Photo Gallery : ऊसतोड मजूराचं पोर फौजदार झालं, अख्ख्या गावानं त्याला डोक्यावर घेतलं, ज्ञानेश्वराच्या ज्ञानार्जानाचा प्रेरणादायी प्रवास
बीड : हलाकीची परस्थिती शिक्षणाच्या प्रवासात कधीच अडचणीची ठरु शकत नाही. जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवल्यास काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण बीड जिल्ह्यातील शिदोड येथील ज्ञानेश्वर देवकते याने राज्यभरातील विद्यार्थ्यांसमोर ठेवलेले आहे. बीड जिल्हा तसा ऊसतोड मजूरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, आई-वडीलांच्या नशिबाला जे ऊसतोडीचे काम आले त्याचीच परंपरा कायम राहू नये म्हणून ज्ञानेश्वर देवकते यांनी अनंत अडचणींचा समाना केला पण शिक्षणात खंड पडू दिला नाही. कुटुंबाची परस्थिती नाजूक असल्यामुळे त्याने शेजारील शेतकऱ्याच्या शेळ्या राखल्या. यातून मिळालेल्या रोजगारातून शिक्षण पूर्ण केले आणि आज तो स्पर्धा परिक्षेतून पोलीस निरीक्षक पदाची परिक्षा उत्तीर्ण झाला आहे. गावकऱ्यांसाठीच नव्हे तर सबंध बीड जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असून त्याचे हे यश पाहून गावकऱ्यांनी त्याची ढोल-ताशाच्या गजरात आणि गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
