AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

| Updated on: Oct 13, 2026 | 8:47 AM
Share

Maharashtra News LIVE : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याचे न्यायालयाने सूचित केलं होतं.

Maharashtra News LIVE : शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra News LIVE Image Credit source: Tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 13 Oct 2026 08:55 AM (IST)

    अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

    दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील 161 गावांमधील 961 वाड्या-वस्त्यांना तब्बल 169 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. 3 लाख 31 हजारांहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारे पुरवठा केला जात आहे.

  • 13 Oct 2026 08:50 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरमध्येच भूजल पातळी 1.41 मीटरने घटली

    जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरमध्येच भूजल पातळी 1.41 मीटरने घटली. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालावरून भूजल पातळीत मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे दरवर्षी सप्टेंबरअखेर भूजल पातळीची पाहणी केली जाते. जळगाव जिल्ह्यातील 166 विहिरींच्या निरीक्षणाच्या आधारावर भूजल पातळीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. यंदा अपुऱ्या आणि असमान पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भूजल पातळीत मोठी घट नोंदवली गेली आहे.

  • 13 Oct 2026 08:45 AM (IST)

    दुष्काळाच्या तोंडावर व्हिआयपी अतिथींसाठी नव्या गाड्या खरेदीसाठी मंजुरी

    दुष्काळाच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारकडून व्हिआयपी अतिथींसाठी नव्या गाड्या खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. तब्बल 12.68 कोटी रुपये 44 गाड्या खरेदीसाठी मंजूर करण्यात आले आहेत. यात सगळ्यात महागडी गाडी चार कोटी रुपयांची आहे. या निर्णयामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • 13 Oct 2026 08:40 AM (IST)

    जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

    जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत शिक्षण विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.राज्य शासनाने दुष्काळी परिस्थिती घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये विशेष बाब म्हणून उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • 13 Oct 2026 08:34 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे सावट

    नंदुरबार जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची शक्यता असून, पावसाने पाठ फिरवल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी नदी-नाले आणि तलावांमधील पाणीसाठा कमी होत असून, भूजलपातळीही खालावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्यासोबतच शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणेही कठीण होऊ शकते. त्यामुळे पिके जगवायची कशी, जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न बळीराजासमोर उभा राहिला आहे.

  • 13 Oct 2026 08:29 AM (IST)

    पुण्यात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद

    दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या दहा टक्के पाणी कपातीच्या आदेशाची महापालिकेने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यानुसार शहरात प्रत्येक गुरुवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ऑक्टोबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून पुणेकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

  • 13 Oct 2026 08:28 AM (IST)

    पुणेकरांना ऑक्टोबर हिटचा तीव्र तडाखा

    परतीच्या पावसाने निरोप घेतल्यानंतर आता पुणेकरांना ऑक्टोबर हिटच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. शहरात पुन्हा उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली असून काल कमाल तापमान 35°c इतके नोंदवले गेले. परिणामी नागरिकांना कुणाच्या चटक्यासोबतच असह्य उकाड्याचाही सामना करावा लागत आहे.

  • 13 Oct 2026 08:27 AM (IST)

    पुणे- हवेतील धुलीकण वाढले, शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली

    पुणे- थंडी सुरू झाल्यानंतर तापमानात घट होते आणि त्यानंतर शहरातील वायू प्रदूषणात वाढ होण्यास सुरुवात होते. मात्र यंदा वातावरणातील घडामोडी, तापमानात होत असलेल्या चढउतारांमुळे पुण्यातील हवेची गुणवत्ता अचानक ढासळली. शिवाजीनगर लोहगाव हडपसर भोसरीसह बहुतांश भागात सलग तीन दिवस हवेतील सूक्ष्म आणि अति सूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण मध्यम श्रेणीत पोहोचले आहेत.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. दुपारी 2 वाजता ही सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंचे वकील ध्रुव मेहता युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मतचोरीचा आरोप करत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यासाठी सोमवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयावर विराट मोर्चा काढला. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेट देण्यास नकार दिल्यामुळे राहुल गांधीच्या विधि चमूने याचिका दाखल केली. त्यानिमित्ताने इंडिया आघाडीने केवळ एकजूटच दाखवली नाही तर आठवडाभरात पाचव्यांदा शक्तिप्रदर्शन करत केंद्र सरकारविरोधातील लढाई आणखी तीव्र केली. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..

Published On - Oct 13,2026 8:22 AM

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान