आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 26 वा सामना आज 30 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. मॅचला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
1 / 5
आयपीएलच्या इतिहासात उभयसंघ एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये पंजाब बंगळुरुवर वरचढ राहिली आहे. पंजाबने 14 सामन्यांमध्ये बंगळुरुचा पराभव केला आहे. तसेच बंगळुरुने 12 विजयांची नोंद केली आहे.
2 / 5
गत 13 व्या मोसमात दोन्ही संघांचा 2 वेळा आमनासामना झाला. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये बंगळुरुला पराभव स्वीकारावा लागला. पंजाबने पहिल्या सामन्यात बंगळुरुवर 8 विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात 97 धावांच्या मोठ्या फरकाने विजय साकारला.
3 / 5
या सामन्यात दोन्ही संघांच्या सलामीवीरांवर सर्वांचच लक्ष असणार आहे. बंगळुरुचा देवदत्त पडीक्कल आणि पंजाबचा कर्णधार सलामीवीर या दोघांनी गेल्या मोसमात शानदार कामगिरी केली होती. तसेच या मोसमातही हे दोघे चांगला खेळ करत आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोण यशस्वी ठरेल, हे पाहण्यासाठी सर्व उत्सुक आहेत.
4 / 5
पंजाबचा आक्रमक फलंदाज गोलंदाजांचा कर्दनकाळ ख्रिस गेलवरही सर्वांचच लक्ष असेल. गेल 2011 ते 2017 दरम्यान बंगळुरुकडून खेळला होता. यादरम्यान गेलने शानदार कामगिरी केली. मात्र त्यानंतर पंजाबने गेलचा आपल्या ताफ्यात समावेश केला. त्यामुळे गेल आपल्या आधीच्या संघाविरुद्ध कशी कामगिरी करतो, याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असणार आहे.