Photo | कामाच्या गराड्यातून वेळ काढत दिशा-टायगरचा ‘फॅमिली टाईम’

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:18 AM, 13 Jan 2021
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, मात्र, शूटिंगला थोडा ब्रेक देऊन टायगर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अनेकवेळा चर्चा होतात. टायगर आणि दिशा अनेकवेळा एकत्र फिरताना देखील दिसतात. आता टायगर श्रॉफच्या कुटुंबासोबत दिशा दिसली
वांद्रेमध्ये टायगर श्रॉफला त्याच्या कुटूंबासह स्पॉट केले गेले. त्यावेळी टायगरसोबत त्याची आई आयशा श्रॉफ, बहीण कृष्णा श्रॉफ आणि दिशा पाटणी देखील सोबत दिसली. टायगर श्रॉफने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली दिसत आहे.
टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झाल्यास तर तो ‘बागी 3’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसेल. याशिवाय टायगर ‘हिरोपंती 2’ आणि ‘गणपत’ या चित्रपटांमध्येही दिसेल. दुसरीकडे दिशा पटानी अभिनेता सलमान खानच्या ‘राधे’ आणि ‘मलंग 2’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी मालदीवला गेले होते. दोघांनी मालदिवचे फोटो शेअर केले होते. मात्र, तेव्हादेखील दोघांनी एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले नव्हते