AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAN Card : कुठे-कुठे वापरलं गेलं तुमचं पॅन कार्ड ? जाणून घ्यायचंय ? एका मिनिटात करा चेक !

डीजिटल युगात पॅन कार्ड अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. मात्र, त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. तुमचं पॅन कार्ड कुठे-कुठे वापरलं गेला, हे जाणून घेण्यासाठी CIBIL सारख्या क्रेडिट ब्युरोच्या वेबसाइट्सवर मोफत क्रेडिट रिपोर्ट तपासा. यामुळे अनाधिकृत कर्जे किंवा क्रेडिट कार्ड ओळखून फसवणूक टाळता येईल. नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

| Updated on: Jan 02, 2026 | 2:21 PM
Share
PAN Card : आजच्या डीजिटल युगात पॅन कार्ड केवळ आयकर भरणे किंवा बँक खाते उघडण्यासाठीच नव्हे, तर ओळखीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. कर्ज, क्रेडिट कार्ड किंवा कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड लागतोच लागतो. मात्र, तुमचा पॅन कार्ड कुठे-कुठे वापरलं जात आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमच्या पाठीमागे कोणी तरी तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर करत असण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पॅन कार्ड कुठे वापरलं गेलं ? कोणी वापरलं? की ते फक्त तुम्हीच वापरलं आहे? हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

1 / 6
अनेकजण विविध फॉर्म्स, बँका किंवा ऑनलाइन व्हेरिफिकेशनसाठी स्वत:च्या पॅन कार्डची माहिती शेअर करतात. ही माहिती चुकीच्या व्यक्तींच्या हाती गेल्यास तिचा गैरवापर होऊ शकतो. तुमच्या नावावर कर्ज घेतले जाऊ शकते. तुमच्या नावावर भलताच व्यक्ती क्रेडिट कार्ड घेऊ शकतो. किंवा फसवणुकीच्या व्यवहारांमध्ये तुमचे नाव अडकू शकते. म्हणूनच वेळोवेळी पॅन कार्डचा वापर तपासणे गरजेचे आहे.

2 / 6
पॅन कार्ड कुठे कुठे वापरलं गेला हे तपासण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एजंटकडे किंवा बँकेत जाण्याची गरज नाही. अवघ्या काही क्लिकमध्ये ही माहिती ऑनलाइन मिळू शकते. CIBIL, Experian किंवा Equifax सारख्या क्रेडिट ब्युरोच्या वेबसाइटला भेट द्या. या संस्था तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवतात.

3 / 6
CIBIL किंवा अन्य क्रेडिट ब्युरोची वेबसाइट उघडा. तिथे क्रेडिट रिपोर्ट किंवा मोफत क्रेडिट स्कोअर तपासण्याचा पर्याय दिसेल. त्यासाठी तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि पॅन कार्ड क्रमांक भरावा लागेल. काही वेबसाइट्स रिपोर्टसाठी शुल्क आकारतात, तर काही मोफत ट्रायलही देतात. रिपोर्ट तयार झाल्यानंतर तुमच्या नावावर असलेली कर्जे, क्रेडिट कार्ड्स किंवा इतर आर्थिक खाती पाहता येतात.

4 / 6
तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमच्या नावावर घेतलेले प्रत्येक कर्ज, जारी केलेले क्रेडिट कार्ड यांची माहिती असते. कर्ज कधी घेतले, रक्कम किती आहे, कोणत्या बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज/कार्ड जारी झाले आहे, तसेच थकबाकीची माहिती स्पष्टपणे दिलेली असते. जर तुम्ही कधीही न घेतलेले कर्ज किंवा कार्ड दिसले, तर तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाल्याची शक्यता आहे.

5 / 6
क्रेडिट रिपोर्टमध्ये कोणतीही संशयास्पद नोंद आढळल्यास त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेशी संपर्क साधून तुम्ही असे कर्ज घेतले नसल्याचे स्पष्ट करा. गरज असल्यास पोलीस ठाण्यात FIR किंवा सायबर क्राइम तक्रार दाखल करा. तसेच पुढील अडचणी टाळण्यासाठी आयकर विभागालाही याची माहिती द्या.

6 / 6
मयत झालेल्यांवर निवडणुकीची जबाबदारी...संभाजीनगर प्रशासनाचा कारभार उघड
मयत झालेल्यांवर निवडणुकीची जबाबदारी...संभाजीनगर प्रशासनाचा कारभार उघड.
भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा
भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा.
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?.
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन.
UTS ॲप बंद! लोकल तिकीट अन पासची सुविधा कायमस्वरूपी बंद, पर्याय काय?
UTS ॲप बंद! लोकल तिकीट अन पासची सुविधा कायमस्वरूपी बंद, पर्याय काय?.
हे काय भयानकच प्रकरण! चक्क उमेदवारी अर्जच गिळला... पुण्यात चाललंय काय?
हे काय भयानकच प्रकरण! चक्क उमेदवारी अर्जच गिळला... पुण्यात चाललंय काय?.
पुण्यात गुन्हेगारांना तिकीट अन् अजित पवार यांची सारवासारव
पुण्यात गुन्हेगारांना तिकीट अन् अजित पवार यांची सारवासारव.
नाशिकनंतर पुण्यात दादांची NCP अन् शिंदे सेना भाजपविरोधात एकत्र येणार?
नाशिकनंतर पुण्यात दादांची NCP अन् शिंदे सेना भाजपविरोधात एकत्र येणार?.
सायनमध्ये AB फॉर्मचा झोल अन् भाजप उमेदवारच नॉट रिचेबल
सायनमध्ये AB फॉर्मचा झोल अन् भाजप उमेदवारच नॉट रिचेबल.
मुंबई महापौर पदावरून राजकीय रणकंदन, वारिस पठाण यांच्या विधानानं वाद
मुंबई महापौर पदावरून राजकीय रणकंदन, वारिस पठाण यांच्या विधानानं वाद.