India Vs England : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ‘गब्बर’ला ‘जब्बर’ कामगिरी करण्याची संधी!

शिखर धवनने इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात 6000 धावा पूर्ण केल्या तर, अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा वेगवान फलंदाज असेल. | (shikhar Dhawan)

1/6
Shikhar Dhawan
इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनला वेगवान 6000 धावा करण्याची संधी आहे. त्याने जर आजच्या मॅचमध्ये 94 रन्स केले तर तो जगातील तिसरा फलंदाज असेल ज्याचे वेगवान 6000 रन्स असतील.
2/6
Shikhar Dhawan
शिखर धवनने सध्या 137 एकदिवसीय डावात 5906 धावा केल्या आहेत. तो 6000 धावांपासून 94 धावा दूर आहे. अशा परिस्थितीत जर त्याने आपल्या 138 व्या डावात 94 रन्स केले तर 6000 एकदिवसीय धावा बनवणारा तो तिसरा वेगवान क्रिकेटपटू ठरेल.
3/6
hashim Amla
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 6000 धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमलाच्या नावावर आहे. 123 व्या डावात त्याने ही धमाकेदार कामगिरी केली.
4/6
Virat kohli
वेगवान 6000 धावा करण्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दुसर्‍या क्रमांकावर आहे. कोहलीने 136 एकदिवसीय सामन्यात 6000 धावा पूर्ण केल्या आहेत.
5/6
shikhar dhawan
न्यूझीलंडचा केन विल्यमसन 139 डावात 6000 धावा काढून तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण, धवनला आज त्याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असेल.
6/6
shikhar dhawan
शिखर धवनने इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात 6000 धावा पूर्ण केल्या तर, अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा वेगवान फलंदाज असेल.