AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 39 बायका 94 मुलांचा सांभाळ, दिवसाला लागतो 100 किलो डाळ-भात, पठ्ठ्याचे लॉकडाऊनमधील जबरदस्त मॅनेजमेंट

चाना यांना 14 सुना आणि 33 नातवडं आहेत. या परिवारामध्ये बहुतांश महिला या गृहिणी आहेत.

| Updated on: May 27, 2021 | 4:34 PM
Share
मुंबई : जगातील सर्वात मोठा परिवार म्हणून भारतातील मिझोरम येथील चाना परिवाराला ओळखले जाते. या परिवाराचे जिओना चाना (Ziona Chana) हे प्रमुख असून त्यांना तब्बल 39 बायका आहेत. या बायकांपासून  चाना यांना तब्बल 94 आपत्य आहेत. संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत असल्यामुळे सध्या व्यवसाय आणि नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. लॉकडाऊनचा परिणाम चाना परिवारावरसुद्धा झालाय. याच पार्श्वभूमीवर जिओना चाना आपल्या परिवारातील 181 सदस्यांना कसे सांभाळतात याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1 / 8
जिओना चाना यांचा परिवार भारतातील मिझोरममध्ये राहतो. त्यांच्या परिवारामध्ये एकूण 181 लोक राहतात. जिओना चाना यांना एकूण 39 पत्नी असून त्यांच्यापासून त्यांना एकूण 94 आपत्य आहेत.

2 / 8
चाना आपल्या परिवारासोबत मिझोरम येथील बटवंग गावामध्ये एका 100 खोल्या असलेल्या घरात राहतात. त्यांच्या काही मुलांची लग्नसुद्धा झाली आहेत. चाना यांना 14 सुना आणि 33 नातवंडे आहेत. या परिवारामधील बहुतांश महिला गृहिणी आहेत.

3 / 8
परिवार मोठा असल्यामुळे चाना कुटुंबाचा खर्चसुद्धा चांगलाच मोठा आहे. या कुटुंबाला एका दिवसाला तब्बल 100 किलो डाळ-भात लागतो. हा खर्च फक्त दुपार आणि संध्याकाळच्या जेवणाचा आहे.

4 / 8
चिकन किंवा मटण खायचे असल्यास या परिवाराला एका वेळी तब्बल 40 किलो मांस लागते. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्यामुळे तसेच नॉनव्हेज तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत असल्यामुळे हे कुटुंब फळभाज्यांना जास्त पसंदी देते.

5 / 8
खर्च वाचावा म्हणून चाना फॅमिली घरातील अंगनातच पालक, मिर्ची, ब्रोकली अशा प्रकारच्या फळभाज्या पिकवतात. होम गार्डनिंग केल्यामुळे या परिवाराचा सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बराच खर्च वाचतो.

6 / 8
या घरातील पुरुष मंडळी शेती तसेच पशुपालनाच्या माध्यमातून पैसे कमवायचे. मात्र, सध्या लॉकडाऊनसदृश परिस्थितीमुळे यांचे रोजगार धोक्यात आले आहेत. तसेच परिवारातील पुरुष हे फळभाज्या तसेच कुक्कुटपालनही करायचे. लॉकडाऊनमुळे त्यांचा हा पर्यायसुद्धा संपला आहे.

7 / 8
अशा परिस्थितीत चाना परिवार आपला चरितार्थ नेमका कसा भागवतो हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. मात्र, चाना परिवार हा जगातील सर्वात मोठा परिवार असल्यामुळे तो सर्वांना माहिती आहे. या परिवाराला जगभरातून देणगी मिळते. याच कारणामुळे चाना परिवाराला सध्याच्या कोरोनास्थितीमध्ये कोणतीही अडचण येत नाही. एका मुलाखतीमध्ये चाना यांनी ही माहिती दिली होती. देणगी मिळत असल्यामुळे त्यांना सध्यातरी पैशांची अडचण नाही.

8 / 8
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात

हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली