Independence Day Celebration 2025 LIVE : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प वॉशिंग्टनहून अलास्काला रवाना
India Independence Day Celebration 2025 Maharashtra LIVE:

Independence day: प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आज आनंदाचं वातावरण आहे. कायम भारतात आज 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी प्रचंड खास आहे. कारण भारताला शत्रूंपासून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातःचा प्राणाची आहुती दिली. हा दिवस स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुबेच्छा दिल्या आहेत. लाल किल्ल्यावरुन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय नागरिकांना संबोधित करतील. या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आजच्या दिवशी मोदी कोणती नवीन घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे… स्वातंत्र्यदिनाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर…
LIVE NEWS & UPDATES
-
नांदगावात मुसळधार पावसाची हजेरी
नांदगावात मुसळधार पावसाची हजेरी तासभर सुरु असलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी शहरातील शाकंभरी व लेंडी नदीला पाणी वाहू लागले सब वे मध्ये पाणी साचले, नागरिकांना काढावा लागतोय पाण्यातून मार्ग
-
बीडच्या जिल्हा रुग्णालयाचं छत कोसळलं
बीडच्या जिल्हा रुग्णालयाचं छत कोसळलं
रुग्ण असलेल्या कक्षातील छत अचानक कोसळलं
या घटनेत एक रुग्ण किरकोळ जखमी
जिल्हा रुग्णालयाची इमारत धोकादायक स्थितीत.
पाऊस कोसळत असल्याने जीर्ण झालेलं छत आणखी कोसळण्याची शक्यता
-
-
मुंबईतील वांद्रे येथे गेल्या 48 तासांत रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू
गेल्या 48 तासांत मुंबईतील वांद्रे येथे झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मर्सिडीज कारने धडक दिल्याने एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे, तर हिट अँड रनच्या इतर दोन प्रकरणांमध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
-
केंद्राचा 12 आणि 28 टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा प्रस्ताव
केंद्र सरकारने जीएसटीचे सध्याचे 12 आणि 28 टक्के स्लॅब रद्द करण्याचा प्रस्ताव दिला आहे. 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन दर प्रस्तावित केले आहेत. सरकारी सूत्रांनुसार, सध्या 28 टक्के श्रेणीत येणाऱ्या सुमारे 90 टक्के करपात्र वस्तू सुधारित जीएसटी प्रणालीमध्ये 18 टक्के श्रेणीत येतील.
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प वॉशिंग्टनहून अलास्काला रवाना
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी भेटीसाठी वॉशिंग्टनहून अलास्काला रवाना झाले आहेत. आज रात्री दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
-
-
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची आमदार संजय केनेकर यांनी घेतली भेट
छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज मांसबंदी असताना बिर्याणी करून खाल्ली आणि इतरांना खाऊ घातली. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करावा अशी मागणी घेऊन भाजपा आमदार संजय केनेकर हे सरळ छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या घरी येऊन धडकले आहेत. आज सुट्टी असल्याने पोलीस आयुक्त घरी असल्याने केनेकर सरळ घर गाठत त्यांना निवेदन दिले आहे .
-
इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं त्यांच्या देशात आपला तिरंगा अभिमानाने फडकतोय- मंगेश चव्हाण
आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं त्यांच्या देशात आपला तिरंगा अभिमानाने फडकतोय. भाजप आमदार मंगेश चव्हाण इंग्लंड दौऱ्यावर आहेत. लंडनमध्ये त्यांनी भारतीयांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. लंडन मधील स्वातंत्र्य दिनाचे काही क्षण त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केले आहे..
-
मुसळधार पावसाने तेरणा डॅम ओव्हरफ्लो, पर्यटनासाठी लोकांची गर्दी
धाराशिव जिल्ह्यात 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालंय. तसेच जिल्ह्यातील लहान-मोठी धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. धाराशिव तालुक्यातील महत्त्वाचे असलेले तेरणा डॅम ओव्हरप्लो झालाय. तेरणा डॅमवर लोक पर्यटनासाठी गर्दी करत आहेत. डॅमवरील अरुंद फुलांवर लोकांनी गर्दी केलीय. सुट्टी असल्यामुळे कुटुंबासह पर्यटनाला येत आहेत. तरुणांची गर्दी आहे. पाण्याचा प्रवाह मोठा आहे मात्र प्रशासनाकडून कोणतीही काळजी घेतली जात नाही.
-
परतूर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी;टाकळी येथील कसुरा नदीला पूर
जालना जिल्ह्यातल्या परतुर तालुक्यात 6 ते 7 दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाला गुरुवारपासून सुरुवात झाली. पावसाचा आज दुपारी जोर अधिकच वाढल्यामुळे टाकळी परिसरात कसुरा नदीला पूर आला. तर दुसरीकडे तालुक्यातीलच श्रीष्ठी वाहेगाव आणि आसपासच्या परिसरात देखील पावसाने जोरदार बॅटिंग केली.पाणी साचलं होतं.
-
केबल टाकण्यासाठी ड्रेनज लाइनमध्ये उरलेल्या 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती
पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. केबल टाकण्यासाठी ड्रेनज लाइन मध्ये उरलेल्या 3 कामगारांचा मृत्यू झाला आहे. निगडी परिसरात ही घटना घडली तिन्ही कामगार एका खासगी मोबाईल कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती आहे. दत्ता होलारे, लखन धावरे आणि साहेबराव गिरसेप अशी मृत कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
-
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. चांदूरबाजार तालुक्यातील माधान, सोनरी गावात मोठा पाऊस झाला आहे. पावसामुळे माधान गावात मोठ्या प्रमाणावर शिरले. पाणी अनेक घरात पाणी शिरल्याने नुकसान झालं आहे. पावसामुळे शेतीचही मोठं नुकसान झालंय. तसेच शेतात तलाव सदृश्य स्थिती झाली आहे.
-
वसई-विरार-नालासोपारापर्यंत पावसाचा जोर वाढला; काही भागात पाणी साचायला सुरुवात
वसई-विरार-नालासोपर्यत आज दुपार नंतर पावसाने आपला जोर वाढवल्याचं दिसून येत आहे. रिमझीम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे सकल भागात काही प्रमाणात पाणी साचायला सुरवात झाली आहे.
-
जितेंद्र आव्हाडांची मांस विक्रीवरील बंदीच्या निर्णयाला विरोध; हिंदू खाटीक संघटनेच्यावतीने कौतुक
मांस विक्रीवर बंदीच्या निर्णयाचा जितेंद्र आव्हाडांनी देखील निषेध केला. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करत हिंदू खाटीक संघटनेच्यावतीने फुलांचा गुच्छ देत आव्हाडांचे आभार मानले.
-
रस्त्यासाठी बुलढाण्यातील आडोळ खुर्द ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन
बुलढाण्यातील आडोळ खुर्द ग्रामस्थांनी रस्त्यासाठी जलसमाधी आंदोलन केलं आहे. रस्त्याच्या मागणीसाठी पोलिसांसमोरच नदीत उडी मारली. पोलिसांनी वेळीच सर्व परिस्थिती हाताळली.
-
मांसबंदी निर्णयाचा इम्तियाज जलील यांच्याकडून निषेध
मांसबंदी निर्णयाचा इम्तियाज जलील यांच्याकडून निषेध करण्यात आला. देशातील अनेक महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेऊन चिकन-मटणावर बंदीची चर्चा महत्त्वाची आहे का असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. या बंदीचा निषेध करत छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांनी चिकन-मटण पार्टीचे आयोजन केलं आहे.
-
स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी शहरातून तिरंगा रॅली
स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. गांधी चौक येथील स्मारकास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. इगतपुरी पोलिस ठाणे, लोहमार्ग पोलिस ठाणे, लिटिल ब्लॉसम स्कूलचा रॅलीत सहभाग झाले. रॅलीत विद्यार्थ्यांनी नशामुक्तीचे फलक हातात घेत जनजागृती केली.
-
2014 नंतर देश खड्ड्यात
आज काही लोकांना वाटते की या देशाला 2014 साली स्वातंत्र्य मिळाले. पण 2014 नंतर देश स्वतंत्र झाला नाही तर खड्ड्यात गेला आहे.धार्मिक फूट ही देशाच्या स्वातंत्र्याला धोकादायक ठरत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
-
मंत्रीपद वाचल्याने कोकाटेंनी नवस फेडला
माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपद वाचावं यासाठी नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ या ठिकाणी शनीमंदिर या ठिकाणी साकडं घातलं होतं, त्यामुळे नवस फेडण्यासाठी कोकाटे पुन्हा शनिमंदिरात दाखल झालेत आणि त्यांनी नवस फेडला.
-
खड्डे प्रश्नी मनसेचे केडीएमसी मुख्यालयासमोर आंदोलन
ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले खड्ड्यांपासून कधी मिळणार?हातात फलक घेत मनसेने गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केले आहे.
-
अकरा किलोचा सुवर्ण कलशारोहण
आळंदीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 जन्मोत्सवानिमित्ताने समाधी मंदिरावर अकरा किलोचा सुवर्ण कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे. सोहळ्याची सुरुवात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वार पूजनाने होणार असून कलशाची पूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
-
राऊतांनी मोदींवर डागली तोफ
पाकला शिव्या देणं सोप, ट्रम्प यांचं नाव घ्या, चीनला शिव्या देण्याची हिम्मत दाखवा असा टोला संजय राऊतांनी मोंदींना लगावला.
-
मंत्रीपद वाचावं यासाठी साकडं घातलं होतं, त्यामुळे नवस फेडण्यासाठी माणिकराव कोकाटे पुन्हा शनिमंदिरात दाखल
नंदूरबार फ्लॅश :- माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपद वाचावं यासाठी नंदुरबार तालुक्यातील शनीमंदिर येथे साकडं घातलं होतं, अखेर त्यांचा खातेबदल झाला पण मंत्रीपद वाचलं, त्यामुळे नवस फेडण्यासाठी कोकाटे पुन्हा शनिमंदिरात दाखल झालेत.
पूजा अर्चा करत त्यांनी नवस फेडला.
माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपद जाणार होतं, त्यासाठी शनी मंदिरात मंत्रीपद जाऊन यासाठी नवस केला होता.
-
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवे वर वाहनांच्या रांगा
सलग आलेल्या सुट्ट्या, स्वातंत्र्य दिन आणि लॉन्ग वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पुण्याकडील लेनवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे, तर लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर यांसारख्या पर्यटन स्थळांकडे वाढलेल्या पर्यटकांच्या ओढ्यामुळे महामार्गावरील गती मंदावली आहे.
-
श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ मंत्र्यांच्या गाड्या येऊ देऊ नका – प्रताप सरनाईक यांचे आदेश
श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ मंत्र्यांच्या गाड्या येऊ देऊ नका, माझ्यापासून सुरुवात करा म्हणत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले.
तुळजापूर शहरातील भवानी रोडवरील लोखंडी गेट पासून मंदिर संस्थांच्या तीन चाकी गाडीमध्ये प्रत्येकाला मंदिराकडे पाठवावे अशी सूचना पालकमंत्र्यांनी दिली.
-
सोशल मीडियावर रिल्स तयार करून लोकांमध्ये दहशत माजवणाऱ्या अमरावतीतील राडा गॅंगच्या तरुणांना अटक
सोशल मीडियावर रिल्स तयार करून लोकांमध्ये दहशत माजवणाऱ्या अमरावतीतील राडा गॅंगच्या तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी शस्त्र जप्त केली .
रिल्स च्या माध्यमातून हे तरुण धमकावत असल्याचा प्रकार समोर आला होता. अखेर अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली
-
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण, पडताळणी सुरु, अदिती तटकरेंची माहिती
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या योजनेबाबत माहिती देताना आदिती तटकरे यांनी सांगितले की, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून केवळ ५०० रुपये दिले जात आहेत. ही योजना गरजू महिलांसाठी असून, चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या भागांमध्ये शासनाने चौकशी सुरू केली आहे. सुमारे १० ते १५ लाख महिलांचा डेटा चुकीचा आल्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. एक लाडकी बहीण कोणत्या ना कोणत्यातरी योजनेचा लाभ घेत असावी, अशी शक्यता असल्याने आम्ही यासाठी पडताळणी करत आहोत. यासाठी स्थानिक पातळीवर शासकीय कर्मचारी पडताळणी करत असून, चुकीचा लाभ घेणाऱ्या महिलांबाबत सुरू असलेल्या या चौकशीला लाभार्थ्यांनी सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली.
-
अमरावती चिकन-मटण विक्रीवर संमिश्र प्रतिसाद, काही ठिकाणी छुप्या पद्धतीने विक्री सुरु
स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावती महानगरपालिकेने चिकन आणि मटण विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला होता. या आदेशाला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. अनेक भागांमध्ये चिकन आणि मटणाची दुकाने बंद होती, तर काही ठिकाणी छुप्या पद्धतीने विक्री सुरू होती. त्यामुळे महानगरपालिकेच्या आदेशाचे पूर्णपणे पालन झाले नसल्याचे समोर आले आहे.
-
पुण्यातील कात्रज चौकात दुर्दैवी अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुण्यातील कात्रज चौकात एक दुर्दैवी अपघात घडला आहे. एका टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात कात्रज चौकात घडला असून. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
-
मालेगावात मटण आणि मांस विक्रेत्यांकडून आदेशाचे पालन, दुकाने ठेवली बंद
मालेगाव महानगरपालिकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त कत्तलखाने, मांस विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांना आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करत मालेगावातील मटण आणि मांस विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शहरातील कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने पूर्णपणे बंद होती.
-
महाराष्ट्र टपाल वर्तुळाची ‘शोले’ला सुवर्ण आदरांजली
महाराष्ट्र टपाल वर्तुळाची ‘शोले’ला सुवर्ण आदरांजली. जी. पी. सिप्पींच्या शोले चित्रपटाच्या 50 वर्षपूर्तीनिमित्त विशेष टपाल प्रकाशन. 2 पिक्चर पोस्टकार्ड्स आणि प्रेझेंटेशन पॅक सुवर्ण रद्दीकरणासह लोकार्पण. मुख्य टपाल महाप्रबंधक अमिताभ सिंग यांच्या हस्ते प्रकाशन. पहिला अल्बम दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना प्रदान. शहजाद सिप्पी, रोहन सिप्पी, किरण जोनेजा सिप्पी, शिवेंद्रसिंह डूंगरपूर यांची कार्यक्रमाला उपस्थिती.
-
कल्याण- डोंबिवली महापालिकेसमोर आंदोलन
कल्याण- डोंबिवली महापालिकेसमोर काँग्रेस आणि खाटिक संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. हातात कोंबड्या घेऊन काँग्रेसने हे आंदोलन केलंय. चिकन, मटण बंदीविरोधात काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जातंय.
-
पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल,पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
-
पीएम मोदींच्या भाषणातून नागरिकांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळते – एकनाथ शिंदे
“मोदी यांनी 12 वेळ लाल किल्ल्यावरुन भाषण केले. त्यातून नागरिकांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. त्यांनी सुदर्शन चक्राची घोषणा केली. भारताला ते पुढे नेणारे पंतप्रधान आहेत. ट्रम्प यांनी जो टॅरिफ लावला आहे, त्यावर मोदी यांनी भाष्य केले. हा देश कुणासमोर झुकणार नाही. महासत्तेकडे जाण्यापासून कोणी रोखणार नाही” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाकडे येणारे दोन्ही मार्ग बंद
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाकडे येणारे दोन्ही मार्ग पोलिसांनी केले बंद. दोन्ही बाजूला बॅरिगेड टाकून पोलिसांनी रस्ता केला बंद. आज काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, खाटीक संघटनेकडून आंदोलनाचा इशारा दिला होता. राजकीय इशाऱ्यानंतर पोलिसांकडून महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
-
सोलापूर महापालिकेच्या ध्वजारोहणावेळी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून अर्ध नग्न आंदोलन
महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी बोगस जातीचा दाखला वापरून नोकरी मिळवण्याचा आरोप… शासनाने या बोगस दाखल्याची चौकशी करावी या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले… यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्त गो बॅक असे बॅनर दाखवत केली घोषणाबाजी… दरम्यान पोलिसांनी प्रहार संघटनेच्या दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले… सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते महापालिकेत ध्वजारोहण करण्यात आले… या ध्वजारोहणावेळी हा सर्व प्रकार पाहायला मिळाला
-
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान नागरिकांचा आत्मदानाचा प्रयत्न…
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात महिलेसह दोन जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न… जिजामाता कन्या छात्रालयातील मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी महिलेचा अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न… लागलीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ तळला… प्रशासन व मंत्र्यांनी आपल्या मुलीला न्याय द्यावा व दोषींवर कारवाई करण्याची महिलेची मागणी…
-
राष्ट्र सुरक्षेसाठी कृष्णाच्या सुदर्शन चक्राचा मार्ग स्वीकारला – पंतप्रधान नरेंद्र मोदी
राष्ट्र सुरक्षेसाठी भारताचं ‘मिशन सुदर्शन चक्र’, ‘मिशन सुदर्शन चक्र’साठी शक्तिशाली शस्त्र वापरली जाणार… शस्त्र, तंत्रज्ञानाचा मिशन सुदर्शन चक्रमध्ये वापर केला जाणार… राष्ट्र सुरक्षेसाठी कृष्णाच्या सुदर्शन चक्राचा मार्ग स्वीकारला जाणार… असं देखील मोदी म्हणाले…
-
शेतकरी, मच्छीमार आणि कामगारांच्या हितासाठी मोदींची भिंत – पंतप्रधान नरेंद्र मोदी
शेतकरी, मच्छीमार आणि कामगार नागरिकांच्या हितासाठी मोदी भिंत बांधली गेली आहे. सरकारने फायलींमध्ये नव्हे तर देशातील नागरिकांच्या जीवनात महत्त्वाचं काम करावे. सरकारी योजना पूर्वीही होत्या. आम्ही त्या सत्यात उतरवल्या आहेत. आम्ही लोकांचा आत्मविश्वास जागृत केला आहे. आयुष्मान भारत योजनेने निरोगी जीवन जगायला आणि रोगांच्या भीतीशिवाय जगायला शिकवले आहे.
-
पीएम आवास योजनेमुळे 4 कोटी गरिबांना घरं मिळाली – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पीएम स्वानिधी योजनेमुळ गरिबांना आर्थिक लाभ झाला… पीएम आवास योजनेमुळे 4 कोटी गरिबांना घरं मिळाली… सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या… 25 कोटींहून अधिक नागरिक दागिद्र्य रेषेबाहेर… आज सरकार जनतेच्या दारी पोहोचतेय… असं देखील मोदी म्हणाले
-
तरुणांसाठी मोठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा…
1 लाख कोटींची योजना तरुणांसाठी चालू करत आहेत… तरुणांसाठी पंतप्रधान विकसित योजना आजपासून लागू… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तरुणांसाठी मोठी खूशखबर…
-
दिवळीत देशवासीयांना मिळणार मोठी भेटवस्तू – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
आज नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली… दिवाळीत देशवासीयांना मोठं गिफ्ट मिळणार आहे… जास्त प्रमाणात आकारले जाणारे कर आता कमी केले जाणार.. आम्ही नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म्स घेऊन येणार… भारत तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या मार्गावर आहे… असं मोदी म्हणाले…
-
आजच्या पिढीनं समृद्ध भारतासाठी पावलं उचलली पाहिजेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजच्या पिढीनं समृद्ध भारतासाठी पावलं उचलली पाहिजेत… देशाच्या विकासाठी मी तुमच्यासोबत आहे…. स्वतंत्र भारतासाठी अनेकांनी बलिदान दिलं… त्या पिढीनं बलिदान दिलम आताच्या पिढीनं समृद्ध भारत करावा… असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…
-
विकसित भारताचं संकल्प पूर्ण करण्यासाठी देशवासीयांची एकजूट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशातील तरुणांमुळे आपण आता खेळणी निर्यात करतोय… आत्मनिर्भर होण्यासाठी आपण अधिक चांगलं काम करू… नव- नवे शोध करुया आणि आपली गरज आपण स्वतःच पूर्ण करू… तुमच्या कल्पना आणि, मी तुमच्यासोबत उभा राहीन… असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…
-
न्यूक्लिअर क्षेत्रात प्रगती करत आहोत – पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपण न्यूक्लिअर क्षेत्रात प्रगती करत आहोत. 10 नवीन अणुभट्ट्या बांधण्याचे काम सुरू आहे. आपण अणुऊर्जेची क्षमता १० पट वाढवू. या क्षेत्रात खाजगी क्षेत्रासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
-
भारत सेमीकंडक्टर आणि ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होईल – पंतप्रधान नरेंद्र मोदी
आता मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येतील. आणखी चार सेमीकंडक्टर योजनांना हिरवा कंदील देण्यात आला आहे. परंतु या वर्षाच्या अखेरीस, भारतात बनवलेल्या, भारतातील लोकांनी बनवलेल्या, सेमीकंडक्टर चिप्स बाजारात येतील… असं देखली मोदी म्हणाले… ऊर्जे क्षेत्रात, सर्वांना माहिती आहे की आपण उर्जेसाठी अनेक देशांवर अवलंबून आहोत. पेट्रोल, डिझेल आणि गॅससाठी आपल्याला लाखो आणि कोटी रुपये खर्च करावे लागतात. आपल्याला या संकटातून देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे.
-
न्यूक्लिअर धमक्यांना आता आम्ही सहन करणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
आम्ही आता न्यूक्लिअरच्या धमक्या सहन करणार नाही. न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग बऱ्याच काळापासून सुरू आहे. पण आम्ही ते सहन करणार नाही. आमच्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे.
-
शत्रूंना आपल्याकडील शस्त्रांची कल्पानाही नाही – पंतप्रधान मोदी
शत्रूंवर केलेल्या हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, शत्रूंना आपल्याकडील शस्त्रांची कल्पानाही नाही… सामर्थ्य वाढवण्यासाठी आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे… दहशतवाद्यांना आम्ही सडेतोड उत्तर देणार… असं देखील मोदी म्हणाले…
-
सिंधू करार एकतर्फी होता: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताने ठरवलं आहे की रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. भारतीय नद्यांचे पाणी शत्रूंना पाणी देत आहे. भारताला त्याचा हक्काचं पाणी मिळेल. भारतातील शेतकऱ्यांचा पाण्यावर अधिकार आहे.
-
शेकडो किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली… – मोदी
पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून ऑपरेश सिंदूर राबवण्यात आलं होतं. त्यावर मोदी म्हणाले, शेकडो किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली… त्यामुळे 22 तारखेनंतर मी सैन्याला पूर्ण सूट दिली…
-
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन हत्या केली – मोदी
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन हत्या केली… त्यामुळे 22 तारखेनंतर मी सैन्याला पूर्ण सूट दिली… वेळ तुम्ही ठरवा, लक्ष्य तुम्ही ठरवा… असं मी सैन्याला सांगितलं…
-
वीर जवानांनी शत्रूंना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली… – मोदी
आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांचं कौतुक केलं… ऑपरेशन सिंदूरच्या वीर जवानांना सलाम करण्याची संधी मिळाली… वीर जवानांनी शत्रूंना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली…
-
हा महान उत्सव म्हणजे 140 कोटी देशवासीयांचा संकल्प – पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्राला संबोधित करत आहेत. राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आज देशातील 140 कोटी नागरिक तिरंग्याच्या रंगात रंगले आहेत.
-
देशभरात आज 79 वा स्वातंत्र्य दिनाचा उत्साह
देशभरात आज 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण करणार आहेत.
Published On - Aug 15,2025 7:14 AM
