राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी नाशिक येथे आज सकाळी वंदे भारत रेल्वेनं आगमन झालं आहे.
1 / 6
तत्पूर्वी ठाणे रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्वागत व सत्कार केला होता. प्रवासादरम्यान अनेक सहप्रवाशांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
2 / 6
प्रवासात एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसतात भारावून जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत आहेत.
3 / 6
नाशिक येथे आयोजित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वंदे भारत ट्रेनने सकाळी नाशिककडे रवाना झाले आहेत.
4 / 6
नेहमीप्रमाणे वृत्तपत्रे वाचत अजित पवार यांचा प्रवास सुरु झाला, मात्र या प्रवासात सहप्रवासी असलेले एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी येऊन बसले.
5 / 6
अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं, स्टेशनवरती कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.