Nitin Deshmukh: ‘एकनाथ शिंदे भगव्याचा आड लपलेला सैतान’, गुवाहाटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या शिलेदाराने टाकला बॉम्ब
Nitin Deshmukh on Eknath Shinde: गुवाहाटीवरून परत येणारे बाळापूरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर विखारी टीका केली. त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही कोंबडीइतकी औटघटिकेची असल्याचा आरोप केला.

Nitin Deshmukh on Eknath Shinde: राज्यातील महापालिका निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडाला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकीकडे महायुतीत पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप असा सामना रंगला आहे. तर मुंबईत ठाकरे बंधुविरोधात भाजप-शिंदे सेना असा थेट सामना आहे. दरम्यान अकोला महापालिका निवडणुकीची प्रचार शिगेला पोहचला आहे. या प्रचारात बाळापूरचे ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विखारी टीका केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भगव्या आड लपलेला शैतान
एकनाथ शिंदे हे भगव्या आड लपलेला सैतान आहे अशी जहरी टीका आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने वादाची ठिणगी पडली आहे. उमरी येथील प्रचारसभेत त्यांनी शिंदेंचा उल्लेख सैतान असा केल्याने वाद पेटला आहे. शिंदे हे गद्दार आणि सैतान असल्याचे त्यांनी वक्तव्य केलं. तर त्यांच्या पक्षाचं आयुष्य हे कोंबडीच्या आयुष्या इतकं आहे. असंही आमदार देशमुख म्हणालं. ज्या दिवशी भाजप त्यांना कापून खाईन, त्या दिवशी त्यांचं आयुष्य संपणार. हिंदुत्वाची मतं खाण्यासाठी शिंदेची शिवसेना भाजपनं उभी केल्याचा आरोप देशमुखांनी यावेळी केला.
मुख्यमंत्र्यांवर देशमुखांची टीका
आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. जाती-जातीत त्यांनी भांडणं लावली. आरक्षणासाठी भांडणं लावणारे ते पहिले मुख्यमंत्री असल्याचा आरोप देशमुखांनी केला. तर महापालिक निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे चालणार नाही, त्यामुळे त्यांनी ओबीसी, मराठा, एससी, एनटी समाजात भांडणं लावल्याचा आरोप फडणवीसांवर केला. गुजरातचे दोन बनिया देशात बनवाबनवी करत असल्याची टीका त्यांनी केली. तर आपल्याला मत मिळत नाही म्हणून ते मत धनुष्यबाणाला आणि वंचितला जाण्यासाठी त्यांची धडपड असल्याचा आरोप देशमुखांनी केला. मताचं विभाजन न करता भाजपला हद्दपार करण्याची विनंती त्यांनी वंचित बहुजन आघाडीला केली. 20 वर्षांपूर्वी भाजपची भोंग्याची गाडी आली, तर बनियाची गाडी आली म्हणायचे असा टोलाही त्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला लगावला.
