निसर्गांच देणं लाभलेल्या भंडारदरा , हरिषचंद्र गड परिसरात पर्यटक मोठी गर्दी करत आहेत. सलग सुट्टयांमुळे भंडारदरा परिसरात होणा-या पर्यटकांच्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभुमीवर होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता जिल्हा पोलिस प्रशासनाने वाहतुक नियमात बदल करण्यात आला आहे.
1 / 4
रंधा धबधबा ते वारंघुशी एकेरी वाहतूक तर पुढे वारंघुशी ते रंधा असा वाहतूक बदल करण्यात आला आहे.
2 / 4
अत्यावश्यक सेवा वगळता उद्या रविवार 13 ऑगस्ट सकाळी 7 वाजेपासुन 16 ऑगस्ट रात्री 8 वाजपर्यंत हे नियमन करण्यात येणार आहे.
3 / 4
उद्या रविवार त्यानंतर स्वातंत्र्य दिन आणि पारशी नववर्ष अशा सलग सुट्टया आहेत. दरवर्षी या काळात पर्यटनासाठी मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी होते. ती रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे.