AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : लातूरमध्ये सर्वदूर पावसाला सुरुवात

| Edited By: | Updated on: Jun 28, 2026 | 9:39 PM
Share

Maharashtra News LIVE : दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाने राज्यातील काही ठिकाणी हजेरी लावली आहे. पुढील आठदिवसात जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यासह महाराष्ट्र, देश, विदेश, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra News LIVE : लातूरमध्ये सर्वदूर पावसाला सुरुवात
Breaking news Image Credit source: Tv9 Network

राज्यात पुन्हा एकदा पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र अल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच आणखी काही राज्यात आज पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच खासदारांच्या पक्षांतरनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने जिल्हाभर संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे.आज धाराशिव येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. तर टीईटी पेपर फुटी प्रकरणी पोलिसांच्या विशेष पथकाने तीन आरोपींना अटक केली आहे. या तीन आरोपींनी पेपरफुटीचा कट कसा रचला याची चौकशी होणार आहे. जळगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाने यांची मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. अमळनेर येथे कचऱ्याच्या घंटागाडीतून मृतदेह नेण्यात आल्याच्या प्रकाराबाबत भूषण भदाने यांची कारवाईच्या मागणीसाठी तक्रार केली आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Jun 2026 08:45 PM (IST)

    नांदेड शहरात पावसाला सुरुवात

    नांदेड शहरात पावसाला सुरुवात

    तीन दिवसानंतर पावसाची हजेरी

    पंधरा मिनिटांपासून जोरदार पाऊस

    सखल भागात साचू लागलंय पावसाचे पाणी

    या पावसाळ्यातला पहिलाच मोठा पाऊस

    पंधरा मिनिटांपासून धो धो पाऊस

  • 28 Jun 2026 08:37 PM (IST)

    ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत किसन कथोरे पॅनेलचा दणदणीत विजय

    ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत किसन कथोरे पॅनेलचा दणदणीत विजय

    २१ पैकी १७ जागांवर सहकार पॅनेलची सरशी

    माजी खासदार कपिल पाटील गटाला मोठा राजकीय धक्का

    बदलापुरात समर्थकांचा ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

  • 28 Jun 2026 08:15 PM (IST)

    फलटण तालुक्यासह खटाव तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

    फलटण तालुक्यासह खटाव तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

    आज संध्याकाळच्या सुमारास पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान

    मागील एक महिन्यापासून पावसाला विलंब झाल्यामुळे शेतकऱ्याच्या पेरण्या खोळंबल्या

    शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामासाठी हा पाऊस फायदेशीर

  • 28 Jun 2026 07:17 PM (IST)

    लातूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात..

    लातूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. देवणी तालुका वगळता सर्वच तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे. लातूर, उदगीर, अहमदपूर, चाकुर, जळकोट, औसा, शिरूर अनंतपाळ तालुक्यात पाऊस पडतो आहे. लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कालपासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे आता पेरणी होतील अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

  • 28 Jun 2026 06:59 PM (IST)

    पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरूनगर परिसरात पावसाची हजेरी

    पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरूनगर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा आणि दमटपणा जाणवत होता. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते.

  • 28 Jun 2026 06:48 PM (IST)

    नाशिकमधील लासलगाव येथे  सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस

    नाशिकमधील लासलगाव येथे  सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस झाला. आठवडे बाजारातील विक्रेत्यांची यामुळे धावपळ उडाली. – रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात बच्चेकंपनीने आनंद लुटल्याचे पाहायला मिळाले. एका तासापेक्षा जास्त काळ लासलगावमध्ये पाऊस बरसला.

  • 28 Jun 2026 06:21 PM (IST)

    पुण्याच्या चाकणमध्ये पुणे-नाशिक महामार्ग जलमय

    पुणे-नाशिक महामार्गावर मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उभारण्यात आलेली गटर लाईन चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचा आरोप होत असून, त्यामुळे महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

  • 28 Jun 2026 06:10 PM (IST)

    संजय राऊत यांची बंडखोर खासदारांवर सडकून टीका

    धाराशिव : खासदार संजय राऊतांच्या भाषणादरम्यान शिवसैनिकानी माध्यमांसोबत हुल्लडबाजी केली. हुल्लडबाजीमुळे भाषण काही काळ थांबले.  संजय राऊत यांनी आपल्या भाषणात बंडखोर खासदारांवर सडकून टीका केली.

  • 28 Jun 2026 04:52 PM (IST)

    7 जुलैला दिबा पाटील यांच्या नावासाठी विधानभवनावर मोर्चा

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव मिळावे म्हणून मागील पाच ते सहा वर्षापासून स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त आंदोलन करत आहेत.राज्य सरकारने विधिमंडळामध्ये एकमताने ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला असतानाही विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होऊनही दीबा पाटील नावाच्या नावाची उद्घोषणा न झाल्याने आता वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन प्रकल्पग्रस्तांच्यामाध्यमातून होत आहेत.अमरण उपोषणानंतर आता प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमिपुत्र 7 जुलैला पनवेल ते विधिमंडळ अशा प्रकारचा पायी मोर्चा काढणार असून सरकारला दि बा पाटील नाव देण्यासाठी भाग पाडणार असल्याचे आज जासई येथे पार पडलेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी सांगितले

  • 28 Jun 2026 04:32 PM (IST)

    पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान मिळाला

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान, ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान पंतप्रधान मोदींच्या पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी दिला आहे. हा पुरस्कार पंतप्रधान मोदींच्या शाश्वत वाढ आणि हरित दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचा गौरव आहे.

  • 28 Jun 2026 04:17 PM (IST)

    टीईटी पेपरफुटी: आरोपीला 8 दिवसांची पोलीस कोठडी

    टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडे टीईटी पेपर सापडला असून, त्यापैकी दोघे फरार असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी आरोपींसाठी दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • 28 Jun 2026 04:10 PM (IST)

    योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्यावर साधला निशाणा

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी अयोध्या मुद्द्यावरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हिंदू धर्माशी संबंधित विकास आणि धार्मिक परंपरांना विरोध केल्याचा आरोप त्यांनी यादव यांच्यावर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येला पुन्हा जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे, असे मुख्यमंत्री योगी यांनी ठामपणे सांगितले. अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, “तुमच्या सरकारने रामभक्तांवर गोळीबार केला. तुम्ही तुमचा इतिहास पाहिला आहे का?”

  • 28 Jun 2026 03:55 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांचे परळीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे परळी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन. उद्धव ठाकरे बीड परळी शिवसेनेच्या उपनेते यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे साह्याने फुलांची उधळण करून स्वागत.

  • 28 Jun 2026 03:45 PM (IST)

    टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे तीव्र आंदोलन

    टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे तीव्र आंदोलन. शिक्षक सेना अध्यक्ष आमदार ज. मो.अभ्यंकर यांच्या मुख्य उपस्थितीत आणि नेतृत्वाखाली आंदोलन​ शिक्षण निरीक्षक कार्यालय, जोगेश्वरी पूर्व, मुंबई.येथे पार पडले. ‘टीईटी पेपरफुटी हा विद्यार्थ्यांवर अन्याय असून तो सहन करणार नाही’, दोषींवर कठोर कारवाईची मागणी

  • 28 Jun 2026 03:32 PM (IST)

    सिया आणि चेतन चौधरीची लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात

    लोहगडावर झालेल्या सिन रिक्रेअशन नंतर आता सिया आणि चेतन चौधरीची लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या समोर चौकशी सुरू. मागील दोन तासांपासून चेतन आणि सिया ची पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या समोर चौकशी सुरु

  • 28 Jun 2026 03:21 PM (IST)

    चिपळूणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

    अखेर चिपळूणमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात..काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन…वातावरणात गारवा; उकाड्यापासून दिलासा. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

  • 28 Jun 2026 03:00 PM (IST)

    शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे परळी येथे आगमन

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे परळी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाले आहे. उद्धव ठाकरे बीड परळी शिवसेनेच्या उपनेते यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे साह्याने फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित कोणाला आहे कोणाला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देत उद्धव ठाकरेंचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर अंबाजोगाई केज मार्ग धाराशिव कडे रवाना होतील

  • 28 Jun 2026 02:50 PM (IST)

    टीईटी पेपर फुटी चा आम्ही पण तीव्र शब्दात निषेध करतोय-कृष्णराज महाडिक

    टीईटी पेपर फुटी प्रकरणी एसटी स्थापन होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केली आहे ती कारवाई सुरू आहे. टीईटी पेपर फुटी चा आम्ही पण तीव्र शब्दात निषेध करतोय. टीईटी पेपर फुटी प्रकरणात सखोल चौकशी करण्यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहोत त्याची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजपा युवक प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केली आहे.

  • 28 Jun 2026 02:40 PM (IST)

    केतन अग्रवाल खूनप्रकरणात सियाचे पितळ उघडं

    2025 डिसेंबर महिन्यामध्ये सिया आणि चेतन दोघे जण जोधपूर गेले होते. एक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दोघे 4-5 दिवस मुक्कामी होते. तिथल्या गड किल्ल्यांवर फेरफटका मारला होता.शुक्रवारी देखील सिया आणि चेतन ला लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जाण्यात आलं, गुन्ह्याचे रिक्रिएशन करण्यात आलं होतं. केतन सोबत लग्न करायचं नाही अस कुटुंबाकडे कधी सियाने बोलून दाखवल नव्हतं. असा जबाब साहिल ने पोलिसांना दिलाय

  • 28 Jun 2026 02:30 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांचे प्रभावती नगरीत स्वागत-खासदार संजय जाधव

    नवनिर्वाचित आमदार सइद खान यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा मांडण्याचं काम केलं माझ्या हस्ते अनावरण झालं अनेक दिवसापासून पाथरी मतदारसंघातील शिवप्रेमींची इच्छा त्यांनी पूर्ण केली.हा पुतळा उभारत असताना काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी त्यांना विरोध केला. हा पुतळा कसा होणार नाही याची दक्षता घेण्याचं काम त्यांनी केलं. रस्त्याचे काम सुरू असताना सईद खान यांनी आंदोलन केली, पुतळ्याची नियोजित जागा अधिग्रहित करून आज या ठिकाणी पुतळा मांडला यावर आम्ही समाधानी आहोत असं जाधव म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि पुतळे उभे करण्यासाठी परवानगी द्यावी लागतेचं . हे सर्व उभं केलं ज्या अर्थी परवानगी आहे. त्याअर्थी हे उभे राहिलं. उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्या पक्षाचे ते मिळावे घेतात प्रभावती नगरीमध्ये ते आलेत त्यांचं स्वागत आहे.

  • 28 Jun 2026 02:19 PM (IST)

    बीडच्या परळी मध्ये होणार उद्धव ठाकरे यांचा स्वागत

    परळी मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे काही वेळातच आगमन होणार असून त्या ठिकाणी शिवसेनेच्या उपनद्या सुषमा अंधारे यांच्याकडून त्यांचं भव्य स्वागत केले जाणारे या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तयारी करण्यात आली आहे. काही वेळा मध्येच उद्धव ठाकरे हे परळी मध्ये दाखल होणार आहे.

  • 28 Jun 2026 02:08 PM (IST)

    मी ठाकरेंसोबत गप्पा मारल्या असत्या-फडणवीस

    ठाकरे आणि मी शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या, त्याला काय अडचण आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर मी माणूस आहे आणि मला पंख नाहीत असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांचा हतबलतेचा दावा फेटाळला.

  • 28 Jun 2026 02:00 PM (IST)

    रिसोड तालुक्यात कांचन आणि अरुणावती नदीला पूर

    रिसोड तालुक्यात कांचन आणि अरुणावती नदीला पूर आला आहे. ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पावसामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठची शेतातील सुपीक माती वाहून गेली. नव्याने केलेली पेरणी उद्ध्वस्त, अनेक शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणीचे संकट आले आहे. सलग दुसर्‍या वर्षी पुराचा फटका बसला आहे. नद्यांचे खोलीकरण करून कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.

  • 28 Jun 2026 02:00 PM (IST)

    मी बोलायला लागलो, तर महागात पडेल; खासदार विशाल पाटलांना मंत्री चंद्रकांत पाटलांचा गर्भित इशारा

    “मी बोलायला लागलो, तर तुम्हाला महागात पडेल,” असा गर्भित इशारा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी खासदार विशाल पाटलांना दिलाय. तसेच जिल्ह्यातील सहकार कोणी मोडीत काढला, पुन्हा जिल्हा बँकेकडून कारखान्यासाठी कर्ज कसे मिळवलं हे, विशाल पाटलांनी सांगावं, त्यांना आपलं जाहीर चॅलेंज आहे, असं देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे. उठसूठ काही आरोप करायचे, हे योग्य नाही, तसेच त्यांना आपल्या आणखी एक आव्हान असून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मला त्यावर बोलायला सांगावं आपण देखील पत्रकार परिषद घेऊन, त्याला उत्तर देतो, असे आव्हान देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांना दिले आहे.

  • 28 Jun 2026 01:50 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपवायचा विडा राऊतांनी उचललाय- संजय जाधव

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यात ज्या पद्धतीने काम सुरू आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वसामान्य माणूस आकर्षित झाला. खासदार संजय राऊत काय बोलतात त्याचं त्यांनाच ताळमेळ नाही. परवा त्यांनी आरोप केला की खासदार दारू पित होते. अख्खं आयुष्य वारकरी संप्रदायात घातलं, वयाच्या साठीपर्यंत आलो. विमानात दारू नेता येते का? ज्यांनी विमानाने प्रवास केला त्यांनी सांगावं. मी दिवसभर जेवलेलो नव्हतो आणि त्या ठिकाणी ड्रायफ्रुट होते, ते खात होतो. माझ्यावर टीका म्हणजे वारकऱ्यांचा अपमान आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष कोणी संपवायचा विडा उचलला असेल तर ते संजय राऊत आहेत, असं उत्तर खासदार संजय जाधव यांनी राऊतांच्या टीकेला दिलं आहे.

  • 28 Jun 2026 01:40 PM (IST)

    एल निनोचा फटका; निफाडमध्ये जून महिना कोरडाच 

    एल निनोचा फटका बसल्यामुळे निफाडमध्ये जून महिना कोरडाच गेला आहे. पावसाअभावी टोमॅटो आणि मिरचीची पिकं धोक्यात आली आहेत. एकरी 70 ते 90 हजारांचा खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं असून ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

  • 28 Jun 2026 01:30 PM (IST)

    लक्ष दिलं असतं तर तुमच्या भानगडी कळल्या असत्या; उद्धव ठाकरेंचा टोला

    “उद्धव ठाकरेंनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, असं तो म्हणाला. बरोबर आहे, लक्ष दिलं असतं तर तुमच्या भानगडी कळल्या असत्या. लक्ष दिलं पाहिजे होतं. आता तुम्ही लक्ष द्या. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड दिला. तुम्ही हा आसूड मला दिला. आता हा आसूड तुम्ही चालवायचं आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 28 Jun 2026 01:20 PM (IST)

    मी शेतकऱ्यांच्या बांधावर असताना हा गद्दार कुठे होता? उद्धव ठाकरेंचा सवाल

    “उद्धव ठाकरे फिरले नाही म्हणतात, तेव्हा कोण फिरलं होतं? त्या दौऱ्यात राहुल सोबत होता. हा गद्दार कुठे होता? मी शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. आपण शेतकऱ्यांना भेटलो. त्यांच्याशी बोललो. तिथून आपण कर्जमुक्तीची मागणी केली होती. कोणत्याही दौऱ्यात हा गद्दार नव्हता,” असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

  • 28 Jun 2026 01:10 PM (IST)

    महापौर मुसलमान असला तरी शिवसेनेचं तिकिट घेऊन लढला- उद्धव ठाकरे

    “मी परभणीकरांना धन्यवाद देतो. तुम्ही हक्काचा महापौर निवडून दिला. जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता निवडून दिला. याने म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले. म्हणे महापौर मुसलमान आहे. असेल, पण तो आमचा आहे. शिवसेनेचं तिकीट घेऊन लढला. ज्याने मुस्लिम महापौर दिला म्हणून टीका केली. गधड्यांना विचारायचं की तुम्ही विधान परिषदेत जो निवडून दिला तो कोण आहे?,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

  • 28 Jun 2026 01:03 PM (IST)

    पैशांच्या गणितावर मांडलेलं निवडणुकीचं गणित लोकशाहीसाठी धोक्याचं- दिलीप वळसे पाटील

    निवडणुकीचं गणित जेव्हा पैशांच्या गणितावर मांडलं जातं, तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असते, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलंय. शिरूर बाजार समिती निवडणूक प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळी वळसे पाटील यांनी उमेदवारी वाटप, मतदारांच्या सवयी आणि शेतकऱ्यांचं हित यावर परखड भाष्य केलं.

  • 28 Jun 2026 12:43 PM (IST)

    वटपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर पत्नीपीडित पुरुषाने पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घातल्या

    वटपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर पत्नीपीडित पुरुषाने पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घातल्या. सात जन्म काय, सात सेकंदही ही पत्नी नको,” म्हणत यमराज्याला घातले साकडे. महिला संरक्षण कायद्यांच्या कथित गैरवापराबाबत व्यथा मांडत, पुरुष आयोग, पुरुष दक्षता समिती आणि तक्रार निवारण कक्षाची मागणी.  छत्रपती संभाजीनगरच्या करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात कार्यक्रम. पत्नीकडून त्रास झाल्यामुळे आयुष्य उध्वस्त झाल्याचा पत्नीपीडित पुरुषांचा आरोप.

  • 28 Jun 2026 12:29 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरच्या फर्स्ट क्राय प्री-स्कूलमध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने तोडफोड

    छत्रपती संभाजीनगरच्या फर्स्ट क्राय प्री-स्कूलमध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने तोडफोड करण्यात आली. 23 महिन्याच्या चिमुकल्याला वर्ग मित्राकडून झाली होती मारहाण त्यानंतर शाळा प्रशासनाच्या विरोधात मनसेचे आंदोलन. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत निष्काळजीपणाचा आरोप; शाळा प्रशासनावर कठोर कारवाईची मनसेची मागणी

  • 28 Jun 2026 12:22 PM (IST)

    सोलापुरात अन्न औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त बर्फीवर कारवाई

    सोलापुरात अन्न औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त बर्फीवर कारवाई करण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथील मेसर्स रामदेव डेअरी येथे टाकलेल्या छाप्यात एकूण 1807 किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासनाकडून जवळपास 7 लाखाचा साठा जप्त. भेसळयुक्त 511 किलो बर्फी, 348 किलो स्वीट बर्फी, 163 किलो अजमेरी बर्फी तसेच वनस्पती तुपाचा साठा नष्ट करण्यात आलाय. संबंधितांवर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील कलम 26, 27 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

  • 28 Jun 2026 12:13 PM (IST)

    परभणीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा खासदार संजय जाधव यांच्या हस्ते

    परभणीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी भाषण केले. या वेळी ते म्हणाले की,” समाजसेवा ही ईश्वर सेवा आहे हे माणून आम्ही काम करणार आहोत. सामन्य माणसाला हेवा वाटवा असं काम शिंदेसाहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यात सुरु आहे. आता काही लोक वेगवेगळ्या गोष्टी करतील. आत ते आमचे खासदार संजय राऊतसाहेब काय बोलतात त्यांचा ताळमेळ आहे की नाही हे त्यांनाच माहित नाही. आत ते असे म्हणातायेत की खासदारसाहेब दारु पित होते, अरे मी माझं संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायात घालवले आहे आणि आता वयाच्या साठीपर्यंत आलोय. विमानात दारु नेता येते का? तंबाखूही नेता येत नाही. वारकऱ्यांचा त्यांनाी अपमान केला आहे.

  • 28 Jun 2026 11:57 AM (IST)

    धुळे जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या

    धुळे जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. धुळ्यातील कृषी केंद्रांवर शुकशुकाट जिल्ह्यामध्ये तीन लाख 50 हजार एक तर वर खरीप पिकाचे नियोजन., सर्वाधिक पेरणी दोन लाख 50 हजार हेक्टर वर कपाशीचे होत असते. मुबलक प्रमाणात बी बियाणे उपलब्ध असताना कृषी केंद्रांवर शुकशुकाट आहे.

  • 28 Jun 2026 11:57 AM (IST)

    पुण्यातील भाविकाकडून श्री तुळजाभवानी मातेला ४९.४२० ग्रॅम वजनाचा सुवर्ण हार अर्पण

    पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भाविक येणभर सचिन कालूराम यांनी श्री तुळजाभवानी मातेस ४९.४२० ग्रॅम वजनाचा सुवर्ण हार अर्पण केला आहे. श्री येणभार हे सहकुटुंब श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले असता त्यांनी मंदिर संस्थानकडे विधिवत सुवर्ण हार सुपूर्द केला. मंदिर संस्थानच्या नोंदीनुसार हा हार स्वीकारण्यात आला. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने येणभार यांचा सन्मान करण्यात आला.

  • 28 Jun 2026 11:47 AM (IST)

    विक्रोळी परिसरात दोन्ही शिवसेनेकडून भाऊ नावावरून बॅनर बाजी..

    विक्रोळी या मतदारसंघात आमदार सुनील राऊत व खासदार संजय दिना पाटील या दोघांनाही भाऊ म्हणून ओळखले जाते. परंतु संजय दिना पाटील यांनी ठाकरे यांचा पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर भाऊ या नावावरून एकमेकांना डिवचणारे बॅनर लावण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून संजय दिना पाटील यांच्या स्वागताच्या बॅनरवर भाऊ असा उल्लेख करण्यात आलाय, तर त्याच बॅनरच्या बाजूला सुनील राऊत यांचा बॅनर लावत भाऊ असा उल्लेख करत आमचा भाऊ निष्ठावान आहे अशा आशयाचा बॅनर लावला आहे.

  • 28 Jun 2026 11:35 AM (IST)

    जळगावमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना घेराव

    अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध करत मागण्यासंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आलं आहे. राज्यात उपवर्गीकरण लागू न करण्याचा निर्णय घ्यावा व अनुसूचित जाती समाजाला न्याय द्यावा अशी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास जी विसावे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

  • 28 Jun 2026 11:18 AM (IST)

    रामाच्या नावाने धंदा सुरु केलाय का? – उद्धव ठाकरे

    राम मंदिराचा धंदा केला. मी सारखा हा शब्द वापरेल. राम मंदिर हे आमचं दैवत आहे. श्रद्धास्थान आहे. मंदिर नाही, त्यांनी दुकान उघडलं. रामाच्या नावाने यांनी धंदा सुरू केला आहे. कारसेवकांनी जीव दिला. घरदार सोडलं. गोध्रा झाला. हे सर्व कशासाठी झालं. राम मंदिर उभं राहावं म्हणून ना. पण त्याच्या आडून जे धंदे चालले आहेत. ते घृणास्पद आहे. मंदिर वही बनायेंगे म्हणायचे. ते कशासाठी हे आता कळत आहे. यांना धंदा करायचा होता… असं वक्तव्य देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

  • 28 Jun 2026 11:15 AM (IST)

    किती वेळा विकासासाठी संसदेत तोंड उघडलं माझ्याकडे सगळंय – उद्धव ठाकरे

    किती वेळा विकासासाठी संसदेत तोंड उघडलं माझ्याकडे सगळंय… ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र आहे का? आज पेपर फुटत आहेत, खासदार फुटत आहेत… सगळीकडे हेच सुरु आहे… असं वक्तव्य देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

  • 28 Jun 2026 11:12 AM (IST)

    लक्ष दिलं असतं तर त्यांच्या बऱ्यात भानगडी कळल्या असत्या – उद्धव ठाकरे

    लक्ष दिलं असतं तर त्यांच्या बऱ्यात भानगडी कळल्या असत्या. मिंधे सेनेचे गद्दार उमेदवार लोकांनी ठरवून पाडले पाहिजेत. गद्दारीच्या मुळावर घाव घातला पाहिजे… खासगी निधीसाठीच खासदार गेले… असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

  • 28 Jun 2026 11:08 AM (IST)

    देवदर्शन करून खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवकडे; आजच उद्धव ठाकरेही जिल्ह्यात

    बालाजी तिरुपती आणि शनिशिंगणापूर येथे देवदर्शन करून खासदार ओमराजे निंबाळकर थोड्याच वेळात धाराशिवमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. मतदारसंघात परतल्यानंतर ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, पुढील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचाही आज धाराशिव दौरा असल्याने जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. दोन्ही नेत्यांच्या हालचालींमुळे आज धाराशिवच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष या दौऱ्यांकडे लागले आहे.

  • 28 Jun 2026 10:50 AM (IST)

    अन्न अन् पाण्याची शुद्धता तपासा पालिकेच्या लॅबमध्ये बीएमसीचे आवाहन

    मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिक, गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिकांना दादर येथील १२३ वर्षे जुन्या ‘म्युनिसिपल अ‍ॅनालिस्ट लॅब’मध्ये अन्न आणि पाणी तपासण्याचे आवाहन केले आहे. या सरकारी प्रयोगशाळेत अत्यंत माफक दरात दर्जेदार आणि खात्रीशीर चाचण्या केल्या जातात. पाणी तपासणीचा अहवाल अवघ्या २४ तासांत थेट व्हॉट्सॲप (WhatsApp) आणि ईमेलवर उपलब्ध करून दिला जाईल. ​

  • 28 Jun 2026 10:40 AM (IST)

    महावितरणला अदानी पॉवरकडून स्वस्त वीज खरेदीस एमईआरसीची मंजुरी

    १,६०० मेगावॉट वीज खरेदीला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची हिरवी झेंडी दाखवली असल्याची माहिती. अदानी पॉवरकडून ५.३० रुपये प्रतियुनिट दराने वीज खरेदी होणार. महानिर्मितीच्या वीजदरापेक्षा अदानीची वीज स्वस्त असल्याने मंजुरी महानिर्मितीच्या प्रकल्पांचा वीजदर ६.१४ ते ६.७७ रुपये प्रतियुनिट असल्याची माहिती. पीपीए संपुष्टात आले म्हणजे प्रकल्प बंद होणार नाहीत, आयोगाचे स्पष्टीकरण

  • 28 Jun 2026 10:30 AM (IST)

    ठाणे पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे मतमोजणी आज

    ठाणे पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे मतमोजणी आज पार पडत आहे. 21 संचालकापैकी 10 जागा बिनविरोध उर्वरित अकरा संचालकासाठी काल मतदान झाले. सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनल यांच्या थेट लढत आहे. एकूण 4027 मतदार आहेत. 97 टक्के मतदान झाले 127 मतदार गैरहजर राहिले. निवडणुकीत सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनल आमने-सामने उभे ठाकले आहेत ..

  • 28 Jun 2026 10:20 AM (IST)

    लोकलमधील हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय

    धावत्या लोकलमध्ये अवघ्या २१ वर्षीय मयंक लोहार या प्रवाशाची चाकू भोसकून झालेल्या हत्येनंतर, रेल्वे पोलीस (GRP) आता लोकल प्रवाशांच्या बॅगांची मॅन्युअल (प्रत्यक्ष) तपासणी तीव्र करणार आहेत. उपनगरीय स्थानकांवर गर्दीमुळे बॅगेज स्कॅनर वापरणे कठीण असल्याने, सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणि अधिकाऱ्याच्या उपस्थितीत प्रवाशांच्या लहान पाठीवरील बॅगा (Backpacks) तपासल्या जातील. किरकोळ वादातून हत्या हत्याराचा वापर रोखण्यासाठी, कामगारांनी आणि कारागिरांनी त्यांच्या कामाची हत्यारे/साधने (उदा. चाकू, धारदार वस्तू) ट्रेन प्रवासात सोबत न बाळगता कामाच्या ठिकाणीच ठेवावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

  • 28 Jun 2026 10:12 AM (IST)

    ओमराजे निंबाळकर अजूनही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फॉलोअर्समध्ये

    ओमराजे निंबाळकर अजूनही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फॉलोअर्समध्ये. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यभर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया हालचालींचीही चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याची चर्चा असताना, ओमराजे निंबाळकर मात्र अजूनही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांना फॉलो करत असल्याचे दिसून येत आहे.

  • 28 Jun 2026 10:05 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज विक्रोळी दौऱ्यावर

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज विक्रोळी दौऱ्यावरती आहेत. विक्रोळी पार्क साईट या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे. आज सकाळी 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन होणार आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी विक्रोळी परिसरात मोठी बॅनरबाजी पाहायला मिळत आहे

  • 28 Jun 2026 09:55 AM (IST)

    हरित मान्सून अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम

    उन्नत नाशिक अभियान आणि हरित मान्सून अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर यांच्यासह मनपा आयुक्त आणि नगरसेवकही सहभागी झाले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही मोहिम राबवली जात आहे.

  • 28 Jun 2026 09:45 AM (IST)

    शिवडीच्या बीडीडी चाळी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत

    वरळी, नायगाव आणि एन.एम. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम वेगाने प्रगतिपथावर असताना केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टकडून मंजुरी न मिळाल्याने शिवडी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रदीर्घ काळापासून रखडला आहे.

  • 28 Jun 2026 09:40 AM (IST)

    मध्य रेल्वेवर सोमवारपासून आणखी १२ AC लोकल धावणार

    वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता मध्य रेल्वेने मुख्य मार्गावरील (Main Line) सध्याच्या 12 नॉन-एसी लोकल फेऱ्यांचे एसी (AC) लोकलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या 12 नवीन फेऱ्यांमुळे मध्य रेल्वेच्या नेटवर्कवरील एकूण एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता 120 वर पोहोचणार आहे.

  • 28 Jun 2026 09:25 AM (IST)

    घरणी जवळ दोन कार अडवून लुटल्याची धक्कादायक घटना

    लातूर जिल्ह्यातल्या घरणी जवळ दोन कार अडवून लुटल्याची घटना घडली होती. या घटनेत प्रवासी महिला मुलांच्या अंगावरील दागिने चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत लुटले होते. या घटनेतील आरोपी आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. या टोळीतील तिघे जण पळून गेले आहेत तर एक जण पोलिसांच्या हाती लागला आहे.

  • 28 Jun 2026 09:15 AM (IST)

    कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह नेल्यामुळे जिल्हाध्यक्षाचा संताप

    अमळनेर येथे कचऱ्याच्या घंटागाडीतून मृतदेह नेण्यात आल्याच्या प्रकाराबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाने यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांचे निलंबनाची मागणी भूषण भदाने यांनी केली आहे.

  • 28 Jun 2026 09:12 AM (IST)

    उद्योजकाची तब्बल 97 लाख 50 हजारांत ऑनलाइन फसवणूक

    जळगावच्या भुसावळ येथील उद्योजकाची तब्बल 97 लाख 50 हजारांत ऑनलाइन फसवणूक झाली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विलास पाटील अँड असोसिएट कंपनीचे मालक विलास जयराम पाटील यांची फसवणूक झाली आहे.

  • 28 Jun 2026 09:10 AM (IST)

    पाकिस्तानच्या कराचीवर मोठा दहशतवादी हल्ला, 4 रेंजर्स ठार

    पाकिस्तानच्या कराची शहरात शनिवारी रात्री मोठा आत्मघाती हल्ला झाला. समोर आलेल्या माहितीनुसार कराचीच्या गुलिस्तान-ए-जौहर परिसरातील युनिव्हर्सिटी रोडजवळ अचानक जोरदार आवाजासह स्फोट झाले. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या हल्ल्यात चार पाकिस्तानी रेंजर्सचा मृत्यू झाला आहे. तर प्रत्युत्तर कारवाईत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

Published On - Jun 28,2026 9:08 AM

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद