किआ कॉर्पोरेशनने ह्युंदाय मोटर ग्रुपच्या ईव्ही प्लॅटफॉर्मवर आपली पहिली इलेक्ट्रिक कार किआ ईव्ही 6 (Kia EV6) चे डिझाइन सादर केले आहे.
Mar 16, 2021 | 7:25 AM
किआ कॉर्पोरेशनने ह्युंदाय मोटर ग्रुपच्या ईव्ही प्लॅटफॉर्मवर आपली पहिली इलेक्ट्रिक कार किआ ईव्ही 6 (Kia EV6) चे डिझाइन सादर केले आहे. ही कार या महिन्याच्या अखेरीस लाँच केली जाणार आहे.
1 / 6
किआ ईव्ही 6 इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (ई-जीएमपी) वर आधारित आहे, हा प्लॅटफॉर्म विशेषत: इलेक्ट्रिक वाहनांसाठी विकसित केला आहे.
2 / 6
कंपनीचे म्हणणे आहे की आगामी काळात या प्लॅटफॉर्मचा इतर मॉडेल्समध्येही विस्तार होईल. 2026 पर्यंत 7 इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करण्याची किआची योजना आहे. ईव्ही 6 या ऑर्डरमधील पहिले मॉडेल आहे.
3 / 6
कारचं फ्रंट पॅनल आधुनिक पद्धतीने डिझाईन करण्यात आलं आहे. ईव्ही 6 मध्ये एक शॉर्ट ओव्हरहँग आहे, असं फोटोंवरुन समजतंय. या कारची हेडलाईट बारीक असून एलईडी पॅटर्नमुले या कारला एक अनोखा लुक मिळाला आहे.
4 / 6
नवीन इंटीरियरबद्दलची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल आणि नेव्हिगेशन (AVN) स्क्रीन जी हायटेक आणि हाय डेफिनेशन क्वालिटीसह येते.
5 / 6
Kia EV6 ची बॅटरी पॉवर या कारला विशेष बनवते आणि नवीन फिलॉसफीसह या करचं डिझाइन तयार केलं आहे. कंपनी आता लवकरात लवकर अजून काही इलेक्ट्रिक व्हिकल सादर करणार आहे.