AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रपुरात भीषण पाणीटंचाई, प्रतिष्ठित नागरिकांच्या घरातही पाण्याला घरघर

चंद्रपूर शहरात वाढत्या उन्हामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महानगरपालिका दररोज १८० टँकर पाणीपुरवठा करत असूनही, अनेक वॉर्डांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

| Updated on: Apr 28, 2025 | 3:08 PM
Share
वाढत्या तापमानामुळे चंद्रपूर शहरातील विविध भागांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे.

1 / 8
चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे (मनपा) शहरातील अनेक वॉर्डांमध्ये दररोज तब्बल १८० टँकर फेऱ्या करून पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या वॉर्डांमध्येही मनपाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

2 / 8
मनपाच्या आठ आणि खाजगी चार अशा एकूण १२ टँकरच्या माध्यमातून शहरातील वडगाव, लक्ष्मीनगर, हवेली गार्डन परिसर, जगन्नाथ बाबा वार्ड, रमाईनगर, अष्टभूजा वार्ड, बाबूपेठ, नगिनाबाग, घुटकाळा, गुलमोहर, महाकाली कॉलरी, अंचलेश्वर गेट, राष्ट्रवादी नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, जटपुरा गेट, कृष्ण नगर, इंदिरा नगर यांसारख्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे.

3 / 8
या वॉर्डांमध्ये १८० टँकर फेऱ्यांद्वारे नागरिकांची तहान भागवली जात आहे. शहरात एकूण ९० ठिकाणी तात्पुरत्या पाणी टाक्या उभारून नागरिकांना पाणी पुरवले जात आहे.

4 / 8
चंद्रपूर शहरासोबतच ग्रामीण भागातही पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती आहे. नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीमार्फत अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा केला जात असला तरी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सध्या किती गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले आहे.

5 / 8
चंद्रपूर शहरात भीषण पाणी टंचाई असतानाही प्रशासन मात्र ही बाब मान्य करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

6 / 8
कधी मनपाच्या टँकरची वाट पाहण्यात, तर कधी पैसे देऊन पाणी विकत घेण्यास ते मजबूर झाले आहेत. या गंभीर समस्येवर प्रशासनाकडे कोणतेही ठोस उत्तर नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

7 / 8
आगामी काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

8 / 8
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.