राज्यात आज दोन ठिकाणी भीषण अपघात झाले आहे. यातील एक अपघात मुंबई-नाशिक महामार्गावर तर दुसरा पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घडला आहे. यात 12 जण गंभीर जखमी झाले आहेत.
1 / 11
मुंबई-नाशिक महामार्गावर एका कारला भरधाव वेगातील ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले.
2 / 11
या अपघातात कारचा वरचा भाग पूर्णपणे दबला गेला होता. त्यामुळे आजूबाजूच्या प्रवाशांनी त्या गाडीतील नागरिकांना बाहेर निघण्यास मदत केली. या गाडीतील सर्व जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
3 / 11
आजूबाजूच्या नागरिकांनी वेळीच मदत केल्याने चार जणांचे प्राण वाचले आहेत. नागरिकांनी केलेल्या मदतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या नागरिकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
4 / 11
तर दुसरीकडे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील रायगाव फाटा येथे तिहेरी अपघात झाला आहे. यात 8 जण जखमी झाले आहेत. त्यातील 2 जण गंभीर आहेत.
5 / 11
साताऱ्यातील या अपघातात आयशर, इनोवा कार आणि कंटेनर यांचा समावेश आहे.
6 / 11
सकाळी सहाच्या सुमारास साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या आयशर ट्रकमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे या ट्रक ड्रायव्हरने हा ट्रक हायवेच्या बाजूला उभा केला होता.
7 / 11
त्यावेळी पाठीमागील दिशेने आलेल्या कोल्हापूर येथील ईनोव्हा कारने चालकाने स्पीड कमी केला. त्यामुळे अचानक मागून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने या दोन्ही वाहनांना जोरदार धडक दिली
8 / 11
अपघात
9 / 11
दरम्यान या अपघात स्थळावरील सर्व वाहतूक सर्विस मार्गावरुन वळवण्यात आली आहे.
10 / 11
या तिन्ही वाहनांचे अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.