Chhagan Bhujbal: देवा भाऊ देता है, तो छप्पर फाडके देता है, अजितदादांच्या शिलेदाराची नायगावमध्ये जोरदार बॅटिंग, छगन भुजबळ काय म्हणाले?
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुतीत अजितदादांनी स्वतंत्र चूल मांडली आहे. तर भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अजितदादांनी 440 व्होल्टचा झटका दिल्यानंतर भाजपमधुनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. तर दुसरीकडे अजितदादांच्या शिलेदाराने मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्याची एकच चर्चा सुरू आहे.

Chhagan Bhujbal Praised CM Devendra Fadnavis: आज अजितदादांचे भ्रष्टाचारांच्या आरोपांसंबंधीचं वक्तव्य आणि त्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांची तितकीच तिखट प्रतिक्रिया चर्चेच असतानाच दुसरीकडे अजित पवारांचे शिलेदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांचे तोंडभरुन कौतुक केले. आज सावित्रीमाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी, सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नुकतीच हृदय शस्त्रक्रिया झालेली असतानाही मंत्री छगन भुजबळ यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला.
देवाभाऊ देता है, तो छफ्फर फाडके देता है
ऑपरेशन होऊन दोन महिने झाले. डॉक्टरांची परवानगी घेऊन या कार्यक्रमला आलो आहे. सावित्रीबाई फुलेंना नमन करतो. नायगावमध्ये पहिल्यांदा इतकी मोठी गर्दी पाहिली. सुशीलकुमार यांच्या काळात जीर्णोद्धार झाला. तेव्हा 35 लाख खर्च केले. आता सरकारने 150 कोटी दिले. देवा भाऊ देता है तो छप्पर फाडके देता है, असे कोडकौतुक छगन भुजबळ यांनी केले. त्याचवेळी पुणे फुलेवाड्याच काम रेंगाळले आहे.त्याला जरा गती द्यायला हवी अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली. महात्मा फुलेंची 200 वी जयंती मोठी साजरा करणार अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी आंतरराष्ट्रीय ग्रंथालयाची घोषणा केली आहे. महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीला हा कार्यक्रम घेता येईल. नायगावचे नाव क्रांती ज्योती सावित्रीबाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ती विचारात घ्यावी, असेही भुजबळ म्हणाले.
शैक्षणिक विकासाची केली मागणी
यावेळी मंत्री मकरंद पाटील यांनी सरकारकडे एक चांगली मागणी केली. आज देशभर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत. 195 वर्षा आधी जाती पातीचे राजकारण होते.त्यावेळी फुले दांपत्याची शाळा सुरू केली. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांचे हस्ते होत आहे.याचा खूप आनंद होत आहे. या तालुक्यात औद्योगीकरण वाढू लागले असे सांगताना त्यांनी या भागात शैक्षणिक हब सुरू झाले तर या भागाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
नायगावचे नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई नगर करण्याची मागणी
यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी नायगावचे नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई नगर करण्याची मागणी केली. सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाची कायम चर्चा झाली मात्र पुढे काहीच झाले नाही.मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यावर याला गती आली.या भव्य स्मारकाचे भूमिपूजन झाले.आपण जर मुख्यमंत्री नसता तर सावित्रीबाई फुले यांचे स्मारक झाले नसते, असे मत त्यांनी मांडले. 110 कोटींचे भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी उभे राहत आहे. या स्मारकाला आणखी 50 कोटीची गरज आहे याची पूर्तता आपण करावी. महात्मा फुले यांच्या मूळ गावी स्मारक उभे करावी इच्छा असून याचा मी ग्राम विकास मंत्री म्हणून आज हे स्मारक उभे करण्याबाबत निर्णय घेतोय असे त्यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषद सभापती राम शिंदे,मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री शंभूराजे देसाई, मंत्री जयकुमार गोरे,मंत्री मकरंद पाटील, आ.अतुल भोसले, आ.मनोज घोरपडे, आ.सचिन पाटील उपस्थित होते.
