PHOTO | कोरोनाचा क्रीडाक्षेत्राला दणका, IPLसह ‘या’ मोठ्या स्पर्धा स्थगित

कोरोनाचा (corona pandemic) क्रीडा क्षेत्रालाही (cricket tournaments) जोरदार फटका बसला आहे. आयपीएलसह (IPL 2021) अनेक स्पर्धा (postponed) या स्थगित करण्यात आल्या आहेत.

1/5
Corona, Covid 19, T20 World Cup 2020, IPL 2021, Pakistan Super League tournaments , postponed due to covid, Sports,
कोरोनाचा जसा इतर क्षेत्रांवर परिणाम झालाय तसाच तो क्रीडा क्षेत्रावरही झालाय. नुकताच कोरोनामुळे आणि खेळाडूंना झालेल्या बाधेमुळे बीसीसीआयने आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित केला आहे. मात्र आतापर्यंत आयपीएलसह अनेक स्पर्धां या कोरोनामुळे स्थगित कराव्या लागल्या आहेत. आयपीएल स्थगितीच्या निमित्ताने कोणकोणत्या स्पर्धा स्थगित केल्या हे आपण जाणून घेणार आहोत.
2/5
Corona, Covid 19, T20 World Cup 2020, IPL 2021, Pakistan Super League tournaments , postponed due to covid, Sports,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन आयपीएलचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं. खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्यासाठी बायोबबल तयार करण्यात आला. मात्र या कोरोनाने बायोबबलही छेदला. खेळाडूंसह, ग्राऊंड स्टाफही पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे अखेर स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. गत मोसमात कोरोनामुळे आयपीएलचं यूएईमध्ये आयोजन केलं होतं.
3/5
Corona, Covid 19, T20 World Cup 2020, IPL 2021, Pakistan Super League tournaments , postponed due to covid, Sports,
पाकिस्तान, टीम इंडियाचा पांरपरिक प्रतिस्पर्धी. पाकिस्तानमध्ये आयपीएलच्या धर्तीवर पीएसएलचं (PSL) आयोजन करण्यात येतं. मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. पीसीबी (PCB) मार्च 2021 मध्ये हा निर्णय घेतला. कोरोनाचा पीएसलच्या गत मोसमावरही परिणाम झाला होता. त्यामुळे उर्वरित सामने परिस्थिती नियंत्रणात आल्यावर खेळवण्यात आले.
4/5
Corona, Covid 19, T20 World Cup 2020, IPL 2021, Pakistan Super League tournaments , postponed due to covid, Sports,
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेलाही कोरोनाचा फटका बसला होता. ही मालिका डिसेंबर 2020 मध्ये खेळवणं अपेक्षित होतं. मात्र इंग्लंड ज्या ठिकाणी थांबली होती, त्या हॉटेलमधील कर्मचारी बाधित सापडला होता. तसेच इंग्लंडच्या गोटातील 2 खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे ही मालिका स्थगित करण्याचा निर्णय दोन्ही क्रिकेट मंडळांच्या संमतीने घेण्यात आला होता.
5/5
Corona, Covid 19, T20 World Cup 2020, IPL 2021, Pakistan Super League tournaments , postponed due to covid, Sports,
कोरोनाचा टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेलाही फटका बसला. ऑस्ट्रेलियामध्ये 2020 च्या शेवटी आयोजन करण्यात येणार होते. सर्व स्थिती नियंत्रणात आल्यावर आयसीसी आयोजना करण्याच्या मानसिकेतत होती. मात्र दिवसेंदिवस परिस्थिती आणखी गंभीर झाली. त्यामुळे ही स्पर्धा अखेर स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता ही स्पर्धा 2022 मध्ये खेळवण्यात येणार आहे.