Digambar Naik | कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा, टपालाच्या तिकिटावर झळकला मराठी अभिनेता!

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:30 PM, 16 Oct 2020
कोकणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कोकणचे सुपुत्र, मराठी अभिनेते दिगंबर नाईक यांचा फोटो असलेल्या टपाल तिकिटाचे नुकतेच अनावरण करण्यात आले.
आपल्या अस्सल मालवणी शैलीने अभिनेते दिगंबर नाईक यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने सगळ्यांची मने जिंकली आहेत.
मालवणातल्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या हाडाच्या कलाकाराने आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत निढळ स्थान तयार केले आहे.
‘जागतिक टपाल दिना’च्या निमित्ताने दिगंबर नाईक यांचा अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला.
या अनोख्या सन्मानानंतर दिगंबर नाईक यांच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.