AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानापेक्षा पण वेगवान, अवघ्या 25 मिनिटांत मुंबईहून पुणे गाठणार, कशी आहे हायपरलूप ट्रेन

Indian Railway First Hyperloop Train : भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदल आहे. वंदे भारत एक्सप्रेसनंतर लवकरच बुलेट ट्रेन धावणार आहे. तर आता हायपरलूप ट्रेन सुद्धा लवकरच धावणार आहे. या रेल्वेचा 410 किमी ट्रॅक तयार झाला आहे.

| Updated on: Dec 06, 2024 | 5:15 PM
Share
भारतीय रेल्वे सातत्याने प्रगती करत आहे. देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहे. तर बुलेट ट्रेन लवकरच धाव घेईल. लवकरच हायपरलूप ट्रेन सुद्धा या कडीत जोडल्या जाणार आहे. त्यासाठीचा   410 किमीचा ट्रॅक पण तयार झाला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ शेअर केला आहे. रेल्वेची टीम आणि आयआयटी मद्रास या दोघांनी हा ट्रॅक तयार केला आहे.

1 / 6
हायपरलूप ट्रेन ही एक हायस्पीड ट्रेन आहे. ती एका ट्यूब व्हॅक्यूमधून धावेल. यामध्ये चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ट्यूबमध्ये ही ट्रेन ताशी 1100 ते 1200 किमी वेगाने धावणार आहे. भारतीय रेल्वे जी हायपरलूप ट्रेन विकसीत करत आहे, तिचा जास्तीत जास्त वेग 600 किमी इतका आहे. यामुळे वि‍जेचा वापर पण कमी होईल. तर प्रदूषण पण कमी होईल.

2 / 6
वेगवान प्रवासामुळे वेळेची मोठी बचत होईल. वेगात ही रेल्वे बुलेट ट्रेनला पण मागे टाकेल. हायपरलूप ट्रेनचे डिझाईन असे असते की ताशी सहज 1100 किमी वेगाने धावेल. ही रेल्वे एका तासात दिल्लीत ते पाटणा हे अंतर कापेल.

3 / 6
देशातील पहिली हायपरलूप ट्रेन ही मुंबई ते पुणे या दरम्यान धावणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई ते पुणे हे अंतर केवळ 25 मिनिटात कापता येईल. सध्या रेल्वेने या दोन शहरातील अंतर कापण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. अर्थात या ट्रेनचे तिकीट हे विमान प्रवासा इतकेच असण्याची शक्यता आहे.

4 / 6
हायपरलूप ट्रेनमध्ये न थांबता प्रवास करता येईल. अंतर झटपट कापल्या जाणार असल्याने वेळ जाणवणार नाही. कमी वेळेत जास्त दूरचा प्रवास करता येईल. हायपरलूप ट्रेनमध्ये कुठे थांबा असण्याची शक्यता नाही. दोन शहरात थेट जावे लागेल. एका पॉडमध्ये जवळपास  24-28  प्रवासी बसू शकतील.

5 / 6
हायपरलूप ट्रेनची कल्पना नवीन नाही. सर्वात अगोदर  2013 मध्ये एलॉन मस्क याने ही संकल्पना मांडली होती. अमेरिकेमधील दोन शहरं लॉस एंजेलिस ते सॅन फ्रांसिसको या दोन शहरादरम्यान न थांबता झटपट प्रवासासाठी त्याने ही कल्पना मांडली होती.

6 / 6
Follow Us
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ