‘Sadabhau Khot यांची आमदारकी गेल्यानं त्यांचं पोट आणि डोकं एकदाच दुखतंय’

‘Sadabhau Khot यांची आमदारकी गेल्यानं त्यांचं पोट आणि डोकं एकदाच दुखतंय’

| Edited By: | Updated on: Mar 29, 2022 | 5:23 PM

प्रसिद्धी मिळविण्यासाठी गोपीचंद पडळकर (Goichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)  यांच्यामध्ये चढाओढ लागल्याचे दिसते, असे आरपीआय खरात गटाचे सचिन खरात (Sachin Kharat) यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धी मिळविण्यासाठी गोपीचंद पडळकर (Goichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)  यांच्यामध्ये चढाओढ लागल्याचे दिसते, असे आरपीआय खरात गटाचे सचिन खरात (Sachin Kharat) यांनी म्हटले आहे. सदाभाऊ खोत आपण क्रांतीसिंह नाना पाटील, लोकनेते वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील आर. आर. (आबा) पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील आहात. निदान सांगली जिल्ह्याचे नाव खराब होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सत्ता मिळाली नाही, म्हणून भाजपाला अर्धडोकेदुखी झाली आहे. आता तुमची आमदारकी गेल्यावर तुमचे पोट आणि डोके एकदाच दुखू लागले आहे. हे विधान करताना बंबवाल्या देवेंद्र फडणवीस यांना विचारले का, नाहीतर पाईप हातात धरून आयुष्यभर फिरावे लागेल, असेही सचिन खरात यावेळी म्हणाले. त्यांनी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यावर यावेळी टीका केली.