प्रत्येक व्यक्ती आनंदात राहण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनेत्री कल्कि कोचलिननं स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी एक मार्ग काढला आहे.(Photos of kalki while Surfing)
एकीकडे कोरोना डोकंवर काढत आहे तर दुसरीकडे रोज काही तरी विचित्र बातमी कानावर येत आहे. अशा परिस्थितीत स्वत:ला आनंदी ठेवणं आता जास्त महत्वाचं आहे. सध्या प्रत्येक व्यक्ती आनंदात राहण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनेत्री कल्कि कोचलिननं स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी एक मार्ग काढला आहे.
1 / 5
काही दिवसांपूर्वी तिनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. त्यात ती सर्फिंग करताना दिसली.
2 / 5
या फोटोसोबतच तिनं आपण दोन वर्षांनंतर सर्फिंग करत असल्याचं सांगितलं. सोबतच तिनं इन्स्ट्रक्टरचेसुद्धा आभार मानले आहेत.
3 / 5
कल्किचा हा फोटो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. तर कल्किसाठी अभिनेत्री हेजल तिची चिअरलिडर बनली आहे. हेजलनं कल्किच्या फोटोवर कमेंट करत तिचं मनोबल वाढवलं आहे.
4 / 5
कल्कि इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. ती नेहमी तिच्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करत असते.