Maharashtra Breaking News LIVE : दिल्ली: पंतप्रधानांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक
Maharashtra Live Breaking : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून मेळावे घेतली जात आहेत. अभिनेते धर्मेंद्र यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष कामाला लागली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालनाच्या दौऱ्यावर असून निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ता मेळावा होणार आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह शेकडो जण आज शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात मोठे खुलासे होताना दिसत आहेत. 13 जणांना ताब्यात पोलिसांनी घेतले असून चाैकशी सुरू आहे. दिल्लीच्या स्फोटाचे कनेक्शन थेट जम्मू काश्मीरच्या पुलवामापर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात आज काही मोठे खुलासे होऊ शकतात. आज बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुढील उपचार त्यांच्यावर घरी सुरू राहणार आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी विशेष खबरदारी, शासकीय विश्रामगृहाची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी
मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी विशेष खबरदारी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहाची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी नाशिक पोलीस दलाच्या बॉम्बस्कॉड पथकाकडून मेटल डिटेक्टर , आणि श्वानांच्या मदतीने तपासणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील आठ ते दहा मंत्री उद्या नाशिक दौऱ्यावर
नाशिकमध्ये उद्या विविध विकास कामांचे उद्घाटन
-
मुंबई महापालिकेसाठी आठवले गटाकडून 14 जागांची मागणी
आम्ही मुंबई महापालिकाच्या निवडणुकीसाठी 14 जागा मागणार
रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य
काँग्रेस जर स्वबळावर लढणार असले तर त्याचा आम्हाला फायदा होणार – आठवले
युतीमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय होणार – आठवले
आम्ही महायुतीमध्येच निवडणुकी लढणार – आठवले
-
-
माजी आमदार राजू पाटील यांचे बंधू विनोद पाटील यांच्या घरी ईडीचं पथक दाखल
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का
माजी आमदार राजू पाटील याचे बंधू विनोद पाटील यांच्या घरी ED चे पथक दाखल
गेल्या 15 तासांपासून भाऊ विनोद पाटील आणि कुटुंबीयांची चौकशी सुरू
मुंबईतील लोढा फसवणूक प्रकरणात विनोद पाटील आरोपी असून या प्रकरणाची ED देखील संयुक्त चौकशी करत आहे
ईडी अधिकारी घरात दाखल, महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची शक्यता
-
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत युवा स्वाभिमान पक्षाची बैठक
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न
‘आम्ही महायुतीमध्ये आहोत, आणि पुढेही राहू युतीचा प्रस्ताव आम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे दिला आहे’
‘युती झाल्यास एकत्र लढू आणि युती न झाल्यास मैत्रीपूर्ण आम्ही निवडणूक लढू’
युवा स्वाभिमान पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत भूमिका
-
दिल्ली बॉम्बस्फोटात 12 जणांचा मृत्यू, 8 मृतदेहांची ओळख पटली
दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयात आलेल्या 12 मृतदेहांपैकी आठ मृतदेहांची ओळख पटवून देण्यात आली आहे आणि ते त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत.
1. 35 वर्षीय अमर कटारिया
2. 34 वर्षीय अशोक कुमार
3. 35 वर्षीय मोहसीन मलिक
4. 35 वर्षीय दिनेश कुमार मिश्रा
5. 52 वर्षीय लोकेश कुमार अग्रवाल
6. 23 वर्षीय पंकज सैनी
7. 19 वर्षीय मोहम्मद नउमन
8. 25 वर्षीय मोहम्मद जुमैन .
-
-
दिल्ली: पंतप्रधानांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक
दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.
-
मुंबईतील कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये भीषण आग
मुंबईतील कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे. ग्राउंड फ्लोअर 2 सनलाईट हॉटेलमध्ये दुपारी 4 वाजता आग लागली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
-
लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरेंनी दिली अशी माहिती
लाडकी बहीण योजनांमध्ये वेबसाईट मध्ये काही बदल होत आहे त्यामुळे वेळ लागत आहे, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. ज्या महिलेचा पती आणि वडील नाही अशांसाठी लाडकी बहीण योजना या वेबसाईटमध्ये बदल करण्यात येणार आहेत. लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांना अनुदान मिळणार, असंही त्यांनी पुढे सांगितलं. मात्र केवायसीसाठी जो वेळ लागतोय तो लवकरच पूर्ण होईल. कोणतेही महिला लाभार्थी पासून वंचित राहणार नाही, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
-
जालन्यात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने जालन्यात आज उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. थोड्याच वेळात एकनाथ शिंदे सभास्थळी दाखल होणार असून त्यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित राहणार आहे. याच मेळाव्यात ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
-
किरकोळ महागाई दशकाच्या नीचांकी पातळीवर
किरकोळ महागाई गेल्या दशकातील सर्वात कमी पातळीवर आली आहे. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई 0.25% होती. जीएसटी दरांमध्ये कपात आणि अन्नधान्याच्या किमतींमध्ये सतत घट झाल्यामुळे हे मुख्यत्वे झाले आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 0.54% होती.
-
भाजप नेत्या चित्रा वाघ या चित्र काढण्यापुरत्या मर्यादित – अरविंद वाळेकर
भाजप नेत्या चित्रा वाघ हे चित्र काढण्यापुरता मर्यादित आहेत,’अंबरनाथचा विकास त्यांना काय माहित?’ अशी कडवट टीका शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर केली आहे. चित्रा वाघ यांना अंबरनाथच्या विकास कामाच्या पटनाट्य सादरीकरणावर वाळेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
-
सोलापूर जिल्ह्यात शिंदे सेना आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवणार
सोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणी राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे आणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नगरपरिषद निवडणुकीसाठी झाली युती झाल्याने महायुती बिघाडी झाली आहे. माढ्याचे खासदार धैर्यशिल मोहिते पाटील यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी १० जागा लढवण्याच्या निर्णयावर एकमत झाले आहे.
-
बीड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्री पंकजा मुंडे यांची बैठक सुरू
बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड शहरात आज बैठक घेतली आहे. यामध्ये गेवराई, धारूर, बीड नगरपालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. लवकरच उमेदवार घोषीत केले जाणार आहेत. बीडमध्ये युती होते की भाजपा स्वबळावर निवडणूक लढवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
दिल्लीतील स्फोट बाहेरील की आतील लोकांनी केला – सुजात आंबेडकर
दिल्लीत स्फोट करणारे भारतच्या बाहेरचे होते की भारताच्या आतले होते.स्फोटाबद्दल केंद्रीय यंत्रणा खुलासा करत नाहीएत.कारण या भारत देशामध्ये सुद्धा एक दहशतवादी संघटना आहे.तिचे नावं आहे आरएसएस असा आरोप वंचितचे सुजात आंबेडकर यांनी बुलढाणा येथे केला आहे.
-
फरीदाबादमध्ये अटक झालेल्या डॉ शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन समोर
दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. फरीदाबादमध्ये अटक झालेल्या डॉ शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय. शाहीनचं लग्न झालेल्या तरुणाचं नाव जफर हयात आहे.
-
बीडमध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या दीर्घायुष्यासाठी विधीवत पूजा करून दुग्धाभिषेक
केज तालुक्यातील समर्थकांकडून आंबळाचा बरड येथे आमदार धनंजय मुंडे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तसेच विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होत असल्याने मुंडेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
-
Ncp आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायलायत सुनावणी पार
Ncp आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायलायत सुनावणी पार पडली आहे. आता पुढील सुनावणी ही नववर्षात 21 जानेवारला साडे 11 वाजता सुनावणी होणार आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी ठेवण्याची मागणी होती. युक्तीवादाला मला 2 तास लागतील, असं कपिल सिब्बल म्हणाले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दिल्ली स्फोट प्रकरणातील जखमींची विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी दिल्ली स्फोट प्रकरणातील जखमींची विचारपूस केली आहे. मोदींनी एलएनजीपी रुग्णालयात जाऊन रुग्णांची चौकशी केली. मोदींनी यावेळेस रुग्णांसह संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
-
अमरावती: बडनेरा येथे स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला
अमरावतीतील बडनेरा येथे लग्नाच्या स्वागत समारोह कार्यक्रमात स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. मित्र राघव बक्षी यानेच जुन्या वादातून नवरदेव मित्र सुजलराम समुद्रेवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात नवरदेवाच्या कमरेला आणि मांडीला दुखापत झाली आहे.
-
शिरूर: बिबट्याने घेतला दहा शेळ्या-मेंढ्यांचा बळी
शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा धुमाकूळ पहायला मिळत आहे. वाघाळे गावात बिबट्याने गुरांच्या गोठ्यावर हल्ला करत तब्बल दहा शेळ्या-मेंढ्यांचा बळी घेतला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालं असून परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे.
-
बीड: धुळे-सोलापूर महामार्गावर तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पलटी
बीड तालुक्यातील मंझरी फाटा येथुन जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावर तांदूळ घेऊन छत्रपती संभाजीनगर कडे जाणारा 16 टायर ट्रक रस्त्यावरच पलटी झाल्याने एका बाजूची वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनास्थळी बीड पोलीस दाखल झाले असून ट्रक हटवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे.
-
परभणीत एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी सुरक्षेची जोरदार तयारी
दिल्लीच्या बॉम्बस्फोट घटनेनंतर परभणीत एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जोरदार सुरक्षा तयारी करण्यात आली आहे. सभेसाठी येणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून बारकाईने पूर्ण परिसराचे निरीक्षण केले जात आहे. डॉग स्कॉटच्या माध्यमातून बारकाईने परिसराची तपासणी केली जात आहे. -
कोल्हापुरात करणी करणाऱ्या तांत्रिकाचे व्हिडीओ व्हायरल
कोल्हापुरातून करणी करणाऱ्या तांत्रिकाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कोल्हापुरातील टिंबर मार्केटमधील हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर येत आहे. अंनिसकडून अशा भोंदूंवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-
जामिनावर सुटलेल्यांना भाजपात प्रवेश; सुळेंचं थेट फडणवीसांना पत्र
सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट पत्र लिहिलं आहे. “जामिनावर सुटलेल्यांना भाजपात प्रवेश कसा दिला जातोय. ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून चिंता वाढली आहे.” असं म्हणत त्यांनी तातडीने करावाई करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
-
जागा वाटपाचा फॉर्म्युला एक-दिवसांत देऊ : रवींद्र चव्हाण
जागा वाटपाचा फॉर्म्युला एक-दिवसांत देऊ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांनी दिली आहे. तसेच नांदेडमध्ये काँग्रेस आणि बहुजन आघाडी एकत्र आल्याचं दिसून आलं आहे. सन्मानावर आधारित युतीची घोषणाही करण्यात आली.
-
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परची स्कूल बसला धडक
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परची स्कूल बसला धडक बसल्याची घटना घडली आहे. नांदेडच्या मुदखेड शहराजवळ ही घटना घडली आहे. पण अपघातात विद्यार्थी सुरक्षित आहेत. युनिव्हर्सल पब्लिक स्कूल, ज्यूनिअर कॉलेजचे 40 विद्यार्थी बचावले आहेत.
-
बीड नगरपरिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू, शिंदे गटाची स्वबळावर लढण्याची तयारी
बीड नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. महायुतीच्या माध्यमातून लढत झाल्यास मित्र पक्षांना साथ देऊ अथवा नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. बीड नगर परिषदेतील 52 जागेवर तसेच नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाकडून ही तयारी सुरू करण्यात आली आहे.
-
नंदुरबार बाजार समितीत मिरचीची आवक 60 टक्क्यांनी घसरली
नंदुरबार बाजार समितीत अनेक वर्षाचे विक्रम मोडत मिरचीची आवक 60टक्क्यांनी घसरली आहे. दररोज शंभर ते सव्वाशे वाहनातून बारा ते पंधरा हजार क्विंटल मिरचीची आवक येत आहे आधी हंगामात रोज 400 ते 500 वाहनं यायची पण आता अवकाळी पावसामुळे मिरची पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने आवक कमी होत आहे. अवकाळी पावसाच्या सर्वाधिक फटका मिरची पिकाला बसलाआहे. या हंगामात आतापर्यंत २५ हजार मिरचीची आवक आली आहे.
-
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली ठाणे जिल्हा रुग्णालयाची पाहणी
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नव्याने बांधण्यात येत असलेल्या ठाणे जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. 10 मजली रुग्णालय बांधून पूर्ण लवकरच रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या जिल्हा रुग्णालयामध्ये एकूण 900 बेडची व्यवस्था असेल.
-
भंडाऱ्यात भाजपाला धक्का
भंडाऱ्यात डॉ. विजया नंदुरकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून भाजपला धक्का बसला आहे. तिकीट न मिळाल्याने भाजप महिला आघाडी माजी महामंत्र्यांनी राजीनामा दिला. “न्याय मिळाला नाही, म्हणून पक्ष सोडला”, असं म्हणत डॉ. विजया नंदुरकर यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.
-
नांदेडमधील 13 नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र
नांदेडमधील 13 नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले आहेत. नगरपालिका निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये नवीन राजकीय समीकरण जुळलं आहे. सम – समान आणि सन्मानावर आधारित युतीची घोषणा करण्यातथ आली आहे. जागा वाटपाचा फॉर्मुला एक दोन दिवसात देऊ, अशी माहिती काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.
-
ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी नाव न घेता माजी आमदार राजेंद्र राऊतांवर टीका
सोलापूर- बार्शीचे ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी नाव न घेता माजी आमदार राजेंद्र राऊतांवर टीका केली आहे. कोणी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा असल्याने काहीही करायचं लायसन्स मिळत नाही, जनता याचा हिशोब करणार, असं ते म्हणाले. तर दिलीप सोपलांनी बार्शीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही जाहीर केला आहे. निर्मला बारबोले या महाविकास आघाडीतर्फे बार्शीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असल्याचं दिलीप सोपल यांनी जाहीर केलं.
-
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांमध्ये आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा स्वबळाचा नारा?
अमरावती- आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक आहे. युवा स्वाभिमान पक्षाने भाजपला युतीसाठी प्रस्ताव पाठवला होता. मात्र अजूनही प्रस्तावावर भाजपकडून कुठलंच उत्तर मिळालं नाही. त्यामुळे दोन दिवस भाजपकडून युती संदर्भात चर्चेची प्रतीक्षा करणार असल्याचं कळतंय. त्यानंतर युवा स्वाभिमान पार्टी कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तव स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पती -पत्नी एकमेकां विरोधात प्रचार करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
-
भंडारा-गोंदिया नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाची स्वबळावर लढण्याची घोषणा
भंडारा-गोंदिया नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. संजय कुंभलकर यांनी हा दावा केला आहे. “महायुतीत प्रस्ताव नाही, म्हणून स्वबळावर लढणार”, असं ते म्हणाले. भंडारा, पवनीत युती नाही त्यामुळे शिंदे गटाची स्वतंत्र लढाई निश्चित झाली आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी शिंदे गट सज्ज झाला आहे. उमेदवारांची घोषणा 15 नोव्हेंबरला होणार आहे.
-
उत्तर पुणे जिल्ह्यात नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत
उत्तर पुणे जिल्ह्यात नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. दिवसा बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतात काम करताना बिबट्यापासून संरक्षण देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी. मात्र बिबट्याची दहशत केवळ जीवघेणी नव्हे, तर सामाजिक संकटाचीही परिसीमा गाठलीय.
-
रेल्वे महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा
रेल्वे महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा. पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय जिंदाबाद बॉम्ब फुटने वाला है खडूने एका शौचालयवर अज्ञाताने लिहिल्याची माहिती. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. रेल्वे विभागाने या घटनेला दुजोरा दिला आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचा आवाहन केलं आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परभणी दौऱ्यावर
नांदेड विमानतळावरून हेलिकॉप्टरने दुपारी दोन वाजता एकनाथ शिंदे परभणीत दाखल होतील. दुपारी दोन वाजता महात्मा फुले शाळेच्या मैदानावरती शिंदे यांची जाहीर सभा. निवडणुकीच्या तोंडावरती उबाठाचे काही पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करतील. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे काय मार्गदर्शन करतात हे पाहणे महत्त्वाचे. परभणी वरून हेलिकॉप्टरने जालन्याकडे निघतील.
-
आणखी एक बिबट्या जेरबंद
गेल्या दोन महिन्यांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या जेरबंद. निफाड तालुक्यातील देवगाव येथील घटना. शरद कृष्णराव जोशी यांच्या मक्याच्या शेतात लावला होता वन विभागाने पिंजरा. जेरबंद झालेला बिबट्या अंदाजे चार ते पाच वर्षाचा नर जातीचा असल्याची माहिती. या परिसरात आणखीन बिबटे असल्याने पिंजरा लावण्याची मागणी. बिबटे जेरबंद करत परिसर बिबट मुक्त करण्याची नागरिक व शेतकऱ्यांची मागणी.
-
धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त
गैरव्यवहार आणि बँकेला वाचवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत राज्य मंत्रिमंडळानी केली कारवाई. प्रशासकाची केली नेमणूक,आता प्रशासकच्या माध्यमातून चालणार धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेत 29 कोटी रुपयांच्या रोखे घोटाळ्यांचा ही संचालक मंडळावरती आहे ठपका, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ बरखास्त प्रस्तावाला 2007 मध्ये तत्कालीन सहकार मंत्र्यांनी दिली होती स्थगिती.
-
सोलापुरात भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक धक्का दिला
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेपूर्वी सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाच माजी नगरसेकांनी भाजपत प्रवेश केलाय. सोलापूरच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांच्या मुलगा प्रथमेश कोठे यांच्यासह पूर्ण गटाने भाजपमध्ये प्रवेश केला.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिकच्या दौऱ्यावर
फडणवीस यांच्या हस्ते 5657.89 कोटींच्या कामांचं होणार भूमिपूजन. सिंहस्थाशी संबंधित नाशिक शहरातील रस्ते पूल यासह रिंग रोडच्या कामांचं होणार उद्घाटन. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील कामांचे देखील होणार उद्घाटन. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेणार. मुख्यमंत्री उद्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता
-
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 133 पदाच्या भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती
उच्च न्यायालयाने अपील फेटाळून दिला आदेश. पदभरतीवरील स्थिगितीचा शासन आदेश रद्द करावा यासाठी एमआयएसटी कंपनीने केली होती नागपूर खंडपीठात याचिका दाखल. याचिका फेटाळून लावत दिली स्थगिती
-
कल्याण बैल बाजार चौक परिसरातील धक्कादायक घटना
कल्याण बैल बाजार चौकात थरार! मध्यरात्री १ वाजता भरधाव ‘छोटा टेम्पो’ थेट दुकानात घुसला; भीषण धडकेत बाईक आणि हातगाडीचा मोठ नुकसान झाले असून हा टेम्पो अल्पवयीन मुलगा चालवत धडक दिल्याची रहिवाशांची माहिती कल्याण पोलिसाचा तपास सुरू
-
अभिनेते धर्मेंद्र रूग्णालयातून घरी
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आलाय. पुढील उपचार त्यांच्यावर घरी केले जाणार असल्याची माहिती मिळतंय. धर्मेंद्र यांच्या निधनाची काल अफवा उडाली होती.
Published On - Nov 12,2025 8:30 AM
