AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निद्रानाश, थकवा आणि नैराश्य.. आजार अनेक, कारण फक्त 1 ! आजच सोडा ही घातक सवय नाहीतर..

आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन असतोच आणि बरेच लोक रात्री उशिरापर्यंत त्यांचा फोन वापरतात. काही लोकं तर त्यांचा मोबाईल फोन उशीखाली किंवा उशीजवळ ठेवून झोपतात. तुम्हीही असं करता का? पण हे तुमच्या झोपेसाठी आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया.

| Updated on: Aug 25, 2025 | 2:45 PM
Share
आजच्या डिजिटल युगात, प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन वापरते. आजकाल तर लहान मुलंही मोबाईल फोनचा वापर जास्त करतात. एकंदरच मोबाईल फोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

1 / 9
सध्याच्या युगात मोबाईल फोनमुळे जवळजवळ सर्व कामे सोपी झाली आहेत. म्हणूनच लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात फोनचा वापर अधिक करू लागले आहेत. सकाळी उठताच, आपण सर्वात आधी आपला फोन चेक करतो. फोन पाहूनच दिवसाची सुरूवात होते. एवढेच नव्हे तर रात्री झोपायला जाण्यापूर्वी देखील कित्येकांना फोन वापरायची सवय आहे, अगदी बेडवर पडल्यावरही आधी फोन चेक करतात मग लोकं झोपतात.

2 / 9
मात्र, आजकालचे तरुण दिवसाचा बराचसा वेळ मोबाईल फोन पाहण्यात घालवतात. काही लोकं तर त्यांचे फोन चार्जला लावून किंवा उशाखाली ठेवून झोपतात. परंतु उशाखाली किंवा बाजूला फोन ठेवून झोपणे हे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते.

3 / 9
कारण झोपताना तुमचा फोन उशीखाली ठेवणे तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी हानिकारक ठरू शकतं. तुमच्या मोबाईलमधून निघणारा निळा प्रकाश हा तुमच्या शरीरात तयार होणाऱ्या मेलाटोनिन हार्मोनवर परिणाम करतो, हेच हार्मोन आपल्याला झोपण्यास मदत करतं.

4 / 9
त्यामुळे, तुम्हाला शांत आणि गाढ झोप येत नाही. किंवा झोप येण्यास जास्त वेळ लागतो आणि झोपेची गुणवत्ता देखील खराब होते. हळूहळू, ही सवय निद्रानाश, थकवा आणि नैराश्याचे कारण देखील बनू शकते.

5 / 9
याशिवाय, फोनमधून निघणाऱ्या सततच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF) रेडिएशनचाही आपल्या शरीरावर परिणाम होतो. मोबाईल फोनच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने मेंदू आणि हार्मोनल सिस्टमवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, फोनमधून निघणारे रेडिएशन आणि चार्जिंग दरम्यान निर्माण होणारी उष्णता आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकते.

6 / 9
झोपेत असताना तुमच्या मोबाईल फोनवर सतत येणाऱ्या सूचना किंवा मेसेजमुळे तुमची झोप बिघडू शकते. झोप नीट झाली नाही किंवा मध्येच झोपमोड झाल्यास दिवसभर थकवा आणि चिडचिड होते.

7 / 9
म्हणूनच रात्री झोपताना तुमचा मोबाईल फोन जवळ ठेवू नका असा सल्ला तज्ज्ञ देतात. तो किमान 3 ते 4 फूट अंतरावर  ठेवावा. यामुळे तुम्हाला रेडिएशन किंवा प्रकाशाच्या संपर्कात येण्यापासून रोखता येईल आणि तुम्हाला चांगली, शांत झोप मिळेल ,  तुमचे आरोग्यही चांगले राहील.

8 / 9
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

9 / 9
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा