AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan : ‘ज्यांच्यावर प्रेम केलं, ते सोडून गेले…’ पहाटेच्या शांततेत अमिताभ बच्चन यांचं दुःख आलं ओठांवर; नाना पाटेकरांच्या आठवणींनी चाहते भावुक

अमिताभ बच्चन यांनी एक हृदयस्पर्शी ब्लॉग लिहिला आहे. यात त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. काही नाती कधीच संपत नाहीत, उलट त्या अधिक गहिऱ्या होतात, असे त्यांचे मत आहे. ही इमोशनल पोस्ट चाहत्यांनाही भावूक करत आहे.

| Updated on: Oct 10, 2026 | 4:46 PM
Share
आयुष्यात काही निरोप असे घ्यावे लागतात, ज्यानंतर जी पोकळी निर्माण होते ती दीर्घकाळासाठी सोबत राहते. आपल्या जवळच्या माणसांनी एकामागून एक साथ सोडून जाणं हे मनावर खोल जखम करून जातं. अमिताभ बच्चन यांच्यासोबतही असंच काहीसं घडलं आहे. गेल्या वर्षभरात बिग बी यांनी चित्रपटसृष्टीतील आपल्या दोन जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे, ज्यांची जागा कधीही भरून निघू शकत नाही. आधी त्यांचे जिवलग मित्र धर्मेंद्र आणि आता नाना पाटेकर. गुरूवार, 8 ऑक्टोबर रोजी गोव्यात नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर बिग बी यांनी सर्वात पहिले  ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावरून नानांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. त्यानतंर 9 ऑक्टोबर रोजी नाना पाटेकर यांच्यासोबतच्या काही जुन्या आठवणी शेअर करत अमिताभ एक पोस्ट लिहिली. अमिताभ बच्चन यांच्या अलीकडील ब्लॉगमधील भावनिक शब्द सध्या चर्चेत आहेत. नाना पाटेकर यांच्यासोबतच्या जुन्या आठवणी आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावना यांची सांगड चाहते घालत आहेत. ( All Photos : Social Media)

1 / 7
अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नेहमीच आयुष्य, काम आणि वैयक्तिक अनुभवांबद्दलचे विचार मांडत असतात. यावेळी पहाटे 5 वाजून 17 मिनिटांनी केलेल्या त्यांच्या पोस्टमधून आठवणींची भावुक छटा पाहायला मिळाली.

2 / 7
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, “काही छायाचित्रे, विचार आणि भावना अशा असतात, ज्या कधीच तुमची पाठ सोडत नाहीत... त्या तुमच्या मनात कायम राहतात... कोणत्या ना कोणत्या रूपात... आपल्या रोजच्या दिनक्रमात... संगीतात... सर्वत्र... त्या आजही संगीतात जिवंत आहेत. ते संगीत तुम्हाला भूतकाळातील त्या क्षणांमध्ये पुन्हा घेऊन जाते, जे आपण अनुभवले होते. ज्यांच्यावर आपण खूप प्रेम केले, ते आता आपल्यात नाहीत. पण त्यांचा आत्मा आणि त्यांनी दिलेली शिकवण नेहमीच आपल्यासोबत आणि आपल्या जवळ राहते.”

3 / 7
बिग बी यांच्या या भावनिक शब्दांमुळे चाहत्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पोस्टचा संबंध अनेकजण नाना पाटेकर यांच्याशी जोडत आहेत. या ब्लॉगच्या एक दिवस आधी, 9 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर नाना पाटेकर यांच्यासोबतचे काही जुने व्हिडिओ शेअर केले होते. या पोस्टला त्यांनी कोणतेही कॅप्शन दिले नव्हते. मात्र, या व्हिडिओंमधून दोन्ही कलाकारांमधील मैत्री, जिव्हाळा आणि परस्पर आदर स्पष्टपणे जाणवत होता.

4 / 7
‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवरील एका व्हिडिओमध्ये नाना पाटेकर अमिताभ बच्चन यांच्याशी मिश्किलपणे संवाद साधताना दिसले. ते म्हणतात, “अमितजी, तुम्ही आल्यानंतर चित्रपटसृष्टीतील ट्रेंडच बदलून गेला. तुम्ही हिरो, कॉमेडियन, डान्स आणि न जाणो काय काय करून अनेक अभिनेत्यांची दुकानं बंद केलीत!”  नाना यांचा हा विनोदी अंदाज पाहून अमिताभ बच्चन आणि त्यांच्यातील सहज मैत्रीची झलक दिसून येते.

5 / 7
अमिताभ बच्चन यांनी १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोहराम’ चित्रपटाच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओही शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन, नाना पाटेकर आणि जॅकी श्रॉफ एकत्र दिसतात. यावेळी बिग बी यांनी नाना पाटेकर यांना प्रेमाने मिठी मारली होती. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये नाना पाटेकर अमिताभ बच्चन यांना पुढील २५ वर्षे ‘कौन बनेगा करोडपती’चे सूत्रसंचालन करत राहण्याची विनंती करतात. त्यानंतर ते गंमतीने म्हणतात, “त्यानंतर मी सांभाळून घेईन!” नानांचे हे बोलणे ऐकून अमिताभ बच्चन खळखळून हसतात.

6 / 7
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या आणखी एका मुलाखतीच्या क्लिपमध्ये नाना पाटेकर एक खास आठवण सांगताना दिसले. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित चित्रपट पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांना भावनिक पत्र लिहिले होते. या पत्रातून त्यांनी नाना यांच्या अभिनयाचे मनापासून कौतुक केले होते.

7 / 7
Follow Us
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक

ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा