AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE 13th june 2025 : अहमदाबाद विमान अपघाताचं कारण समोर येणार, तो ब्लॅक बॉक्स सापडला

Updated on: Jun 14, 2025 | 8:51 AM
Share

Maharashtra News LIVE in Marathi : आज 13 जून 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra News LIVE 13th june 2025 :  अहमदाबाद विमान अपघाताचं कारण समोर येणार, तो ब्लॅक बॉक्स सापडला

अहमदाबाद मधील मेघानी येथे एअर इंडियाचा विमानाला उड्डाणा नंतर झालेल्या अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याच सांगण्यात येत आहे. अपघात घडलेल्या ठिकाणावरून रेस्क्यू करून आणलेल्या मृतदेहांना सध्या अहमदाबाद मधील शासकीय रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या शवविच्छेदन केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी 300 पेक्षा अधिक मृतदेह ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत असून या मृतदेहांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पारध शिवारात जुन्या शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीमध्ये दोघेजण जखमी झाले आहे. वैभव लोखंडे आणि हर्षल पवार असं जखमींचे नावं आहेत. याप्रकरणी गोपाल लोखंडे यांच्या फिर्यादीवरून एका महिलेसह चौघांविरोधात जालन्यातील पारध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीच्या जुन्या वादातून शेतातच हाणामारीची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून हाणामारीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Jun 2025 07:23 PM (IST)

    आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या घाटकोपरमध्ये बॅनर

    आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या घाटकोपरमध्ये बॅनर

    वन सिटी , वन व्हाइस , वन होप अशा अशयाचं बॅनर

    युवा सेना नेता कार्तिक स्वामी यांनी लावले बॅनर

  • 13 Jun 2025 06:49 PM (IST)

    सांगलीला पावसानं झोडपलं, नदी नाल्याला पूर

    सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे, तासगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे.त्यामुळे तासगाव शहरातला कापूर ओढा भरून वाहू लागलेला आहे,  कापूर ओढ्याला पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच अनेक ठिकाणी ओढे नाले हे तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

  • 13 Jun 2025 06:04 PM (IST)

    मुंबई शहरात मुसळधार पावसाला सुरुवात

    मुंबई शहरात मुसळधार पावसाला सुरुवात

    सकाळपासून होतं ढगाळ वातावरण, आता पवासाला सुरुवात

    पुढील दोन ते तीन दिवस हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा

    पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता

  • 13 Jun 2025 05:54 PM (IST)

    बोईंग 787-8/9 विमानांची सुरक्षा तपासणी वाढवण्याचे निर्देश डीजीसीएने एअर इंडियाला दिले

    नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाच्या बोईंग 787-8/9 ड्रीमलायनर विमानाची सुरक्षा तपासणी वाढवण्याचे आदेश दिले आहेत. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये एअर इंडियाचे बोईंग 787-8/9 ड्रीमलायनर विमान AI171 हे विमान कोसळले होते. या अपघातात 241 जणांचा मृत्यू झाला होता आणि 28 हून अधिक जण जमिनीवरचे ठार झाले होते.

  • 13 Jun 2025 05:36 PM (IST)

    एनआयएचे पथक अहमदाबाद विमान अपघातस्थळी पोहोचले

    अहमदाबादमधील विमान अपघाताच्या तपासात आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि इतर केंद्रीय संस्थांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या पथकाने अपघातस्थळाला भेट दिली आणि तपास यंत्रणांना आवश्यक तांत्रिक आणि सुरक्षा सहाय्य पुरवले.

  • 13 Jun 2025 05:15 PM (IST)

    इस्रायलने इराणचा क्षेपणास्त्र प्रक्षेपण तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा

    शुक्रवारी इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि ड्रोन डागले. यानंतर इराणनेही इस्रायलवर 100 हून अधिक ड्रोन डागले. मात्र, आता इस्रायलने दावा केला आहे की त्यांनी इराणचा क्षेपणास्त्र प्रक्षेपण पॅड नष्ट केला आहे.

  • 13 Jun 2025 05:05 PM (IST)

    WTC 2025 Final SA vs AUS : ऑस्ट्रेलियाचं दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचं आव्हान

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या डावात 74 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने 207 धावांची खेळी केली. यासह दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान दक्षिण अफ्रिका गाठणार की ऑस्ट्रेलिया रोखणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • 13 Jun 2025 04:58 PM (IST)

    अहमदाबाद विमान अपघाताचं कारण समोर येणार, तो ब्लॅक बॉक्स सापडला

    अहमदाबाद विमान अपघाताचं कारण लवकरच समोर येणार आहे. दुर्घटनेतील तो ब्लॅक बॉक्स सापडला आहे. अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासाला वेगाने सुरु आहे. हा ब्लॅकबॉक्स सध्या दिल्लीला पाठवण्यात आला आहे.

  • 13 Jun 2025 04:35 PM (IST)

    प्रवासादरम्यान विमानातील एसीमध्ये बिघाड; प्रवासी आकाश वत्स यांचा खुलासा

    आकाश वत्स या प्रवशाचा याच विमानातून दिल्ली ते अहमदाबाद असा प्रवास होता. तेव्हा प्रवासादरम्यान विमानातील एसीमध्ये बिघाड असल्याचं प्रवासी आकाश वत्स यांनी सांगितलं. तसेच विमानाच्या इंटिरियरमध्ये काही चुका होत्या. असंही त्यांनी स्पष्ट केलं.

  • 13 Jun 2025 04:13 PM (IST)

    विमानाचा दरवाजा तुटल्यामुळे बाहेर पडता आलं; विमान अपघातातून वाचलेल्या प्रवाशानं सांगितला थरार

    अहमदाबाद विमान अपघातातून बचावलेल्या प्रवासाने सांगितला अपघाताचा थरार. तो  म्हणाला की, ” मी उडी मारली नाही तर विमानाचा दरवाजा तुटल्यामुळे बाहेर पडता आलं. मी सीटसह बाहेर फेकलो गेलो. ” असं अपघातातून वाचलेला प्रवासी रमेश विश्वासकुमार यांनी सांगितलं.

  • 13 Jun 2025 03:53 PM (IST)

    एम्ब्युलन्स सर्व्हीस पोहचल्याने ‘त्या’ प्रवाशाला वेळीच मदत

    अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर घटनास्थळी एम्ब्युलन्स सर्व्हीस पोहचल्याने विमान दुर्घटनेत वाचलेल्या एकमेव प्रवाशाला मदत मिळाली.

  • 13 Jun 2025 03:43 PM (IST)

    बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांनाच कार्यालयात कोंडले

    बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून  त्यांनी अमरावती तहसीलदार विजय लोखंडे यांना त्यांच्या दालनात कोंडले आहे.

  • 13 Jun 2025 03:31 PM (IST)

    Plane Crash : बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधून विद्यार्थी आपले साहित्य घेण्यासाठी आले

    अहमदाबाद येथील कालच्या विमान अपघातानंतर लागलेली आग विझवल्यानंतर महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य घेऊन मेडिकलचे विद्यार्थी आपल्या नातेवाईकांकडे परतत आहेत. तर काहीजण मित्रांच्या घरी शिफ्ट होत आहेत.

  • 13 Jun 2025 03:23 PM (IST)

    अलिबाग-पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मेलेला कुत्रा सापडल्याने खळबळ

    अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावातील जलजीवन मिशन योजने अंतर्गत बांधलेल्या पाण्याच्या टाकीत चक्क मृत सडलेल्या अवस्थेतील कुत्रा आढळून आला आहे

  • 13 Jun 2025 03:18 PM (IST)

    प्रभाग रचनेवर जितेंद्र आव्हाड यांची जहरी टीका

    निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांना घरी बोलावून इथले राजकीय नेते प्रभाग रचना करतात अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

  • 13 Jun 2025 02:40 PM (IST)

    केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, बाबुराव कदम यांची आक्रमक भूमिका

    हदगाव-नांदेड परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीमुळे सत्ताधारी शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी गरज पडल्यास विधानसभेचे अधिवेशन बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आमदार बाबुराव कदम यांनी नुकसानीची पाहणी केली असून केळी पिकासाठी हेक्टरी १ लाख ६० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

  • 13 Jun 2025 02:33 PM (IST)

    बच्चू कडूंसोबत बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडली, उचलून रुग्णालयात नेण्याची वेळ

    अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्यासोबत बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडली आहे. उपोषणस्थळी वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ईसीजी मशीन बंद असल्याने डॉक्टरांवर ते संतापले. तर ६० कार्यकर्त्यांची तपासणी करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे अनेकांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले. गंभीर बाब म्हणजे, स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने एका उपोषणकर्त्या कार्यकर्त्याला चक्क उचलून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. ज्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • 13 Jun 2025 01:59 PM (IST)

    उळे कासेगावचा पूल पुन्हा पाण्याखाली

    दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे कासेगावचा पूल पुन्हा पाण्याखाली गेला. पुलावरून पाणी वाहत असूनही नागरिकांचा पाण्यातून धोकादायक प्रवास सुरू आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे उळे कासेगावच्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

  • 13 Jun 2025 01:53 PM (IST)

    आता फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड चालणार

    कल्याणमध्ये आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकले. ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍याने बॅनर लावले. आता फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड चालणार अशा आशयाचा बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधले. राज्यात ठाकरे गट मनसे युतीबाबत चर्चा रंगल्या असतानाच आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकले आहे.

  • 13 Jun 2025 01:40 PM (IST)

    सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. गेल्या २४ तासात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दरात तब्बल 2 हजार 400 तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

  • 13 Jun 2025 01:30 PM (IST)

    बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा

    बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आमच्या मनसे पक्षाचा पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली. प्रकाश महाजन यांनी बच्चू कडूंची भेट घेतली. राज्यातील सरकार गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. बच्चू कडू यांच्या विधायक मागणी आहे त्यासाठी ते आंदोलन करत आहेत, असे ते म्हणाले.

  • 13 Jun 2025 01:20 PM (IST)

    प्रहार कार्यकर्त्यांनी फोडले फटाके

    प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी हदगाव तहसील कार्यालयात फटाके फोडले. बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून प्रहारचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. तहसील कार्यालयात बसून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

  • 13 Jun 2025 01:10 PM (IST)

    यशोमती ठाकूर यांचा कडू यांना पाठिंबा

    कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा पाठिंबा जाहीर केला. बच्चू भाऊ सोबत राजकीय मतभेद असले तरी शेतकऱ्याचं कल्याण हाच आमच्यासाठी धर्म आहे असं मी मानत आले आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर होणार्‍या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. शेतकरी कर्जमाफी असू दे की, हमीभाव, मायबाप शेतकर्‍याच्या प्रत्येक मुद्यावर काँग्रेस पक्षाने ठाम भूमिका घेतली आहे, असे ते म्हणाले.

  • 13 Jun 2025 01:00 PM (IST)

    बच्चू कडू यांना भेटण्यासाठी मंत्री राठोड दाखल

    बच्चू कडू यांना भेटण्यासाठी मंत्री संजय राठोड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे उपोषण स्थळी दाखल झाले आहेत.

  • 13 Jun 2025 12:43 PM (IST)

    करमाळयात प्रहार संघटनेने जातेगाव ते टेंभुर्णी महामार्ग रोखला

    प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे सहा दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही म्हणून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे प्रहार जनशक्ती संघटना आक्रमक झाल्या आहेत. जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गावर मौलाली माळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

  • 13 Jun 2025 12:30 PM (IST)

    सोन्या आणि चांदीच्या दराने घेतली उसळी

    बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या २४ तासात झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 400 तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

  • 13 Jun 2025 12:16 PM (IST)

    बच्चू कडूंना काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा पाठिंबा

    कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी पाठिंबा दिला आहे. ‘बच्चूभाऊ सोबत राजकीय मतभेद असले तरी शेतकऱ्याचे कल्याण हाच आमच्यासाठी धर्म आहे असे मी मानत आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे’ असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

  • 13 Jun 2025 11:59 AM (IST)

    अहमदाबाद – विमान अपघातानंतर मेडिकल हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये जेवण बनवण्याचे काम करणारी सल्ला बेन आणि तिची नात बेपत्ता

    विमान अपघातानंतर मेडिकल हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये जेवण बनवण्याचे काम करणारी सल्ला बेन आणि तिची नात बेपत्ता आहेत.

    सल्ला बेनच्या दिराने सांगितले की, घटनेच्या दिवशी ती तिच्या अडीच वर्षांच्या नातीसोबत जेवण बनवण्यासाठी मेडिकल हॉस्टेलमध्ये गेली होती पण घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी पोलिसांकडे आणि रुग्णालयात चौकशी केली पण अद्याप काहीही सापडले नाही.

  • 13 Jun 2025 11:42 AM (IST)

    थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

    थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर ते तातडीने खाली लँड करण्यात आलं.

  • 13 Jun 2025 11:41 AM (IST)

    अमरवाती – बच्चू कडू यांची प्रकृती प्रचंड खालावली

    अमरावती  – बच्चू कडू यांची प्रकृती प्रचंड खालावली असून सकाळी त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. मात्र उपचार घेण्यास बच्चू कडूंनी नकार दिला. कुठलंही सलाईन लावून घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली,

    कालपासून बच्चू कडून सतत उलट्या सुरू आहेत. दरम्यान बच्चू कडूंची प्रकृती खालावल्याने दुसरीकडे कार्यकर्त्यांने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • 13 Jun 2025 11:28 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रुपाणी कुटुंबाचं सांत्वन

    काल झालेल्या अहमदाबादमधील विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रुपाणी कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं

  • 13 Jun 2025 10:53 AM (IST)

    नाशिक भाजप शहराध्यक्षांकडे 35 पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे

    नाशिक शहरात भाजप शहराध्यक्षांकडे 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सोपवले आहेत. गणेश गीते आणि सुधाकर बडगुजर प्रवेशाचा वाद सुरू असताना पक्ष कार्यकर्ते नाराज आहे. पक्षात कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होतंय. मात्र येणाऱ्यांसाठी पायघड्या घातल्या जात आहेत. पक्षात निवडणुकांवेळी कार्यकर्त्यांची आठवण होते. मात्र इतर वेळी विसर मात्र पडतो, असं म्हणत या पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली.

  • 13 Jun 2025 10:39 AM (IST)

    विमान अपघातातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाची प्रतिक्रिया, काय सांगितलं?

    अहमदाबादमध्ये गुरुवारी झालेल्या विमान अपघात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. रमेश विश्वकुमार हे एकमेव या अपघातातून बचावले. रमेश यांनी अपघातावेळी काय झालं? याबाबत सांगितलं. “मी विमानातून उडी मारली नाही, सीटसह बाहेर फेकलो गेलो”, असं रमेश विश्वकुमार म्हणाले.

  • 13 Jun 2025 10:34 AM (IST)

    बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ अमरावती परतवाडा मार्गावर वलगावमध्ये चक्काजाम आंदोलन

    अमरावतीमधून मोठी बातमी समोर आली आहे. बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ अमरावती परतवाडा मार्गावर वलगावमध्ये चक्काजाम आंदोलन सुरु आहे. प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी केली जात असून कर्जमाफी करावी अशी मागणी केली जात आहे. बच्चू कडू याच्या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे.

  • 13 Jun 2025 10:18 AM (IST)

    विमान अपघाताची जबाबदारी कुणीही घ्यायला तयार नाही : संजय राऊत

    शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. “अहमदाबादमधील घटना मनाला अस्वस्थ करणारी आहे. विमान अपघाताची जबाबदारी कुणीही घ्यायला तयार नाही. 1 कोटी मदत केल्याने प्रश्न संपत नाही”, असं राऊत म्हणाले.

    “तसेच रेल्वे अपघात,दहशतवादी हल्ल्यात मृत्यू होतायत. अपघात टाळता येत नाहीत, असं गृहमंत्री अमित शाह म्हणतात. मग यांना काय टाळता येतं? असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच मोठे अपघात होऊनही सरकारच्या तोंडावर दु:खाची रेषही दिसत नाहीय”, असंही राऊत म्हणाले.

  • 13 Jun 2025 10:05 AM (IST)

    पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडला मोदींच्या विविध विकास कामांचा आलेख

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी 11 वर्षात मोदींनी संरक्षण, आर्थिक, आरोग्य, शिक्षण आणि इतर सर्वच क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आलेख मांडला. महाराष्ट्रातील वंचित आणि तळागाळातील घटकाला मोदींनी न्याय दिल्याचं गोरेंनी म्हटलं. तसेच नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याआधी भारताची अर्थव्यवस्था ही फारशी चांगली नव्हती. मात्र मोदी सरकारमुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचा दावाही गोरे यांनी केला.

  • 13 Jun 2025 09:55 AM (IST)

    मोदींनी घेतली जखमींची भेट

    पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादमधील सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णाची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, के.सी. पाटील, पोलीस आयुक्त आहेत.

  • 13 Jun 2025 09:41 AM (IST)

    धुळे शहरात अतिसार साथ रोगाची लागण

    धुळे शहरात अतिसार साथ रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे मनपाने आता ज्या भागात रुग्ण आढळले त्या भागात पाणी तपासणी सुरू केली आहे. पाण्यातील टीडीएस तपासले जात आहेत. मोगलाई, शनिनगगर, भिमनगर या भागात रुग्ण आढळले होते.

  • 13 Jun 2025 09:35 AM (IST)

    मोदी विश्वास कुमार यांची भेट घेणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघातातून वाचलेल्या विश्वास कुमार यांची भेट घेतील. तसेच माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांनाही भेटणार आहेत.

  • 13 Jun 2025 09:27 AM (IST)

    अहमदाबाद सिव्हीलमध्ये प्रचंड बंदोबस्त

    गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया विमानाला काल झालेल्या अपघात नंतर सध्या जखमी आणि मृतदेह ठेवण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले. आज पंतप्रधान त्या ठिकाणी भेट देणार आहे.

  • 13 Jun 2025 09:11 AM (IST)

    बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलन आजचा सहावा दिवस

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलन आजचा सहावा दिवस आहे. या आंदोलनात बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयावर प्रहारचे कार्यकर्ते चढले आहेत.

  • 13 Jun 2025 08:57 AM (IST)

    Pune news : पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात

    पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात. अपघातात एक जणाचा दुर्देवी मृत्यू. ट्रेलर चालकाचा अपघातात मृत्यू. काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चांदणी चौकात घडला अपघात. ट्रकच्या ट्रॉलीमध्ये असलेले लोखंडी पाईप समोर केबिनमध्ये येऊन ट्रक चालकाच्या अंगात घुसले आणि त्यात या ट्रकचालकाचा दुर्देवी मृत्यू झाला.

  • 13 Jun 2025 08:56 AM (IST)

    Ahmedabad Air india Plane Crash : डोंबिवलीच्या रोशनी सोनघरेचा दुर्देवी मृत्यू

    अहमदाबाद विमान दुर्घटनेत डोंबिवलीच्या रोशनी सोनघरेचा दुर्देवी मृत्यू. लंडनला जात असताना फ्लाइट क्रू ची सदस्य. दीड वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालेल्या रोशनीने एअर होस्टेस बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. निधनाची बातमी कळताच परिसरात शोककळा. शेजाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना.

  • 13 Jun 2025 08:42 AM (IST)

    Mumbai News : मध्य रेल्वेच्या अप मार्गाची वाहतूक विस्कळीत

    मध्य रेल्वेच्या अप मार्गाची वाहतूक विस्कळीत. लहवित ते अस्वली दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत. काही गाड्या दुसऱ्या ट्रॅकवरून वळविण्यात आल्या असून काही गाड्या विविध स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ओव्हर हेड वायर बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

  • 13 Jun 2025 08:41 AM (IST)

    Ahmedabad Air india Plane Crash : पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये

    पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद येथे पोहोचले असून ते परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. काल अहमदाबादमध्ये एअर इंडियाच विमान कोसळलं. यात 242 प्रवासी होते.

Published On - Jun 13,2025 8:40 AM

Follow us
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्...
आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल
आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल.
भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली
भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली.
मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी
मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी.
अरे आमची लाज काढू नका... भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्...
अरे आमची लाज काढू नका... भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्....
तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले
तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले.
'त्या' प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती
'त्या' प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती.
डबल डेक्करला आग अन् प्रवाशांनी बसमधून घेतल्या उड्या, थरारक व्हिडीओ
डबल डेक्करला आग अन् प्रवाशांनी बसमधून घेतल्या उड्या, थरारक व्हिडीओ.
अद्भूत... आंबोलीतील सौंदर्य, डोळ्यांचे पारणं फेडणारा नजारा एकदा बघाच
अद्भूत... आंबोलीतील सौंदर्य, डोळ्यांचे पारणं फेडणारा नजारा एकदा बघाच.
राज्यातले बडे नेते हनीट्रॅपच्या चंगुलमध्ये
राज्यातले बडे नेते हनीट्रॅपच्या चंगुलमध्ये.