Photo : TRP च्या यादीतून ‘इंडियन आयडॉल’ आऊट, ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ची बाजी

अनेक वादांनंतर इंडियन आयडॉल 12 यावेळी या टीआरपीच्या यादीतून बाहेर आहे. ('Indian Idol' out of TRP's list, 'Yeh Rishta Kya Kahalata Hain' on top)

1/6
indian idol
या आठवड्यातील टीआरपी चार्ट समोर आला आहे आणि अनेक वादांनंतर इंडियन आयडॉल 12 यावेळी या यादीतून बाहेर आहे. या आठवड्याच्या टीआरपी चार्टनं स्टार प्लसचे लोकप्रिय कार्यक्रम हस्तगत केले आहेत.
2/6
yeh rishta
‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ : राजन शाहीचा शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आपली जादू दाखवत आहे. या आठवड्यात शोनं टीआरपी चार्टमध्ये प्रथम स्थान मिळविलं आहे. विशेष म्हणजे स्टार उत्सववर शोचे जुने भागदेखील एकाचवेळी पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत नायरा आणि कार्तिकसोबतच हिना खान आणि करण मेहरादेखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
3/6
ghum hai kisi ke pyaar mein
'गुम है किसी के प्यार में' : ऐश्वर्या आणि नील भट्ट स्टारर शो 'गुम है किसी के प्यार में' दुसर्‍या क्रमांकावर आहे. शोमध्ये दाखवलेली विराट आणि सई यांची प्रेमकथा प्रेक्षकांना खूप आवडली आहे. मागील आठवड्यात हा शो पहिल्या क्रमांकावर होता.
4/6
या आठवड्यात टीआरपी चार्टमध्ये ‘इमली’ तिसऱ्या क्रमांकावर आहे. या शोला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे.
5/6
Anupama
अनेक दिवसांपासून टॉपवर असलेली रुपाली गांगुली आणि सुधांशु पांडे स्टार ‘अनुपमा’ आता चौथ्या क्रमांकावर आली आहे.
6/6
indian idol 12 .
इंडियन आयडॉल 12 ला मागे सोडत आता ‘साथ निभाना साथिया 2’ टीआरपी चार्टवर पाचव्या क्रमांकावर आहे. हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे.