Maharashtra Breaking News LIVE : पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जय गुजरातची घोषणा
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रावर सिनेट सदस्यांची अचानक भेट; दुरवस्थेची चव्हाट्यावर. मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रास युवासेना सिनेट सदस्यांनी अचानक भेट देत दुरवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वच्छतेचा अभाव, कायमस्वरूपी प्रमुखाची अनुपस्थिती आणि प्रगतीचा अभाव अशा गंभीर त्रुटी पाहणीत उघड झाल्या. येत्या दोन दिवसांत धर्मवीर आनंद दिघे यांचे नामफलक न लागल्यास युवासेनेतर्फे स्वतः नामकरण सोहळा करणार, असा इशारा सिनेट सदस्यांनी दिला. ग्रामीण भागातून येणा-या विद्यार्थांच्या अज्ञानाचा फायदा घेवून त्यांना भाडयाने रुम मिळवून देतो म्हणून ब्रोकरेजच्या नावाखाली किंवा अॅडवान्स भाडे घेवून अनेक विद्यार्थ्यांकडून रक्कमा घेवून फसवणूक केल्याचे उघड. कर्वेनगरमधील काही जणांसोबत घडला प्रकार. दत्तात्रय गुलाबराव गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कर्वेनगर परिसरात राहणारे पार्थ नागनाथ जगताप,गौरव गौतम गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल. वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४),३५१(२), ३५२, ३ (५) अन्वये फसवणूक, धमकी देणे व शिवीगाळ करणे अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कांदिवलीमध्ये आंदोलन
लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कांदिवलीमध्ये आंदोलन
लक्ष्मण हाके यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून आंदोलन
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
लक्ष्मण हाके यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी
-
नाशिक: मालेगावात ‘तुकडेबंदी ‘ कायद्याचे उल्लंघन, 8 अधिकारी निलंबित
मालेगावात तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तत्कालीन प्रांताधिकारी उदय किसवे यांच्यासह 8 मुद्रांक अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत, तसेच भुमाफिया जाकीर अब्दुल लतीफ शेख व आरीफ स्टँप वेंडर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
-
वसई-विरारमध्ये दिवसभर पावसाची रिपरिप, नागरिकांची तारांबळ
वसई-विरारमध्ये दिवसभर पावसाची रिपरिप सुरू आहे, तसेच अधून-मधून जोरदार पाऊस पडत आहे. वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावरील नागरिकांची ताराबळ उडत आहे. संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण असल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
-
भाजपकडून राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते – सुनील तटकरे
सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले की, भाजप संधी साधू पक्ष नाही, राष्ट्रवादीला नेहमी सन्मापूर्व वागणूक दिली जाते. स्थानिक पातळीवर निवडणूक 8 वर्षांनी होत आहे त्यामुळे इच्छूकांची संख्या अधिक आहे, मात्र आम्ही युतीला बाधा येणार नाही याची काळजी घेऊ.
-
कांदिवलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. त्यामुळे या गटाच्या कार्यकर्त्यांना कांदिवली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना ठाण्यात नेले आहे.
-
-
उबाठा शिवनेना नेते विनायक राऊत यांची एकनाथ शिंदेंवर टीका
केवळ सत्तेची लाचारी हेच दिसतंय. पुण्यातून जय गुजरातची घोषणा ही लाजिरवाणी असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्र क्षमा करणार नाही, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
-
जर कोणी भाषेमुळे गुंडगिरी करत असेल तर ते सहन करणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की महाराष्ट्रात मराठी भाषेचा अभिमान बाळगण्यात काहीही गैर नाही पण जर कोणी भाषेवरून गुंडगिरी करत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. जर कोणी भाषेच्या आधारावर भांडण करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. घडलेल्या घटनेवर पोलिसांनी कारवाई केली आहे आणि भविष्यातही जर कोणी भाषेवरून वाद निर्माण केला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
-
कृष्णजन्मभूमी-शाही ईदगाह प्रकरण, हायकोर्टाने हिंदू बाजूची याचिका फेटाळली
अलाहाबाद उच्च न्यायालयात कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादावर सुनावणी झाली. न्यायालयाने शाही ईदगाह मशिदीला “वादग्रस्त रचना” म्हणून घोषित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळून लावली.
-
भाजपा नेते प्रवीण दरेकर विरोधकांवर बरसले, म्हणाले…
जेव्हा वरळीत केम छो वरळी असे बोर्ड लागले होते तेव्हा जितेंद्र आव्हाडांना दिसलं नाही का? गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी बोर्ड लावले होते. एकनाथ शिंदे साहेब जय गुजरात म्हणताना जय महाराष्ट्र पण बोलले. गुजराती लोकांचा तो कार्यक्रम होता, असं सांगत प्रवीण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना सुनावलं.
-
पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जय गुजरातची घोषणा
पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी जय गुजरातची घोषणा दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असा नारा दिला.
-
नाशिक जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, कृषीमंत्र्याना घेरण्याचा प्रयत्न
नाशिक जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला. शेतकऱ्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच अनेक शेतकऱ्यांकडून कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांना त्यांनी केलेल्या विधानाची आठवण करुन दिली. त्यावरुन शेतकरी आणि कृषी मंत्र्यांमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, असं विधान काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं.
तसेच मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केलं. तसेच सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने काम करत आहे, असं आश्वानसही कृषीमंत्र्यांनी दिलं.
-
दारू पिताना वाद, मित्राकडून हत्या
उल्हासनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मित्रानेच मित्राची हत्या केल्याच प्रकार उघडकीस आला आहे. या 2 मित्रांमध्ये दारु पिताना वाद झाला. यावरुन शकील शेख यांनी मित्राला संपवलं. त्यानंतर आता आरोपी शकीलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
-
मराठी लोक एकत्र येत आहेत ही बाब सकारात्मक आहे – आदिती तटकरे
मराठी लोक एकत्र येत आहेत हे सकारात्मक आहे हे चांगले आहे. देशभर मराठी माणसाचं नाव कस लौकिक होईल यासाठी सगळ्या मराठी माणसांनी काम केलं पाहिजे असे महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
-
सांगलीत पिता-पुत्राने किटकप्राशन करुन जीवन संपवलं
सांगलीच्या मिरज तालुक्यातील सोनी येथे पिता-पुत्रांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कीटकनाशक पिऊन पिता-पुत्रांनी आपलं आयुष्य संपवलं आहे.
-
बोरिवलीतील ओबेरॉय स्काय सिटीजवळील एका गोदामाचे आगीत नुकसान
गोदामात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ती विझवली आहे. या घटनेत कोणती ही जीवितहानी नाही.
-
अजित पवार यांचं शिक्षण कमी, म्हणून सामाजिक न्याय कळत नाही – हाके
अजित पवार यांचं शिक्षण कमी असल्याने त्यांना सोशल जस्टीस आणि नीतीमूल्य कळत नाहीत असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. सारथीला किती निधी दिलाय , महाज्योतीला साधे कार्यालय नाही असाही आरोप हाके यांनी केला आहे.
-
हिंदी जीआर होळी प्रकरणात दीपक पवार यांच्यासह अनेकांवर गुन्हे
हिंदी जीआरची होळी प्रकरणात दीपक पवार यांच्यासह अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या समोर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती जीआरची होळी झाली होती.
-
ठाकरे गटाची जोरदार बॅनरबाजी
मुंबईच्या मातोश्री बाहेर शिवसेना ठाकरे गटाची जोरदार बॅनरबाजी दिसून आली. शिवसेनेचे स्थानिक आमदार वरून सरदेसाई यांनी लावले बॅनरवर आवाज मराठीचाच असा आशय आहे. मातोश्रीच्या संपूर्ण परिसरामध्ये पाच जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधू कडून मराठी बांधवांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
-
2,289 महिला सरकारी कर्मचाऱ्यांचे लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद
महाराष्ट्र सरकारने 2,289 अपात्र महिला सरकारी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ बंद केले आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,289 महिला सरकारी कर्मचाऱ्यांचे लाभ बंद केले असून, त्या अपात्र असल्याचे आढळले आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गुरूवारी राज्य विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
-
सागर मुंडे याला पोलीस कोठडी
अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एका तरुणाकडे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस आढळले. वारजे भागात पोलिसांच्या तपासणीत तरुणाला अटक करण्यात आली. वारजे माळवाडी पोलिसांनी २१ वर्षीय सागर मुंडे याला अटक केली. न्यायालयाने सागर मुंडे याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
-
रायगड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस
रायगड जिल्ह्यात दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्हयातील धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून 28 धरणांपैकी पैकी 18 धरण 100 टक्के पूर्ण भरली आहेत. मागील दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात परिपूर्ण पाऊस झाल्याने धरणात कमालीची पाणी वाढ झालेली दिसून येते. उर्वरित 10 धरणांमध्ये 60 ते 75 टक्के पाणी साठा जमा असल्याची माहिती रायगड लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे
-
देशाचे परराष्ट्रमंत्री काय करत आहेत
पाकिस्तानची टीम आशिया कपसाठी भारतात येण्याची शक्यता आहे. त्यावर भारताची डिप्लोप्सी काय करत आहे, देशाचे परराष्ट्रमंत्री काय करत आहेत असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
-
शिवाजी महाराज आणि बाजीरावांमुळे नैराश्य पळून जाते
बाजीरावांच्या पराक्रमाचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पण माझ्या जीवनात जेव्हा केव्हा नैराश्याची दस्तक येते तेव्हा मला नेहमी बाल शिवाजी आणि श्रीमंत बाजीरावांचा विचार येतो आणि निराशा कोसो दूर जाते. एवढ्या विपरीत स्थितीत ते केले तर आता सर्वत्र अनुकूलताच अनुकूलता आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडले.
-
शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत तयार करण्याची जबाबदारी 140 कोटी भारतीयांची – अमित शाह
शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत तयार करण्याची जबाबदारी 140 कोटी भारतीयांची आहे. स्वराज्यासाठी संघर्ष करण्याची गरज होती तेव्हा संघर्ष केला. स्वराज्य टिकवण्यासाठी गरज पडली तर आम्ही संघर्ष करू – अमित शाह पुण्यात बोलत होते.
-
पुण्यातील हांडेवाडी उरुळी देवाची येथे शाळेचा साठा असणाऱ्या शेडला लागली आग
पुण्यातील हांडेवाडी उरुळी देवाची येथे शाळेचा साठा असणाऱ्या शेडला आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
जितेंद्र आव्हाड आणि राऊत यांच्या जिभेला हाड नाही – संतप्त गिरीश महाजनांची टीका
जितेंद्र आव्हाड आणि राऊत यांच्याबद्दल न बोललेलं बरं, ते काहीही बोलतात त्यांच्या जिभेला हाड नाही अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
त्यांना काहीतरी वेगळं बोलून टीआरपी हवा असतो. हा त्यांचा नेहमीचा उद्योग आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.
-
बाजीराव पेशवा यांचे स्मारक बनवण्याची योग्य जागा ही एनडीएच – अमित शाह
बाजीरावांचे पुतळे देशभरात आहे. माझ्या गावात आहे. पण स्मारक बनवण्याची योग्य जागा ही एनडीएच आहे – अमित शाह
-
पुण्यातील भूमी स्वराज्याच्या संस्कारांचे उगमस्थान – अमित शाह
पुण्यातील भूमी स्वराज्याच्या संस्कारांचे उगमस्थान आहे. इंग्रजांनी इतिहासातल्या अनेक नायकांवर अन्याय केला – अमित शाह
-
आम्ही ट्विटरवर, इन्स्टाग्रामवर टीका करत नाही, तर प्रत्यक्ष…. शिंदे गटाचा मनसे-ठाकरे गटाला टोला
कल्याण-शीळ रोडवरील पलावा पुलाचे अखेर लोकार्पण झाल्याने कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या पुलाच्या कामासाठी यापूर्वी मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केले होते, तसेच स्थानिक आमदार आणि सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली होती. या टीकेला आज पुलाच्या उद्घाटनावेळी आमदार राजेश मोरे यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिले. “आम्ही ट्विटरवर, इन्स्टाग्रामवर टीका करत नाही… प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करतो,” असे म्हणत त्यांनी नाव न घेता मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांना टोला लगावला.
-
मराठी भाषेसाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र या, मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षांचे आवाहन
मीरा-भाईंदरमध्ये काल परप्रांतीय समाजाने काढलेल्या विशाल मोर्च्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कानखाली मारण्याच्या घटनेवरून संपूर्ण समाज रस्त्यावर उतरल्याने ही परिस्थिती उद्भवली. या पार्श्वभूमीवर, आज संध्याकाळी मराठी बांधव आणि शहरातील सर्व राजकीय पक्ष पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन या प्रकरणी कारवाईची मागणी करणार आहेत. “मराठी भाषा, संस्कृती आणि स्वाभिमानासाठी आता राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे,” असे मत मराठी एकीकरण समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी व्यक्त केले.
-
उद्या या ठिकाणी मनुष्यरुपी सागर येणार… किशोरी पेडणेकरांनी केली डोमची पाहणी
वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे होणाऱ्या विजयी मेळाव्याची तयारी सुरू असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज पाहणी केली. समोर समुद्र आहे आणि वरळी डोममध्ये मानवी रूपात एक समुद्र येणार आहे. २०१७ साली बाळासाहेबांचे विचार घेऊन याच ठिकाणाहून पक्षाची संहिता तयार करण्यात आली होती आणि उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली होती. जे आमच्या पाठीत खंजीर मारून गेले, ते देखील या ठिकाणी नेते झाले,” असे म्हणत किशोरी पेडणेकरांनी विरोधकांना टोला लगावला. कोविड काळातही याच डोममध्ये अनेकांचे प्राण वाचवण्यात आले होते, त्यामुळे हा डोम ऐतिहासिक असून त्याने अनेक गोष्टी पाहिल्या आहेत, असे पेडणेकर यांनी नमूद केले. उद्या या ठिकाणी मनुष्यरुपी सागर येणार असल्याने, सर्व व्यवस्था व्यवस्थित आहे का, याची पाहणी करण्यासाठी आल्याचे किशोरी पेडणेकरांनी सांगितले.
-
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वाखरीत मुक्कामी, वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिराची कुरोली येथील मुक्कामानंतर आज वाखरी येथे मुक्कामी आहे. वारीतील वाखरी हे पालखी सोहळ्याचे शेवटचे मुक्कामाचे ठिकाण असल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. उद्या, म्हणजेच ५ जुलै २०२५ रोजी, पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार असल्यामुळे वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. ‘ज्ञानोबा तुकोबा’च्या जयघोषाने वाखरी परिसर दुमदुमून गेला आहे. अनेक वारकरी फुगड्या आणि इतर पारंपरिक खेळ खेळून या आनंदाच्या वातावरणात सहभागी होत आनंदोत्सव साजरा करत आहेत.
-
कोंढव्यातील अत्याचार प्रकरणानंतर नीलम गोऱ्हेंची माहिती…
आरोपीने पीडितेला नंतर धमकी दिली होती… आरोपीनं मी पुन्हा येईल असं टाईप देखील केलं होतं… कोंढव्यातील अत्याचार प्रकरणानंतर नीलम गोऱ्हेंची माहिती..
-
बेशिस्त वाहनचालकांना वटणीवर आणण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्त क्षेत्रात टोविंगअलर्ट मोड मध्ये सुरू
टोविंग व्हॅनच्या विरोधात काही दिवसांपूर्वी शहरात राजकीय आणि सामाजिक पक्षांनी आंदोलकांनी चक्काजाम केला होता… शहरात सतत होणारी वाहतूक कोंडी टाळून वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी ठाण्यात वाहतूक पोलिसांनी वागळे इस्टेट परिसरात देखील टोविंग सुरू केले आहे..
-
ठाण्यात दोन वर्षात उभ्या राहिल्या 398 अनधिकृत इमारती
दिव्यात सर्वाधिक 223 ,वर्तक नगर मध्ये 60, तर मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात 39 अनधिकृत इमारतींचा समावेश… अनधिकृत इमारती अजूनही उभ्या राहत आहेत याची चौकशी महानगरपालिका आयुक्त करणार का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे… आतापर्यंत 124 बेकायदा इमारतीवर पालिकेचा हातोडा…
-
अमित शाहंच्या दौऱ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल
अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त पुणे शहरातील काही भागात वाहतुकी तात्पुरता बदल करण्यात आला आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मंतरवाडी फाटा खडीमशीन चौक ते कात्रज चौक यादरम्यान सर्व मालवाहतूक करणाऱ्या जड अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. बंडगार्डन वाहतूक विभागातील मोर ओढा सर्किट हाऊस चौक ते आयबी चौक दरम्यानचे वाहतूक एकेरी. आवश्यकतेनुसार सूत्रपा करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलीय.
-
अमरावतीच्या मेळघाटमध्ये अजूनही भीषण पाणी टंचाई
भर पावसाळ्यातही मेळघाट मधील अनेक गावात अजूनही भीषण पाणीटंचाई. पुरेसा पाऊस न झाल्याने महिलांची पाण्यासाठी भटकंती. भल्या पहाटे बिहाली गावातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. मेळघाट मधील अनेक गावात अजूनही टँकरने सुरू आहे पाणीपुरवठा. शासनाच्या पाणीपुरवठा योजना ठरल्या कुचकामी.
-
म्हात्रे दांम्पत्यासाठी ठाकरे-शिंदे गटात रस्सीखेच
डोंबिवलीत माजी नगरसेवकांच्या प्रवेशासाठी ठाकरे-शिंदे गटात रस्सीखेच. म्हात्रे दाम्पत्य कोणत्या गटात जाणार याकडे लक्ष. भाजपला रामराम ठोकल्यानंतर म्हात्रे दाम्पत्याला आपल्या पक्षात सामावून घेण्यासाठी ठाकरे व शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांनी भेटीगाठींचा धडाका लावत त्यांना पक्षप्रवेशासाठी आमंत्रणे दिली.
-
अमित शहा आज पुण्यात, NDA येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याच अनावरण
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात आहेत. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासह अन्य कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. शाह यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेही या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच्या अनावरणासह प्रशिक्षणार्थी कॅडेट आणि सैन्यातील अधिकाऱ्यांबरोबर शाहा संवाद साधणार आहेत.
Published On - Jul 04,2025 8:42 AM
