IND vs WI Ravi Bishnoi: क्रिकेटसाठी वडिलांशी भांडणाऱ्या, शिक्षण सोडणाऱ्या मुलाने पदार्पणाच्या सामन्यात दाखवली कमाल

IND vs WI Ravi Bishnoi: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने काही नवीन खेळाडूंना संधी देऊन पाहण्याची भारताची रणनिती आहे.

Feb 16, 2022 | 8:45 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 16, 2022 | 8:45 PM

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने काही नवीन खेळाडूंना संधी देऊन पाहण्याची भारताची रणनिती आहे.  आज एक नवीन प्लेयर टी 20 मध्ये डेब्यु करतोय. युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.

1 / 10
रवी बिश्नोईची आज भारतीय संघात झालेली निवड त्याची मेहनत आणि त्यागाचे फळ आहे. क्रिकेटसाठी त्याने शिक्षण सोडलं. वडिलांच्या मर्जीच्या विरोधात गेला. अनेकदा रिजेक्शन झालं. पण स्वत:वरचा विश्वास ढळू दिला नाही.

2 / 10
वर्ष 2018 मध्ये रवीला बिश्नोईला वडिलांच्या मर्जीच्या विरोधात जावे लागले. त्यावर्षी राजस्थान रॉयल्स संघालाठी रवी नेट्समध्ये गोलंदाजी करत होता. त्याच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार होत्या. मुलाने बोर्डाची परीक्षा द्यावी, अशी वडिलांची इच्छा होती. पण रवी तिथेच थांबला आणि तिथूनच त्याचं नशीब पालटायला सुरुवात झाली. रवीने अजूनपर्यंत बोर्डाची परीक्षा दिलेली नाही.

3 / 10
इंडियन प्रिमियर लीगमध्ये रवी बिश्नोई किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळत असताना त्याला अनिल कुंबळेने मोलाचे मार्गदर्शन केले. मैदानावर असताना, योजनांची कशी अमलबजावणी करायची हे अनिल कुंबळेकडून शिकला. रवीने 6.95 च्या सरासरीने आयपीएलच्या 23 सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत.

4 / 10
IPL मध्ये रवी बिश्नोईच नाव ऑक्शनसाठी पुकारण्यात आलं नाही. कारण  या युवा प्रतिभावान गोलंदाजाची लखनऊ सुपर जायंट्सने ड्राफ्ट प्लेयर्समध्ये निवड केली होती.

5 / 10
रवी बिश्नोई आता अवघ्या 21 वर्षांचा आहे. 2019 मध्ये तो अंडर 19 वर्ल्डकपमध्ये खेळला होता. अवघ्या दोन वर्षात तो भारतीय संघात पोहोचला आहे. यावरुन त्याच्यातली प्रतिभा दिसून येते.

6 / 10
बिश्नोईने एका मुलाखतीत त्याचा यशाचा फॉर्म्युला सांगितला होता. टी 20 मध्ये कधी विकेट मिळवण्याचा प्रयत्न करायचा नाही. फक्त निर्धाव चेंडू टाकायचे, त्याने दबाव वाढतो व याच फॉर्म्युल्याने विकेट मिळतात, असे बिष्नोईचे मत आहे.

7 / 10
रवी बिश्नोईने अंडर 19 वर्ल्डकपमध्ये याच फॉर्म्युल्याने सहा सामन्यात 17 विकेट घेतल्या होत्या. टीम इंडियाचा फायनलमध्ये बांगलादेशने पराभव केला होता.

8 / 10
रवी बिष्नोई जोधपूरचा आहे. त्याच्या गावात क्रिकेट अकादमी नव्हती. पदार्पणाच्या सामन्यात त्याने चार षटकात 17 धावा देत दोन विकेट घेतल्या.

9 / 10
त्यावेळी बिश्नोईने प्रद्योत सिंह राठोर आणि शाहरुख पठान सोबत मिळून स्पार्टन नावाची क्रिकेट अकादमी सुरु केली होती. ( Ravi bishnoi All photos instagram)

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें