𝐓𝐞𝐣𝐚𝐬𝐡𝐫𝐢 𝐏𝐫𝐚𝐝𝐡𝐚𝐧 | तेजश्री प्रधान पुन्हा छोट्या पडद्यावर, ‘झी मराठी’ नव्हे, ‘या’ वाहिनीवर मालिकेत झळकणार

अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच एका मराठी मालिकेत झळकणार असल्याची माहिती काही सोशल मीडिया पेजनी दिली आहे. ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर दिसण्याची शक्यता आहे

1/6
'अग्गंबाई सासूबाई', 'होणार सून मी ह्या घरची' यासारख्या मालिकांमधून अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. तेजश्रीचं लवकर छोट्या पडद्यावर पुन्हा दर्शन घडणार आहे.

2/6
छोट्या पडद्यासोबतच रंगभूमी, मराठी चित्रपट आणि बॉलिवूडमध्येही तेजश्री प्रधानने धडक मारली आहे. जान्हवीपासून शुभ्रापर्यंत तेजश्रीने साकारलेल्या अनेक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेल्या आहेत.

3/6
 अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच एका मराठी मालिकेत झळकणार असल्याची माहिती काही सोशल मीडिया पेजनी दिली आहे. ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर दिसण्याची शक्यता आहे. या मालिकेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.

4/6
झी मराठी वाहिनीवरील 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील जान्हवीच्या व्यक्तिरेखेने तेजश्री प्रधान लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. 2013 ते 2016 या साडेतीन वर्षांच्या कालावधीत श्री-जान्हवीच्या जोडीचं प्रेक्षकांवर गारुड होतं. तिचा 'काहीही हं श्री' हा डायलॉग तर अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

5/6
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेने तिला 2013 मध्ये ओळख दिली असली, तरी तेजश्री त्याआधीपासूनच मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. 2007 मध्ये त्यावेळच्या ईटीव्ही मराठी वाहिनीवर 'ह्या गोजिरवाण्या घरात' या मालिकेने कमालीची लोकप्रियता मिळवली होती.

6/6
'होणार सून'च्या लोकप्रियतेनंतर 2009 मध्ये तेजश्रीला अवधूत गुप्ते दिग्दर्शित 'झेंडा' हा चित्रपट मिळाला आणि तिने सिनेविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर शर्यत, लग्न पहावे करुन, असेही एकदा व्हावे असे अनेक चित्रपट तिने केले. 'ती सध्या काय करते' या चित्रपटाने तेजश्रीच्या लोकप्रियतेला नवीन आयाम मिळाला. 'सूर नवा ध्यास नवा' या सिंगिंग रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाचं तेजश्रीने उत्तम सूत्रसंचालन केलं (सर्व फोटो : tejashripradhan Instagram account)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI