AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शुभविवाह’ मालिकेत मोठा ट्विस्ट; या लोकप्रिय अभिनेत्याची होणार एण्ट्री

'शुभविवाह' ही मालिका दुपारी 2 स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत यशोमन आपटे आणि मधुरा देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. यासोबतच कुंजिका कालविंट, विशाखा सुभेदार, अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल देशपांडे, शीतल शुक्ला, विजय पटवर्धन यांच्याही भूमिका आहेत.

| Updated on: Jun 20, 2025 | 1:35 PM
Share
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'शुभविवाह' ही मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. आकाशच्या जीवघेण्या अपघातानंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी भूमी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. आकाशच्या उपचारांसाठी भारतातला नंबर वन न्युरो सर्जन संकर्षण अधिकारी देखिल येणार आहेत.

1 / 6
डॉ. संकर्षण अधिकारी अत्यंत हुशार डॉक्टर असून आपल्या डॉक्टरी प्रोफेशनकडे प्रोफेशन म्हणून न बघता सेवा म्हणून बघतात. रुग्णांची सेवा हीच त्यांच्या आयुष्यातली पहिली प्रायॉरिटी आहे. सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय उद्रिरकर डॉ. संकर्षण अधिकारीची भूमिका साकारणार आहे.

2 / 6
स्टार प्रवाहच्या 'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेमुळे चिन्मय घराघरात पोहोचला. जवळपास 11 वर्षांनंतर चिन्मय स्टार प्रवाहच्या मालिकेतून भेटीला येणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना चिन्मय म्हणाला, "स्टार प्रवाह वाहिनीमुळे मला नवी ओळख मिळाली आणि पुन्हा एकदा एका नव्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटण्याची संधी मिळणार आहे."

3 / 6
"या भूमिकेसाठी जेव्हा विचारणा झाली तेव्हा ऐकता क्षणीच ती मला आवडली आणि मी लगेच होकार दिला. अशा पद्धतीची भूमिका मी पहिल्यांदा साकारतोय. डॉ. संकर्षण हा स्वभावाने गंभीर आणि कमी व्यक्त होणारा आहे. अत्यंत शिस्तबद्ध आयुष्य जगणारा. आपण भलं आणि आपलं काम भलं या मताचा," असं त्याने सांगितलं.

4 / 6
डॉ. संकर्षण हा आपल्या कुटुंबावर, बायको मुलांवर प्रचंड प्रेम करणारा आहे. पण त्याच्या या मताला, त्याच्या स्वभावाला आणि व्यक्तिमत्वाला तेव्हा धक्का बसतो जेव्हा त्याच्या बायकोचा अपघाती मृत्यू होतो. बायकोच्या अपघाती मृत्यूमुळे तो कोलमडून गेला आहे.

5 / 6
त्याचं आयुष्य बायकोपासून सुरु होऊन बायकोपाशी संपायचं. ती गेल्यामुळे तो आतून पुरत तुटलाय. त्याने जगणं सोडून दिलंय. येईल तो दिवस फक्त ढकलतो आहे. आकाशवर उपचार करण्यासाठी त्याने भूमीसमोर एक अट ठेवली आहे. ही अट नेमकी काय आहे? आकाशचा जीव वाचवण्यासाठी भूमी ही अट स्वीकारणार का? हे पाहंणं उत्सुकतेचं असेल.

6 / 6
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.