गायक रोहित राऊतची ‘वायरलवाली Love Story’, नवा कोरा म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला!

‘हृदयात वाजे समथिंग’, ‘हे नाते कोणते’ अशी सुपरहिट गाणी गायलेला गायक रोहित राऊत आता ‘वायरलवाली Love Story’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर ‘वायरलवाली Love Story’ हा नवा कोरा म्युझिक व्हिडीओ लाँच करण्यात आला आहे.

1/5

2/5
सप्तसूर म्युझिक आणि नवसत्य एंटरटेन्मेंट यांनी ‘वायरलवाली Love Story’ हा म्युझिक व्हिडीओ प्रस्तुत केला आहे. रोहित राऊतसह सोनाली सोनावणेनं या म्युझिक व्हिडीओतलं ‘वायरलवाली Love Story’ हे धमाकेदार गीत गायलं आहे.

3/5
सप्तसूर म्युझिकचे ‘जोडी दोघांची दिसते चिकणी’ हे सोनाली सोनावणेचे गाणंही हिट आहे. ‘वायरलवाली Love Story’ म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन नवनाथ निकम यांनी केलं आहे. शालू देवतळे थूल यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. स्वप्नील अर्पेल यांनी छायांकन केलं आहे. तर निधी साळवे आणि आदी मांडवकर ही नवी जोडी या म्युझिक व्हिडीओत झळकली आहे.

4/5
रोहित राऊतनं आजपर्यंत अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्याचं प्रत्येक गाणं त्याच्या चाहत्यांना आनंद देणारं आहे. त्यात आता वायरलवाली Love Story या नव्या गाण्याचीही भर पडणार आहे.

5/5
‘तुझी माझी लव्हस्टोरी सुरू झाली, एक नंबर वायरल झाली’ असे आजच्या यूथच्या तोंडी असलेले शब्दच या गाण्यातून ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे रोहितची ‘वायरलवाली Love Story’ त्याच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरणार यात शंका नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI