Maharashtra Breaking News LIVE 30 September 2024 : गोंदियात हजारो आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 30 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच इंडिया आघाडी व सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. तसेच पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुजरातमधील चक्रीय स्थितीमुळे राज्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
अमित शाह यांच्या उपस्थितीत उद्या मुंबईत भाजपची बैठक होणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्या मुंबईत भाजपची बैठक होणार आहे. शक्ती कार्यकर्ता या टॅगलाइनखाली भाजपने सभेचे आयोजन केले आहे. अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबईतील भाजपचे प्रमुख नेते आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
-
स्वयंघोषित इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला
स्वयंघोषित इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला आहे. इस्लामाबाद, कराची आणि लाहोरमध्ये सार्वजनिक भाषण देतील आणि शुक्रवारच्या नमाजाचे नेतृत्व व संबोधितही करतील. पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रिब्यूनने धार्मिक व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
-
-
एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला
एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी आज दिल्लीत एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्याकडून हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
-
अमरावती जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. अचलपूर चिखलदंजन जिल्ह्यातील सुर्जी गावात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे नागरिकांमध्ये अचानक घबराट पसरली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी नोंदवण्यात आली आहे.
-
शिवसेना उबाठाने इस्लमाबादमध्ये दसरा मेळावा घ्यावा- शीतल म्हात्रेंची टीका
लोकसभा निवडणुकीत उबाठाच्या प्रचार रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकवले आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींचा सहभाग होता, त्यामुळे उबाठा गटाने पाकिस्तानातील इस्लमाबादमध्ये यंदाचा दसरा मेळावा घ्यावा, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आज केली. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
-
-
महायुतीचे काम करणार- आमदार कथोरे
मुरबाड विधानसभेवर शिंदे गटाने आपला दावा केला आहे. त्यावर आमदार किसान कथोरे यांनी सांगितले की, महायुतीकडून शिंदे गटाला तिकीट देण्यात आले तर मी कोणती बंडखोरी न करता महायुतीचे काम करेन
-
नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा वावर
नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्याचा मानवी वस्तीमध्ये वावर दिवसेंदिवस आढळून येत आहे. नाशिक शहरात लगत असलेल्या भागांमध्ये बिबट्याची दहशत वाढत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरत आहे. दोन दिवसांपासून नाशिक रोड, पाथर्डी फाटा परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला तर काल रात्रीच्या सुमारास मखमलाबाद शिवारात बिबट्याचा वावर आढळून आला आहे.
-
अमरावती जिल्ह्यात भूंकपाचे धक्के
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चिखलदरा आणि अंजनगाव सुर्जी परीसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपाचे धक्के बसल्याने नागरीकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 4.2 एवढी भूकंपाची तीव्रता होती.
-
आदिवासी समाज आक्रमक
धनगर समाजाच्या एस.टी. संवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु आहे. यामुळे आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. गोंदियात हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले आहे.
-
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये- प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की ओबीसीचा आरक्षण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे. त्यामध्ये इतर कोणाचाही समावेश होता कामा नये. सरकारला मराठा समाजाचा आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी वेगळ आरक्षण द्यावे, मात्र ओबीसीतून आरक्षण देऊ नये
-
भाजपाचे काम करणाऱ्या नगराध्यक्षासह नऊ नगरसेवकाची काँग्रेसमधून हकालपट्टी
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी केली पक्षातून हकालपट्टी. खासदार अशोक चव्हाण तीन तालुक्याचे नेते काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम कदम यांची टीका. अशोक चव्हाण यांचा एकही माणूस काँग्रेसमध्ये ठेवणार नाही, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर कदम कदम यांचा इशारा
-
नरहरी झिरवळ यांच्या आंदोलनानंतर ओबीसी आणि धनगर नेते घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे करणार नरहरी झिरवळ यांची तक्रार, झिरवळ समाज भीवना भडकवत असल्याचा धनगर नेत्यांची आरोप , एसटी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता वेगळं आरक्षण मागत असल्याचाही दावा
-
सुप्रिया सुळे यांचा नाव न घेता अजित पवारांवर टीका
पुणे जिल्हयाने आता पर्यंत अनेक पालकमंत्री पाहिले पण अस सुडाचं राजकारण कधी पाहिलं नाही. दीड दोन महिन्याचा विषय आहे आपलंच सरकार येणार आहे. जो कोणी पालकमंत्री होईल तो विरोधी पक्षाचा पण मान सन्मान ठेवेल
-
धारावीतील मशिदीचं अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात
धारावीतील मशिदीचं अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात झाली आहे. मेहबूब सुबानिया मशीद ट्रस्टकडून बांधकाम काडण्यास सुरुवात झाली आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी ट्रस्टने हायकोर्टात धाव घेतली होती. अनधिकृत बांधकाम स्वत: काढण्याची हमी ट्रस्टनं दिली होती.
-
नंदुरबारच्या धडगाव बँकेमध्ये महिलांची मोठी गर्दी
नंदुरबारच्या धडगाव बँकेमध्ये महिलांची मोठी गर्दी झाली आहे. लाडकी बहीण योजनेते पैसे काढायला तसंच ई-केवायसी करण्यासाठी गर्दी झाली आहे. ई-केवायसी नसल्यामुळे महिलांना योजनेचे पैसे मिळाले नाहीत.
-
पुण्यात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता
पुण्यात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात पवार गटाच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. रमेश थोरात यांच्याकडून गाठीभेठी आणि बैठकांना सुरुवात झाली आहे.
-
मणिपूरमधील नागरिकांनी शरद पवारांची भेट घेतली
मणिपूरमधील नागरिकांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवारांनी केंद्राशी बोलावं अशी मागणी त्यांनी केली आहे. शरद पवारांनी पंतप्रधान मोदींशी बोलणार असल्याचं आश्वासन दिल्याची माहिती आहे. तीन जणांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेतली.
-
मुंबई-नाशिक महामार्गावर आदिवासी संघटनांकडून रास्ता रोको
नाशिक- धनगरांना आदिवासींमधून आरक्षण द्यायला आदिवासी संघटनांनी विरोध केला आहे. मुंबई नाशिक महामार्गावर आदिवासी संघटनांकडून रास्ता रोको करण्यात येत आहे. आंदोलकांनी रस्त्यावर उतरत मुंबई-नाशिक महामार्ग रोखला आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे.
-
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर अथवा मृत्यूनंतरच्या निधीत वाढ करण्यात आली आहे.
-
महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात महत्वाची बैठक सुरू
महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक सुरू. मविआच्या सलग दोन दिवस जागावाटपसंदर्भात बैठका होणार आहेत. गेल्या आठवड्यात मविआच्या नेत्यांनी 288 जागांचा आढावा घेतला होता.
-
नरहरी झिरवळांसह आदिवासी समाजातील आमदारांचं आंदोलन सुरू
नरहरी झिरवळांसह आदिवासी समाजातील आमदारांचं मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन सुरू आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला जात आहे. पेसा भरतीसंदर्भातील प्रश्न सोडवण्याचीही मागणी करण्यात येत आहे.
हिरामण खोसकर, किरण लहामटे हे देखील आंदोलनात होणार सहभागी.
-
नवी दिल्ली – झारखंडमधे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमधे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे एकमेव आमदार कमलेश सिंह भाजपमधे प्रवेश करणार आहेत. हुसेनाबाद मतदार संघाचे आमदार कमेलश सिंह हे येत्या 3 ऑक्टोबरला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. सिंह हे पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होते
-
नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे, आणि मी दर्शन घेण्यासाठी जाणार – मनोज जरांगे पाटील
नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे, आणि मी दर्शन घेण्यासाठी जाणार आहे, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
मराठा समाजाने प्रचंड संख्येने नारायण गडावर यायचे आहे, सर्वांनी एकजूट दाखवायची. अशी एकजूट आणि शक्ती दाखवा, अशी की पुन्हा अशी एकजूट असणार नाही, असे आवाहनही त्यांनी केलं.
-
Maharashtra News: नेपाळमध्ये आलेल्या पुराचा फटका बिहार राज्याला
नेपाळमध्ये आलेल्या पुराचा फटका बिहार राज्याला… बिहारमधील काही जिल्ह्यांना पुराचा फटका… 13 जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ… मुजफ्फरपूर कटरा जवळ असलेल्या पॉवर प्लांटमध्ये पाणी घुसल्याची माहिती… प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात… नागरिकांनी सतर्क राहण्याच प्रशासनाचं आवाहन…
-
अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा 8 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.
-
Maharashtra News: राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना लाडकी बहीण योजना सुरु – संजय राऊत
राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना लाडकी बहीण योजना सुरु… लाडकी बहीण योजना, मतं विकत घेण्याची योजना… लाडकी बहीण ही मिंधे गटाच्या मतांसाठी केलेली योजना… सरकारकडे पैसे नसताना योजना, केंद्राची जबाबदारी आहे की नाही? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
-
Maharashtra News: अजित पवारांचे दोन मोठे नेते शरद पवारांना भेटण्यासाठी
अजित पवारांचे दोन मोठे नेते शरद पवारांना भेटण्यासाठी… माढाचे आमदार बबन शिंदे… बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक… पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे… विलास लांडे यांनी मागे भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती… विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर
-
पोटेगाव जंगलात रानटी हत्तींचा कळप
गडचिरोली रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या जवळच्या पोटेगाव जंगलात आढळला. पोटेगाव गुरुवाडा मार्गे वाकडी मुर्जझ परिसरात काल रात्री हत्तींनी प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रानटी हत्तींच्या कडपामध्ये 25 ते 27 हत्तींच्या समावेश आहे. रानटी हत्तींना नियंत्रण आणण्यास वन विभाग दीड वर्षापासून अपयशी ठरत आहे.
-
रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला
भोसरीचे ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. भोसरी विधानसभेवर ठाकरे गटाने दावा केला आहे. भोसरीत सहकार्य करावे रवी लांडगे आज शरद पवारांना विनंती करणार आहेत. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरु आहे.
-
पश्चिम रेल्वे उशीराने धावतेय
सहाव्या मार्गिकेचे काम सुरू झाल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्या उशिराने धावत आहे. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या सर्व लोकल उशिराने धावत आहेत.कांदिवली मालाड गोरेगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. लोकल उशिराने धावत असल्याने प्रवासी नाराज झाले आहेत.
-
पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला
नाशिकच्या हरिहर गडवर केलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. हिमऑरडील या ट्रेकिंग संस्थेतर्फे हरिहर गड परिसरातील प्रसिद्ध शितकडा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गेले होते. याच दरम्यान अचानक मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. वेळीच योग्य खबरदारी घेतल्याने मोठी हानी टळली. ट्रेक लीडरने वेळीच खबरदारी घेत सर्वांना जमिनीवर झोपण्यास सांगितले. कुठल्याही प्रकारची हालचाल न करण्याच्या सूचना दिल्या. सुमारे 20 ते 25 मिनिटे मधमाशा पर्यटकांच्या डोक्यावर अंगाभोवती घिरट्या घालत होत्या. काही पर्यटक किरकोळ जखमी झाले. मात्र योग्य खबरदारी घेतल्याने मोठी हानी टळली.
-
Maharashtra News Live : येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस सक्रीय
पुणे : येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाची उघडीप असणार आहे. पावसासाठी पोषक स्थिती नसल्याने पावसाची शक्यता नाही. मात्र गुजरातमधील चक्रीय स्थितीमुळ राज्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र परतीच्या प्रवासाला अजून पोषक वातावरण नाही. पुणे आणि मुंबईतून १० ते १७ ऑक्टोबर दरम्यान मोसमी वारे परततील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
-
Maharashtra News Live : कल्याण पश्चिमेत भाजपला झटका, भाजप जिल्हा सचिव करणार शिवसेनेत प्रवेश
कल्याण पश्चिमेत राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप जिल्हा सचिव रंदवे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या घटनेमुळे कल्याण पश्चिमेत शिवसेना-भाजप संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिम मतदारसंघात बंडखोरी करून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता तसा प्रयत्न भाजपने करू नये म्हणून शिवसेनेने दिला भाजपला पहिला झटका दिला आहे.
-
Maharashtra News Live : इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटाच्या चौघांचे अर्ज दाखल
इंदापूर विधानसभेसाठी शरदचंद्र पवार पक्षाकडून चार इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे, अमोल भिसे आणि अशोक घोगरे अशी या चौघांची नावे आहेत. प्रविण माने यांनी अजित पवार गटात लोकसभेला प्रवेश केला होता. मात्र काही दिवसांपूर्वी ते पुन्हा शरद पवार गटात आले. काल इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी भेट पक्षातील कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची मागणी केली होती. तर हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणारं, याची चर्चा रंगली आहे. सध्या तरी ४ जणांनी आपला अर्ज भरला आहे
-
Maharashtra News Live : शरद पवार गटाचा पुण्यात मीटअप मेळावा
पुणे : येत्या १ ऑक्टोबरला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा मीट अप मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सोशल मीडिया सेलचा मेळावा घेतला जाणार आहे. यावेळी स्वतः शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शरद पवारांसोबतच जयंत पाटील, सुप्रिया सुळेही यावेळी उपस्थित असणार आहेत.
Published On - Sep 30,2024 8:22 AM
