Photo : ‘संक्रांतीच्या शुभेच्छा ‘,अभिज्ञा आणि मेहुलचं संक्रांत स्पेशल फोटोशूट

(‘Happy Sankranti’, Abhidnya and Mehul’s Sankranti special photoshoot)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:49 AM, 14 Jan 2021
देशभरात मकर संक्रांतीला एक वेगळं महत्त्व असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात गोडवा आनणारा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो
मकर संक्रांतीला नव विवाहित जोडप्यांना जास्त मान दिला जातो. काळे कपडे आणि हलव्याचे दागिने त्यांना दिले जातात.
अशात मराठीची फॅशन आयकॉन अभिज्ञा भावेनं संक्रांतीसाठी खास फोटोशूट केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच अभिज्ञा मेहुल पैसोबत विवाह बंधनात अडकली. या दोघांनी संक्रांतीसाठी केलेलं हे कपल फोटोशूट सध्या ट्रेंडिग आहे.
अभिज्ञा आणि मेहुलचे हे फोटो परफेक्ट कपल गोल्स देत आहेत.
या दोघांनी मस्त समुद्र किनाऱ्यावर हे फोटोशूट केलं आहे.
काळ्या साडीमध्ये अभिज्ञा अधिकच सुंदर दिसतेय.