Maharashtra LIVE : टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून
PM Modi Ram Mandir Flag Hoisting Speech LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी अयोध्येला भेट देतील, जिथे ते श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करतील. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून मोदी यावेळी काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करतील. त्यापूर्वी ते अयोध्येतील लोकांना अभिवादन करतील आणि मंदिरांमध्ये प्रार्थना करतील. या ऐतिहासिक प्रसंगासाठी प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली आहे. एटीएस आणि एनएसजीसह एकूण 6,970 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 41 वी पुण्यतिथी साजरी होत आहे. अपघाताबद्दल देखील मोठी अपडेट समोर येत आहे. नवले ब्रिजवर झालेल्या कंटेनरच्या अपघातात 8 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावावा लागला. त्यानंतर, प्रशासनाने येथील मार्गावरुन वाहतुकीसाठी वेग मर्यादा निश्चित केलीय. नवले ब्रिजवरील वाहतूक मार्गावरुन वेग मर्यादा 30 किमी प्रतितास वेग निश्चित करण्यात आली आहे. भुमकर चौक ते नवले ब्रिज पर्यंत ही वेगवेगळ्या मर्यादा असणार आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 20 संघ भाग घेणार आहेत. ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून महिनाभर ही स्पर्धा असेल. या स्पर्धेच्या शेड्युलबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. थोड्याच वेळात याची घोषणा होईल.
-
252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात सिद्धार्थ कपूरची चौकशी
252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धार्थ कपूर मुंबईच्या घाटकोपर अँटी नार्कोटिक्स सेलकडून चौकशी सुरु आहे.
-
-
टी20 वर्ल्डकप 2026 वेळापत्रकाच्या घोषणेदरम्यान रोहित शर्मा उपस्थित राहणार
2024 च्या टी20 विश्वचषकात भारताला विजय मिळवून देणारा रोहित शर्मा आज मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. 2026 च्या आयसीसी टी20विश्वचषकाचे वेळापत्रक थोड्याच वेळात जाहीर केले जाईल. हरमनप्रीत कौर आणि श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूज उपस्थित राहणार आहेत.
-
प्रत्येक द्वेषपूर्ण भाषणाच्या घटनेवर लक्ष ठेवण्यास तयार नाही: सर्वोच्च न्यायालय
देशभरातील द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रत्येक घटनेवर कायदेशीर कारवाई करण्यास किंवा त्यावर लक्ष ठेवण्यास ते तयार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले आहे. यासाठी कायदेशीर उपाय, पोलिस स्टेशन आणि उच्च न्यायालये आधीच उपलब्ध आहेत.
-
सकाळी मी रामाच्या अयोध्येत होतो, आता मी गीतेच्या कुरुक्षेत्रात आहे: पंतप्रधान मोदी
नववे शीख गुरु, गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीद जयंतीनिमित्त कुरुक्षेत्रात आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज सकाळी मी राम नगरी अयोध्येत होतो आणि आता मी गीतेची नगरी कुरुक्षेत्रात आहे. गुरु तेग बहादूर जी यांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन अर्पण केले.”
-
-
रेल्वेच्या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणा – खासदार नरेश म्हस्के
ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, दिघा, ऐरोली, बेलापूर, वाशी, भाईंदर, मीरा रोड या स्थानकांमधील प्रलंबित विकासकामे, ठाणे – मुलुंड स्थानका दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामात होत असलेली दिरंगाई याबाबत आज दिल्लीतील संसद भवनात खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समोर खंत व्यक्त करत विकासकामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. तसेच प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी कारवाई करण्याची सूचनाही यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केली.
-
पंढरपूर नगरपालिकेत उमेदवारांच्या चिन्हावरून गोंधळ
तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला एक चिन्ह आणि त्याच आघाडीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना दुसरे चिन्ह मिळणार असल्याने पंढरपूर नगर परिषदेत गोंधळ पहायला मिळत आहे. यामुळे पंढरपूर नगरपालिकेतील निवडणुकीच्या चिन्ह वाटपाच्या आधीच विरोधी तीर्थक्षेत्र विकास आघाडीने प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. भगीरथ भालके यांच्या नेतृत्वात एकत्र आलेल्या विविध पक्ष आणि संघटनांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांसाठी एकच चिन्ह मिळावे अशी मागणी केली आहे.
-
माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात
माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झाला आहे. आपल्या नातवाला फिरवत असताना मागून आलेल्या चार चाकी गाडीने त्यांना उडवले. या अपघातात निर्मला गावित गंभीर जखमी झाल्या आहेत. नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
-
छत्रपती संभाजीनगर: वेरूळमध्ये ओम जगद्गुरु जनशांती धर्मसोहळ्याचे आयोजन
वेरूळ येथे जगतगुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या ३६ व्या पुण्यस्मरणानिमित्त वेरुळ येथे स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत ओम जगद्गुरु जनशांती धर्मसोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
-
उज्ज्वला थिटे यांच्या अपीलावर उद्या पुन्हा होणार सुनावणी
अनगर नगरपंचायत नगरपरिषदेच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या अपीलावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. आज (25 नोव्हेंबर) दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने निवडणूक कार्यक्रम राबवल्याचा मुद्दा उज्वला थिटे यांच्या वकिलांनी मांडला.
कोणत्याही निवडणुकीत जर अर्जदार अपिलात गेला असेल तर त्याबाबत पुढची कार्यवाही करता येत नाही असा नियम आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपील पूर्ण होण्याआधीच अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा अर्ज माघार घेतला. त्यामुळे आदर्श निवडणूक कार्यक्रमाचा भंग झाल्याचा दावा थिटे यांच्या वकिलांनी केला आहे. सोलापूर जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली. अनगर नगरपंचायतीच्या उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर सोलापूर कोर्टात धाव घेतली.
-
डोंबिवलीत मतदार यादीत ‘घोळ’! शिंदे शिवसेनेचा संताप, तब्बल ४५०० मतांची अदलाबदल? आंदोलनाचा इशारा
डोंबिवली 22 प्रभागात तब्बल 4500 मतांची रहस्यमय अदलाबदल झाल्याचा गंभीर आरोप विकास म्हात्रे यांनी केला आहे. प्रभागाच्या मध्यभागातील मतदारांची नावेच दुसरीकडे हलवल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे त्वरित दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.
घोळ कायम राहिला तसेच मतदारांचा संवैधानिक हक्क हिरावला तर रस्त्यावर उतरू. तसेच वेळ आली तर न्यायालयातही जाऊ, असा इशाराही शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
-
निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील अशी अपेक्षा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणावरुन प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील अशी अपेक्षा आहे. निवडणुका संदर्भात शुक्रवारपर्यंत आदेश येतील”,असं फडणवीस बुलडाण्यात म्हणाले.
-
बदलापूर–अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक संदर्भात मोठी बातमी
बदलापूर–अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण सत्र न्यायालयाने 18 इच्छुक उमेदवारांच्या याचिका फेटाळल्या आहेत. तर भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या याचिकेला मंजुरी दिली आहे. बदलापूर–अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणूकीत निवडणूक आयोगाकडून विविध कारणांनी उमेदवारी अर्ज बाद केले होते.
या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्याच्या विरोधात अंबरनाथ नगरपरिषदेतून 13 आणि बदलापूर नगरपरिषदेतून 6 असे उमेदवारी अर्ज बाद झालेल्या 19 उमेदवारांनी याचिका दाखल केली होती. अनेक अर्जांवर उमेदवारांची सही व इतर माहिती नसणे यांसारख्या गंभीर त्रुटींमुळे न्यायालयाने 18 याचिका फेटाळल्या.
मात्र भाजपचे पवन वाळेकर यांचा उमेदवारी अर्ज भरलं होतं. त्यात कमळ चिन्ह दाखवलं होतं. तसेच इतर माहितीत नील किंवा निरंक असं लिहिल होत. ते नजर चुकीने झाल्याने मान्य केल्याने त्याची उमेदवारी अर्ज न्यायालयाने स्वीकारल्याची माहिती वकिलांनी दिली.
-
कल्याण -डोंबिवलीत युतीमध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत : श्रीकांत शिंदे
महायुतीचा महापौर असला पाहिजे असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. कल्याण – डोंबिवलीत युतीमध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत असही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
-
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही : फडणवीस
लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ते म्हणाले “मी मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही” असा विश्वास त्यांनी दिला आहे.
-
नवनीत राणा भविष्यात माजी खासदार राहणार नाहीत : फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीसांनी अमरावतीत प्रचारसभा घेतली त्यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्याबद्दल एक महत्तवाचं वक्तव्य केलं आहे. नवनीत राणा भविष्यात माजी खासदार राहणार नाहीत असं फडणवीस म्हणाले आहेत.
-
विकासाच्या मुद्द्यावर महायुती जिंकेल : उपमुख्यमंत्री शिंदे
मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर होईल असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. विकासाच्या मुद्द्यावर महायुती जिंकेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
-
आजच्या सोन्याच्या भावात मोठी वाढ
जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात 2 हजार रुपयांनी तर चांदीच्या भावात 4 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 28 हजार 750 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 64 हजार 228 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
-
नाशिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान रॅकेट उघड
नाशिकमधील चाळीसगावचे डॉ. बाळासाहेब पाटील यांच्यावर PCPNDT कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारचाकीत पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र बाळगून गर्भलिंग निदान केल्याचं उघड झाले आहे. सोनोग्राफी यंत्राची विनापरवानगी विक्री केल्याबद्दल GE Healthcare कंपनीही सहआरोपी
-
मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो- एकनाथ शिंदे
रिवर्तनाचा पर्व आता सुरू झाला आहे. गोंदियावर भगवा फडकवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. डॉक्टर कटरे एकदम नवीन फ्रेश कॅंडिडेट आहेत. कोणाला जळजळ होत असेल कोणाच्या पोटात त्रास असेल तर त्यालाही औषध देऊन टाका. मी डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन करतो. एक केला ना मोठा ऑपरेशन असे एकनाथ शिंदे म्हणाले.
-
उद्धव ठाकरे संजय राऊतच्या निवासस्थानी
उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्या भांडुप निवासस्थानी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचले आहेत. सोबत मिलिंद नार्वेकर देखील असल्याचे दिसत आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज चिखलीत प्रचार सभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चिखलीत प्रचार सभा घेणार आहेत.चिखलीकर फडणवीस यांना साथ देतील. चिखली नगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल.बोंद्रे घराण्याची घराणेशाही आहे. विधानसभा निवडणूक, नगर पालिका निवडणूक आली तरी बोंद्रे घराण्यातील उमेदवार उभे राहतात. मात्र चिखलीकरांना आता घराणेशाही नको, अशा भाजप आमदार श्वेता महाले म्हणाल्या.
-
जत नगरपरिषदेसाठी पडळकरांनी कंबर कसली
सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी कंबर कसली आहे.निवडणुकीच्या प्रचारासाठी पडकरांकडून गल्लोगल्ली बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे.प्रचारासाठी गोपीचंद पडळकर यांनी आपल्या वाहनांचा ताफा बाजूला ठेवत दुचाकीवरून शहरात प्रचाराचा धडका लावला आहे.भाजपकडून या ठिकाणी स्वबळावर जत नगर परिषदेची निवडणूक लढवली जात आहे.शहरातल्या विकासात शेतकऱ्यांची साथ लाभत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
-
पक्ष माझ्या काकाचा नाही… पक्ष तुमच्याच काकाचा आहे तो व्यवस्थित सांभाळावा
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना लक्ष केले. आमच्याकडे सगळे एबी फॉर्म मागत होता. पक्ष तुझ्या काकाचा आहे का? असे अजित पवार यांनी म्हटले होते. यावर आता भाजपा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.
पक्ष माझ्या काकाचा नाही. पक्ष तुमच्याच काकाचा आहे तो व्यवस्थित चालवा अशा शब्दात भाजपचे नेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. डॉक्टर क्षीरसागर म्हणाले की.. बीडमध्ये खालची टोळी जमा झाली त्यांनी काहीतरी मिस फीड दादांना केले, मी दादांना स्वतः बोलण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या व्यस्त शेड्युलमध्ये माझे काही बोलणे झाले नाही परंतु त्यांनी सुद्धा तशी विचारणा मला केली नाही.. त्यांना काही ब्रिफिंग केलं असेल आणि त्यांनी काही डिसिजन घेऊन ठेवले असतील तर मी त्याच्यात काही बोलू शकत नाही. पक्ष हा माझा नाही त्यांच्याच काकांचा आहे. त्यांनी तो व्यवस्थित सांभाळावा आणि खालच्या लोकांनी काय सांगितले त्याची शहानिशा करावी म्हणजे त्यांना सत्य परिस्थिती काय ते कळेल असे देखील डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
-
भारतीय नौदलाच्या ध्वज बदलवला
भारतीय नौदलाच्या ध्वजावर असे प्रतिक होते की ज्याचा आपल्या शक्तीसी, वारश्याशी काहीच संबंध नव्हता. आम्ही हे प्रतिक हटवले. आपण शिवाजी महाराजांशी संबंधित प्रतिक घेतले. केवळ डिझाईनमध्ये बदल केला नाही तर मानसिकता बदलण्याचं हे काम होतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत म्हणाले. हेच परिवर्तन आज अयोध्येतही दिसत आहे. ज्यांनी रामत्व नाकारलं ही गुलामीची मानसिकता आहे. भारत वर्षाच्या प्रत्येक कणाकणात राम आहे.
-
विकसीत भारतासाठी सामूहिक शक्तीची गरज -पंतप्रधान मोदी
विकसित भारत बनवण्यासाठी समाजाच्या या सामूहिक शक्तीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत केले. राम मंदिराचं दिव्य प्रांगण भारताच्या सामूहिक चेतनचं प्रतिक बनलं आहे. या ठिकाणी शबरीचं मंदिर बनलं आहे. जनजाती समाजाच्या प्रेमाचं हे प्रतिक आहे. या ठिकाणी निषाद राजाचं मंदिर आहे. हे मैत्रीचं प्रतिक आहे. एकाच ठिकाणी माता अहिल्या आहे. महर्षी वाल्मिक आहे. महर्षी वशिष्ठ आहे. विश्वामित्र आहे, अगस्त्य आहे. संत तुलसीदास आहे. रामलल्लासह सर्व संतांचं इथे दर्शन होतं. जटायूचीही मूर्ती आहे. मी प्रत्येक देशवासियांना सांगेल. तुम्ही राममंदिराला आला तर सप्तमंदिराचं दर्शनही करा. हे मंदिर आपल्या अस्थेसह मित्रता, आणि सामाजिक सद्भवा वाढवतो.
-
पंतप्रधान मोदींची मोठी टीका
मेकालेने भारतात मानसिक गुलामीची पायाभरणी केली. दहा वर्षानंतर म्हणजे २०३५ मध्ये त्या अपवित्र घटनेला २०० वर्ष पूर्ण होत आहे. काही दिवसापूर्वी मी एका कार्यक्रमात म्हटलं होतं की येत्या १० वर्षात भारताला गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त करायचं आहे. दहा वर्षाचं टार्गेट ठेवायचं आहे. सर्वात मोठं दुर्देव म्हणजे मॅकेलेने जो ठरवलं होतं त्याचा प्रभाव अधिक होता. आपल्याला स्वातंत्र मिळालं पण हिन भावना गेली नाही. एक विकार आला, तो म्हणजे परदेशी गोष्टी चांगल्या आहेत. आणि देशातील गोष्टी वाईट आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
-
शतकांच्या वेदनांना शमल्या
यावेळी आपल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिर स्थापनेच्या संघर्षावर विचार व्यक्त केले. संपूर्ण भारत, संपूर्ण विश्व राममय आहे. प्रत्येक राम भक्ताच्या हृदयात अद्वितीय संतोष आहे. असीम कृतज्ञता आहे. आपार अलौकीक आनंद आहे. शतकानुशतकाच्या जखमा भरत आहेत. शतकानुशकताच्या वेदनांना विराम मिळत आहे. अनेक वर्षाचा संकल्प सिद्धीप्राप्त होत आहे. ज्या यज्ञाची अग्नी ५०० वर्ष प्रज्वलीत राहिली, जो यज्ञ एक क्षणही आस्थापासून दूर गेला नाही. एक क्षणही विश्वासापासून दूर गेला नाही, तो यज्ञ आज घडत आहे. आज श्रीरामाचा दिव्य प्रताप या ध्वजातून प्रतिष्ठापित झाला आहे. हा केवळ एक ध्वज नाही. हा भारतीय सभ्यतेचा पुनरजागरणचा ध्वज आहे, असे पंतप्रधान यांनी स्पष्ट केले
-
येणाऱ्या 1000 वर्षांसाठी भारताचा पाया मजबूत करायचा आहे – नरेंद्र मोदी
“येणाऱ्या 1000 वर्षांसाठी भारताचा पाया मजबूत करायचा आहे. जे फक्त वर्तमानाचा विचार करतात ते पुढच्या पिढ्यांवर अन्याय करतात. आपल्याला वर्तमानासह भावी पिढ्यांचा विचार करायचा आहे. कारण आपण जेव्हा नव्हतो तेव्हा सुद्धा हा देश होता. आपण नसू तेव्हा सुद्धा हे देश असेल, येणारी दशकं, येणारी शतकं आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. त्यासाठी प्रभू रामाकडून शिकावं लागेल. त्यांचं व्यक्तीमत्व समजावं लागेल. कृती, व्यवहार आत्मसात करावा लागेल. राम म्हणजे आदर्श, राम म्हणजे मर्यादा, राम जीवनाच सर्वोच्च चरित्र, राम म्हणजे सत्य, पराक्रमाचा संगम” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
-
2047 पर्यंत विकसित भारताचं निर्माण करावं लागेल – नरेंद्र मोदी
“महिला, दलित, मागास, अतिमागास, आदिवासी, वंचित. शेतकरी, श्रमिका, युवा प्रत्येक वर्गाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवलं. ज्यावेळी देशाची प्रत्येक व्यक्ती, वर्ग सशक्त होईल तेव्हा संकल्प सिद्धीसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. 2047 पर्यंत विकसित भारताचं निर्माण करावं लागेल” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले
-
राम वनवासातून आले, त्यावेळी ते मर्यादा पुरुषोत्तम होते – नरेंद्र मोदी
“ज्यावेळी श्रीराम अयोध्येतून वनावासात गेले, त्यावेळी ते युवराज राम होते. पण परत आले त्यावेळी मर्यादा पुरुषोत्तम बनून आले.राम म्हणजे आदर्श आणि मर्यादा. आपल्या दूरदृष्टी ठेऊन काम करावं लागेल. विकसित भारत बनवण्यासाठी सुद्धा समाजाच्या या सामूहिक शक्तीची आवश्यकता आहे. राम मंदिराचं दिव्य प्रांगण भारताच्या सामूहिक सामर्थ्याची चेतना स्थळ बनतय” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
-
दुरुनच मंदिराच्या ध्वजाला प्राणम करतील त्यांनाही तितकचं पुण्य मिळेल – नरेंद्र मोदी
“भेदभाव, पीडा, त्रासापासून मुक्ती, समाजात शांतता आणि सुख असलं पाहिजे.आपण असा समाज बनवू जिथे गरिबी नसेल. आपल्या ग्रंथात म्हटलय जे लोक कुठल्या कारणाने मंदिरात येत नसतील, दुरुनच मंदिराच्या ध्वजाला प्राणम करतील त्यांनाही तितकचं पुण्य मिळेल. हा धर्मध्वज लांबूनच रामलल्लांच्या जन्मभूमीच दर्शन घडवेल.संपूर्ण विश्वातील कोट्यवधी राम भक्तांना या अविस्मरणीय, अद्वितीय क्षणाच्या मी शुभेच्छा देतो. ज्या दानवीरांनी राम मंदिर निर्माणाला सहकार्य केलं, राममंदिर निर्माणाशी संबंधित प्रत्येक कारागिर, व्यक्तीच मी अभिनंदन करतो” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
-
धर्मध्वज आवाहन करणार सत्यमेव जयते – नरेंद्र मोदी
“येणारी शतकं हा धर्म ध्वज प्रभुरामांच्या आदर्श आणि सिद्धांताचा उदघोष करेल. धर्मध्वज आवाहन करणार सत्यमेव जयते. विजय सत्याचा होतो. असत्याचा नाही. धर्मध्वज उदघोष करेल सत्यम एकपदम. सत्यचं ब्रह्माच स्वरुप आहे. सत्यात धर्म स्थापित आहे. धर्म ध्वज प्रेरणा बनेल प्राण जाय पर वचन ना जाये” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,
-
हा ध्वज संकल्प आहे, हा ध्वज यश आहे – नरेंद्र मोदी
“धर्म ध्वज केवळ एक ध्वज नाही. हा भारतीय सभ्यता पूर्नजागरणाचा ध्वज आहे. याचा भगवा रंग यावर रचित सूर्यवंशाची ख्याती राम राज्याची किर्ती प्रतिरुपीत होते. हा ध्वज संकल्प आहे, हा ध्वज यश आहे. हा ध्वज शतकापासून सुरु असलेल्या संघर्षाचा साकार स्वरुप आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
-
आज यज्ञाची पूर्णाहुती आहे, ज्याचा अग्नि 500 वर्ष प्रज्वलित राहिला – नरेंद्र मोदी
“आज संपूर्ण भारत, संपूर्ण विश्व राममय आहे. प्रत्येक राम भक्ताच्या ह्द्ययात प्रचंड समाधान आहे, कृतज्ञता आहे. अपार अलौकिक आनंद आहे. अनेक शतकाचे घाव भरत आहेत. शतकाच्या वेदनेला आज विराम मिळतोय. शतकाचा संकल्प सिद्धी पूर्ण होतेय. आज यज्ञाची पूर्णाहुती आहे, ज्याचा अग्नि 500 वर्ष प्रज्वलित राहिला. जो यज्ञ एक क्षणही आस्थेपासून दूर गेला नाही. एक क्षणही विश्वासापासून तुटला नाही” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
-
स्वप्न पाहिलेलं त्यापेक्षा भव्य मंदिर बांधलं – मोहन भागवत
“हिंदू समाजाने सतत 500 वर्षानंतर दीर्घ आंदोलनानंतर आपलं सत्व सिद्ध केलं. नतंर रामलल्ला आले. मंदिर बनलं. जे स्वप्न पाहिलेलं. रामदास स्वामींनी असं स्वप्न बघितलेलं. बिलकुल तसं स्वप्न पाहिलेलं त्यापेक्षा भव्य मंदिर बांधलं” असं मोहन भागवत म्हणाले.
-
धर्मध्वज पुन्हा खालून वर जाताना शिखरावर विराजमान होताना पाहिलं – मोहन भागवत
“आज वास्तवात अशोकजींना शांतता मिळाली असेल. किती संत, किती गृहस्थ, किती विद्यार्थी त्यांनी आपलं प्राणपर्ण केलं. जे मागे राहिले ते सुद्धा रोज मनात इच्छा व्यक्त करायचे मंदिर बनलं पाहिजे. मंदिर बनलं. रामराज्याचा ध्वज अयोध्येत फडकायचा. आज तो पुन्हा खालून वर जाताना शिखरावर विराजमान होता आज आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. ध्वज प्रतीक असतो. मंदिर बनायलाही वेळ लागला” असं मोहन भागवत म्हणाले.
-
अयोध्या नगरीत राम मंदिरावर फडकला धर्मध्वज
अयोध्या नगरीत राम मंदिरावर फडकला धर्मध्वज. 4 ते 5 कामगारांकडून मिळून धर्म ध्वजाची निर्मिती. धर्मध्वजात तीन थरांच्या रेशमी साटनचा वापर. पीएम मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत धर्म ध्वजारोहण. झेंड्याची खास बाब म्हणजे पॅराशूट फॅब्रिकपासून बनवलाय.
-
स्मृती मानधना यांच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज
स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिच्या वडिलांना लग्नाच्या दिवशी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. गेल्या दोन दिवसांपासून सांगलीतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना रात्री उशिरा डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डिस्चार्ज मिळाल्याने स्मृतीच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
-
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर आंदोलन
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील असणाऱ्या त्रुटीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, काँग्रेस तसेच आपकडून आंदोलन करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांचं प्रारूप मतदार यादीच्या संदर्भात आंदोलन आहे. भारतीय जनता पार्टीने निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरत प्रारूप मतदार यादी बनवल्याचा आरोप करण्यात येत आहे.
-
आजचा दिवस शतकातला सर्वाधिक अविस्मरणीय क्षण- महंत सुधीरदास पुजारी
“आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. 8800 वर्षांनंतर हा दिवस आला आहे. आजच्याच दिवशी श्रीरामांचा विवाह झाला होता. त्यात मंगळवारच्या दिवशीच श्रीरामांचा जन्म झाला आहे. आज अयोध्येत हा सुवर्ण दंडावर उभारला गेलेला रामध्वज स्थापित होतोय. ज्यावर वृक्षाचं चिन्ह आहे. हा ध्वज हिंदू धर्मशास्त्राच्या शुभ संकेतानुसार आहे. आजचा दिवस शतकातला सर्वाधिक अविस्मरणीय क्षण आहे,” अशी प्रतिक्रिया महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपाठोपाठ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचाही प्रचाराचा धडाका
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उद्यापासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. नगरपरिषद निवडणुकीसाठी ते प्रचार सभा घेणार आहेत. बुधवारी नंदुरबार, शिरपूर, अमळनेर, पारोळा, चांदवड, पिंपळगावमध्ये सभा असेल. तर गुरुवारी पाथरी, मानवत, परतूर, हदगाव, मुखेडमध्ये खासदार डॉ. शिंदे सभा घेणार आहेत.
-
मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड
मुंबईत कफ परेड स्थानकाजवळ मेट्रो बंद पडली. मुंबई मेट्रो-3 मध्ये तांत्रिक कारणामुळे वाहतुकीला विलंब होत असल्याची माहिती समोर येत आहे. 10.25 मिनिटांनी मुंबई मेट्रो बंद पडली.
-
जळगाव सराफ बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगाव येथील सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या दरातील चढ-उतारांदरम्यान ही घसरण ग्राहकांना दिलासा देणारी ठरली आहे. सोन्याच्या भावात प्रति तोळ्यामागे तब्बल १,००० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर (जीएसटी वगळता) ₹१ लाख २३ हजार रुपये प्रति तोळा इतके झाले आहे. तर चांदीच्या भावात देखील मोठी कपात झाली आहे. प्रति किलोमागे ₹१,५०० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. सध्या चांदीचे दर १ लाख ५५ हजार रुपये प्रति किलो वर आले आहेत.
-
अमरावती मेळघाट मार्गावर ट्रक पलटी, मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान वाहतूक ठप्प
अमरावतीच्या मेळघाटमधील धारणी-परतवाडा रोडवर आज सकाळी मोठा अपघात झाला आहे. घटांग गावाजवळ एका मालवाहू ट्रकचा अपघात होऊन तो रस्त्यावर पलटी झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अपघातामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या प्रचंड लांब रांगा लागल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
-
ठाणेकरांनो लक्ष द्या! या भागांमध्ये बुधवारी पाणी नाही
ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) हद्दीतील वागळे, लोकमान्य नगर, सावरकर नगर आणि इंद्रानगर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या परिसरांमध्ये बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत, तब्बल २४ तासांसाठी हा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे.
-
ठाण्यात निघणार संविधान गौरव रॅली, जितेंद्र आव्हाड राहणार उपस्थित
भारताला संसदीय लोकशाही देणाऱ्या संविधानास यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता ठाण्यात भव्य -दिव्य संविधान रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड आणि ज्येष्ठ विधितज्ञ असीम सरोदे हे सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या नगरीत दाखल, रोड शो ला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या नगरीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या रोड शो ला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील ८ लाख नागरिकांना आमंत्रण देण्यात आले आहे.
-
जिथे कमी तिथे मी, सत्ता येत-जात असते, चांगले दिवस येतील – सुवर्णा पाटील
सातारा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांचा सातारा शहरात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. सातारा नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजेंच्या आव्हानापेक्षा जनतेने त्यांना आव्हान दिलं आहे. सातारा शहरात मागील 35 वर्षात कोणताही विकास झाला नाही. अनेक सुविधांचा अभाव आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मला ही संधी आहे. जिथे कमी तिथे मी, सत्ता येत असते जात असते. संध्याकाळ नंतर नक्कीच सकाळ येते. हा जनसमुदाय पाहून चांगले दिवस येतील असा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुवर्णा पाटील यांनी दिली.
-
निवडणुकीमुळे 28 शस्त्रे पोलिसांकडे जमा
अकरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील एकूण 29 शस्त्र परवाने जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते आदेश. पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून पोलिस ठाणेनिहाय आतापर्यंत 28 शस्त्र परवाने जमा. विधानसभा निवडणूक कालावधीत ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीतील एकूण ७२९ परवानाधारकांची शस्त्रे करण्यात होती जमा
-
दक्षिण सोलापुरातील वांगी गावात दोन जिवलग मित्रांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना
वांगी गावातील गोरख भोई आणि सुरेश भोई असे आत्महत्या केलेल्या जिवलग मित्रांची नावे. आधी गोरख भोई यांनी आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर गोरख भोई याचा अंत्यविधी सुरू असतानाच सुरेश भोई यानेही आत्महत्या केल्याची प्रत्यक्षदर्शीची माहिती
-
धर्मेंद्र यांच्या फार्म हाऊस समोर ग्रामस्थांनी वाहिली श्रद्धांजली
मावळ तालुक्यातील औंढे येथील ग्रामस्थांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. गावातील लोकांनी त्यांच्या सोबत घालवलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण झाले.
-
शिरूरच्या शिंदोडी येथे बिबट्याचा हल्ला
शिरूर तालुक्यातील शिंदोडी परिसरात रात्री बिबट्याने अचानक हल्ला चढवून शेतकऱ्याच्या दोन जर्सी कालवडांला जखमी केले यामध्ये एक कालवड मृत झाले असून दुसरी गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पशुधन सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता पसरली
-
अकरा नगर परिषदांसाठी निवडणूक निरीक्षकांच्या नियुक्ती
नाशिक जिल्ह्यातील अकरा नगर परिषदांसाठी निवडणूक निरीक्षकांच्या नियुक्ती. निवडणूक पारदर्शक पडण्यासाठी निरीक्षकांच्या नियुक्ती. आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांना निरीक्षकांकडे करता येणार तक्रार. अकरा नगरपरिषदांसाठी चार निरीक्षकांची नियुक्ती
-
कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी
शिवसेना उबाठा पक्षाकडून कोळसेवाडी पोलिसांना निवेदन देत केली मागणी…. अर्णव खैरे मृत्यू प्रकरणाला राजकीय रंग देत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण दुषित करत भाषावाद–प्रांतवाद–धर्मवाद करून ठाकरे बंधूंवर बेछूट आरोप करत वातावरण बिघडवल्याचा आरोप… पोलिसांनी कारवाई न केल्यास न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा ठाकरेच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचा थेट इशारा..
-
शिक्षक पात्रता परीक्षेला 1987 विद्यार्थ्यांची दांडी
नाशिक शहरातील 86 केंद्रांवर 31 हजार 32 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा… दोन सत्रात घेण्यात आले होते शिक्षक पात्रता परीक्षेचे पेपर… पेपर एक साठी 32 केंद्रांवर 12 हजार 383 परीक्षार्थी उपस्थित होते तर 821 जण होते अनुपस्थित… पेपर दोन साठी 54 केंद्रांवर 17 हजार 661 परीक्षार्थी होते उपस्थित तर 1 हजार 166 परीक्षार्थी होते अनुपस्थित…
-
देशातील तिसरे मोठे आयटी पार्क सोलापुरात होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट लवकरच साकारणार… दक्षिण सोलापुरातील होटगी गावनाजीक 50 एकरावर हे आयटी पार्क उभारण्यात येणार आहे… येत्या 18 महिन्यांमध्ये हे आयटी पार्क उभा करण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात आयटी पार्क करणार असल्याची घोषणा केली होती… या आयटी पार्कमुळे जवळपास 2 लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे…
-
नाशिक – जिल्ह्यातील अकरा नगर परिषदांसाठी निवडणूक निरीक्षकांच्या नियुक्ती
निवडणूक पारदर्शक पडण्यासाठी निरीक्षकांच्या नियुक्ती.. आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांना निरीक्षकांकडे करता येणार तक्रार… अकरा नगरपरिषदांसाठी चार निरीक्षकांची नियुक्ती… तीन निरीक्षकांकडे प्रत्येकी तीन तीन नगरपरिषदा तर एका निरीक्षकांकडे दोन नगरपरिषद निरीक्षक म्हणून कार्यभार…
-
जिल्ह्यातील अकरा नगर परिषदांसाठी निवडणूक निरीक्षकांच्या नियुक्ती
निवडणूक पारदर्शक पडण्यासाठी निरीक्षकांच्या नियुक्ती… आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांना निरीक्षकांकडे करता येणार तक्रार… अकरा नगरपरिषदांसाठी चार निरीक्षकांची नियुक्ती… तीन निरीक्षकांकडे प्रत्येकी तीन तीन नगरपरिषदा तर एका निरीक्षकांकडे दोन नगरपरिषद निरीक्षक म्हणून कार्यभार..
-
महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ
महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचे समोर येत आहे. एका प्रभागातील किमान अडीच ते तीन हजार मतदार दुसऱ्या प्रभागात दाखविण्यात आल्याने इच्छुकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत २०० पेक्षा अधिक आक्षेप दाखल झाले तर पुढील तीन दिवसांत हा आकडा आणखी बराच वाढण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ पर्यंतची अपडेट मतदार याद्या महापालिकेला निवडणुकीसाठी सोपविल्या होत्या.
-
कल्याणच्या लेडीज बारचा बिघडला ताल…
मध्यरात्री कल्याणच्या ताल बारवर पोलिसांची धाड; १५ बारबाला आणि एकूण २८ जणांवर गुन्हा दाखल… अश्लील नृत्य, डीजेचा कर्कश आवाज आणि परवानगीच्या अटींचे उल्लंघन करत पहाटेपर्यंत सुरू असल्याने केली कारवाई… डीसीपी अतुल झेंडे यांच्या पथकाची कारवाई… बारचे मालक, चालक, मॅनेजरसह 6 जणांना ताब्यात
Published On - Nov 25,2025 8:10 AM
