Satara Crime | किरकोळ भांडणातून तरुणाला उकळत्या चुन्यात ढकललं

Satara Crime | किरकोळ भांडणातून तरुणाला उकळत्या चुन्यात ढकललं

| Updated on: Feb 10, 2022 | 2:32 PM

साताऱ्या(Satara)तील रविवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या समाधान मोरे या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे उकळत्या चुन्यात ढकलून या मुलाला नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली आहे.

साताऱ्या(Satara)तील रविवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या समाधान मोरे या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे उकळत्या चुन्यात ढकलून या मुलाला नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली आहे. त्यामुळे मारहाण झालेल्या मुलाचे शरीर ठिकठिकाणी भाजले आहे. क्षुल्लक कारणातून मारहाण केल्याची बाब समोर येत असून त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार (Treatment) सुरू करण्यात आले आहेत. मारहाण करणारे संशयित हे दारू प्यायलेले असल्याचे तक्रारदार यांचे सांगणे आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस (Police) ठाण्यात करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येईल, कशाप्रकारे अत्यंत क्षुल्लक कारणातून मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर उकळत्या चुन्यात ढकलले. यात त्याचा हात 9 टक्के भाजला आहे. आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.