तुमचं ब्रेकअप झालंय?, मग या गोष्टींपासून दूर रहा; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जेव्हा एखाद्या व्यक्तीचे आपल्या जोडीदारासोबत ब्रेकअप (Breakup with partner) होते, तेव्हा संबंधित व्यक्ती ही प्रचंड तणावात असते. मनावरील तणाव वाढल्याने तसेच तणावाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन कसे करावे हे माहित नसल्याने अनेक चुकीच्या गोष्टी आत्मसात केल्या जातात. त्यामध्ये स्मोकिंग, मोबाईलचा अति वापर, अति विचार करणे, वेळेवर जेवन न करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. मात्र या सर्व गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

Feb 18, 2022 | 10:51 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Feb 18, 2022 | 10:51 PM

स्मोकिंग : तज्ज्ञांच्या मते अनेक जण जोडीदारासोबत ब्रेकअप झाल्यानंतर व्यसनांच्या आहारी जातात. ज्यामध्ये दारू पिणे, सिगारेट ओढणे अशा गोष्टींचा समावेश असतो. मात्र अशा व्यसनाचा तुमच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो, दीर्घकाळ सिगारेट ओढल्यास तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे अशा गोष्टींपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो.

1 / 5
मोबाईलचा अधिकाधिक वापर : जोडीदारासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या किंवा त्याच्याशी संबंधित आठवणी विसरण्यासाठी अनेक जण मोबाईलचा आधार घेतात. अनेक जण तर ब्रेकअपनंतर रात्रभर मोबाईलवर व्यस्त असतात. ही सवय अतिशय घातक आहे. यामुळे तुम्हाला डोळ्यांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

2 / 5
 अति विचार करणे: ब्रेकअप झाल्यानंतर अनेक जण अति विचार करतात. मात्र अति विचार करणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारणक आहे. तज्ज्ञाच्या मते एखाद्या गोष्टीचा अति विचार केल्याने व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो.

3 / 5
एकटेपणा : ब्रेकअप झाल्यानंतर व्यक्ती एकटे राहण्यास प्राधान्य देतो. तो कोणाशीही बोलत नाही, अथवा आपल्या भावना इतरांसोबत शेअर करत नाही. मात्र असे करणे चुकीचे आहे. एकटेपणामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदारांच्या आठवणींचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांसमोर तुमचे मन मोकळे करू शकता.

4 / 5
 व्यवस्थित न जेवने :  जेव्हा एखाद्याचे ब्रेकअप होते, तेव्हा संबंधित व्यक्ती प्रचंड तणावाखाली असते. अशावेळी तणावाचे योग्य व्यवस्थापन करणे न जमल्यास व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो. अशावेळी तो कुठलीच गोष्ट वेळेवर करत नाही. मात्र जेवन वेळेच्या वेळी न केल्यास त्याचे तुमच्या आरोग्यावर अनेक दृष्परीणाम होऊ शकतात.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें