडणवीसांच्या आईबद्दल जरांगेंनी अपशब्द वापरल्याच्या आरोपावर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया

    फडणवीसांच्या आईबद्दल जरांगेंनी अपशब्द वापरल्याचा आरोपावर प्रविण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीसांची राजकारणावर पकड आहे. त्यामुळे त्यांना बदनाम करणं, त्यांना कोंडीत पकडणे असे प्रयोग सुरु आहे” असं भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

  • 25 Aug 2025 01:58 PM (IST)

    वैभव खेडेकर मनसेतून बडतर्फ

    वैभव खेडेकर मनसेतून बडतर्फ झाले आहेत. संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या सहीने बडतर्फीचे आदेश निघाले आहेत. खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव बडतर्फ झाले आहेत.

  • 25 Aug 2025 01:45 PM (IST)

    शिक्षकांच्या बोगस भरती संदर्भात नाशिक येथे आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल, तपासासाठी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जळगावात चौकशीसाठी दाखल

    जळगाव जिल्ह्यात बोगस शालार्थ आयडी तयार करून जवळपास ५० शिक्षकांच्या बोगस भरती संदर्भात नाशिक येथे आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल असून या गुन्ह्याच्या तपासात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पथक आज जळगावात चौकशीसाठी दाखल झाले आहे.

    पाच अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे पथकाकडून जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या दालनात बंद द्वार चौकशी केली जात आहे.

    ज्या शाळेत बोगस शालार्थ आयडी याचा वापर करून बोगस शिक्षकांची भरती झाली आहे त्या शाळेतील मुख्याध्यापकांना बोलावून त्यांची चौकशी केली जात आहे.

  • 25 Aug 2025 01:33 PM (IST)

    वांद्रे येथील एमएसआरडीसी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन

    वांद्रे येथील एमएसआरडीसी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन.  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते निषेध करण्यासाठी रुग्णवाहिकेतून आले होते. हात आणि डोक्यावर पट्टी बांधून आंदोलक एमएसआरडीसी कार्यालयात पोहोचले.  मुंबईतील रस्ते आणि पुलांवरील खड्ड्यांविरुद्ध एक अनोखा आंदोलन  करण्यात आलं.

  • 25 Aug 2025 01:22 PM (IST)

    गोंदिया शहरातील वाहतूक नियंत्रणावर आता कॅमेऱ्याचे लक्ष, नियम तोडणाऱ्यांना होणार कारवाई

    दिया जिल्हा वाहतूक शाखा द्वारा गोंदिया शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. याचबरोबर एएनपीआर कॅमेरे लावण्यात आले आहेत. जेणेकरून शहरांमध्ये होणाऱ्या विविध घटनांवर आळा घालण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी यांचा उपयोग होणार आहे.

  • 25 Aug 2025 01:11 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांच्या आई बद्दल बोललो असेन तर.. काय म्हणाले मनोज जरांगे पाटील

    देवेंद्र फडणवीस यांच्या आई बद्दल मी काही बोललो नाही, पण काही बोललो असेन तर ते शब्द मागे घेतो – मनोज जरांगे पाटील

  • 25 Aug 2025 12:52 PM (IST)

    अमरावती- राजकमल चौक ते जयस्तंभ चौक ते रेल्वे स्टेशन चौक जोडणारा पूल पूर्णत: बंद

    अमरावती शहरातील अत्यंत महत्वाचा असलेला राजकमल चौक ते जयस्तंभ चौक ते रेल्वे स्टेशन चौक जोडणारा पूल आता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे. पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने अमरावती शहरातील राजकमल चौक इर्विन चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अमरावतीमधील सिग्नलवर वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. तीन चौकांना जोडणारा हा पूल पूर्णतः नादुरुस्त झाल्याने सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तसंच पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला.

  • 25 Aug 2025 12:40 PM (IST)

    दोन दिवसांत आरक्षण द्या, मुंबईत यायची गरज भासणार नाही- जरांगे

    “अजूनही सरकारकडे दोन दिवस आहेत. हैदराबाद गॅझेटवर तुम्ही 13 महिन्यांपासून अभ्यास करत आहात. दोन दिवसांत आरक्षण द्या, मुंबईत यायची गरज भासणार नाही. संविधानात बसणारं आरक्षण द्या. फडणवीसांना आज आणि उद्या.. दोन दिवसांची संधी देतो,” असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

  • 25 Aug 2025 12:30 PM (IST)

    10 टक्के आरक्षण म्हणजे भाड्याचं घर, कधीही जाईल- जरांगे पाटील

    “आम्हाला शेती करायला कोणतीही लाज वाटत नाही. 10 टक्के आरक्षण म्हणजे भाड्याचं घर, कधीही जाईल. मराठा आणि कुणबी एकच हा जीआर हवाय. मराठा समाज फार संयमाने वागलाय,” असं जरांगे म्हणाले.

  • 25 Aug 2025 12:20 PM (IST)

    मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही- जरांगे पाटील

    “आम्हाला न्यायासाठी जायचं आहे, कोणाला त्रास द्यायचा नाही. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मराठा-कुणबी एक आहेत, हा अध्यादेश काढा,” अशी मागणी जरांगेंनी केली.

  • 25 Aug 2025 12:10 PM (IST)

    मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद

    “27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता मुंबईसाठी निघणार आहे. आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार आहोत,” अशी घोषणा जरांगे पाटलांनी केली.

  • 25 Aug 2025 11:50 AM (IST)

    कांदिवलीत एक चार मजली इमारत कोसळली

    कांदिवली पश्चिमेकडील एसव्ही रोडजवळ एक चार मजली इमारत कोसळली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. बीएमसीने ही इमारत धोकादायक असल्याचे कारण देत ती आधीच रिकामी केली होती. सध्या, बीएमसीची टीम घटनास्थळी पोहोचली आहे आणि हटवण्याचे काम करत आहे.

  • 25 Aug 2025 11:43 AM (IST)

    येणाऱ्या काळात भ्रष्टाचार मुक्त कारभार देण्यासाठी कटिबद्ध – अमित ,साटम

    “मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर निवडून आणण्याकरता, मुंबईकरांचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी कठोर प्रयत्न करु. येणाऱ्या काळात भ्रष्टाचार मुक्त कारभार देण्यासाठी कटिबद्ध आहोत” असं अमित साटम यांनी सांगितंलं

  • 25 Aug 2025 11:43 AM (IST)

    विकास, उन्नती आणि प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध – अमित साटम

    “गेल्या 11 वर्षात मुंबई शहराचा कायापालट, मुंबईत परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न त्याचा रिझल्ट मुंबईकरांना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या 11 वर्षात काम केलय तसाच विकास, उन्नती आणि प्रगती मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत” असं मुंबई भाजपचे नवीन अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितलं.

  • 25 Aug 2025 11:37 AM (IST)

    महाराष्ट्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज

    “गणेशोत्सवाच्या आधी उद्याच वेतन देण्याचा जीआर काढलेला आहे. महाराष्ट्र सरकारकडून जे वेतन अधिकारी, कर्मचारी पेन्शनधारकांना दिलं जातं. उद्या 26 तारखेला त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होईल, तसा जीआर काढलेला आहे” असं राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

  • 25 Aug 2025 11:18 AM (IST)

    शहर खड्डेमुक्त करण्याचा महापालिकेचा दावा फोल

    दुचाकी चालक महिलेचा खड्डयांमुळे झालेला अपघात CCTV कॅमेऱ्यात कैद. शहरातील मायको सर्कल ते आरडी सर्कलला जोडणाऱ्या मार्गावरील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. अपघातात महिलेचा हात आणि डोक्याला गंभीर इजा. गणेशोत्सवापूर्वी नाशिक शहर खड्डेमुक्त करण्याचा महापालिकेचा दावा फोल ठरण्याची चिन्हे. खड्डे बुजवले जात नसल्याने नागरिक पालिकेच्या कारभाराविरोधात संतप्त.

  • 25 Aug 2025 10:22 AM (IST)

    भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती

    भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे.

  • 25 Aug 2025 10:15 AM (IST)

    पंतप्रधान जेलमध्ये गेले, तर त्यांच्याकडूनही राजीनामा घेतला जाईल – अमित शाह

    कोणत्याही परिस्थितीत बिल पास होणारच, विरोधकांकडून जनतेते संभ्रम पसरवण्याचे काम सुरु आहे. तुरुंगातून मुख्यमंत्री, पंतप्रधान सरकार चालवू शकतात का, जर पंतप्रधान जेलमध्ये गेले, तर त्यांच्याकडूनही राजीनामा घेतला जाईल – अमित शाह

  • 25 Aug 2025 10:09 AM (IST)

    विरोधक संसदेत चर्चा करु देत नाही – अमित शाह

    देशात एनडीएच्या मुख्यमंत्र्‍यांची संख्या जास्त आहे. विरोधक संसदेत चर्चा करु देत नाही, विरोधकांनी विधेयकाच्या विरोधातील कारणं सांगावीत, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

  • 25 Aug 2025 09:52 AM (IST)

    मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन

    आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अमित साटम यासह मुंबईतील आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित राहणार सध्या प्रवीण दरेकर भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत.

  • 25 Aug 2025 09:34 AM (IST)

    भरधाव इनोव्हा कार अपघातग्रस्त ट्रक वर धडकून भीषण अपघात

    राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वर खामगाव जवळ वळण मार्गावर सकाळी अपघात. कार धुळे येथून नागपूर कडे जाताना सकाळी अपघात. अपघातात कार मधील दोघे गंभीर जखमी. जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू..

  • 25 Aug 2025 09:17 AM (IST)

    ठाण्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिला हप्त्यात मेट्रोची होणार ट्रायल रन…

    ५ ते ९ सप्टेंबर दरम्यान होणार पहिला ट्रायल रन. ठाण्यातील आनंद नगर परिसरात मेट्रो लाईन क्रमांक चार ची ट्रायल रन होणार असून याकरिता मेट्रो ट्रेनची बोगी आणण्यात आली आहे. रात्रीपासूनच क्रेनच्या साह्याने ही बोगी मेट्रो लाईनवर चढवण्याचे काम सुरू आहे..

  • 25 Aug 2025 09:11 AM (IST)

    मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये बिघाड

    मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये बिघाड झाला आहे. मनमाडजवळच्या पानेवाडी स्थानकावर गाडी उभी आहे. गाडीला 20 मिनिटांपेक्षा जास्त विलंब झालाय. प्रेशर पाईप तुटल्याने झाला गाडीचा खोळंबा. प्रेशर पाईप दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू.

  • 25 Aug 2025 09:06 AM (IST)

    तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पुन्हा विस्कळीत; प्रवाशांचे हाल

    मध्य रेल्वे : कल्याण–सीएसटी दरम्यान 10 ते 15 मिनिट उशीर. वेस्टर्न रेल्वे : विरार–चर्चगेट दरम्यान 5 ते 7 मिनिटे उशीर. ट्रान्स-हार्बर लाइन : वाशी–सीएसएमटी दरम्यान 5 ते 7 मिनिटे उशीर. तांत्रिक कारणांमुळे रेल्वे सेवा विस्कळीत.  पहाटेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने येणाऱ्या चाकरमानी आणि प्रवाशांचे हाल

  • 25 Aug 2025 08:55 AM (IST)

    पावसामुळे मध्य रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने

    पावसामुळे मध्य रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे.  सीएसटीएमकडे जाणारी रेल्वे लोकल उशिराने धावत आहेत, तर ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणारी रेल्वे लोकल पाच ते दहा मिनिटे उशिराने लोकल धावत आहे….

  • 25 Aug 2025 08:45 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाला सुरुवात…

    सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी आणि कामावर जाणाऱ्यांसाठी मोठी अडचण होत आहे… सलग पाच दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांना मोठा फायदा होत आहे…. आज सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने याचा परिणाम धरण क्षेत्रावर होणार आहे… जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा लागली होती त्यामुळे सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत होणार… जिल्ह्यातील अनेक भागात 65 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे…

  • 25 Aug 2025 08:35 AM (IST)

    मेहकर तालुक्यात डोणगाव परिसरात अनेकांची फसवणूक ..

    खाजगी फायनान्स कंपनीच्या नावाखाली अनेकांना लावला चुना… श्रीराम फायनान्स कंपनीच्या एजंट गजानन आखाडे कडून फसवणूक झाल्याचा आरोप… फसवणूक झाल्याची नागरिकांनी केली पोलिस अधीक्षकांकडे तक्रारा… सुलभ हफ्त्यावर कर्ज देण्याच्या नावाखाली तसेच कमी व्याजदर देण्याच्या नावाखाली केली फसवणूक..

  • 25 Aug 2025 08:20 AM (IST)

    भायखळा स्टेशनवर ‘पाण्याचा धबधबा’; प्रवाशांची दैना!

    भायखळा रेल्वे स्थानकाच्या 3 व 4 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर स्कायवॉकवरून उतरताच पत्र्याच्या गळतीमुळे पाण्याचा धबधबा… सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना छत्री उघडून धबधब्यातून काढावा लागला मार्ग…प्रवासी पाण्यातून ट्रेन पकडण्यासाठी धावताना दिसले… गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त करत तातडीने दुरुस्तीची करण्याची प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

  • 25 Aug 2025 08:03 AM (IST)

    गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग

    990 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू… पाणलोट क्षेत्रात काही प्रमाणात पाऊस होत असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू… गंगापूर धरण सध्या 97 टक्के भरले आहे… गंगापूर धरणातून नाशिक शहराला केला जातो पाणीपुरवठा

Published On - Aug 25,2025 8:01 AM

Follow us
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.