Maharashtra Political News LIVE : चांदीवलीत मनसेचा वाद चव्हाट्यावर;साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

| Updated on: Apr 03, 2024 | 7:25 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi: आज 2 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News LIVE : चांदीवलीत मनसेचा वाद चव्हाट्यावर;साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी नागपूर, रामटेक, वर्धा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आरोपींवर कारवाई सुरु आहे. आयुक्त विनय कुमार चौबे यांचा मोका पॅटर्न जोरात चर्चेत आहे. आयुक्त चौबे यांनी तीन महिन्यांत 36 गुन्हेगारांना मोका लावला आहे. नागपुरातील भाजपची महत्त्वपूर्ण बैठक रात्री दीड वाजता संपली तब्बल साडेतीन तास ही बैठक सुरू होती. बैठकीत 6 लोकसभा मतदार संघाच्या नियोजन संदर्भात चर्चा झाली. नागपूर महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीत आघाडी घेतली आहे. शेवटच्या तीन दिवसांत 22 कोटी रुपये गोळा केले आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 02 Apr 2024 06:55 PM (IST)

  जनतेच्या न्याय हक्कासाठी खळखट्याक करणाऱ्या मनसेतच राडा

  जनतेच्या न्याय हक्कासाठी खळ खट्याक करणारी मनसे मात्र आता आपापसात  राडा करताना दिसत आहे.मनसे पक्षात पुन्हा एकदा आमना सामना पाहायला मिळाला आहे. आर्थिक आणि अंतर्गत वाद झाल्याचं समोर आलं आहे. मनसेचे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्या कार्यकर्त्यांनी कामगार सेना उपाध्यक्ष राज पार्टे यांच्या कामगारांना भर रस्त्यात हत्यारांच्या साह्याने चांदीवली येथे मध्य रात्री बेदम मारहाण केली आहे. मारहाणीत 2 जण गंभीर जखमी झाले.

  प्रकाश रिंगे आणि अनुप राणा अशी जखमींची नावे असून राजावाडी रुग्णालयात उपचार घेत आहेत.तर या बाबत साकीनाका पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला आहे.या प्रकरणी पुढील तपास साकीनाका पोलिस करत आहे.. कठोरात कठोर कारवाई ची मागणी जखमी कामगाराने केली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे मध्ये झालेल्या आपापसात वादा मुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चेला उधाण आले आहे.

 • 02 Apr 2024 06:15 PM (IST)

  धाराशिव येथील महाविकास आघाडी पदाधिकारी मेळाव्यात उडवली खिल्ली

  शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीवर टीका केलीय. महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्याच्या मुद्द्यावरुन टीका करण्यात आली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव येथील महाविकास आघाडी पदाधिकारी मेळाव्यात खिल्ली उडवली. मटक्याच्या आकड्यासारखे आजचा उमेदवार कोण ? अशी रोज सकाळ दुपार अशी वेगवेगळी नावे समोर येत आहेत, असं निबांळकर म्हणाले.

 • 02 Apr 2024 05:52 PM (IST)

  कर्नाटकचे लोक भ्रष्टाचार सहन करत नाहीत - शाह

  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंगळुरू येथील शक्ती केंद्र प्रमुख परिषदेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, कर्नाटकातील जनता भ्रष्टाचार सहन करत नाही.

 • 02 Apr 2024 05:35 PM (IST)

  संजय सिंह यांना जामीन मिळाल्यावर राघव चढ्ढा म्हणाले की..

  संजय सिंह यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मिळाल्याबद्दल राघव चढ्ढा म्हणाले की, आजचा दिवस आम आदमी पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी खूप भावनिक आहे. आपला सिंह संजय सिंह यांच्या सुटकेने आज आनंद आहे जो शब्दात व्यक्त करता येणार नाही.

 • 02 Apr 2024 05:25 PM (IST)

  छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमकीत नऊ नक्षलवादी ठार

  छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गांगलूर पोलिस स्टेशन परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी नक्षलविरोधी कारवाईसाठी सुरक्षा दल पाठवण्यात आले. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत नऊ नक्षलवादी ठार झाले आहेत.

 • 02 Apr 2024 05:12 PM (IST)

  जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे वाहन दरीत पडल्याने एकाचा मृत्यू

  जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात मंगळवारी एक वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत पडल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. आसर-बुलंदपूर येथे एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले असता कमल सिंग (27) यांना मृत घोषित करण्यात आले.

 • 02 Apr 2024 04:00 PM (IST)

  उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू

  पुण्यातील ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उंदीर चावून रुग्णाचा मृत्यू आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे.

 • 02 Apr 2024 03:50 PM (IST)

  रविकांत तुपकर लोकसभेच्या रिंगणात

  शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभेसाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे. तुपकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरण्यापूर्वी तुपकर यांनी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले.

 • 02 Apr 2024 03:40 PM (IST)

  दादा भुसे तातडीने मुंबईकडे

  नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मालेगावहून मुंबईकडे तातडीने रवाना झाले. यवतमाळ दौरा रद्द करून दादा भुसे तातडीनं मुंबईला रवाना झाले. हेमंत गोडसे, भाऊ चौधरी आणि शिवसेनेचे पदाधिकारी सकाळपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. नाशिकची जागा शिवसेनेलाचं मिळावी, यासाठी हेमंत गोडसे प्रयत्नशील असल्याचे समजते.

 • 02 Apr 2024 03:30 PM (IST)

  हेंमत गोडसे आमच्याकडे येणार -सुषमा अंधारे

  उन्मेश पाटलांचं माहिती नाही. पण हेमंत गोडसे आमच्याकडे कमबॅक करतील. शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार नाही. म्हणून गोडसे आमच्यासोबत येतील. भाजप सर्वेचे कारण दाखवत जास्त जागा पदरात पाडून घेत आहेत, असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.

 • 02 Apr 2024 03:20 PM (IST)

  रामदास कदमांकडून जमीन घोटाळा, अनिल परब यांचा घणाघाती आरोप

  रामदास कदम यांच्याकडून जमीन घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. कदम यांचे 12 ते 13 घोटाळे मी बाहेर काढणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. कदमांच्या घोटाळ्याचे पुरावे मी किरीट सोमय्यांना देणार, हिंमत असेल तर त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करावा, असा टोला पण त्यांनी हाणला.

 • 02 Apr 2024 03:10 PM (IST)

  देशात उष्णतेची लाट तीव्र

  देशात उष्णतेची तीव्र लाट येणार आहे. लोकसभेची निवडणूक असल्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, असे केंद्रीय विज्ञानमंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले आहे.

 • 02 Apr 2024 03:02 PM (IST)

  शिरुरचा खासदार राष्ट्रवादीचा

  अजित पवार यांनी शिरूरचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल असा चंग बांधल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. आपण मागील पाच वर्ष माजी खासदार आसलो तरी लोकांची मदार ही माझ्यावर होती. मला चांगला प्रतिसाद मिळत आहे मीडियावर काहीही असो मात्र ग्राउंड रियालिटी खूप वेगळी आहे, असे ते म्हणाले.

 • 02 Apr 2024 02:53 PM (IST)

  भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार

  जळगाव - भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गटाचे शिवबंधन हाती बांधणार आहेत.

 • 02 Apr 2024 02:31 PM (IST)

  अमरावती लोकसभा निवडणुकीत चुरस वाढली

  अमरावती - आनंदराज आंबेडकर यांच अमरावतीत जोरदार शक्ति प्रदर्शन. आनंदराज आंबेडकर यांचा अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅली काढत उमेदवारी अर्ज केला दाखल. अमरावतीत वंचित बहुजन आघाडी सुद्धा पाठिंबा देणार असल्याची चर्चा..

 • 02 Apr 2024 02:28 PM (IST)

  आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना जामीन मंजूर

  नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना जामीन मंजूर. सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 • 02 Apr 2024 02:27 PM (IST)

  रोज 8 शेतकरी आत्महत्या होत आहे - रोहित पवार

  रोहित पवार- राज्यात एक सुद्धा शेतकरी आत्महत्या होऊ देणार नाही अशी शपथ घेतली होती. रोज 8 शेतकरी आत्महत्या होत आहे. कृषी मंत्री कुठं आहे बघितले का ? कृषिमंत्री दिसत नाही. तुम्हाला नुकसान होऊन मदत मिळाली का ? अतिवृष्टीचे पैसे मिळाले का, खासदार कुठे माहिती नाही.

 • 02 Apr 2024 01:56 PM (IST)

  जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी संजय राऊत यांची घेतली भेट

  पक्षाने तिकीट नाकारल्याने उन्मेश पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे...

 • 02 Apr 2024 01:35 PM (IST)

  सुषमा अंधारे यांचे मोठे विधान

  जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीकडे कुठलेही घोडं अडलं नाही, महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल. मात्र महायुतीमध्ये गोंधळाची परिस्थिती, महायुतीमध्ये जागावाटप संदर्भात गोंधळ असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

 • 02 Apr 2024 01:20 PM (IST)

  मुरलीधर मोहोळ आणि नारायण राणे यांची भेट

  पुणे लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. राणे यांच्या पुण्यातील निवासस्थानी झालेल्या या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली.

 • 02 Apr 2024 01:13 PM (IST)

  लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी जामखेड येथे भाजपची महत्त्वाची बैठक

  बैठकीसाठी पहिल्यांदाच आमदार राम शिंदे आणि भाजप खासदार सुजय विखे एकत्र येणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर राम शिंदे सुजय विखेंच्या प्रचाराला मैदानात उतरणार

 • 02 Apr 2024 12:50 PM (IST)

  रामदास कदमांकडून जमीन घोटाळा; अनिल परबांकडून आरोप

  रामदास कदमांकडून जमीन घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे  गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. "मी पुढील काळात 12-13 घोटाळे उघड करणार आहे. रामदास कदम यांनी मंत्री असताना अधिकारांचा गैरवापर केला. रामदास कदमांच्या दोन घोटाळ्यांची प्रकरणं किरीट सोमय्यांकडे देणार असून सोमय्यांकडे वेळ असेल तर त्यांना मी भेटायला तयार आहे," असं परब म्हणाले.

 • 02 Apr 2024 12:40 PM (IST)

  'रामायण'मध्ये श्रीराम यांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी भरला उमेदवारीचा अर्ज

  लोकसभा निवडणुकीसाठी अभिनेते अरुण गोविल यांनी उत्तरप्रदेशच्या मेरठमधून भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यही उपस्थित होते.

 • 02 Apr 2024 12:30 PM (IST)

  'आप'चे सर्व आमदार घेणार सुनीता केजरीवाल यांची भेट

  आम आदमी पक्षाचे (आप) सर्व आमदार लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत.

 • 02 Apr 2024 12:20 PM (IST)

  प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेची 7,311 कोटींची कमाई

  मध्ये रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या विभागातून प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय म्हणजेच आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्य रेल्वे सर्वाधिक प्रवाशांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे ठरली आहे. प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेला 7,311 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

 • 02 Apr 2024 12:10 PM (IST)

  पुढील दोन महिने उष्णतेच्या झळा वाढण्याची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

  यंदा कोकण किनारपट्टीचा अपवाद वगळता राज्यभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून उष्णतेच्या झळा वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागांत उष्णतेच्या लाटा येऊ शकतील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 • 02 Apr 2024 11:57 AM (IST)

  Live Update | पुणे , बारामती , शिरूर लोकसभेसाठी आता महिला आघाडीच्या समन्वय बैठका सुरू होणार

  आज पुण्यात महिला आघाडीची समन्वय बैठक... बैठकीला प्रमुख महिला पदाधिकारी राहणार उपस्थित... महिला आघाडीचं प्रचाराच नियोजन करण्यासाठी आज बैठकीचं आयोजन... महायुती आता महायुतीतील महिला आघाडीचा पण समन्वय साधणार

 • 02 Apr 2024 11:45 AM (IST)

  Live Update | नाना पटोले यांना काँग्रेसमध्ये कोणीच गांभीर्याने घेत नाही - अशोक चव्हाण

  नाना पटोले यांना काँग्रेसमध्ये कोणीच गांभीर्याने घेत नाही... नाना पटोले यांना न विचारता उमेदवार डिक्लेअर होत आहेत... नाना पटोले यांच्या टीकेला अशोक चव्हाण यांचे उत्तर

 • 02 Apr 2024 11:37 AM (IST)

  Live Update | नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग

  नवी मुंबईतील पावणे कोपर खैरणे एमआयडीसी मधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग... आगीचे कारण अद्याप अस्पष्ट... अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल... आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू... केमिकल कंपनी असल्याने आग पसरण्याची भीती

 • 02 Apr 2024 11:25 AM (IST)

  Live Update | महायुतीने तीन दिवसापूर्वी माझ्या विश्वास टाकून माझी उमेदवारी निश्चित केली आहे - सुनेत्रा पवार

  दौंड तालुका हा सुजलाम सुफलाम आहे.... दौंड तालुक्यात आमदार राहुल कुल अतिशय चांगले काम करीत आहेत.. दौंड तालुक्यात जी सुबत्ता दिसते यावरून दादांनी केलेला विकास लक्षात येतो... माझा तळागाळातील शेतकरी यांचे कामे करण्यासठी दादा कायमस्वरूपी तत्पर... केंद्रात आणि राज्यात एकच विचाराचा सरकार असल्यास विकास होतो... मोदींचा विचाराचा खासदार निवडून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे.. असं वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केलं.

 • 02 Apr 2024 11:09 AM (IST)

  Live Update | महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज दौंड तालुक्यात गाव भेट दौऱ्यावर

  दौंड तालुक्यातील कानगाव येथे सुनेत्रा पवार दाखल... राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर... सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद... सुनेत्रा पवार आज दिवसभर दौंड तालुक्यात..

 • 02 Apr 2024 11:01 AM (IST)

  रामदास आठवलेंना जागा न सोडल्याने आठवले गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक

  रामदास आठवलेंना जागा न सोडल्याने आठवले गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.  22 एप्रिल पर्यंत शिर्डीची जागा आठवले गटाला सोडावी, अन्यथा अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी मतदारसंघात आरपीआयचे उमेदवार उभे करणार . आरपीआयच्या अस्तित्वासाठी निवडणूक लढण्याचा निर्धार.

 • 02 Apr 2024 10:49 AM (IST)

  आदित्य ठाकरे यांचा 4 एप्रिल रोजी बुलढाणा दौरा

  आदित्य ठाकरे यांचा 4 एप्रिल रोजी बुलढाणा दौरा.  ठाकरे गटाचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.  आदित्य ठाकरे प्रचार फेरीला उपस्थिती लावणार असून सभेला देखील संबोधित करतील.

 • 02 Apr 2024 10:28 AM (IST)

  अमरावती लोकसभेसाठी आनंदराज आंबेडकर आज 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार

  अमरावती लोकसभेसाठी आनंदराज आंबेडकर आज 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार.  वंचित बहुजन आघाडी आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा. अमरावतीत प्रकाश आंबेडकर मोठी खेळी करण्याची शक्यता.

  प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर व मुलगा सुजात आंबेडकर हे अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार.

 • 02 Apr 2024 10:18 AM (IST)

  पतंजलीचे रामदेव बाबा व आचार्य बाळकृष्ण आज सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याची शक्यता

  पतंजलीचे रामदेव बाबा व आचार्य बाळकृष्ण आज सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याची शक्यता.  दिशाभूल करणाऱ्या जाहिराती चालवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात रामदेव बाबांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. मागील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना हजर होण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला होता . त्यानुसार आज पतंजलीचे रामदेव बाबा व आचार्य बाळकृष्ण सर्वोच्च न्यायालयात हजर राहू शकतात

 • 02 Apr 2024 10:08 AM (IST)

  विजय शिवतारे अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरीवर दाखल

  विजय शिवतारे अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरीवर दाखल झाले. बारामतीतून माघार घेतल्यानंतर पहिल्यांदाच घेणार अजित पवारांची भेट.

 • 02 Apr 2024 09:57 AM (IST)

  पुरंदरमध्ये महायुतीची समन्वयकांची बैठक

  विजय शिवतारे यांच्या माघारीनंतर पुरंदरमध्ये महायुतीची समन्वय बैठक होत आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघात आज महायुतीची समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.  बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आलीय. बैठकीला महायुतीचे आजी माजी आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 • 02 Apr 2024 09:45 AM (IST)

  दोन शहरांच्या नामकरण याचिकेची सुनावणी पूर्ण

  धाराशिव की उस्मानाबाद आणि छत्रपती संभाजीनगर की औरंगाबाद या नामकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायाललयात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी पूर्ण झालीय. प्रकरण निकालासाठी ठेवले राखीव, कोर्ट कधीही निकाल जाहीर करू शकते. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अरिफ डॉक्टर या खंडपीठाने निकाल राखीव ठेवला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव तर औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती.

 • 02 Apr 2024 09:30 AM (IST)

  महायुतीची बारामती लोकसभेसाठी सभा आज जाहीर होणार

  सासवडच्या पालखी मैदानावर महायुतीची बारामती लोकसभेसाठी जाहीर सभा होणार आहे,  विजय बापू शिवतारे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. सभेची तारीख आज निश्चित होणार आहे.  पालखी तळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. पुढील आठवड्यात सभा होण्याची शक्यता आहे. विजय बापू शिवतारे यांनी माघार घेतल्यानंतर होणार पहिलीच जाहीर सभा होणार आहे.

 • 02 Apr 2024 09:15 AM (IST)

  भाजप उमेदवार नितीन गडकरी यांची आज प्रचाररॅली

  नागपुरातील दक्षिण पश्चिम मतदारसंघात आज भाजप उमेदवार नितीन गडकरी यांची प्रचार रॅली होणार आहे.  गडकरीसोबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा लोक संवाद यात्रेत सहभागी होणार आहेत. गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचा आज चौथा दिवस आहे. गडकरींच्या प्रचार शिगेला पोहचला आहे. दक्षिम पश्चिम विधानसभा मतदार संघ हा देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे.

 • 02 Apr 2024 08:57 AM (IST)

  Maharashtra News : हेमंत पाटील समर्थकांचा ताफा घेऊन येणार मुंबईत

  हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील समर्थकांचा 250 ते 300 गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे होणार रवाना. हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचं तिकीट कापलं जाईल ही चर्चा. खासदार हेमंत पाटील समर्थक आक्रमक. पदाधिकारी, कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत घेणार भेट. नांदेड ,यवतमाळ ,हिंगोली लोकसभा क्षेत्रातील 250 ते 300 गाड्यांचा ताफा मुंबईकडे होणार रवाना.

 • 02 Apr 2024 08:46 AM (IST)

  Maharashtra News : पोपटांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तिघांना अटक

  पुणे शहरात अलेक्झांड्रिन पोपटांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तिघांना वन विभागाने सापळा रचून अटक केलीय. त्यांच्या ताब्यातून दोन पोपट जप्त केले आहेत. पुण्यातील औंध येथील लोहिया आयटी पार्कजवळ रविवारी ही कारवाई करण्यात आली. पियुष पासलकर, यश कानगुडे आणि सौरव झोरे असे गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.

 • 02 Apr 2024 08:21 AM (IST)

  Maharashtra News : आमदार बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर सडकून टीका

  अमरावती लोकसभेच्या निवडणूकीच वातावरण तापलं. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी घेतला कार्यकर्ता मेळावा.17 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेईज्जती केली. 2 कोटीच्या गाडीत फिरायचं व 17 रुपयाच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका. बच्चू कडू यांच्याकडून राणा दाम्पत्याचा खरपूस समाचार. 17 रूपयाची साडी मत परिवर्तन करू शकत नाही. राणांनी मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्यांवर बच्चू कडू यांची टीका

 • 02 Apr 2024 08:19 AM (IST)

  Maharashtra News : नाशिक शिवसेनेत होऊ शकत मोठं बंड

  नाशिकच्या जागेचा महायुती मधील तिढा कायम. हेमंत गोडसे यांच्यासह दादा भुसे आणि भाऊसाहेब चौधरी आज पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी. सकाळी 11 वाजता घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. नाशिकची जागा भुजबळांची मागणी नसताना त्यांना दिल्यास शिवसेनेत होऊ शकत मोठं बंड.

 • 02 Apr 2024 07:55 AM (IST)

  चाकणमध्ये कंटेनरला भीषण आग

  पुण्यातील चाकणच्या महिंद्रा चौका जवळ उभा असलेल्या कंटेनरला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जीविहितहानी झालेली नाही. तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले गेले.

 • 02 Apr 2024 07:43 AM (IST)

  कांदा काढण्यास शेतकऱ्यांची लगबग

  मावळ तालुक्यात कांदा काढण्यास शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मावळ तालुक्याच्या पूर्व भागातील कांदा पीक काढणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. मावळ तालुक्याच्या पूर्व भागातील तळेगाव दाभाडे, माळवाडी, कोटेश्वर वाडी, इंदोरी जांबवडे, सुदबडी या गावातील शिवराम मध्ये कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

 • 02 Apr 2024 07:31 AM (IST)

  पिंपरी चिंचवड मनपात 150 फायरमनची भरती

  पिंपरी चिंचवड मनपात महापालिकेचा अग्निशमन विभाग सक्षम होणार आहे. त्यांनी 150 फायरमनची भरती केली आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना लोकवस्त्या आणि औद्योगिक भागात सातत्याने लहान-मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत. मात्र अग्निशमन केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने आगीच्या घटनांवर नियंत्रण आणताना अडचणी येतात.

 • 02 Apr 2024 07:20 AM (IST)

  काँग्रेस ग्रुप अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल

  जुनी व्हिडीओ क्लिप व्हायरल केल्यामुळे ग्रुप अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल झाला आहे. रामदास तडस यांच्या तक्रारीवरून काँग्रेसच्या ग्रुप अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल झाला आहे. जुना व्हिडीओ प्रसारित केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या ‘एक्स’ खात्याच्या अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल झाला आहे. आदर्श आचारसंहिता लागू असताना हा खोडसाळ प्रकार केल्याचा आरोप आहे.

Published On - Apr 02,2024 7:18 AM

Follow us
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.