Maharashatra News Live : मुंबई : किल्ला कोर्ट परिसरात बसचा अपघात
Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

मुंबईतील प्रदूषणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी पाच सदस्यीय स्वतंत्र समिति स्थापन करण्यात आली आहे. बांधकाम प्रकल्पावर कठोर नियंत्रण ठेवा अशा सूचना हायकोर्टाने दिल्या आहेत. अंबरनाथ नगरपालिका निवडणूकित प्रचार शिगेला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज अंबरनाथ बदलापूरमध्ये तीन सभा होतील. तर दुसरीकडे भाजपच्या वतीने अंबरनाथ शहरात गोपीचंद पडळकर आणि रक्षा खडसे यांची जाहीर सभा होणार आहेत. कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल आरोपींना शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींकडून 13 तोळे सोने आणि पावणेदोन किलो चांदी असा एकूण वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
बदलापूरमध्ये विरोधकांचं डिपॉझिट जप्त होणार – एकनाथ शिंदे
बदलापूरमधील प्रचारसभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, बदलापूर मध्ये 49 आणि 1 नगराध्यक्ष म्हणजे 50 हाफ सेंच्युरी. शीतल म्हात्रे या बिन विरोध निवडून आल्याने शिवसेनाचं खातं उघडलं. लाडकी बहीण मी विधानसभा आणि महाराष्ट्र मध्ये पहात आहे. बदलापूर मध्ये 26 हजार लाडक्या बहीणी या योजनाचा लाभ घेत आहेत. 2 तारीख पर्यंत डोळ्यात तेल घालून काम करा. विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्या शिवाय राहणार आहे.
-
मुंबई : किल्ला कोर्ट परिसरात बसचा अपघात
मुंबई किल्ला कोर्ट परिसरात फुटपाट वर पार्किंगसाठी रिव्हर्स घेत असताना MH 02 FX 0794 क्रमांकाची City Flow बस CCTV बसवलेल्या पोलला धडक दिल्याची घटना घडली आहे. धडकेत पोल सह बसचे नुकसान झालं असून बसचा अडथळा दूर करण्यासाठी ड्रायव्हरकडून प्रयत्न सुरू आहेत.
-
-
भोर – अजित पवारांनी चांगला निधी दिला – रुपाली चाकणकर
भोरमध्ये प्रचार करताना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर म्हणाल्या की, गेल्या वर्षभरात आमदार शंकर मांडेकर आणि अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणावर निधी या भागाला दिलेला आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास मांडेकर आणि अजित पवार यांच्या वर आहे. माजी आमदार संग्राम थोपटे गेले अनेक वर्ष या भागाचे नेतृत्व करत होते. मात्र जनतेच्या मागण्या, कामं त्यांना पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर असणारा नाराजीचा सूर विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला.
-
बीड : मला एकदा संधी, मी बारामती बदलून दाखवली आहे – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित हे बीडमध्ये प्रचारसभा घेत आहेत. यावेली मतदारांना आवाहन करताना त्यांनी म्हटले की, मला एकदा संधी देऊन बघा मी बारामती बदलून दाखवली आहे. इथं रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. याला जबाबदार कोण? बाकीचे जिल्हे सुधारले आणि आपण मागे राहणार का? पुढची पिढी काय म्हणेल. कुणाची बटणं दाबताय असं म्हणत अजित दादांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
-
मालेगाव अत्याचार प्रकरणात उज्वल निकम विशेष सरकारी वकील
नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे गावात एका चिमूलकी मुलीवर घडलेल्या अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
-
-
गोंदिया शहरातील प्रत्येकाला मालकी हक्काचा पट्टा मिळेल – देवेंद्र फडणवीस
गोंदिया शहरातील प्रत्येकाला मालकी हक्काचा पट्टा मिळेल. सिंधी समाजाच्या लोकांना सुद्धा जमिनीचे मालकी हक्क मिळतील. झुडपी जंगलातील वसलेल्या लोकांना सुद्धा मालकी हक्काचा पट्टा मिळेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियातील सभेत दिले.
-
घोडबंदरवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रहिवाशांची मशाल यात्रा
ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सामाजिक संस्था आणि घोडबंदर रहिवाशांनी मशाल यात्रा काढली आहे. ठाणे बोरिवली आणि बोरिवली ते ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या या घोडबंदर रोडवर गेल्यावर्षभरापासून रस्त्याची कामे मेट्रोची कामे यामुळे रहिवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.
-
तोतया आयएएस अधिकाऱ्याच्या प्रियकराला अटक
तोतया आयएएस अधिकारी कल्पना भागवत हिचा प्रियकर मोहम्मद अश्रफ खिल आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचा तोतया ओएसडी अभिषेक चौधरी उर्फ डिंपी याला दिल्लीतून अटक झाली आहे.अटक केलेल्या आरोपींना आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. तोतया ओएसडी आणि कल्पनाचा प्रियकर हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दोघा आरोपींना दिल्लीतून अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 9 डिसेंबर पर्यंत, म्हणजे 10 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे
-
यावेळी महायुतीला चांगले यश येईल, आठवलेंनी व्यक्त केला विश्वास
पुणे – राज्यात महायुतीला चांगलेच यश मिळण्याची शक्यता आहे. आता कोण कोणा बरोबर आहे काही कळत नाही. पूर्वी महायुती महाआघाडी होती. महायुतीने चांगला निर्णय घेतला आहे. होईल तिथ सोबत नसेल तिथ विरोधात असे सूत्र आहे. राज्यात महायुतीला चांगले यश मिळेल, असे रामदास आठवले म्हणाले.
-
मेढा नगरपंचायतीत आमचेच सर्व उमेदवार निवडून येतील, शंभूराज देसाई यांचा विश्वास
सातारा: मेढा नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे करण्यात आले असून आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मेढा येथे उमेदवारांच्या उपस्थितीत रॅली काढली. मेढा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख अंकुश कदम विरुद्ध भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले अशी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी मेढा नगरपंचायतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे
-
जेजुरीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर सभा
जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी माजी आमदार संजय जगताप यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली आहे, थोड्याच वेळात ही सभा सुरू होणार आहे.
-
कल्याण पश्चिमध्ये बिअर शॉपला भीषण आग
कल्याण पश्चिममधील आधारवाडी चौकातील बिअर शॉपला भीषण आग
सायंकाळी अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू,
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, आगीचं कारण अस्पष्ट
-
बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन, कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्याच्या गाडीची हवा सोडली
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या आठ दिवसांपासून भाव वाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी प्रत्येक गावागावात टायर पेटवून कारखानदारांचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले. यानंतर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली ती बैठक निष्फळ ठरली. यानंतर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यांच्या गाडीची हवा सोडून दिली तर अनेक ट्रॅक्टरची आणि ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा सोडत छत्रपती सहकारी साखर कारखाना बंद पाडला आहे. याचा मोठा परिणाम गाळपावर झाला आहे.
-
दिल्ली प्रमाणेच आता अमरावतीमध्येही बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, एक जण ताब्यात
दिल्ली प्रमाणेच अमरावतीमध्येही बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी
नीनावी फोन कॉलमुळे अमरावती शहर पोलिसांत खळबळ
अमरावती शहर पोलिसांनी एका आरोपीला इंदोरमधून घेतले ताब्यात
दिल्लीप्रमाणे अमरावतीतही बॉम्बस्फोट करणार असल्याची दिली होती धमकी
पोलिसांकडून शहरात हाय अलर्ट, अनेक ठिकाणी नाकाबंदी
-
‘दित्वा’ चक्रीवादळ उद्या सकाळी तामिळनाडू, पुद्दुचेरीला धडकण्याची शक्यता: आयएमडी
‘दित्वा’ चक्रीवादळ वादळाबाबत, आयएमडीने म्हटले आहे की, ‘दित्वा’ 30 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत उत्तर-वायव्येकडे सरकत राहण्याची आणि उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे.
-
दिल्ली: गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या कोठडीत 7 दिवसांची वाढ
दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयाने गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या कोठडीत सात दिवसांची वाढ केली आहे. विशेष एनआयए न्यायाधीशांनी एनआयए मुख्यालयात सुनावणी केली.
-
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली
दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या आरोपपत्राची दखल घेण्याबाबतचा आपला आदेश पुढे ढकलला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशासाठी 16 डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
-
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी मुझम्मिल आणि इतरांच्या एनआयए कोठडीत 10 दिवसांची वाढ
दिल्ली दहशतवादी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना पटियाला हाऊस कोर्टातून बाहेर काढण्यात आले, जिथे त्यांना 10 दिवसांच्या एनआयए कोठडीची मुदत संपल्यानंतर हजर करण्यात आले. विशेष एनआयए कोर्टाने आरोपी डॉ. मुझम्मिल शकील गनई, डॉ. आदिल अहमद राथेर, डॉ. शाहीन सईद आणि मुफ्ती इरफान अहमद वागे यांच्या कोठडीची मुदत आणखी 10 दिवसांनी वाढवली.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार देशमुख कुटुंबीयांची भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक मस्साजोगच्या दिशेने रवाना झाले आहेत. देशमुख कुटुंबीयांची घेणार भेट. माजलगाव, धारूर येथील सभा संपल्यानंतर अजित दादांचा ताफा हेलिपॅडकडे न जाता मस्साजोगच्या दिशेने रवाना झाला आहे. आज संतोष देशमुख यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे.
-
सयाजी शिंदेंच्या आक्षेपार्य वक्तव्यानंतर साधू महंतांची तीव्र नाराजी
तपोवनातील झाडे तोडण्याविरोधात आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवन परिसरात जाऊन केला होता विरोध. हेच विरोध करत असताना साधू आले काय गेले काय मेले काय असे वक्तव्य सयाशी शिंदे यांनी केले होते.
-
इमरान खान यांना मारण्यासाठी थेट तुरुंगावर हल्ला?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता वाढतच चालली आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की इमरान खान यांना रावळपिंडीच्या अडियाल तुरुंगात अत्यंत खराब परिस्थितीत ठेवले गेले आहेत आणि त्यांना पूर्णपणे एकटेपणात ठेवण्यात आले आहे. आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. गुप्तचर यत्रणांनीमाहिती दिली की इमरान खानला मारण्यासाठी थेट तुरुंगावर हल्ला करण्याचा प्लान आखला जात आहे.
-
संजय उपाध्याय यांना धमकीदिल्याप्रकरणी राजकीय हालचालींना वेग
बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांना धमकीदिल्याप्रकरणी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. धमकीची माहिती मिळताच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, संजय उपाध्याय यांची भेट घेण्यासाठी बोरिवलीत पोहोचले.
-
धनंजय मुंडेंची पैदास राक्षसाची देखील नसावी : जरांगे पाटील
धनंजय मुंडेंवर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘धनंजय मुंडेंची पैदास राक्षसाची देखील नसावी’ इतकी गंभीर टीका जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे.
-
सरकारने साधूंच्या नावाखाली संधीसाधूपणा करू नये : राज ठाकरे
राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. ‘साधूंच्या नावाने जमीन सपाट करायची आणि उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव आहे. सरकारने साधूंच्या नावाखाली संधीसाधूपणा करू नये” असं म्हणत तपोवनमधील वृक्षतोडीला त्यांनी विरोध दर्शवला आहे.
-
सिल्लोडमध्ये भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा
सिल्लोडमध्ये भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. सत्तारांचे कार्यकर्ते पैसेवाटप करत असल्याचा भाजपाचा आरोप आहे.
-
निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय : नितेश राणे
निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेतील इतर नेते चव्हाणांवर का बोलत नाहीत? असा सवालही नितेश यांनी व्यक्त केला आहे.
-
सिल्लोडमध्ये भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा
छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथे भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा. शिंदेसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. दोन गट आमने सामने येताच पोलिसांकडून कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न. अब्दुल सत्तारांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा भाजप नेत्यांचा आरोप.
-
ऑक्सिजन सिलेंडर, मास्क लावून काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद
ऑक्सिजन सिलेंडर, मास्क लावून काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद. मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेवर काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची पातळी सध्या खालावली आहे. मुंबईची हवा आरोग्यासाठी घातक बनली आहे.
-
कुंभमेळ्यासाठी झाडे तोडण्याची काय गरज? – खासदार अरविंद सावंत
“देशाचा व्यापार, बाजार, पैसे एवढंच का दिसतं? बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी झाडे तोडण्याची काय गरज? आधी कधी असे प्रकार झाले होते का? मुंबईकडे इतक्या उजाड जागा आहेत, खाजगी शेतकऱ्यांची जमीन आहे,त्यांना भाडं द्या, वापरा. पण ते न करता थेट जंगलांवर कुरघोडी” अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली.
-
सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये 1 हजार 200 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 6 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 31 हजार 325 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 77 हजार 160 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या चार दिवसात सोन्याच्या दरात चार हजार तर चांदीच्या दरात तब्बल 16 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
-
राम खाडे यांची प्रकृती अद्याप चिंताजनक
राम खाडे यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालययात उपचार सुरु आहेत. राम खाडे यांना अहिल्यानगरमधून पुण्यातील रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली. राम खाडे हल्ला झाल्यापासून बेशुद्ध अवस्थेत असल्याची त्यांच्या कुटुंबीयांनी माहिती दिलीय.
-
न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही-मनोज जरांगे
आम्ही कोणीही न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही देशमुख कुटुंबियांना शब्द देतो, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. आम्ही बोलणारे नाही तर कृती करून दाखवणारे आहोत. खूप वाईट झालं, कुटुंब उघड पडलं.समोरचे काहीतरी डाव टाकू पाहत आहे,मी पडद्याच्या अडून बोलत नाही काही, माणूसच नाही राहिला तर यांना काय मोजायचं. सुरेश अण्णा तुमच्यावर सुद्धा आरोप झाला काहीतरी, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
-
आरोपींना अटक करत पोलिसांनी काढली धिंड
पुण्यातील विमान नगर परिसरात कोयत्याने तोडफोड करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत परवा रात्री एका टपरीधारकाला कोयत्याचा धाक दाखवत तोडफोड केली होती.चारही आरोपींना विमानतळ पोलिसांनी अटक केली. आरोपींना अटक करत पोलिसांनी त्यांची धिंड काढली.
-
पीडितेच्या कुटुंबियासह ग्रामस्थांचे आमरण उपोषण
डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व खून प्रकरणात पीडितेला न्याय मिळावा यासाठी डोंगराळे ग्रामस्थ व पीडितेचे कुटुंबाने आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात केली आहे. शालेय मुलांचा देखील आंदोलनात सहभाग घेतला आहे. या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी.आरोपीला तत्काळ फाशी द्यावी, अशी पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांची मागणी केली आहे
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे
सोन्याच्या दरामध्ये 1 हजार 200 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 6 हजार रुपयांची वाढ झाली आहे.सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 31 हजार 325 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 77 हजार 160 रुपयांवर पोहोचले.गेल्या चार दिवसात सोन्या दरात अडीच हजार तर चांदीच्या दरात तब्बल 12 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. लग्नसराई मध्ये सोन्या-चांदीच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे वऱ्हाडी मंडळींना खिशाला कात्री बसली आहे
-
महापालिका अतिक्रमण विभागाचे धडक कारवाई
हडपसर राष्ट्रीय महामार्ग मांजरी फाटा येथे रस्त्यामध्ये अडथळा ठरणारे अनधिकृत पक्के बांधकाम व कच्चे शेड, ओटे यावर महापालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली. हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालय हद्दीत राष्ट्रीय महामार्ग विभाग, महापालिका बांधकाम विभाग व अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत मांजरी रोड सोलापूर रोड व १५ नंबर बस स्थानक येथे रस्ता रुंदीकरण, फ्रंट मर्जिन, साइड मार्जिन मध्ये धडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत २ हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले व कच्चे शेड व ओटे असे ७ हजार ८०० चौरस फुटांवर कारवाई करण्यात आली.
-
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा दुचाकीवरुन प्रचार
सांगली जिल्ह्यातील अरुण-ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत भाजप महायुतीच्या प्रचारार्थ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दुचाकीवरून प्रवास करुन घरोघरी संपर्क केला. यावेळी प्रत्येक भेटीत ना. पाटील यांचे ही उत्साहात स्वागत करण्यात आले.
-
वृक्षतोडीसह जादूटोण्याची जोरदार चर्चा
एकीकडे तपोवन येथील वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असताना जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. अरेबियन भाषेत लिहून झाडांना लटकवल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दावा आहे. झाडांवर जादूटोणा केल्याचा दावाअंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आला. वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आलो असताना जादूटोण्याचा प्रकार असल्याचे लक्षात आल्याचे कृष्णा चांदगुडे अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी म्हटले आहे.
-
बीडच्या माजलगाव शहरात अजित पवार यांची आज नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ सभा
बीडच्या माजलगाव शहरात अजित पवार यांची आज नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ सभा होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत नवाब मलिक देखील दाखल झाले आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांच्या मतदार संघातील माजलगाव आणि धारूर या दोन्ही शहरात अजित दादांच्या सभा होणार आहेत.
-
एकीकडे तपोवन येथील वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असताना जादूटोण्याचा प्रकार समोर
अरेबियन भाषेत लिहून झाडांना लटकवल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दावा केला… झाडांवर जादूटोणा केल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात दावा आला. वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आलो असताना जादूटोण्याचा प्रकार असल्याचे लक्षात आले..
-
मालवण पोलीस ठाण्यात निलेश राणेंवर गुन्हा दाखल
मालवण पोलीस ठाण्यात निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे… भाजप कार्यकर्त्यांच्या घरात बेकायदेशीरित्या शिरल्याच्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे… विजय केनवडेकरांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
-
साधू आले गेले मेले माहित नाही पण झाडे राहिली पाहिजे – सयाजी शिंदे
झाडाची व्याख्या करणे अजून राज्य सरकारला माहीत नाही… सगळ्यात जास्त वड आपल्या सरकारने तोडले… गिरीश महाजन माजी तुमची दुश्मनी नाही आणि झाली तरी काही हरकत नाही…. बारा वर्षांनी येतो त्याला काय म्हणतात… जगात एकच सेलिब्रेस्टी झाड… असं वक्तव्य अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलं आहे.
-
सांगली – ईश्वरपूर मध्ये जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात
सांगलीच्या वरून ईश्वरपूर नगरपरिषदेसाठी अत्यंत चुरशीने निवडणूक पार पडत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून ईश्वरपूर शहरात भव्य रॅली काढण्यात आली आहे. आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ईश्वरपूर शहरातून पदयात्रेला सुरुवात झाली आहे. शहरातल्या सर्व प्रभागांमधून ही भव्य दिव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह हजारो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार पक्षविरुद्ध महायुती अशी लढत होत असून जयंत पाटलांच्या विरोधात सर्व विरोधक आणि महायुती ही एकवटली आहे, त्यामुळे जयंत पाटलांच्या प्रतिष्ठेची ही नगर परिषदेची निवडणूक बनली आहे.
-
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काढला रूट मार्च
लोणावळ्यात 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होत असल्याने निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी रूट मार्च काढला. लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने पर्यटन नगरीतील प्रमुख रस्त्यांवर शक्तीप्रदर्शन करत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
-
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत लवकरच 224 पदांची भरती
छत्रपती संभाजीनगर मनपात कायमस्वरूपी 224 पदांची भरती करण्यात येणार आहे. या संदर्भात आठवडाभरात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना तीन आठवड्यांचा अवधी दिला जाईल. शासनाने नियुक्त केलेल्या आयबीपीएस या एजन्सीच्या माध्यमातून भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. भरतीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यांत पूर्ण होईल, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.
-
अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची काँग्रेसवर टीका
काँग्रेसने पकडून – पकडून उमेदवार दिले मात्र त्यांनाही गावाला नेऊन ठेवले. ज्या नेत्यांचा आपल्या उमेदवारांवर विश्वास नाही, त्या उमेदवारांवर जनता कशी विश्वास ठेवणार असा टोलाही आमदार कल्याणशेट्टी यांनी लागवला. अक्कलकोट तालुक्यात तीन नगरपरिषदेच्या निवडणूका होत आहेत. यावेळी भाजपाकडून मैंदर्गी, दुधनी आणि अक्कलकोट मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले
-
चांगली मानसे साधू संत असतात ते गर्दी करत नाही- सयाजी शिंदे
नाशिक कर चांगली माणसे आहेत. हे झाडे तोडू नका मला केव्हापण बोलावा मी येईल. सगळे आपलेच शासन करते आहेत. मी नाशिककरांना सपोर्ट करण्यासाठी आलो आहे. 220 कोटींचे हे टेंडर आहे. आता इथे हा कसला मेळावा आहे
-
ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात
सांगलीच्या वरून ईश्वरपूर नगरपरिषदेसाठी अत्यंत चुरशीने निवडणूक पार पडत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून ईश्वरपूर शहरात भव्य रॅली काढण्यात आली आहे. आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ईश्वरपूर शहरातून पदयात्रेला सुरुवात झाली आहे.
-
तपोवनमधील एकही झाड तुटता कामा नये, झाड आपले माय-बाप आहेत – सयाजी शिंदे
तपोवनमधील एकही झाड तुटता कामा नये. झाडं तुटू देऊ नका, ते आपले मायबाप आहेत. झाडं गेली तर नाशिककरांचं मोठं नुकसान होईल – सयाजी शिंदे
-
नाशिक – अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून तपोवन येथील वृक्षांची पाहणी
नाशिक – अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून तपोवन येथील वृक्षांची पाहणी करण्यात येत आगे. – सयाजी शिंदे यांच्या सह पर्यावरण प्रेमी झाडांच्या कत्तलविरोधात एकवटले आहेत. झाडांची पाहणी करून पर्यावरण प्रेमी सोबत या संदर्भात चर्चा करणार आहेत.
-
खंडणी विरोधी पथकांची धडक कामगिरी, एम.डी. तस्करी प्रकरणात एकूण 6 जणांना अटक
ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने अमली पदार्थ एम डी विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 922 ग्राम एम.डी. हा अमली पदार्थ हस्तगत केला. पोलिसांनी आतापर्यंत एम. डी. प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.
-
कल्याणमध्ये राजकीय पदाधिकाऱ्याची निघृण हत्या !
कल्याणमध्ये राजकीय पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली. कल्याण तालुक्यातील मुरबाड महामार्गावरील मामणोली गावाजवळ जुन्या वैमनस्यातून धारदार शस्त्रांनी हल्ला करून निर्घृण हत्या केली. किरण घोरड असे मयत शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारीचे नाव असून तो टिटवाळ्यातील गोवेली गावचा रहिवासी होता. प्राथमिक माहितीनुसार, टोळक्याने राडा घालत घोरड यांच्यावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याने गंभीर जखमी झाले, त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
मुंबईमध्ये प्रदूषणात झपाट्याने वाढ
मुंबईमध्ये प्रदूषणात झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक आज (AQI) अनेक अतीवाईट श्रेणीत नोंदवला गेला असून एक्युआय 260 वर पोहोचलाय. सर्वत्र धुरकट वातावरण आहे, दृष्यमानता कमी झाली आहे त्यामुळे कोलाबा, माझगाव , बीकेसी, कुर्ला, माझगाव, मालाड, देवनार, कांजूरमार्ग, शिवाजी नगरसह अनेक भागांत हवा सतत दूषित श्रेणीत असून वातावरणातील PM-10 धूलिकणांचे प्रमाण वाढलं आहे.
-
डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व खून प्रकरणी कुटुंबियांचे आमरण उपोषण
मालेगाव ( नाशिक ) : डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व खून प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा यासाठी डोंगराळे ग्रामस्थ व पीडितेचे कुटुंबीय आजपासून आमरण उपोषण करणार . आज सकाळी ११ वाजता डोंगराळे गावात होणार आमरण उपोषणाला सुरुवात करणार. या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी व आरोपीला तत्काळ फाशी द्यावी अशी पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांची मागणी आहे.
-
‘लाडकी बहीण’साठी निधी कमी पडू देणार नाही – एकनाथ शिंदे
कोट्यवधी लाडक्या बहिणींचा भाऊ ही ओळख माझ्यासाठी खूप मोठी आहे. ‘लाडकी बहीण’साठी निधी कमी पडू देणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगलीतील सभेत म्हणाले.
Published On - Nov 29,2025 8:47 AM
