Maharashatra News Live : रवींद्र धंगेकरांकडून मोहोळांवर नवा आरोप, व्हिडीओ केला शेअर
Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

पावसाने दिवाळीतच शिमगा घातला. राज्यातील अनेक भागात ऐन दिवाळीत मुसळधार पाऊस पडला. भाऊबीजच्या दिवशी रात्री अचानक पावसाने दाणादाण उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत पुस्तकाचे आज विमोचन होईल. तर आंध्र प्रदेशाच्या कुरनूलमध्ये भयंकर अपघात घडला. बसने पेट घेतल्याने 20 प्रवासी जिवंत जळाले. आज रवींद्र धंगेकर हे पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत.यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 ऑक्टोबर रोजी यवतमाळ दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 ऑक्टोबर रोजी यवतमाळ दौऱ्यावर
यवतमाळ मध्ये शिव संकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर
एकनाथ शिंदे सर्व पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दौरा
-
रायगडमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात
रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची व व्यापाऱ्यांची अक्षरशः तारांबळ उडाली आहे, अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्याला व व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतीचं मोठंं नुकसान झालं आहे.
-
-
नाशिक जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी
नाशिक जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी
मनमाड, बागलाण परिसरात संध्याकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात
अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिक व भाजी विक्रेत्यांची तारांबळ
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढली
-
धक्कादायक! जळगाव जामोदमध्ये अंगावर फटाके फेकण्याच्या वादातून हत्या
अंगावर फटाके फेकण्याच्या वादातून हत्या
जळगाव जामोद शहरातील घटना ..
तिन्ही आरोपीस पोलिसांनी केली अटक
आरोपींनी केली 26 वर्षीय तरुणाची हत्या
-
पुणे पोलिसांनी अहिल्यानगरमधून गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ केली जप्त
अहिल्यानगरमधील जामखेड खर्डा येथून गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ही गाडी लपवून ठेवण्यात आली होती.
-
-
रवींद्र धंगेकरांकडून मोहोळांवर नवा आरोप, व्हिडीओ केला शेअर
रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळांवर नवा आरोप केला आहे. महापौर असताना पुणे पालिकेची पाटी लावून बिल्डरची गाडी वापरायचे, असा आरोप धंगेकरांनी केला आहे.
पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन होस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसात पाहिले आहेत. परंतु तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असलेले सांगतात.
मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो,मोहोळ हे खासदार होण्याच्या… pic.twitter.com/01zmvCUrnj
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 23, 2025
-
काँग्रेसची ‘व्होट चोरी’ची बनावट कहाणी, संजय निरूपम यांचा आरोप
काँग्रेसच्या मतचोरीच्या आरोपांवर शिवसेना नेते संजय निरुपम टीका करत म्हणाले की, “काँग्रेसने ‘व्होट चोरी’ची बनावट कहाणी सुरू केली आणि तेच त्याची चौकशी करत आहेत. कर्नाटक सरकारची एसआयटी बनावट असू शकते. 80 रुपयांत मते वगळता येतात असे मला वाटत नाही.”
#WATCH | Mumbai | On vote theft allegations by Congress, Shiv Sena leader Sanjay Nirupam says, “Congress started the fake narrative of Vote Chori and they are the only ones investigating it… The SIT of Karnataka government might be fake… I don’t believe votes can be deleted… pic.twitter.com/1FkdtsuB17
— ANI (@ANI) October 24, 2025
-
सातारा डॉक्टर आत्महत्येनंतर ठाकरे गटाचे नेते आनंद दुबेंची सरकारवर टीका
सातारा येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी सरकारवर टीका करत म्हणाले, “ही एक हृदयद्रावक घटना आहे. आपण ‘जंगल राज’कडे वाटचाल करत आहोत का? आम्ही देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीबद्दल विचारणा करावी. भविष्यात अशा घटना घडू नयेत. आरोपींना तुरुंगात टाकले पाहिजे. राज्यभर गुन्हे घडत आहेत.”
#WATCH | Mumbai | On Satara woman doctor’s death, allegedly by suicide, Shiv Sena (UBT) leader Anand Dubey, says, “It is a heart-wrenching incident… Are we moving towards ‘Jungle Raaj’?… We request Devendra Fadnavis to question his ministers about the deteriorating state of… pic.twitter.com/auLnQqqZDT
— ANI (@ANI) October 24, 2025
-
नागपुरात गंगाधरराव फडणवीस डायग्नोसिस सेंटर, देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न पूर्ण
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 वर्षापूर्वी पाहिलेल्या स्वप्नांची आज पुर्तता झाली. गरिबांना नाममात्र दरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी गंगाधरराव फडणवीस मेमोरियल च्या माध्यमातून नागपुरात गंगाधरराव फडणवीस डायग्नोसिस सेंटर साकारण्यात आलं
-
सांगली शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाची जोरदार हजेरी
सांगली शहरासह जिल्ह्यातील काही भागात दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या अवकाळी पावसाने सांगली शहरासह जिल्ह्यातील जत सह काही भागात पावसाने हजेरी लावली. दिवाळी असताना अचानक पडलेल्या पावसाने सांगलीकरांची दैना उडाली. शहरातील सकल भागात जोरदार पावसामुळे पाणी साचले होते.
-
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे कर्डिले यांच्या कुटुंबाच्या भेटीला
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी दाखल झाले आहेत. आमदार शिवाजी कर्डिले यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. कर्डिले यांच्या बुऱ्हानगर येथील निवासस्थानी जाऊन कोकाटे यांनी त्यांची सांत्वन भेट घेतली आहे. कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांची त्यांनी विचारपूस केली.यावेळी आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित होते.
-
कल्याण मोहने परिसरात गावकऱ्यांची बैठक
दोन दिवसांपूर्वी बुधवारी रात्री फटाक्याच्या वादातून दोन गटात कल्याण मोहने पोलिस चौकी परिसरात दगडफेक करत तुंबळ हाणामारी झाली होती. मोहने परिसरात मोहने गावातील गावकऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली आहे. त्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे.
-
महाराष्ट्राचे रक्षण करता येत नसेल तर फडणवीस राजीनामा द्या – यशोमती ठाकूर
फलटण प्रकरणात रक्षकच भक्षक झाले आहेत, देवेंद्र फडणवीस तुम्ही एकतर मुख्यमंत्री बना किंवा गृहमंत्री. दोन्ही पदे तुम्हाला पाहिजे, तुम्ही दोन्ही पदे सांभाळू शकत नाही, तुमचा दबदबा नाही. महाराष्ट्राचे रक्षण करता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
-
पांगरा शिंदे येथे बारा वर्षांनी होणाऱ्या श्री भगवान रोकडेश्वर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील रोकडेश्वर मंदिरात दर बारा वर्षांनी होणाऱ्या श्री भगवान रोकडेश्वर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी गावकऱ्यांची बैठक संपन्न झाली.
-
पनवेलमधील पळस्पेफाटा येथील दुकानाला भीषण आग
पनवेलमधील पळस्पेफाटा येथील दुकानाला भीषण आग लागली आहे. बाजूला असलेल्या दुकानालादेखील आगीचा फटका बसला आहे. टायर व गॅरेज दुकान यात जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
-
अहिल्यानगर शहरासह परिसरात पावसाची जोरदार हजेरी, पिकांचे नुकसान होण्याची शक्यता
अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या जोरदार पावसामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. हवामान खात्याने आजपासून पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
-
फलटण – महिला डॉक्टर आत्महत्येची राज्य महिला आयोगाकडून दखल
फलटण – महिला डॉक्टर आत्महत्येची राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध घेऊन सखोल तपास करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर दिसणार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवेढा येथे 26 ऑक्टोबर रविवार रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. एवढंच नव्हे तर यावेळी मनोज जरांगे पाटील देखील उपस्थित राहणार आहेत.
-
जोगेश्वरी बिजनेस पार्क आग प्रकरण, मनसे शिष्टमंडळांनी घेतली पालिका सहाय्यक आयुक्तांची भेट
मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहरामबाग येथील जे एम एस बिजनेस पार्कला काल भीषण आग लागून सतरा जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मनसेने विकासका विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ओशिवरा पोलिसांकडे केली. यानंतर आज मनसे शिष्टमंडळाने या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन मुंबई महानगरपालिका के/पश्चिम प्रभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे केली. एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करून अनधिकृत मजल्यावर तोडक कारवाई करण्याचे आश्वासन मनसे शिष्ट मंडळाला देण्यात आले आहे
-
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची फडणवीसांकडून दखल
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल घेण्यात आली आहे. संबंधित पोलिसांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
बांधकाम कामगारांना साहित्य वाटपासाठी तुफान गर्दी; पहाटेपासून लाभार्थ्यांच्या रांगा, सुविधांचा अभाव
अमरावतीमध्ये बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या गृहपयोगी साहित्याचे वाटप सुरू असल्याने प्रचंड गर्दी झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्व चौदाही तालुक्यांतील लाभार्थ्यांना एकाच ठिकाणाहून वस्तूंचे वाटप होत आहे. पहाटेपासूनच महिला आणि पुरुषांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या गर्दीत पिण्याच्या पाण्याचीही कोणतीही व्यवस्था नसल्याने लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र वितरण केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी लाभार्थ्यांकडून जोर धरू लागली आहे.
-
मुंबईतील काळाचौकी परिसरात तरुणीवर चाकूहल्ला
मुंबईतील काळाचौकी परिसरात तरुणीवर चाकूहल्ला झाल्याची घटना घडली आहे. तरुणीवर चाकूहल्ला केल्यानंतर तरुणाने स्वत:वरही वार केले. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
-
जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात पुन्हा एकदा वाद, कारखान्याचे नाव हटवल्याने खळबळ
सांगली जिल्ह्यातील जत येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील नामकरण हटवल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी कारखान्याच्या कमानीवर मूळ नावाऐवजी ‘विजयसिंह डफळे’ असे नामकरण केले होते, ज्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, कारखाना प्रशासनाने तातडीने हे बदललेले नामकरण हटवले आहे. गोपीचंद पडळकर यांनी जतचा हा कारखाना सभासदांना परत मिळावा यासाठी आधीच संघर्ष पुकारलेला असल्याने, नामकरणाच्या या कृतीमुळे दोन्ही नेत्यांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
-
साताऱ्यात महिला डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, गळफास घेऊन संपवलं जीवन
साताऱ्यात महिला डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, गळफास घेऊन संपवलं जीवनhttps://t.co/LoHnANrEDJ #satara
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 24, 2025
-
पुण्यातील वानवडी परिसरातील धाकादायक घटना…
फटाके वाजवण्याचा कारणावरून हाणामारी उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू…. 21 तारखेला फटाके वाजवण्याच्या शिल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाली होती… या हाणामारीत जितेंद्र ठोसर (32 ) नावाच्या युवक गंभीर जखमी झाला होता… उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या प्रकरणी वानवडी पोलीस हा नगात सहा जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय… पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु…
-
जत्रेतील गर्दीचा फायदा घेत मुलीला उचलून नेऊन केला अत्याचार
यवतमाळ येथील मारेगावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार… जत्रेतील गर्दीचा फायदा घेत मुलीला उचलून नेऊन केला अत्याचार… आरोपी पोलिसांच्या ताब्यात… कैलास आत्राम असे आरोपीचे नाव
-
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर निशाणा…
मुख्यमंत्र्याचं प्रतिकात्मक कार्टून बच्चू कडू यांनी सोशल मीडियावर व्हायरल करत केली टीका… फडणवीस साहेब किती दिवस दिलेला शब्द तोंडात धरून बसणार? राज्याच्या शेतकऱ्यांचा संयम आता संपत चाललाय…! – बच्चू कडू यांचा टोला… ७/१२ कोरा — शेतकऱ्यांचा हक्क आहे… २८ ऑक्टोंबर ला नागपूरची भूमी उत्तर मागेल… आता मौन नाही… उत्तर हवंय! चला नागपूर… शेतकऱ्यांचा एल्गार उठणार! असा बच्चू कडू यांच्या सोशल मीडिया पेजवर उल्लेख
-
घटनाबाह्य कृत्य सुरु आहे, खासगी जीवनात शिरण्याचा प्रकार – संजय राऊत
घटनाबाह्य कृत्य सुरु आहे, खासगी जीवनात शिरण्याचा प्रकार… बावनकुळेंनी टीमसोबत एक वॉररुम सुरु केलंय… विरोधकांना मिळणारी मतं गिळण्याचं काम… कर्नाटकात 80 रुपयांच एक मत डिलीट केलं जातं… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
आठ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
अडीच वर्षापासून पेमेंट मिळत नसल्याने गेल्या आठ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण. उपायुक्ताचे आदेश असूनही गेली अडीच वर्षापासून वेतन न दिल्याचा उपोषणकर्त्या सुवर्ण रजपूत यांचा आरोप.
-
महिला डॉक्टरची आत्महत्या
साताऱ्यातील फलटण येथील धक्कादायक घटना. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या. डॉ. संपदा मुंडे यांनी केली आत्महत्या. आत्महत्येचे कारण अस्पष्ट. काल रात्री त्यांनी टोकाचं पाऊल उचलत एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या. या घटनेने फलटण उपजिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
-
बेकायदेशीर हातभट्टी दारूवर पोलिसांची मोठी कारवाई
मावळात बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मितीवर वडगाव मावळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. डोणे गावच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकून अवैध दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि तयार दारू असा एकूण 1 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 45 वर्षीय एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
नाशिक जिल्ह्यात द्राक्षबागांना पावसाचा मोठा फटका
सततच्या अस्मानी संकटामुळे द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात द्राक्षबागांना बसला मोठा फटका. 26 एप्रिलपासून सुरू झालेला पाऊस दिवाळीनंतरही कायम आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागेना फळधारणा ठप्प. लासलगावजवळील कोटमगावातील शेतकरी मंगला गांगुर्डे यांच्या दोन एकर द्राक्षबागेला फळधारणा झालीच नाही. तलाठी व कृषी अधिकारी पंचनाम्यासाठी न आल्याने शेतकऱ्यांचा संताप.
-
तुकाराम बाबा महाराजांचा सरकारला इशारा
राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अन्यथा नाशिक मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आधी प्रशिक्षणार्थ्यांचे कुंभमेळा आंदोलन होईल,असा इशारा तुकाराम बाबा महाराजांनी दिला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सरकारच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन सानीतील बेमुदत उपोषणा आंदोलन दरम्यान दिलं होतं.मात्र दोन महिने उलटून देखील सरकार दरबारी कोणतीच हालचाल किंवा सरकार सोबत बैठक देखील घेण्यात आली नसल्याचा आरोप करत राज्यातल्या 50 हजार प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठी भगवे वस्त्र परिधान करत सरकारचे जपनाम आंदोलन करण्याचा इशारा, प्रशिक्षणार्थी संघटनेचे नेते तुकाराम बाबा महाराजांनी राज्य सरकारला दिला आहे.
-
बसला भीषण अपघात, 20 प्रवाशांचा मृत्यू
आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यात कल्लूर येथील चिन्नाटेकुरु गावाजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 20 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अजूनपर्यंत अधिकृत पुष्टी झालेली नाही. बसमध्ये 40 प्रवासी होते. बसने पेट घेताच 10 ते 12 प्रवाशांनी उड्या मारत जीव वाचवला.
-
दादर चौपाटीवर कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी
मुंबईतील दुषित हावेचा दर्जा सुधारला आहे, मात्र दादर चौपाटीवर कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. काल दिवाळीचा सण संपला आहे.फटाक्यांच्या अतिषबाजीने आसमंत फुलून गेला होता.मात्र त्याच फटाक्यांचे कागद, समुद्र चौपाटीवर जशाच्या तसे पडलेले आहेत.अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आपणाला पाहायला मिळत आहेत, तर समूनद्रातून वाहून आलेल्या काचार्याने ही किनाऱ्यावर अस्वच्छता पसरली आहे.सकाळ च्या वेळेत अनेक मॉर्निंग वॉक करणारे नागरिक आहेत, मात्र कचऱ्याचे मुळे अस्वच्छ झालेल्या जागेवरच त्यांना व्यायाम करावा लागत आहे.
-
‘बिनआवाजी दिवाळी’ साजरी
दिवाळीतील फटाक्यांचा आवाज मोजणाऱ्या ‘आवाज फाउंडेशन’च्या उपक्रमात यंदा पावसामुळे खंड पडला. मुंबईत गेल्या काही वर्षांपासून ‘आवाज फाउंडेशन’कडून दिवाळीदरम्यान ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण मोजले जाते. मात्र, यंदा पावसामुळे मोजणीवर परिणाम झाला. तरीदेखील, संस्थेने नागरिकांना ‘बिनआवाजी दिवाळी’ साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
-
अक्कलकोट तालुक्यासाठी 106 कोटींचा प्रस्ताव
अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या अक्कलकोट तालुक्याच्या मदतीसाठी 106 कोटींचा प्रस्ताव पाठवला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात पावसामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते अशी माहिती अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे असल्याचीही माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली
-
बिल्डरच्या गाडीला महापौराचा लोगो कसा -रवींद्र धंगेकर
मी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या विरोधात नाही.जैन बोर्डींग शासकीय यंत्रणा धाब्यावर बसवून कस हस्तगत केल यावर मी बोललो, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा यात हात आहे हे मी सांगतोय. ते खुलासा करायला तयार नाही.ते सांगतात मी निवडणुकीत पडलोय जगाला माहित आहे मी निवडणुकीत पडलोय ते. बोर्डिंगच्या जागा बिल्डरांच्या घशात घालणाऱ्या मोहाळांना मी प्रश्न विचारतोय. महापौर असताना मुरलीधर मोहोळ यांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारात घाण ठेवली. बिल्डरच्या गाडीला महापौराचा लोगो कसा असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी विचारला. देवेंद्र फडणवीस यांनी या मध्ये लक्ष घालावे असे आवाहन त्यांनी केले.
Published On - Oct 24,2025 8:13 AM
