AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 1 June 2025 : क्रिमियाला जाणारी रशियन लष्करी मालवाहू ट्रेन उडवली, युक्रेनचा दावा

| Edited By: | Updated on: Jun 02, 2025 | 8:16 AM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 1 जून 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 1 June 2025 : क्रिमियाला जाणारी रशियन लष्करी मालवाहू ट्रेन उडवली, युक्रेनचा दावा

पुण्यातील भावे हायस्कूलजवळील अपघातप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलंय. विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देणं आवश्यक आहे, असं त्यांनी लिहिलं. त्याचप्रमाणे त्यांच्या उपचाराचा खर्च सरकारने करावा अशी मागणी त्यांनी केली. पुण्यातील भावे हायस्कूलजवळ कारने 12 जणांना उडवलं होतं. अपघातात जखमी झालेले सर्व 12 जण एमपीएससीचे विद्यार्थी आहेत. संध्याकाळी 5.45 वाजता विद्यार्थी चहाच्या दुकानाबाहेर उभे होते. मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने चहा पिण्यासाठी उभे असलेल्या विद्यार्थ्यांना उडवलं. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी ‘सामना’तील अग्रलेखात एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. शिंदेंनी गुवाहाटीत नेमकं काय केलं, याबद्दल त्यांनी लिहिलंय. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Jun 2025 06:59 PM (IST)

    नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी काठमांडूमध्ये निदर्शने

    नेपाळमध्ये राजेशाही पुनर्संचयित करण्यासाठी आणि त्याला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी (आरपीपी) आणि आरपीपी नेपाळसह राजेशाही समर्थक गटांनी काठमांडूमधील नारायण चौर येथे निदर्शने केली.

  • 01 Jun 2025 06:38 PM (IST)

    गोरखपूरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव

    गोरखपूरमध्ये बर्ड फ्लू (H5N1 आणि H9N2) च्या प्रादुर्भावामुळे चिकन दुकाने 21 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. बाधित भागातून नमुने गोळा करण्यात आले आहेत आणि त्यामध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे.

  • 01 Jun 2025 06:30 PM (IST)

    उत्तर कोरिया बनू नका – कंगना राणौत

    कोलकाता पोलिसांनी कायद्याच्या विद्यार्थिनीला केलेल्या अटकेवर भाजप खासदार कंगना राणौत म्हणाल्या, “कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली कोणालाही त्रास देणे योग्य नाही. जेव्हा एखाद्याने अपशब्द वापरल्याबद्दल माफी मागितली आहे आणि पोस्ट डिलीट केली आहे, तेव्हा एखाद्याला तुरुंगात टाकणे, त्याला तुरुंगात ठेवणे, त्याला त्रास देणे, त्याचे संपूर्ण करिअर आणि चारित्र्य खराब करणे हे खूप चुकीचे आहे. कोणत्याही मुलीसोबत असे घडू नये. मी बंगाल सरकारला विनंती करते की त्यांनी उत्तर कोरिया बनवू नये. येथे सर्वांना संवैधानिक अधिकार आहेत. आजची मुले त्यांच्या दैनंदिन संभाषणात अशी भाषा वापरतात.”

  • 01 Jun 2025 06:18 PM (IST)

    क्रिमियाला जाणारी रशियन लष्करी मालवाहू ट्रेन उडवून देण्यात आली, युक्रेनचा दावा

    क्रिमियाला जाणारी रशियन लष्करी मालवाहू ट्रेन उडवून देण्यात आल्याचे युक्रेनने म्हटले आहे. युक्रेनच्या लष्करी गुप्तचर संस्थेने, जी GUR म्हणून ओळखली जाते. आज सकाळी सांगितले की, अन्न आणि इंधन वाहून नेणारी रशियन लष्करी मालवाहू ट्रेन क्रिमियाला जात असताना स्फोटात उडवण्यात आली.

  • 01 Jun 2025 03:51 PM (IST)

    कुंभमेळा निमित्ताने 4 हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्या – देवेंद्र फडणवीस

    नाशिक कुंभमेळा निमित्ताने 4 हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  अजून 2 हजार कोटी रुपयांची निविदा काढण्यात येणार आहे.  गोदावरी नदी स्वच्छ राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू झाले आहेत असेही फडणवीस यांनी सांगितले.

  • 01 Jun 2025 02:37 PM (IST)

    अमोल मिटकरी हा छोटा माणूस चिल्लर माणूस- ओबीसी नेते लक्ष्मण हाके

    अमोल मिटकरी मी जर पाणीतोड असेल तर अजित दादा समुद्रतोड आहे… अजितदादा नदीतोड आहे… अजित दादा जलसिंचन तोड आहे… अमोल मिटकरी तुझ्या या वक्तव्यावर मी व्यक्त होणार नाही. अजितदादा काय बोलला असेल तर मी व्यक्त होईल अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली. तसेच अमोल मिटकरी हा छोटा माणूस चिल्लर माणूस आहे असे देखील ते पुढे म्हणाले.

  • 01 Jun 2025 02:12 PM (IST)

    नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या ताराखा जाहीर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक घेतली. यामध्ये 13 आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

  • 01 Jun 2025 12:59 PM (IST)

    एचटीबीटी कपाशी बियाण्याची तस्करी

    अमरावतीत ट्रॅव्हल्स मधून प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाण्याची तस्करी केल्याचे उघड झाले आहे. 2500 पाकिटे प्रिंट केलेले चार कट्टे जप्त करण्यात आले. एकूण 25 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. खरीप हंगामाच्या तोंडावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

  • 01 Jun 2025 12:50 PM (IST)

    रणजीत कासलेला दोन दिवसांची कोठडी

    सोशल मीडियावर नेत्यांची ‘ पोलखोल ‘ करणं बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला भोवलं. रणजीत कासलेला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. लोकप्रतिनिधींची बदनामी करण तसेच जातींमध्ये द्वेष निर्माण केल्याप्रकरणी रणजीत कासलेला अटक करण्यात आली. रणजीत कासलेला दिल्ली येथे अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोशल मीडियावर सातत्याने लोकप्रतिनिधी आणि यंत्रणेला लक्ष केल्यामुळे सध्या चर्चेत रणजीत कासले सध्या चर्चेत आला आहे.

  • 01 Jun 2025 12:40 PM (IST)

    मुख्यमंत्री आज कुंभमेळा नियोजनचे आढावा घेणार

    मुख्यमंत्री आज कुंभमेळा नियोजनचे आढावा घेणार आहेत. सर्व आखड्यांचे प्रमुख साधू महंत याना सुद्धा आज आमंत्रण केले आहे. सविस्तर चर्चा आज मुख्यमंत्री साधू महंत यांच्या सोबत करतील. आज मुख्यमंत्री शाही स्नान तारखा देखील जाहीर करतील, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

  • 01 Jun 2025 12:30 PM (IST)

    मालेगावमध्ये अजून एक गुन्हा दाखल

    जन्म दाखला प्रकरणात अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालेगावी दुसऱ्यांची कागदपत्रे वापरून जन्म प्रमाणपत्र तयार केल्याचे समजते. प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी तिसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करीत उद्या मालेगावात अजून एक धमाका करणार असल्याची माहिती दिली.

  • 01 Jun 2025 12:20 PM (IST)

    जनावरांची केली सुटका

    गडचिरोलीमधील आष्टी पोलिसांनी जनावराची तस्करी होत असलेल्या वाहनांवर कारवाई करून 48 जनावरे जप्त केले. त्यात 30 बैल आणि 18 गायांच्या समावेश आहे. उत्तर प्रदेशातील २ आरोपी गडचिरोली पोलिसांनी अटक केली. कत्तलीसाठी जात असलेल्या जनावरांना बेशुद्ध अवस्थेतून वाहनांमधून पोलिसांनी बाहेर काढले.

  • 01 Jun 2025 12:10 PM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरी दौरा

    ठाण्याच्या शुभदीप निवासस्थानवरून मुंबईकडे निघताना नातू रुद्रांश याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवळ घेत मायेचा हात फिरवला. रुद्रांश आपल्या हातात खेळणं घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाज देतात शिंदे हे थांबले आणि रुद्रांश ला जवळ घेत लाड केले. नातवाने आवाज देतात उपमुख्यमंत्री थांबले. नातू रुद्रांशला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाड करत पुढे मार्गस्थ झाले.

  • 01 Jun 2025 12:01 PM (IST)

    कांद्याच्या किंमती भडकणार?

    मुसळधार पावसात कांदा खराब झाल्याने येत्या काळात बाजारात कांद्याचा तुटवडा होऊन किंमत वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी पण पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे किंमती वधारल्या होत्या. यावेळी सुद्धा तशीच स्थिती असल्याने भाव वधारण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

  • 01 Jun 2025 12:00 PM (IST)

    शरद पवारांकडून बाबा आढाव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

    राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या 95 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मार्केट यार्डमधील हमाल पंचायतीच्या कार्यालयात आले. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बाबा आढाव यांचा वाढदिवस साजरा केला गेला. पवार यांनी बाबा आढाव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

  • 01 Jun 2025 11:51 AM (IST)

    लातूर जिल्ह्यात विद्यार्थ्यास मारहाण

    लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर येथे टोळक्याने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. एका बेकरी समोर थांबलेल्या विद्यार्थ्याला टोळक्याने ही मारहाण केली आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

  • 01 Jun 2025 11:35 AM (IST)

    सातारामधील नुकसानीची पाहणी

    सातारा जिल्ह्यातील फलटण मान खटाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झाली होती. या अतिवृष्टीमुळे शेतीचे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले. फलटण शहरासह बाधित झालेल्या गावांची पाहणी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून भरपाईसाठी त्वरित पावले उचलण्याच्या सूचना दिल्या.

  • 01 Jun 2025 11:22 AM (IST)

    पावसामुळे ज्वारीचे नुकसान

    लातूर जिल्ह्यात ज्वारीच्या शेतीला पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसामुळे ज्वारीचे पीक बळाराजाच्या हातून गेले आहे. ज्वारी काढणीला आली असताना पाऊस सुरु झाला. यामुळे ज्वारी काळी पडून कणसाला कोंब फुटले आहेत.

  • 01 Jun 2025 11:05 AM (IST)

    मुंबईत पावसाला सुरुवात

    मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. दोन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे.

  • 01 Jun 2025 10:57 AM (IST)

    तेलंगणा राज्यातील मूलगु जिल्ह्यात आठ माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण

    तेलंगणा राज्यातील मूलगु जिल्ह्यात आठ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. डीव्हीसीएम पदावरील एका मोठ्या माओवाद्यासह RCP आणि CNM सदस्य पदाचे हे माओवादी आहेत. यात तीन महिला माओवादी आणि पाच पुरुष माओवाघांचा समावेश आहे. हे माओवादी छत्तीसगड राज्यातील बिजापूर, नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यात माओवादी संघटनेत कार्यरत होते.

  • 01 Jun 2025 10:48 AM (IST)

    मुंबई आणि एमएमआर राज्यांमध्ये सीएनजीच्या किंमतीत आजपासून वाढ

    मुंबई आणि एमएमआर राज्यांमध्ये सीएनजीच्या किंमतीत आजपासून वाढ होणार आहे. प्रतिकिलो मागे पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबई, ठाणे आणि एमएमआरच्या इतर भागात सीएनजीची सुधारित किंमत ८० रुपये प्रति किलो झाली आहे. गेल्या काही महिन्यांतील ही चौथी दरवाढ आहे.

  • 01 Jun 2025 10:43 AM (IST)

    आसाममध्ये पुरामुळे मोठं नुकसान, 28 जणांचा मृत्यू

    आसाममध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालं असून 28 जणांचा मृत्यू झाला आहे. 28 जिल्ह्यांमधील 23 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. कछारमधील 1 लाख 77 हजार नागरिकांना घर सोडावं लागलं.

  • 01 Jun 2025 10:35 AM (IST)

    शिवसेनेच्या शिंदे गटातल्या लोकांनी कामाख्या मंदिरात प्राण्यांचे बळी चढवले- राऊत

    “दोन-तीन वर्षांपूर्वी शिवसेनेची काही लोकं गुवाहाटीतील कामाख्या मंदिरात गेली होती. 50 ते 60 जण गेले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात प्राण्यांचे बळी चढवले. बैल, बकरी, रेडा यांची बळी चढवली. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी हे बळी चढवले गेले. महाराष्ट्रातल्या सत्तांतरासाठी हे केलं गेलं,” असं राऊत म्हणाले.

  • 01 Jun 2025 10:33 AM (IST)

    एकनाश शिंदे कामाख्याला गेल्यापासून तिकडे भाविकांची गर्दी वाढली- राऊत

    “मी गुवाहाटीला गेलो होतो. त्यादिवशी योगायोगाने अमावस्या होती. त्याठिकाणी महाराष्ट्रातील आणि ठाण्यातील भाविक मोठ्या प्रमाणात आले होते. एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन तिकडे गेले होते. त्यानंतर कामाख्या मंदिरात भक्तांची गर्दी वाढली. त्याठिकाणी अनेक प्राण्यांची बळी दिलेली होती. त्यांची शिंगं तिकडे होती, ते पाहून दुर्दैवी वाटलं,” असं संजय राऊत म्हणाले.

  • 01 Jun 2025 10:23 AM (IST)

    चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाच्या हलक्या सरी

    चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. ५ जूनपर्यंत पुणे आणि पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी तुरळक, हलक्या सरी बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मे महिन्यातच सक्रिय झालेल्या मान्सूनचा जोर ओसरला आहे.

  • 01 Jun 2025 10:22 AM (IST)

    सोलापूर ते गोवा विमानसेवेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    सोलापूर ते गोवा विमानसेवेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चारच दिवसांत 200 पेक्षा अधिक तिकिटांची बुकिंग झाली आहे. फ्लाय 91 कंपनीच्या माध्यमातून 9 जूनपासून सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू होतेय. तिकीट बुकिंग सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी 72 आसनी विमानांची तिकिटे फुल्ल झाली आहेत. बहुप्रतिक्षित विमानसेवा आता सुरू होत असल्याने सोलापूरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

  • 01 Jun 2025 10:16 AM (IST)

    पुण्यात भावे हायस्कूलजवळील अपघातप्रकरणी सुप्रिया सुळे यांचं ट्विट

    ‘पुण्यात भावे हायस्कूलजवळील अपघातात एमपीएससी करणारे तरुण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे त्यांना कदाचित आजचा पेपर देता येणार नाही. या विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी प्रदान करणे आवश्यक आहे. यासोबतच शासनाने या विद्यार्थ्यांवरील उपचारांचा खर्च करावा जेणेकरून त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करुन निर्णय घ्यावा ही विनंती,’ असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलंय.

Published On - Jun 01,2025 10:12 AM

Follow us
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.