AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : शरद पवार यांचं सर्वात मोठं राजकीय भाष्य; राज्यात लोकसभेची पुनरावृत्ती? कारण तरी काय

Sharad Pawar on Vidhansabha Election 2024 : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महायुती सरकावर कोरडे ओढतानाच विधानसभेचे चित्र पण स्पष्ट केले. शरद पवार यांनी राज्यात लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा दावा त्यांनी केला. त्यामागील कारण पण त्यांनी स्पष्ट केले आहे. काय म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar : शरद पवार यांचं सर्वात मोठं राजकीय भाष्य; राज्यात लोकसभेची पुनरावृत्ती? कारण तरी काय
शरद पवार यांचे मोठं राजकीय भाष्य
| Updated on: Oct 13, 2024 | 2:21 PM
Share

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भाकि‍तांकडे सर्वांचेच लक्ष्य असते. यापूर्वी त्यांनी लोकसभेला महाविकास आघाडी मोठ्या फरकाने जिंकेल असं भाकित केलं होतं. निकालानंतरचं चित्र राज्यासमोर आहे. आता ही त्यांनी लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज वर्तवला आहे. पवार यांनी महायुतीवर कोरडे ओढले आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मोठी मुसंडी मारण्याचा दावा केला. काय म्हणाले शरद पवार?

लोकांना बदल हवा

मी सतत महाराष्ट्रात हिंडतोय. इतर सहकारी फिरत आहे. माझं निरीक्षण असं आहे की लोकांना परिवर्तन हवं आहे. लोकसभेच्या निकालाआधी कोणी मान्य करत नव्हतं. पण निकाल आला. आम्ही ३१ जागा जिंकलो याचा अर्थ लोकांना बदल हवा होता. आताही विधानसभेत हा बदल होणार हे नक्की आहे, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहऱ्याबाबत उत्तर दिलं. उत्तर दिलं तेच आमचं उत्तर आहे.

हा तर निवडणुकीचा उद्योग

महिलांचा सन्मान करायचं ठरवलं तर आम्ही त्याचं समर्थन करतो. फक्त ही योजना कायमची आहे की तात्पुरती आहे. हे सांगावं. बजेट मांडला जातो. त्यातील एकही तरतूद बजेटमध्ये नाही. हा निवडणुकीसाठीचा उद्योग आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली. ही एक प्रकारे भगिनींची फसवणूक करण्याचं पाऊल आहे.

लाडकी बहिणीचं स्वरुप, त्याचा अभ्यास करावा लागेल. बजेटची तरतूद याची माहिती घ्यावी लागेल. जर योग्य असेल तर चालू ठेवायला हरकत नाही. पण ती तात्पुरती होणार नाही याची खात्री आमची झाली पाहिजे. ज्यांना लाभ होणार आहे, त्यांनाही वाटली पाहिजे, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी आघाडी मिळण्याचा विश्वास शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दोन महिने थांबा, आमचे सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे महायुतीला आता वातावरण बदलल्याचा मोठा फायदा होईल असे वाटत आहे. लोकसभेचा कलंक पुसणार असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे