AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OTT Top Trending : बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा सिनेमा पाहिलात का? कुठे पाहता येणार जाणून घ्या

OTT Top Trending : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. त्याचा सिनेमा थिएटरमध्ये फ्लॉप ठरला असला तरी आता ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. जर तुम्हाला बाळासाहेबांच्या नातवाचा सिनेमा घर बसल्या पाहायचा असेल तर ही बातमी नक्की वाचा...

| Updated on: Nov 21, 2025 | 4:31 PM
Share
करोनानंतर अनेका प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्यापेक्षा घर बसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहण्यास आवडते. अनेकजण नवे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहतात. काही सिनेमांच्या कथा चांगल्या असतात तरीही ते थिएटरमध्ये फारसे चालत नाहीत. अशाच एका सिनेमाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांचा नातू महत्त्वाच्या भूमिकेत आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. आता हा सिनेमा ओटीटीवर टॉप ट्रेंड होताना दिसत आहे.

1 / 5
बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरेचा निशांची ही सिनेमा 19 सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बाळासाहेबांचा नातू असल्यामुळे या सिनेमाची चांगली चर्चा रंगली होती. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. हा सिनेमा सुपरफ्लॉप ठरला.  ‘निशांची’ नंतर आता ‘निशांची २’ही थेट ओटीटीवर रिलीज झाला आहे. अनुराग कश्यपने चाहत्यांना सरप्राइज देत चित्रपटाचा सीक्वेल थिएटरऐवजी थेट ओटीटीवर आणला आहे. तो कुठे पाहायचा आणि बबलू, डबलू, रिंकूच्या कथेत पुढे काय घडतं ते जाणून घ्या.

2 / 5
अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘निशांची’ सिनेमा गेल्या शुक्रवारी, 14 नोव्हेंबरला ओटीटीवर रिलीज झाला होता. मजेशीर बाब म्हणजे, मेकर्सनी सरप्राइज देत त्याचा दुसरा भाग म्हणजे ‘निशांची पार्ट 2’ थेट ओटीटीवर रिलीज करून टाकला. तेही कोणत्याही घोषणा किंवा प्रमोशनशिवाय. पहिल्या भागाच्या शेवटी डबलूचं गुपित उघड झाल्यानंतर रिंकूचा राग अनावर झाल्याचे दिसले होते. तर बबलू, मंजिरी आणि अंबिका प्रसाद यांची कथा अधुरीच राहिली होती. आता मात्र दोन्ही भाग एकत्र स्ट्रीम होत आहेत. प्रेक्षकांसाठी सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘निशांची’ आधी थिएटरमध्ये आला आणि नंतर ओटीटीवर, पण ‘निशांची पार्ट २’ थेट डिजिटलवरच प्रदर्शित करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया यामागचं नेमकं कारण काय आहे आणि ‘निशांची २’ मध्ये नेमकं काय घडतं!

3 / 5
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘निशांची २’ हा सिनेमा देखील पहिल्या भागाप्रमाणेच Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिला चित्रपट ‘निशांची’ थिएटरमध्ये पूर्णपणे आपटला होता. त्याच्या रिलीज पद्धतीला अनुराग कश्यपने पहिल्या भागाला जबाबदार धरलं आहे. ते म्हणतात की ओरिजिनल चित्रपटाचे यश थिएटरमध्ये त्याच्या सीक्वेलची वाट मोकळी करते. ‘निशांची २’ थिएटरमध्ये न आणण्याबाबत ते म्हणतात, “जर प्रेक्षक पहिल्या भागाला येत असते, तर दुसरा भाग नक्कीच थिएटरमध्ये रिलीज झाला असता.”

4 / 5
‘निशांची’ने बॉक्स ऑफिसवर अवघे 1.31 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे चित्रपटाचे बजेटही रिकव्हर झाले नव्हते. उलट निर्मात्यांना त्यांच्या खिश्यातून पैसे काढावे लागले होते. अनुराग कश्यपने दुसरा भाग ओटीटीवर प्रदर्शित करण्याबाबत सांगितले की, पहिल्या भागाला समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यामुळेच प्रेक्षकांपर्यंत संपूर्ण कथा पोहोचवण्यासाठी त्यांनी थेट ओटीटी रिलीजचा मार्ग निवडला.

5 / 5
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.