AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहीहंडीच्या जल्लोषात प्राजक्ता गायकवाडचा ठेका; ‘मदनमंजिरी’वर थिरकली अभिनेत्री

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई, ठाण्यात गोविंदा पथकांमध्ये बक्षिसांसाठी चुरस सुरू आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने मागाठाणे येथील दहीहंडीला हजेरी लावत आयोजकांचे कौतुक केले. तिने 'अशी मी मदनमंजिरी' व 'हृदयी वसंत फुलताना' या गाण्यांवर नृत्य सादर करत गोविंदांचा उत्साह द्विगुणित केला. तिच्या दमदार परफॉर्मन्सने उपस्थितांनीही ठेका धरला.

| Updated on: Sep 05, 2026 | 3:01 PM
Share
राज्यभरात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह विविध शहरांमध्ये मोठ्या दिमाखात दहीहंडी उत्सव साजरा केला जात असून, ठिकठिकाणी आकर्षक दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, घाटकोपर, ठाणे यांसह अनेक भागांत लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. दहीहंडी फोडून हे बक्षीस पटकावण्यासाठी विविध गोविंदा पथकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे.

1 / 6
दहीहंडीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावत गोविंदांचा उत्साह वाढवला. मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनेही मागाठाणे येथील दहीहंडी उत्सवाला खास हजेरी लावली.

2 / 6
यावेळी प्राजक्ताने दहीहंडीच्या भव्य आयोजनाचे कौतुक केले. "इतक्या मोठ्या प्रमाणात दहीहंडी फार क्वचितच आयोजित केली जाते. या माध्यमातून इतक्या मोठ्या संख्येने लोक आणि कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. त्यासाठी आयोजकांचे खरंच कौतुक आहे. मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल मनापासून आभार," अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

3 / 6
प्राजक्ताने गोविंदा पथकांना दहीहंडीच्या शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी खास नृत्याविष्कारही सादर केला. तिच्या दमदार परफॉर्मन्सने उपस्थित प्रेक्षकांचीही मने जिंकली.

प्राजक्ताने गोविंदा पथकांना दहीहंडीच्या शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी खास नृत्याविष्कारही सादर केला. तिच्या दमदार परफॉर्मन्सने उपस्थित प्रेक्षकांचीही मने जिंकली.

4 / 6
प्राजक्ताने 'अशी मी मदनमंजिरी, सुबक ठेंगणी, लखलखते सुंदरी' या गाण्यावर नृत्य करत आपल्या परफॉर्मन्सची सुरुवात केली. त्यानंतर 'हृदयी वसंत फुलताना' या लोकप्रिय गाण्यावरही तिने ठेका धरत सुंदर नृत्य सादर केले.

5 / 6
एकीकडे गोविंदा पथकांकडून दहीहंडी फोडण्यासाठी थरांवर थर रचले जात होते, तर दुसरीकडे प्राजक्ताच्या नृत्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. तिच्या परफॉर्मन्सदरम्यान उपस्थितांनी गाण्यांवर ठेका धरत वातावरण आणखी जल्लोषमय केलं.

6 / 6
Follow Us
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून मोठं विधान
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून केलं मोठं विधान
दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला! पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी...
मोठी बातमी! दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला, पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी कमानीखाली दबून महिलेने गमावला जीव