Maharashtra Breaking News LIVE 13 May 2025 : नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, सलग सहाव्या दिवशी पाऊस
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 13 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला आमच्या पद्धतीने चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. कुणीही अण्वस्त्रांची धमकी दिली, तरी त्याला भीक न घालता निर्णायक प्रहार केला जाईल, अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. त्यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच सोमवारी जाहीर भाष्य केलं. दहशतवादी आणि त्यांना थारा देणारं सरकार यांना आम्ही वेगळं मानत नाही, असंही मोदींनी ठणकावलं. दरम्यान सोमवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. राजस्थानच्या सीमेवरील जिल्ह्यात मोदींच्या भाषणानंतर पुन्हा हवाई हल्ले झाले. राजस्थानच्या बाडमेर, झुंझुनू, जोधपूर या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा ड्रोन हल्ले झाले. या हल्ल्याला भारतीय लष्कराकडून तात्काळ चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..
LIVE NEWS & UPDATES
-
जिथा बनावट दारू प्रकरणातील मृतांची संख्या 20 वर पोहोचली
पंजाबमधील अमृतसरमधील मजिठा बनावट दारू प्रकरणात मृतांची संख्या 20 वर पोहोचली आहे. 3-4 जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
-
राहुल गांधी 15 मे रोजी बिहार दौऱ्यावर
राहुल गांधी 15 मे रोजी बिहारला भेट देतील. ते पाटणा आणि दरभंगा येथे कार्यक्रम करतील. यासोबतच फुले चित्रपट पाहण्याचा कार्यक्रमही आहे. राहुल गांधी दरभंगा येथील विद्यार्थ्यांशीही संवाद साधतील.
-
-
बुधवारी सकाळी 11 वाजता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक
उद्या सकाळी 11 वाजता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक होईल. या बैठकीत ऑपरेशन सिंदूर आणि त्याशी संबंधित सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.
-
कल्याण पूर्व- पूना लिंक रोडवर पुन्हा अपघात
कल्याण पूर्व- पूना लिंक रोडवर पुन्हा अपघात
विजयनगर परिसरात कचऱ्याचा डंपर दुभाजकावर चढला
डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपरचा अपघात
सुदैवाने जीवितहानी नाही ,
गेल्या महिनाभरातील चौथा अपघात
-
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी
वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाला सुरुवात
अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ
पाऊस आल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा
अचानक आलेल्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता
-
-
नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, सलग सहाव्या दिवशी पाऊस
नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं
इगतपुरी तालुक्यात सलग 6 व्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
विजेच्या कडकडाटासह व जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
तालुक्यात अवकाळी पावसाने 87 हेक्टर शेती बाधित
उन्हाळी बाजरी व भाजीपाल्याची पिके जमीनदोस्त झाल्याची कृषी विभागाची माहिती
-
वसईत नाले आणि नद्या भूमाफियांनी मातीभराव टाकला, नागरिकांकडून तक्रार दाखल
वसई तालुक्यातील कामन आणि चिंचोटी परिसरातील नैसर्गिक नाले आणि नद्या भूमाफियांनी अनधिकृत मातीभराव करून अक्षरशः गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कामनच्या जाधववाडी परिसरातील सर्व्हे नंबर ११ मध्ये ही गंभीर घटना घडली आहे. चिंचोटी आणि कामन परिसरातून डोंगरावरील पाणी समुद्र आणि खाडीला मिळवणारा तब्बल ३० फुटांचा नैसर्गिक नाला भूमाफियांनी केवळ ५ फुटांपर्यंत अरुंद केला आहे. यामुळे परिसरातील नैसर्गिक जलप्रणालीवर गंभीर परिणाम झाला आहे. या गंभीर प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
-
वीजेच्या गडगडाटसह तुफान पाऊस
मागच्या दोन दिवसांपासून वातावरणात उकाडा जाणवत असताना सकाळपासुन वातावरणात गारवा तयार झाला होता. त्यामुळे उकाड्यापासुन दिलासा मिळाला. पाऊसाची जोरदार बँटिंग सुरु झाली. टोमँटो आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे
-
त्या पोस्टरने वेधले लक्ष्य
सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा..साहेबांनी संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार तुमच्यावरती सोडले आहेय अजित दादा व आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात अशा आशयाच्या पोस्टरने सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. पुण्यातील डेक्कन चौकात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याकडून पोस्टर लावण्यात आले.
-
खेड तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका
खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्याच्या तडाक्याने नागरिकांमध्ये मोठी धांदल उडाली आहे. अवकाळी पावसाने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
-
ताडोबा व्याघ्रप्रकल्पात 2 वाघांची जोरदार झुंज
ताडोबा व्याघ्रप्रकल्पात 2 वाघांची जोरदार झुंज झाली. झुंजीत ब्रम्हा या वाघाचा मृत्यू तर छोटा मटका हा प्रसिद्ध वाघ गंभीर जखमी झाला. अधिवास आणि वाघिणीवरील हक्काच्या लढाईतून झाली काल संध्याकाळी या 2 वाघांमध्ये झुंज झाली होती. रामदेगी परिसरात छोटा मटका या प्रसिद्ध वाघाचा अधिवास आहे.
-
पाकिस्तान सीमेवर जनजीवन पूर्वपदावर
भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर आत्ता सम वाळवंटाजवळील गावात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पण इथे अनेक दशकापासून काम करणारा मुस्लिम समुदाय काही बोलण्यास तयार होत नसल्याचे चित्र आहे. एक अनामिक भिती त्यांच्या मनात घर करून गेली आहे.
-
मान्सून लवकरच दाखल होणार
आज अंदमान मध्ये मान्सून दाखल झाला आहे. 27 मेला मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येतेय. अंदमान मध्ये आठ ते नऊ दिवस आणि केरळात तीन ते चार दिवस अगोदर मान्सून दाखल झाला आहे.
-
साई मंदिरात नवीन देणगी धोरण
साईबाबा संस्थान तिरूपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर नवीन डोनेशन पॉलिसी स्वीकारली आहे. आता 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दान देणा-या भाविकांना देखील मिळणार व्हिआयपी आरतीचा लाभ मिळेल.
-
सत्ताधारी भाजप आमदार सुभाष देशमुख ठिय्या आंदोलनाला बसले
सीना नदीच्या पट्ट्यातील 10 ते 15 गावांना पाणी न सोडल्याने सत्ताधारी आमदार सुभाष देशमुख आणि शेतकरी आक्रमक… सोलापुरातील सिंचन भवनच्या कार्यालयात भाजप आमदार सुभाष देशमुखांचे शेतकऱ्यांसोबत ठिय्या आंदोलन सुरू … भाजप आमदार सुभाष देशमुख देखील आंदोलनात सहभागी झालेत… सिंचन भवनच्या मुख्य प्रवेशद्वारात बिछाना टाकून ठिय्या आंदोलन सुरू… मागील आठवड्यात पाणी देण्याचे खोटे आश्वासन देऊन पाणी न सोडल्याने शेतकरी आक्रमक…. सीना नदी पात्रातील 10 ते 15 गावातील शेतकरी या आंदोलनात सहभागी…
-
यंदाचा दहावीचा निकाल 94.10 टक्के
यंदाचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
-
अज्ञाताकडून अल्पवयीन विद्यार्थिनींच्या अर्धनग्न फोटोंची मागणी
अज्ञाताकडून अल्पवयीन विद्यार्थिनींच्या अर्धनग्न फोटोंची मागणी… शाळेतील शिक्षण अधिकारी बोलत असल्याची अज्ञात आरोपीकडून बतावणी… महाल परिसरातील शाळेत शिकणाऱ्या 15 – 16 विद्यार्थिनींसोबतचा प्रकार… पालकांच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल…
-
मातृदिनालाच मुलाकडून आईला कुकरने मारल्याची धक्कादायक घटना समोर
सोलापूर: स्वतःची पेन्शन नातेवाईकांना दिल्याने आईला कुकरणे मारल्याची मारहाण केलीय… विजयालक्ष्मी चिंचणपुरे असे जखमी झालेल्या आईचे नाव आहे… या प्रकरणी जेलरोड पोलिसांनी मुलगा हर्षल चिंचणपुरे या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केलीय… अटक करून पोलिसांनी हर्षल चिंचणपुरे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली… सोलापुरातील अन्नपूर्णा संकुल अपार्टमेंट येथे घडली घटना
-
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये एन्काऊंटर
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक सुरु आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये एन्काऊंटर करण्यात आला आहे. लष्कराकडून गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांसाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. यात अनेक दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती मिळतेय. तसेच 1 दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
अमृतसरमधील शाळा आजही बंद, स्थानिक प्रशानसनाचे आदेश
मोठी बातमी समोर आली आहे. अमृतसरमधील शाळा आजही बंद असणार आहेत. स्थानिक प्रशानसनाने याबाबतचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील आदेशापर्यंत अमृतसरमधील शाळा बंद राहणार आहेत. सीमावर्ती जिल्ह्याला पाकिस्तानकडून अजूनही धोका असल्याने सुरक्षिततेच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
जालन्यात अंगावर वीज पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, भाटेपूरीतील घटना
जालन्यात अंगावर वीज पडून एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जालन्यातील भाटेपूरी गावात हा प्रकार घडला. यात विठ्ठल कावळे या तरुणाचा दुर्देवी अंत झाला. विठ्ठल कावळेला वीज अंगावर कोसळल्यानंतर जालना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. या घटनेने भाटेपुरी आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
गुहागर तालुक्यातील ‘कुडली ‘ गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई
गुहागर तालुक्यातील ‘कुडली’ गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जल साठ्यांची पाणी पातळी खालवली आहे. त्यामुळे गावातील प्रियांका पांचाळ या गावातील महिलांना त्यांच्या बोअरवेलमधून पाणी देत आहेत. त्यामुळे पाणी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
-
पुणे शहरात HSRP नंबर प्लेट बसवण्यात वाहन चालकांचा थंड प्रतिसाद
पुणे शहरात HSRP नंबर प्लेट बसवण्यात वाहन चालकांचा थंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आतापर्यंत पुण्यात केवळ 1 लाख 61 हजार 310 वाहनधारकांकडूनच या HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करण्यात आली. अजूनही तब्बल 23 लाखांहून अधिक वाहनधारकांकडून नंबर प्लेट बसवण्यात आलेली नाही. पुणे आरटीओमध्ये 2019 नंतर 27.61 लाख वाहनांची नोंदणी करण्यात आलीय. त्यापैकी केवळ 1.61 लाख वाहन चालकांकडून आतापर्यंत या नंबर प्लेट्स बसवल्या आहेत.
-
पुणे शहरात HSRP नंबर प्लेटसाठी थंड प्रतिसाद
पुणे शहरात HSRP नंबर प्लेट बसविण्यात वाहन चालकांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत पुण्यात केवळ 1 लाख 61 हजार 310 वाहनांवरच हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. अजूनही तब्बल 23 लाखांहून अधिक वाहनांनी या नंबर प्लेट बसवल्या नाही.
-
उदय सामंत-राज ठाकरे चर्चा
सकाळी काही कामासाठी आलो होतो. राज ठाकरे यांना फोन केला. मी गप्पा मारण्यासाठी येत आहे. राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यावर अनेक विषय कळतात. त्यामुळे ही भेट घेतली. विकासाबाबत चर्चा होते. तुमच्या मनात जी शंका आहे. ती कोणतीही चर्चा झाली नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.
-
सिंहगडाच्या विकासासाठी 285 कोटी रुपये
राज्य सरकारकडून सिंहगडाच्या विकासासाठी 285 कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. गडाच्या खराब झालेला कल्याण दरवाजा, पुणे दरवाजासह ढासळणारी तटबंदी, बुरुज, पाऊल वाटा, पायर्या तसेच ऐतिहासिक वास्तूंची शिवकालीन बांधकाम शैलीत उभारणी करण्यात येणार आहे.
-
बुलढाण्यात अवकाळी पाऊस
बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरु झाला आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान होत आहे.
-
PMP ला मिळणार 200 बस
पुणे शहारासाठी पीएमपीला नवीन बसेस मिळणार आहे. जून अखेरपर्यंत नव्या 200 बसेस ताफ्यात दाखल होणार आहे. यामुळे आता पुणेकरांना अधिक आरामदायी आणि पर्यावरण पूरक सार्वजनिक वाहतूक सेवा मिळणार आहे.
-
ठाणे जिल्ह्यातील 1,21,244 विद्यार्थ्यांचा आज दहावीचा निकाल
ठाणे जिल्ह्यातील 1,21,244 विद्यार्थ्यांचा आज दहावीचा निकाल लागणार आहे. दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार आहे. बारावीनंतर आता दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे.
-
शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा ठाकरे गटाचा राजीनामा
शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक नेतृत्वावर नाराज असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिला आहे. तेजस्वी घोसाळकर या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. अभिषेक घोसाळकरच्या हत्येनंतर आता तेजस्वी घोसाळकर यांनी मोठं पाऊल उचललं आहे.
-
उदय सामंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला
उदय सामंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ते भेटीला गेले आहेत. उदय सामंत आणि राज ठाकरे यांची ही तिसरी भेट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
-
अवकाळी पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले
अवकाळी पावसामुळे गवार, मटार, फरसबी यांसारख्या भाज्यांचे दर कडाडले आहेत. तर काकडी, गाजर, लाल भोपळा स्वस्त झाला आहे. फरसबी, शेवग्याच्या शेंगा, गवार ,मटार या भाज्यांचे दर वाढले असून त्यांनी किलोला शंभरी ओलांडली आहे.
-
पुण्याहून विमानसेवा खंडीतच, प्रवासी प्रतीक्षेत
पुण्याहून विमानसेवा खंडीतच असून अमृतसर, चंदीगड, जयपूर, जोधपूर, राजकोट इथले प्रवासी प्रतीक्षेत आहेत. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव देशातील 32 विमानतळं बंद केली होती. मात्र तणाव निवळल्याने सोमवारी केंद्र सरकारने बंद असलेले 32 विमानतळ पुन्हा प्रवासी सेवेसाठी खुले केले असले तरीही विमान कंपन्यांची तयारी नसल्याने काही विमान बंद असलेल्या पूर्ववत झाल्या नाहीत. यात पुणे विमानतळाचा देखील समावेश आहे. सोमवारी पुणे विमानतळावरून विमानसेवा पूर्ववत झालेली नाही.
-
शिवशाहीचा हिरकणीच्या नावाने प्रवास
शिवशाहीचा हिरकणीच्या नावाने प्रवास सुरू होणार आहे. सर्व बसेसचं लवकरच रूपांतर होणार असून दापोडीतील कार्यशाळेत काम होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बसचं रूपांतर हिरकणी वातानुकूलित बसमध्ये केलं जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सदस्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पहिल्या टप्प्यात पुण्याजवळील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत सात शिवशाही बसच्या रचनेत बदल केला जाणार आहे. या कामाला लवकर सुरुवात होणार आहे.
-
पुणे- एसएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी
पुणे- एसएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी लागणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी हे आज सकाळी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर करतील. यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी या शालांत परीक्षेला बसले होते. दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट वर पालकांना आणि मुलांना हा निकाल पाहता येईल.
-
पुणे- मान्सून आज अंदमान-निकोबार बेटावर धडकण्याची शक्यता
पुणे- मान्सून आज अंदमान-निकोबार बेटावर धडकण्याची शक्यता आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरातले नैऋत्य मोसमी वारे हा पहिला पाऊस घेऊन येतील. हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे. यंदा मान्सूनचं आगमन आठवडाभर आधीच होत आहे.
-
मुंबईत ढगाळ वातावरण, दोन दिवस यलो अलर्ट
मुंबईत ढगाळ वातावरण असून दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला. तर दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे. महा-मुंबई परिसरात आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सकाळपासूनच दादर चौपाटी, घाटकोपर, वांद्रे, ठाणे परिसरात ढगाळ वातावरण आहे. ठाणे आणि मुंबईमध्ये मेघगर्जनेसह हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
Published On - May 13,2025 8:03 AM
